...............आणि जेव्हा त्याने पाहिले.......!😠😠😡



          " शी! काय ही घाण." आनंदराव रस्त्यावरुन जाताना बडबडत होते. सोबत त्यांची पत्नी आनंदी व मुलगा आदित्य होते.

"काय बाई लोकं कशी पचापचा थुंकतायेत."आनंदी वैतागत बोलते.

"पण बाबा सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर थुंकण्याला दंड असतो ना?" छोट्या आदित्यने कुतुहुलाने विचारलं.

"हो पण तो नियम आपल्या देशात कोणं पाळतो? अरे इथे लोक सगळे नियम धाब्यावर बसवुन स्वतः चीच मनमानी करतात." 

"शी! अहो सांभाळून चला. काय थुंकलीयेत ही लोकं. यापेक्षा जनावरे बरी." आनंदी रस्त्यावरुन कसरत करुन चालता चालता बोलते. 

"या लोकांना बोलणारं कोण नाही.जनावरे तरी बरी म्हणावं लागेल." 

"एकीकडे स्वच्छता स्वच्छता म्हणुन जनजागृती करायची. आणि दुसरीकडे रस्त्यावर ही घाण, सार्वजनिक बाथरुममध्ये गेलो तर कधी पाणी नसतं, तर कधी...." आनंदराव बोलत असतात.

"अहो पुरे पुरे. तुम्ही सार्वजनिक बाथरुम, टॉयलेट सांगितलं खरं पण मला उलटी यायला लागलीय आता." तोंडावर हात ठेवत आनंदी बोलते.

"पण बाबा हे कोणीतरी बदलायला हवं की नको." आदित्य मध्येच थांबत बोलतो.

"अरे तु काय बदलणार बाळा. वर्षानुवर्षेची मानसिकता आहे ही लोकांची. आपल्या देशात नको ते खपवलं जातं, नको ते व्हिडिओ व्हायरल होतात. फालतु चर्चा होतात, तिथे ही रस्त्यावर पसरलेली घाण, स्वच्छता याबद्दल कोण पाहणार? इथे चांगल्या गोष्टींना कायम केराची टोपली दाखवली जाते.चल आपलं घर आलं." आनंदराव बोलत बोलत घरात शिरतात, मागोमाग आदित्य व आनंदी जातात. 

     आदित्य विचारात गुंततो. तसं त्याचं वय असतं १२-१३ वर्ष. पण आता त्याला ते रस्त्यावर थुंकणारे लोक, मनमानी पणा करणारे लोक आठवु लागतात. 

"छे काय करता येईल. ही माणसं का समजुन घेत नाहीत. आपला देश स्वच्छतेच्या बाबतीत खरोखरच परिपुर्ण आहे का? बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक शौचालये सुध्दा नाहीत, आहेत तीही घाणेरडी.या देशात खरोखरंच नको त्या गोष्टी व्हायरल होतात. नट नट्यांच्या चर्चा होतात, पण असल्या महत्वाच्या गोष्टींकडे कोणी पाहतही नाही." वयापेक्षा त्याचे विचार पोक्त बनलेले असतात.

"एक बाळा कसला विचार करतोयस? समोरचा नाश्ता बघ थंड होतोय." एकदम आनंदी येत त्याला सांगते.

"आई मला न खरोखरच या असल्या माणसांची किळस वाटते बघ. बाहेरचे जग बघ. कुठेही कचरा, घाण काही दिसणार नाही, पण आपल्याकडे......." 

"तु का एवढा विचार करतोयस बाळा? अरे तु एकटा काय करणार आहेस का? तु अभ्यासावर लक्ष दे बघु." आई आदित्यची पाठ थोपटत निघुन जाते. आदित्य माञ गंभीर होतो. 

     एक दिवस तो घरातुन आईने लिहून दिलेलेसामान आणण्यासाठी जात असतो. तेव्हाच काही लोक रस्त्यावर उभे राहुन पचापचा थुंकताना दिसतात. तो तसाच त्यांच्या जवळ जातो.

"अहो काका हे काय करताय?" 

     तो माणूस दचकतो.

"काय करतोय? उभा आहे दिसत नाही तुला." 

"अहो पण हे असं रस्त्यावर थुंकणं कसं दिसतं ते बघा ना. जाताना येताना बाकीच्यांना ञास होतो त्याचा." 

"तु कोण रे मला अक्कल शिकवणारा. जा तुझा शाळेचा टायमिंग झाला, शाळेत जा."ते सगळे त्याच्यावर हसतात. आदित्य खाली मान घालून परतत असतो. तेवढ्यात कोणाचातरी हात त्याच्या खांद्यावर पडतो. 

"बाबा तुम्ही?" आनंदराव सकाळीच काही कामासाठी गेलेले असतात. आदित्य ला पाहुन त्याच्याजवळ येतात.

"काय रे कुठे जात होतास बाळा?" आदित्य सामानाची यादी दाखवतो. 

"बाबा, या लोकांना मी घाण करु नका म्हणुन सांगत होतो, पण कुणी ऐकतच नाही." आनंदराव हसतात. 

"अरे ही सगळी मनमानी करणाऱ्या मानसिकतेची लोकं आहेत. आपलं तेच खरं करणार. अरे जिथे शिला की जवानी, मुन्नी बदनाम सारखी गाणी फेमस होतात. पण चांगली गाणी कोणी म्हणत, ऐकत नाहीत. जिथे रस्त्यावर घाण करणे, फुकटची गर्दी करणे, फालतु चर्चा करणे या गोष्टींना महत्त्व दिलं जातं. जिथे श्रध्देचा बाजार मांडला जातो त्या तिथे लोकं कशी सुधारणार?" आदित्य दिङमुढ होतो. 

"एक आयडिया आहे माझ्याकडे." म्हणतआनंदराव हळुच आदित्यच्या कानात कुजबुजतात. आदित्य तयार होतो. मग आदित्य आणि आनंदराव मोबाईल ने अशा घाण करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ तयार करतात. त्यांना समजवतानाचे ही व्हिडिओ तयार करतात. ते कसे समजुन घेत नाहीत, हे त्यातुन दिसत असते. 

    एक एक करत ते आपल्या यु ट्युब चैनेलवर, सोशल मिडियावर व्हिडिओ पोस्ट करतात. लाखो लोकं व्हिडिओ पाहुन त्या घाण करणाऱ्या लोकांवर संतापतात. बऱ्याच जणांना आपली लाज वाटु लागते.काही दांडगाई, मनमानी करणाऱ्या लोकांना तो आपला अपमान वाटतो. तेव्हा ते थेट आनंदरावांचे घर गाठतात. 

      रविवार चा दिवस असतो. आनंदराव आदित्यचा अभ्यास घेत असतात. आनंदी किचनमधे असते. हे लोक तणतणत येतात. 

"आमचे व्हिडिओ बनवुन हा बघ मुलाचा अभ्यास घेत बसलाय." म्हणत एकजण आनंदरावांना मारायला जातो. आनंदी किचनमधुन घाबरत बाहेर येते. 

"अहो काय करताय? सोडा सोडा त्यांना" ओरडत ती मध्ये पडते. प्रसंगावधान राखत आदित्य लगेच पोलिसांना फोन करतो. 

"आमचे व्हिडिओ बनवणार काय?" 

"मला फक्त तुम्हाला तुमची चुक दाखवायची होती, वैयक्तिक कोणतीही शञुता करायची नव्हती. अहो जगात आपण स्वच्छतेत चांगल्या क्रमांकावर आहोत म्हटलं जातं आणि तुमच्यासारखे लोक काहीच समजुन न घेता फक्त दादागिरी दाखवता." 

"ए तुझं भाषण बंद कर. आम्ही असंच वागणार." म्हणत तो माणुस पुन्हा आनंदरावांना मारायला जाणार तेवढ्यात एक पोलिस हवालदारासोबत आत शिरत त्याला पकडतो. 

"साल्या मारामारी करतोस काय रे?" ओ ओ साहेब सोडा मला. आम्ही काही नाही केलयं. अहो यानेच आमचे व्हिडिओ तयार करुन सोशल मिडियावर टाकले." 

"कसले व्हिडिओ?" पोलिस आश्चर्याने विचारतो. तेवढ्यात लपलेला आदित्य बाहेर येतो.

"मी सांगतो इन्स्पेक्टर काका." म्हणत तो बाजुला पडलेला मोबाईल उचलुन ते व्हिडिओ पोलिसाला दाखवतो.

"काका हे कुणीतरी करायलाच हवं ना? आता सांगा ही यांच्यासारखी माणसं मनमानी करत घाण करत असतील, दादागिरी दाखवत असतील तर काय करायचं. आपला देश स्वच्छतेच्या बाबतीत आग्रही आहे, तरी ही रस्त्यावर थुंकणारी लोकं, शौचालये घाण करणारी लोकं आहेतच. अहो नको ते व्हिडिओ शेअर होतात, व्हायरल होतात. तर मग चांगल्या गोष्टी व्हायरल व्हायला हव्यात की नको?" आदित्य न घाबरता एका दमात बोलुन जातो. पोलिस थक्क होऊन पाहत राहतात.आदित्यच्या पाठीवर शाबासकीची थाप देत तो पोलिस बोलतो.

"खुप चांगलं काम केलंस तु बाळा. अरे तुझ्यासारखी विचार करणारी मुले असली तर आपल्या देशात काहीतरी सुधारणा नक्की घडेल."नंतर त्या पकडलेल्या माणसाकडे वळतात.

"शिका या लहान मुलांकडून काहीतरी. नुसतं चौकात उभं राहून कुठल्या हिरोने कसले कपडे घातले, कुठली हिरॉईन काय म्हणाली.नाहीतर एक एक भंकस गाणी आणि हिडीस गोष्टी करण्यापेक्षा असं काहीतरी करा." त्या माणसाची मान खाली जाते. पोलिस हवादारासोबत त्याला घेऊन निघून जातात. आनंदराव जखमी असतात, तरीही आदित्यला ऊठुन जवळ घेतात. वा! बाळा. अरे असंच न घाबरता काम कर.मग एक दिवस असा असेल की कुणालाच काही सांगण्याची गरज वाटणार नाही. सगळं चांगलं होईल." 

"अहो तुम्हाला खुप लागलयं." आनंदी आतमधुन फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते आणि आनंदरावाची मलमपट्टी करते.

"अगं या शरीराच्या जखमा तर बऱ्याच होतील, पण आपलीच, आपल्या या भारत देशातील लोकं आपली मानसिकता बदलत नाही त्या मनावरच्या जखमा कधी बऱ्या होणार?" आनंदराव भावुक होत आदित्य व आनंदीला कवेत घेतात.

------------------------------------------------------------------------


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिशक्ती

द डायरी ऑफ लोस्ट व्हिलेज

क्रुपासिंधु