पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ये रिश्ता क्या कहलाता है!

इमेज
 (सदर कथेचा उद्देश हा केवळ निखळ मनोरंजनाचा असुन मुळ कलाक्रुतीचा अपमान व्हावा हा नाही. तरी वाचकांनी गंमत म्हणुन या कथेचा आस्वाद घ्यावा.) "अगे बाये, ह्या वटवाघुळ खयसुन इला हा घरात?" खालच्या अवाटातली उषाची आवस करवादली( ओरडली). "अगे इला असताला खयसुन तरी. हाकल तेका." उषा "अगो दोन दिवसापासून येता मगो ता."उषाची आवस चुलीत लाकडा सारत बोलली.       उषा काय बोलाक नाय. भायर पडयेत जावन बसला. तितक्यात बाजूच्या घरातला मेघला इला. "अगो उषे, तिया हय बसलय? चल मगो'ये रिश्ता क्या कहलाता है' बघुक." "अगे बाये. होय गो होय. चल जावया. गे आये येतय हा जावन मिया." म्हणत उषा भायर पडता.      थडे समोरच्या झाडार- "च्या मारी ह्या पोराचो दोन दिवस झाले पिछो करतय, तरी माका ओळख दाखयना नाय." रामु वटवाघुळ उल्टो होवन फ्रेंडाक सांगत असता. "होय रे, तिया जसो काय मोठो हिरोच मरे. अरे ता माणुस, तिया वटवाघुळ. रिश्तो कसो जुळतलो?'" फ्रेंड. "अरे होतला बरोबर. जुळतलो आमचो रिश्तो." रामु तावातावानं बोलाक लागता. "ए राम्या ता बघ उषा जात