पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाप-मुलीचे नाते

इमेज
                                  ऊन्हाच्या निथळत्या धारात एक माणुस लोहाराच्या भात्यावर कोयत्याला धार काढत असतो. घणाचे घाव घालताना पटकन त्याचा घाव बोटांवर पडतो, असह्य वेदना तो आओठ आवळत सहन करतो, तेवढ्यात समोरून जाणारा माणूस त्याला 100 ची नोट दाखवतो, आपल्या रक्ताळलेल्या बोटांकडे पाहून तो काम सुरू करतो, कारण पा पा असे म्हणत त्याची तान्हुली पाणी बोटल घेऊन आलेली असते, ती तान्हुली हेच त्याचे जिवन असतं. –--–----–---------–----------------------------–---------------------            मुलींना ओझे समजणाऱ्या लोकांना हेच सांगु इच्छितो, की तुम्ही कामावर जाताना पाण्याची बाटली, डबा, बैग मुलगीच आणुन देऊ शकते. तुम्हांला दुखलं खुपलं तर तीच तुमचे डोळे पुसु शकते. गर्व आहे मला मी एका मुलीचा बाप आहे. प्रथा पध्दतींंमध्ये त्यांना अडकवून ठेवू नका. जी मुलांना सांभाळू शकते ती जगही पुरुषांपेक्षा उत्तम चालवू शकते, तरीही अजून त्यांच्या बद्द्ल दुजाभाव का? 
इमेज
                                             शापित सौंदर्य                         भाग-1     " अनन्या, ए बाळ अनन्या. झालं की नाही तुझं आवरुन ?" खालुन आईचा आवाज आला तशी अनन्या अंथरुणातुन दचकून उठून बसली, व आईला ओ देत म्हणाली, " आई फक्त 10 मिनिटे, आत्ता तयार होऊन आले. " आईला माहिती होते, ही दहा मिनिटे म्हणजे जवळपास एक तासभर तरी बाहेर येणार नाही, म्हणून ती सर्व आवराआवर करुन किचनमध्ये जाते.        अनन्या. अनन्या सरदेशमुख. एक हुशार, होतकरु आणि सुंदर मुलगी. आज तिचा वाढदिवस असल्याने बाहेर फिरायला जायचे असते. पण ती अजून अंथरुणातूनच उठलेली नसते, तिला आवरायला तासभर तरी लागणार हे गृहित धरुन आईने स्वयंपाकाची तयारी सुरु केलेली असते. काही वेळाने आईची हाक ऐकून अनन्या बाहेर येते. तिने आज ब्लॅक कलरचा सुरेख ड्रेस परिधान केलेला असतो. तिला पाहताच आई अलगद तिच्या जवळ येते.        " कुणाची नजर न लागो माझ्या लेकीला. चल आता अभिमान तुझी वाट पाहत बाहेरच उभा आहे. " अभिमानचे नाव ऐकताच तिच्या मोहक चेह-यावर नाजुकसे हास्य उमलते, आणि ती लगबगीने दरवाजाकडे जायला निघते. आई तिला था