पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रतिघात- द ब्लड गेम Chapter 2

इमेज
   "आता ही लढाई तुझी एकटयाची आहे.......हा हा हा हा शिवमकुमार शी पंगा. बाबा........."         नवीन खडबडुन जागा होतो आणि आजुबाजुला पाहतो. ड्रॉवर मधील ते कार्ड बाजुला पडलेले असते. "तुम जाके जावेद से मिलना......" अब्दुल चाचाचा चेहरा त्याच्या समोर येतो. तेवढ्यात दरवाजा ठोठावल्याचा आवाज येतो. नवीन कार्ड खिशात ठेवुन दरवाजा उघडतो.  "सारा........" समोर साराला पाहुन त्याला धक्का बसतो. "नवीन......." सारा नवीन ला मिठी मारते.      सारा आत येते. "तु अचानक इथे कशी काय?" नवीन खुर्चीवर बसतो.  "जेव्हापासून मी युएस ला गेले, ना तुझा फोन, ना मेसेज. माझ्याकडे ही तुझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा कुठलाच ऑप्शन नव्हता. त्यातच आमच्या शेजारचे गुजराती काका, त्यांच्या टिव्हीवर हिंदी न्युज चैनेलवरुन समजलं की तुझ्यासोबत हे असं घडलं. तेव्हापासून इथे येऊन तुला शोधत होते." "काय उपयोग आहे सारा? आता तर सगळं संपलयं. राहिल्या त्या फक्त आठवणी." नवीन भावुक होतो. "असं का बोलतोयस नवीन. मी आहे ना? आपण नव्याने सुरवात करु. " सारा नवीनच्या हातावर हात ठेवते.

आठवणीतला पाऊस

इमेज
                                                                                    "पाणी झरत चाललं,वर आभाळं फाटलं                                              पावसाने पावसाला वर नभात गाठलं"           बालपणी ऐकलेले हे गाणे आजही रोमांचित करणारे आहे. वैशाख वणवा त्यात अंगावरुन ओघळणारे घामाचे ओघळ अणि अशातच वातावरणात बदल व्हायला लागतो. अंधार दाटुन येतो, आकाशात काळेकुट्ट ढग दाटीवाटी करु लागतात. जोराचा वारा वाहु लागतो, आणि कोसळणाऱ्या जलधारा धरतीला त्रुप्त करतात.        "चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती           हिरवे हिरवे प्राणकशी ही रुजुन आली पाती"       कवी मंगेश पाडगावकर यांच्या गाण्यातल्या या ओळी आठवु लागतात. अनेक कथा- कवितांमधला हा अल्लड हिरो नेमक्या वेळेलाच आपली एंट्री करत असतो. कधी सौम्य तर कधी उग्र बनुन तुटुन पडतो. मग केव्हातरी वाटते, अरे काय हा वेडा झाला की काय? सारखा कोसळतो आहे. पण कधीकधी तिन चार दिवस नोकरीवर कर्मचारी कसा दांडी मारतो तसा गायबच होतो. तेव्हा पुन्हा त्याची मनधरणी करावी लागते.         चित्रपटातील पावसाची पण खरी गंमत असते. अगदी अंधार दाटुन येतो