पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लॅपटॉप-शोध मनाचा

इमेज
      (पडदयावरील पात्रे- तात्या,शांताक्का, पोस्टमन,जेनी, हरी, जेन (छोटा मुलगा)) ---------------------------------------------------------------------------------------------------------                                          पहिला अंक        (पडदा उघडतो, उजेडामध्ये स्टेजच्या मध्यभागी एक मध्यमवयीन गृहस्थ हातात पेन व डायरी घेऊन बाकडयावर बसलेला आहे. काहीतरी आठवून तो डायरीमध्ये लिहित आहे. दूरवरुन कुठेतरी सू सू असा वारा वाहण्याचा आवाज ऐकू येत आहे.) (स्वगत) मला आठवते, ती संध्याकाळ, जेव्हा तात्या नेहमी आम्हांला देवांच्या, क्रांतीकारकांच्या साहसांच्या, पराक्रमी पुरुषांच्या कथा सांगायचे. तात्या, माझे वडिल. स्वच्छ धोतर, वर बनियन घालुन डोक्यावर सदैव पांढरी टोपी तिरकी घालणारे. मला आजही आठवतोय तो घराचा व्हरांडा, आणि तो झोपाळा. ज्याच्यावर बसून तात्या आयुष्याचे तत्वज्ञान अगदी समजेल अशा भाषेत सांगत असत. कायम हसतमुख, सगळयांशी ओळख. नेहमी समोरच्याला मदत करण्याची तयारी. ते नेहमी म्हणायचे, " अरे हयो कोकण म्हणजे आमचो स्वर्ग आसा स्वर्ग. आम्ही सगळे त्येचे राखणदार. हया जा आपला आयुष्य आसा ना ता