पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अवंतिका एक छोटीशी प्रेमकथा

इमेज
                                                                                                    अवंतिका           अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा सडा पसरलेला होता, त्याचा सुगंध वातावरणात सर्वत्र दरवळत होता. सकाळचे नयनरम्य व आल्हाददायक वातावरण होते. अशातच आपल्या टुमदार कौलारू घराच्या खोलीत उघड्या खिडकीजवळ बसून अवंतिका बाहेरचे द्रुश्य पाहत होती. खिडकीतून येणाऱ्या वार्याच्या मंद झुळकीमुळे तिचे रेशमी केस भुरुभुरू उडत होते.          सहज तिने घड्याळात पाहिले, सकाळचे आठ वाजले होते. वातावरणातील गारवा कमी झाला नव्हता. स्वयंपाकघरात भांड्यांची खुडबुड स्पष्टपणे ऐकू येत होती, आई तिथे असण्याचा तो संकेत होता. बाबा अजूनही सकाळच्या रपेटीहून आले नव्हते.          समोरच्या मेजावर तिची डायरी ठेवलेली होती. ती पाहताच तिच्या गतकाळातील स्म्रुती जाग्या झाल्या. डायरी उचलून तिने लिहायला सुरवात केली.            लहानपणापासूनच फुलपाखरा सारखी स्वच्छंद, अवखळ, हसरी होते मी. सर्वांशी प्रेमाने वागावे असे बाळकडू घरातुनच मिळाले होते. वर्गात पहिला नंबर कधी सोडला नाही.  बरोबरच खेळाचे मैदानही गाजवत होते. बाबांची लाडकी प