पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

क्रुपासिंधु

इमेज
                         ते दोघे पती-पत्नी आपली तक्रार घेऊन अक्कलकोट मध्ये स्वामींकडे आले होते. वटवृक्षाच्या बुंध्याशी बाळाप्पा स्वामींची सेवा करत होता. उजव्या कुशीवर स्वामी विश्रांती घेत होते. स्वामींचे रुप अतिशय तेजस्वी जणु आकाशी चा सुर्य. त्या दोघा पती पत्नी च्या चेहऱ्यावर एकमेकांबद्दल व्देष दिसत होता. दोघेही हात जोडून स्वामीं समोर उभे होते. स्वामींनी डोळे उघडले आणि ते उठून बसले. "स्वामी, स्वामी" करत दोघेही पुढे आले. "अरे श्रीपती क्यों आये हो इधर?" "स्वामी तुम्हाला तर माहितीच आहे, मी एवढं करतो तरी हिचं कायम माझ्याशी भांडण......" "अहाहा आणि तुम्ही काय धुतल्या तांदळा सारखे आहात काय! " मैना ही उखडली.       स्वामींनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि हसले. "श्रीपती, मैना बाई अरे बहोत टेढी चीज होती है घर गृहस्थी संभालना." स्वामी उभे राहिले. बाळाप्पा आणि ते दोघे घाबरले. स्वामी सरळ चालत झाडाकडे आले. जवळच बाळाप्पा ची कुदळ पडलेली होती, स्वामींनी ती उचलली, आणि कुदळीचा नुसता दांडा हातात घेत त्याने जमीन खणु लागले. "स्वामी हे काय करताय?&q