पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
                    मेघमल्हार- एक रांगडी प्रेमकहाणी नमस्कार वाचकहो! मी आज एक नवीन प्रेमकथा सुरु करणार आहे. ही कथा आहे नात्यातल्या ओलाव्याची , बहरणाऱ्या प्रेमाची. मेघना- मल्हारची. एक रांगडेपण , एक स्वच्छंदीपण आणि एक विश्वासघात........! ----------------------------------------------       सातारा जिल्ह्यातील कोरेगाव. सकाळची वेळ. शेठ हिराचंदानींच्या फुड फैक्टरीतील एका गोदामासमोर भरपुर गर्दी होती. एक मोठा ट्रक उभा होता , आणि गडी त्यातुन सामान उतरत गोदामात पोहचवत होते. " ए चला चला आवरा पटकन." गोदामाचा खडुस मैनेजर जळफळत होता. एक म्हातारासा गडी कसाबसा सामान उचलण्याचा प्रयत्न करत असतो , पण त्याला ते जमत नसते. " अरे ए चल लवकर. काही काम करायला नको. आयता पगार पाहिजे." म्हणत तो मैनेजर आगपाखड करत होता. तेवढ्यात एक अंगापिंडाने बळकट , भारदस्त तरुणाने त्या म्हाताऱ्याकडील सामान उचलले आणि मैनेजरच्या देखत गोदामात सामान नेऊन ठेवले. " लयी उपकार झाले बाबा तुझे." म्हातारा गडी हात जोडत बोलु लागला. मैनेजर मात्र रागाने दोघांकडे पाहत निघुन गेला. " इथं नवीन हायेस का ? कवा