पोस्ट्स

दहशतीच्या छायेखाली

इमेज
                                                                                                  दहशतीच्या छायेखाली          विरार रोड वर नेहमीप्रमाणे वर्दळ होती. कुणी कार्यालयीन कामासाठी धावपळ करत होते, कुणी स्टेशनवर ट्रेन मिळावी म्हणून धावपळ करत होते. एक अंधारी जागा मात्र सुरक्षित होती. कुणाला सहजासहजी लक्षात येणार नाही, अशा ईमारतीत तळघरात एक व्यक्ती खुर्चीत पाठमोरी बसली होती. डोक्यावर फेल्ट हॅट व काळा कोट. हातातला सिगारेटचा पाईप मध्येच तोंडात कोंबून ती कुणाच्यातरी येण्याची वाट पाहत होती. तेवढयात अंधारात खुडबुड झाली. "जावेद, मला वाटलचं होतं तु येशील." "बॉस, प्लॅन रेडी आहे. तुम्ही एकदा ऑर्डर दिली की लगेच निघू." "गुड. ईशाद, नजीम आणि दाराला सांग तयार राहायला." " जी बॉस."     ...
इमेज
                        एक अनुभव असाही           " बीप बीप " असा कुठूनतरी आवाज ऐकु आला, आणि मन पटकन भुतकाळातील एका कटु अनुभवाकडे वळले. २०२१ मधील सप्टेंबरची ३० तारीख. मला आठवतो तो दिवस, गोपाळकाला होता त्या दिवशी. सुटटी असल्याने मी घरीच होतो. मी पंचायत समिती कुडाळमध्ये कर्मचारी असल्याने कुडाळातच भाडयाने राहत होतो. काहीतरी काम आलं म्हणून मी लगबगीने खाली गेलो, काम आटोपलं आणि वेगाने जिना चढत रुमकडे आलो. अचानक काय झालं काही कळलं नाही. छातीत प्रचंड वेदना जाणवल्या, पाठीत पण खुप दुखु लागले. कसाबसा मी खाली झोपलो , पण कळा थांबत नव्हत्या. माझी दोन्ही लहान मुलं, त्यांना काही कळालं नाही. त्यांनी माझ्या बायकोला बोलावलं, तेव्हा लगेच मला हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं.         निदान झालं, मला सौम्य ह्रदयविकाराचा झटका आला होता. माझं वय ३२. सगळेच अवाक झाले. एवढया लहान वयात हार्टअटॅक. कोणी काही, कोणी काही बोलत होतं. शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्याने मला तातडीने कोल्हापूरच्या ॲपल...
इमेज
                        उत्सवांचे बदलते स्वरुप ---------------------------------------------------------------------------------          आपला भारत एक संस्कृतीप्रधान देश आहे. वेगवेगळे सण, उत्सव व परंपरा इथे जपल्या व पाळल्या जातात. सगळे धर्म, पंथ इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. भारत देशाची उत्सवाची परंपरा फार जुनी आहे. हिंदू धर्मात प्रत्येक महिना हा वेगवेगळे सण घेऊन येत असतो. जानेवारी महिन्यात मकर संक्राती , फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्री, मार्च महिन्यात होळी, एप्रिल महिन्यात गुढीपाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया, जुन महिन्यात वटपौर्णिमा, नंतर नागपंचमी असो वा चतुर्थी आणि दिवाळी. प्रत्येक महिन्यात उत्सवांची रेलचेल चालूच असते.         प्रत्येक सणाचे स्वत:चे असे काहीतरी वेगळेपण असते, जे आपल्या संस्कृतीने जपून ठेवलेले आहे. देवांच्या जत्रा असो वा देवळातले धार्मिक कार्यक्रम हा ही उत्सवांचाच एक भाग. मकर संक्रातीला तिळगुळ देऊन वर्षभरातील गोडवा जपण्याचा संदेश दिला ...

क्रुपासिंधु

इमेज
                         ते दोघे पती-पत्नी आपली तक्रार घेऊन अक्कलकोट मध्ये स्वामींकडे आले होते. वटवृक्षाच्या बुंध्याशी बाळाप्पा स्वामींची सेवा करत होता. उजव्या कुशीवर स्वामी विश्रांती घेत होते. स्वामींचे रुप अतिशय तेजस्वी जणु आकाशी चा सुर्य. त्या दोघा पती पत्नी च्या चेहऱ्यावर एकमेकांबद्दल व्देष दिसत होता. दोघेही हात जोडून स्वामीं समोर उभे होते. स्वामींनी डोळे उघडले आणि ते उठून बसले. "स्वामी, स्वामी" करत दोघेही पुढे आले. "अरे श्रीपती क्यों आये हो इधर?" "स्वामी तुम्हाला तर माहितीच आहे, मी एवढं करतो तरी हिचं कायम माझ्याशी भांडण......" "अहाहा आणि तुम्ही काय धुतल्या तांदळा सारखे आहात काय! " मैना ही उखडली.       स्वामींनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि हसले. "श्रीपती, मैना बाई अरे बहोत टेढी चीज होती है घर गृहस्थी संभालना." स्वामी उभे राहिले. बाळाप्पा आणि ते दोघे घाबरले. स्वामी सरळ चालत झाडाकडे आले. जवळच बाळाप्पा ची कुदळ पडलेली होती, स्वामींनी ती उचलली, आणि कुदळीचा नुसता दांडा हातात घेत त्याने जमीन ख...

...............आणि जेव्हा त्याने पाहिले.......!😠😠😡

इमेज
          "  शी! काय ही घाण." आनंदराव रस्त्यावरुन जाताना बडबडत होते. सोबत त्यांची पत्नी आनंदी व मुलगा आदित्य होते. "काय बाई लोकं कशी पचापचा थुंकतायेत."आनंदी वैतागत बोलते. "पण बाबा सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर थुंकण्याला दंड असतो ना?" छोट्या आदित्यने कुतुहुलाने विचारलं. "हो पण तो नियम आपल्या देशात कोणं पाळतो? अरे इथे लोक सगळे नियम धाब्यावर बसवुन स्वतः चीच मनमानी करतात."  "शी! अहो सांभाळून चला. काय थुंकलीयेत ही लोकं. यापेक्षा जनावरे बरी." आनंदी रस्त्यावरुन कसरत करुन चालता चालता बोलते.  "या लोकांना बोलणारं कोण नाही.जनावरे तरी बरी म्हणावं लागेल."  "एकीकडे स्वच्छता स्वच्छता म्हणुन जनजागृती करायची. आणि दुसरीकडे रस्त्यावर ही घाण, सार्वजनिक बाथरुममध्ये गेलो तर कधी पाणी नसतं, तर कधी...." आनंदराव बोलत असतात. "अहो पुरे पुरे. तुम्ही सार्वजनिक बाथरुम, टॉयलेट सांगितलं खरं पण मला उलटी यायला लागलीय आता." तोंडावर हात ठेवत आनंदी बोलते. "पण बाबा हे कोणीतरी बदलायला हवं की नको." आदित्य मध्येच थांबत बोलतो. "अरे तु ...

अंधश्रद्धा

इमेज
           रितेश चं काव्याशी नुकतंच लग्न झालं होतं. काव्या दिसायला सुंदर, स्वभावाने चांगली होती. रितेश चिडचिडा होता, पण काव्यावर मनापासून प्रेम करणारा होता.        काव्याची सासु देवभोळी होती. बुवाबाजी, तंज्ञमंञ, चमत्कार असल्या भाकड गोष्टींवर तिचा विश्वास होता. लग्नानंतर काही दिवसांनी एकदा काव्याच्या पोटात दुखु लागले, तिला मासिक पाळीचा ञास होत होता. रितेशला काय यातलं माहिती नव्हतं. तो काय करणार? सासु म्हणजे रितेशची आई बडबडायला लागली. "आमच्या घराण्यात असा ञास कोणाला नाही बघ." रितेश डॉक्टर बोलवायला जात होता, तिने थांबवलं. "अरे थांब हिला बाबांकडे घेऊन जाऊया."  "कोण बाबा? कुणाचे?"  "अरे कुणाचे बाबा काय? हे आपले कुडाळ मठात आहेत ते."  "अगं तुझं काय डोकं फिरलयं का? मी डॉक्टरला बोलवतो."      काव्याची सासु रितेशला तशीच उठवते, पोट दुखत असताना आणि रितेशचं काही न ऐकता तिला रिक्षातून घेऊन जाते. रितेश गडबडीने बाहेर पडुन तिच्या मागोमाग जाऊ लागतो दुसऱ्या रिक्षेने.        बाबांचा मठ. बरेच शिष्यगण जमले...