पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारत देश एक रुप अनेक

इमेज
                भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात सर्व धर्माचे, सर्व भाषेचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला असा हा देश आहे. सुजलाम, सुफलाम अशी आपली भुमी आहे. देशातील बहुतांश जनता ही खेडयात राहणारी आहे, आणि त्यांचा शेतीवर उदरनिर्वाह चालु आहे. देशाच्या सिमेवरील जवानांमुळे आणि शेतात राबणा-या किसानांमुळे आपला देश इतिहासात महान आहे.                आपल्या देशावर किती संकटे आली, पण त्याचा सामना आपण यशस्वीपणे करुन दाखविलेला आहे. कोरोना महामारीच्या व अशा प्रकारच्या साथरोगांच्या काळात आपले ऐक्य दिसून आलेले आहे. कोरोना काळात आपण राखलेला संयम, स्वच्छता, शांतता यापुढेही टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी असणार आहे.          लॉकडाऊनच्या नियमांचे आपण पालन केलेलेच आहे, परंतु अपवादात्मक परिस्थितीत काहींनी नियम धाब्यावर बसवून मोदींनी केलेल्या आवाहनाची गंमत उडवली. प्रधानमंत्री मोदींजीनी गच्चीमध्ये, दरवाजाच्या उंब-यावर उभे राहून टाळया वाजवणेस, थाळया वाजवणेस सांगितले, पण त्यामागचा शुध्द हेतु काहीजणांनी लक्षात घेतला नाही.               आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आह