पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रतिघात- द रिव्हेंज Chapter-1

इमेज
                        मुंबईतील एक चाळवजा भाग. त्या जागेत नवीन आपल्या आईसोबत राहत आहे. तो बीएस्सीच्या अखेरच्या वर्षाला आहे, आज त्याचा २१ वा वाढदिवस होणार आहे.  "नवीन, नवीन. कुठे गेलाय हा मुलगा, काय माहित?" नवीनची आई त्याला शोधत असते. "काकु तो पलिकडच्या गार्डन मध्ये बसलाय."शेजारीच गैरेजमध्ये काम करणारा सलीम बोलला. "अरे देवा! काय करु या मुलाचं?" म्हणत डोक्यावर हात मारत नवीनची आई गार्डन कडे जाते. नवीन गार्डन मध्ये बेंचवर बसुन समोर खेळणाऱ्या मुलांकडे पाहत आहे.  "नवीन तु इथे काय करतोयस? तुझा वाढदिवस आहे ना आज?" नवीनची आई जवळ बसत बोलते. "काय उपयोग आहे आई?" नवीन उदास होत दुरवर पाहत बोलतो. "म्हणजे?" नवीनची आई आश्चर्याने विचारते. "आई, आज कॉलेजमधुन घरी येताना-"         नवीन काहीसे आठवुन बोलतो.        कॉलेजकडे जाणारा भरगच्च गर्दीचा रस्ता. वाहनांचा, फेरीवाल्यांचा संमिश्र आवाज. छोटी छोटी अनाथ, गरीब मुले सिग्नलवर भिक मागत आहेत. काही लोक जाता जाता रस्त्यावर पानाच्या पिचकाऱ्या उडवत आहेत, थुंकत आहेत. नवीन शांतपणे सगळं पाहत फुटपाथवरु

ज्ञानेश्वर माऊली

इमेज
                                               "माझा मराठीचा बोलु कौतुके,परी अम्रुतातही पैजा जिंके"      ज्ञानेश्वर माऊलींनी सुमारे ७०० वर्षांपूर्वी 'भावार्थ दिपिका' ग्रंथ लिहिला. तिच ही ज्ञानेश्वरी. भगवतगीतेचे शुद्ध मराठीत निरुपण म्हणजे ज्ञानेश्वरी.         अवघ्या १५-२० वर्षाच्या कोवळ्या वयात संतपदाला पोहचलेले एक महान व्यक्तिमत्त्व. आपले थोरले बंधु निव्रुत्तीनाथ यांना गुरुस्थानी मानुन ज्ञानदेवांनी संत साहित्याचा पाया रचला. "ज्ञानदेवे रचला पाया, तुका झालासे कळस"      प्रेम दिल्याने प्रेम वाढते, पशुही माणसासारखा बोलु शकतो. नव्हे मंत्र म्हणु शकतो हे त्यांनी पैठणच्या भर सभेसमोर रेड्यामुखी वेद वदवुन सिध्द करुन दाखवले.        आपल्या रसाळ वाणीने माऊलींनी समजण्यास कठीण अशा गितेतील ओव्या सहज सोप्या भाषेत सांगितल्या. स्वतःला ते निव्रुत्तीनाथांचा दास मानत. त्यांच्या वागण्यात एक नम्रता होती. "जो जे वांछिल, तो ते लाहो प्राणिजात"       स्वतः दुःखाचे कढ पचवुन माऊली भगवंताजवळ पसायदान मागतायेत. केवढे हे दिव्यत्व!  विठ्ठलाचा साक्षात्कार झाल्यावर भक्तीत तल्लीन होणार