पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

द डायरी ऑफ लोस्ट व्हिलेज

इमेज
                          आज मी लिहायला बसलो आहे, पण काय लिहायचं हा प्रश्न मनात येतो आहे. माझ्या २५ वर्षांच्या सरकारी नोकरीत मला बरेच चांगले वाईट अनुभव आले, ते मांडायचे का? पण मन भुतकाळात शोध घेऊ लागले. तेव्हा मला सापडले असे एक गाव ज्याच्याविषयी लिहावेसे वाटेल.             मी राजाराम म्हात्रे. मुंब ईत महानगरपालिकेत अधिकारी आहे. माझ्या सोबत माझे खास सहकारी दामोदर देशमुखही होते. तसं सरकारी असुनही आम्ही शक्य तेवढ्या जलद कामांचा निपटारा करत असे. एकदा आमच्या विभागात एक नवीन अधिकारी बदलून आला, सोमनाथ कुलकर्णी. अतिशय शिस्तबद्ध आणि रेखीव काम व नवनवीन सुधारणांवर त्याचा भर होता. आमचं हळूहळू त्यांच्याशी जमत होतं. त्यांच्याकडुनच समजलं की ते ज्या गावातून आले तिथे तर काम करण्याची, एवढचं काय बाकीच्या गोष्टीही जगापेक्षा भारी व वेगळ्या आहेत. त्या गावाचं नाव होतं नवेगाव.         ते गाव मुंब ई पासुन १०० एक किलोमीटर वर होतं. साहेबांकडून त्याच्याविषयी ऐकताना तिकडे एखादी सहल काढावी असा विचार मनात येत होता. पण आमच्या विभागात कामाचा उबगच एवढा होता, की तो विचार कोणालाच परवडणारा नव्हता. एक दिवस आमच्या विभागातले