पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

...............आणि जेव्हा त्याने पाहिले.......!😠😠😡

इमेज
          "  शी! काय ही घाण." आनंदराव रस्त्यावरुन जाताना बडबडत होते. सोबत त्यांची पत्नी आनंदी व मुलगा आदित्य होते. "काय बाई लोकं कशी पचापचा थुंकतायेत."आनंदी वैतागत बोलते. "पण बाबा सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर थुंकण्याला दंड असतो ना?" छोट्या आदित्यने कुतुहुलाने विचारलं. "हो पण तो नियम आपल्या देशात कोणं पाळतो? अरे इथे लोक सगळे नियम धाब्यावर बसवुन स्वतः चीच मनमानी करतात."  "शी! अहो सांभाळून चला. काय थुंकलीयेत ही लोकं. यापेक्षा जनावरे बरी." आनंदी रस्त्यावरुन कसरत करुन चालता चालता बोलते.  "या लोकांना बोलणारं कोण नाही.जनावरे तरी बरी म्हणावं लागेल."  "एकीकडे स्वच्छता स्वच्छता म्हणुन जनजागृती करायची. आणि दुसरीकडे रस्त्यावर ही घाण, सार्वजनिक बाथरुममध्ये गेलो तर कधी पाणी नसतं, तर कधी...." आनंदराव बोलत असतात. "अहो पुरे पुरे. तुम्ही सार्वजनिक बाथरुम, टॉयलेट सांगितलं खरं पण मला उलटी यायला लागलीय आता." तोंडावर हात ठेवत आनंदी बोलते. "पण बाबा हे कोणीतरी बदलायला हवं की नको." आदित्य मध्येच थांबत बोलतो. "अरे तु