मेघमल्हार- एक रांगडी प्रेमकहाणी

नमस्कार वाचकहो! मी आज एक नवीन प्रेमकथा सुरु करणार आहे. ही कथा आहे नात्यातल्या ओलाव्याची, बहरणाऱ्या प्रेमाची. मेघना- मल्हारची. एक रांगडेपण, एक स्वच्छंदीपण आणि एक विश्वासघात........!
----------------------------------------------
     
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव. सकाळची वेळ. शेठ हिराचंदानींच्या फुड फैक्टरीतील एका गोदामासमोर भरपुर गर्दी होती. एक मोठा ट्रक उभा होता, आणि गडी त्यातुन सामान उतरत गोदामात पोहचवत होते.
"
ए चला चला आवरा पटकन." गोदामाचा खडुस मैनेजर जळफळत होता. एक म्हातारासा गडी कसाबसा सामान उचलण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला ते जमत नसते.
"
अरे ए चल लवकर. काही काम करायला नको. आयता पगार पाहिजे." म्हणत तो मैनेजर आगपाखड करत होता. तेवढ्यात एक अंगापिंडाने बळकट, भारदस्त तरुणाने त्या म्हाताऱ्याकडील सामान उचलले आणि मैनेजरच्या देखत गोदामात सामान नेऊन ठेवले.
"
लयी उपकार झाले बाबा तुझे." म्हातारा गडी हात जोडत बोलु लागला. मैनेजर मात्र रागाने दोघांकडे पाहत निघुन गेला.
"
इथं नवीन हायेस का? कवा बघितलं नाही." तो म्हातारा गडी बोलत होता.
"
ए मल्हार, अरे लवकर चल. मोठ्या साहेबांनी बोलावलयं तुला." एक गडी त्याला आवाज देत बोलला. तसा वळुन मल्हार म्हणाला.
"
व्हयं व्हयं चल आलो." मल्हारने म्हाताऱ्या गड्याचा हात प्रेमाने दाबला आणि तो जाण्यासाठी वळला.
"
काय रं, कशाला बोलावलं असेल मोठ्या साहेबांनी?" मल्हार विचारत होता.
"
काय माहित? या मोठ्या लोकांचं काय खरं असतं होय?" गडी बोलतो आणि निघुन जातो. भर पावसातुन भिजतच मल्हार शेठ हिराचंदानींच्या बंगल्यासमोर पोहचला, आणि गेटमधुन पाहु लागला.
"
काय रं. कुणाला भेटायचं होतं?" गेटवरच्या वॉचमनने त्याला हटकलं.
"
अरे रामु येऊ दे त्याला आत. मीच बोलवलयं." वरच्या गच्चीवरुन मल्हारकडे पाहत हिराचंदानी बोलले. वॉचमनने गेट उघडले, मल्हार आत आला.
   
रुबाबदार पेहरावातील शेठ हिराचंदानी पायऱ्या उतरत खाली आले. अंगाचं मुटकुळं करुन मल्हार कुडकुडत बाहेरच्या पडवीत हात जोडुन उभा होता.
"
राम राम मालक." मल्हार म्हणाला.
"
तुच मल्हार पाटील ना रे?" करड्या आवाजात हिराचंदानीनी विचारलं.
"
व्हयं जी." मल्हारने मान डोलवली.
"
मल्हार. तु नवीन आहेस म्हणुन सांगतो. तु तुला दिलेली कामं करत जा. दुसऱ्याला मदत वगैरे करण्याच्या फंदात पडायचं नाही, समजलं?" हिराचंदानींच्या आवाजाला धार होती.
"
चुक झाली मालक. माफ करा." मल्हार मान तुकवत बोलु लागला.
"
हम्म. जा तु आता." हातानेच हिराचंदानीनी इशारा करताच मल्हार बंगल्यातुन बाहेर पडला.

मुसळधार पाऊस कोसळत होता. मल्हारचे वडिल दरवाजातुन बाहेर पाहत होते.
"
काय उधाण आलया पावसाला आणि ह्यो मल्हार कुठं राह्यलाय अजुन?" मल्हारची आई भाकऱ्या थापता थापता विचारत होती.
"
आगं येईल तो कामात असेल."तोच त्यांना दुरवरुन मल्हार येताना दिसतो.
"
त्यो बघ आला मल्हार." ओल्या अंगाने थरथरत मल्हार आत शिरतो.
"
काय रं भिजत का आलायेस? छत्री नव्हती का?" मल्हारची आई टॉवेल देता देता विचारत होती.
"
आगं मोठ्या साहेबांनी बोलावलं व्हत बंगल्यावर."
"
काय सांगतुया? आनं कशापायी?" चुना मळता मळता मल्हारच्या बाबांनी विचारले.
     
मल्हार काही वेळ गप्प झाला.
"
काय रं?"
"
आज पहिला दिस ना माझा, साहेबांनी नेटानं काम कर सांगायासाठी बोलावलं होतं." मल्हार मान खाली घालत बोलतो.
"
असा गं माझा ल्योक तो." मल्हारची आई त्याची द्रुष्ट काढत बोलते.
"
लयी चांगला माणुस हाय हिराचंदानी सायेब." मल्हारच्या बाबांनी पुस्ती जोडली.
"
आये आगं गरमागरम भाकर दे ना खायला." मल्हार काकुळतीला येत बोलला.
"
वायच थांब रं, पिठलं जरा रटरटाया हवं." मल्हारची आई चुलीकडे जाते. तेवढ्यात एक गडी धावतच येतो आणि मल्हारला हाक मारतो.
"
आरं ये मल्हार, चल की लवकर. मालक बोलवाया लागले समद्याना."
"
आरं थांब की भाकर तुकडा खाऊदे त्याला.तु बी ये की." मल्हारची आई बाहेर येत बोलते.
"
नाय नगं, पुन्ह्यांदा कधी. मल्हार चलतुया नव्हं?" गडी ओरडत होता.
"
चल येतु." मल्हारने हात धुतले आणि तो बाहेर पडला.
    
दोघं डोक्यावर छत्री नीट सांभाळत लगबगीने येतात. तेवढ्यात एक आलिशान कार फाटकातुन आत येते, मागोमाग दुसरी कार येते.
"
चला चला सगळे. साहेब आले." मैनेजर सुचना देतो. सगळे गडी हात जोडुन उभे राहतात.
    
हिराचंदानी साहेब खाली उतरतात. दुसऱ्या कारचा दरवाजा उघडला जातो आणि एक सुंदरशी तरुणी पाठमोरी होत त्यातुन उतरते. तिचे आईवडील आणि बहिणही उतरतात. ती सुंदर तरुण मुलगी कंपनी न्याहाळत असते.
"
ये ये रावबहादूर, आत चल." हिराचंदानी रावबहादूर साठेंचा हात पकडून त्यांना आत नेत असतात. सगळे आत जात असतात, तेवढ्यात त्या सुंदर मुलीची नजर उंचापुऱ्या, रांगड्या मल्हारवर पडते, आणि ती त्याला पाहत खिळुन राहते.
"
मेघना, अगं चल ना लवकर. का थांबलीस तिथे?" तिची बहिण अन्वेषा ओरडली. मेघना पुढे जाऊ लागली, पण तिचे मल्हारवरचे लक्ष हटत नव्हते. अन्वेषाने तिचा हात पकडून तिला ओढत आत घेऊन गेली.
"
चला सगळे पुन्हा कामाला लागा." मैनेजरने हुकुम सोडला. सगळे गडी पांगले.
"
तुला माहिती हाय, रावबहादूर सायेब खुप जवळचे मित्र हायेत मोठ्या सायबांचे."एक गडी मल्हारला सांगत होता.
"
असेना का, आपलं काम भलं, आणि आपण भलं, कसं?" मल्हार सामान उचलुन गोदामात ठेवु लागतो.

 हिराचंदानीचा नोकर केबिनचा दरवाजा उघडतो. रावबहादूर व हिराचंदानी आत येतात. दोघेही समोरासमोर बसतात. मेघनाला मात्र तिथे करमत नसते.
"
डैड मी बाहेर फिरुन येते."
"
ओके बेटा." मेघना अन्वेषा सोबत बाहेर येते. बाहेर येताच मोबाईल मधुन ती फोटो काढु लागते.
"
वॉव दैटस ग्रेट. व्हॉट अ ब्युटीफुल प्लेस." मेघना उत्साहाने बोलते.
"
काय यार. इट सो बोअरिंग. मला तर इथुन कधी जातोय असं झालयं."पडलेला चेहरा करत अन्वेषा बोलते.
"
तु ना आहेसच मुळी बोअरींग."मेघना हसतच तिला डिवचते.
"
काय? मी बोअरींग, मी बोअरींग?" अन्वेषा मेघनाच्या मागे धावते. तेवढ्यात मेघनाची नजर गुदामाकडे उभ्या मल्हारवर पडते. मल्हार एका गड्यासोबत ट्रकमध्ये सामान चढवत असतो.
"
मेघु..." अन्वेषा तिला हाक मारते. मल्हारचे लक्ष मेघनाकडे जाते आणि तो खाली मान घालुन काही न बोलता निघुन जातो. मेघना त्याला पाहत स्तब्ध उभी राहते.
"
कम ऑन मेघु. इथे का उभी आहेस? पलिकडे मस्त गार्डन आहे, चल ना तिकडे." म्हणत अन्वेषा तिला ओढत आपल्यासोबत नेते.
    
केबिनमध्ये मात्र रावबहादूर व हिराचंदानी एकमेकांशी हातमिळवणी करत असतात.
"
अरे जास्त नफा पाहिजे असेल तर काही फंडे वापरावेच लागतात." दोघेही हसु लागतात. तेवढ्यात मेघना आत येते.
"
ही बघ मेघना आली." हिराचंदानी बोलतात.
"
डैड, बघा ना काय मस्त फोटोज आहेत." मेघना मोबाईल मधील फोटो रावबहादूरना दाखवत असते.
"
हा कोण आहे?" प्रत्येक फोटोत दिसणारा तरुण पाहत ते विचारतात.
    
हिराचंदानी पाहतात.
"
हा होय. नवीन गडी आहे आमच्या कंपनीतला मल्हार पाटील नाव त्याचं."
"
मल्हार पाटील." मेघना मनातच कुजबुजते.
"
मेघु काय इथे बोलत बसलीयस, चल ना बाहेर." अन्वेषा हाक मारते.
"
या मुलींचं फिरणं काय संपणारे नाही, काय रावबहादूर?" हसतच हिराचंदानी विचारतात, तसे रावबहादूरही हसण्यात सामील होतात. मेघना मात्र मनातच खुश होत बाहेर येते. आकाशाकडे पाहते, काळेकुट्ट ढग भरुन आलेले असतात.
"
मल्हार......मेघनाचा मल्हार". ती कुजबुजते आणि तेवढ्यात मुसळधार पावसाला सुरवात होते. मेघना चिंब पावसात भिजु लागते, सगळे गडी लोक, अन्वेषा तिच्याकडे पाहत राहतात. दुरवर काम करणाऱ्या मल्हारचे लक्ष तिच्याकडे जाते. क्षणभर नजरानजर होते, पण तेवढ्यात अन्वेषा ओढत तिला कारमध्ये बसवते. मेघना मल्हारकडे चोरुन पाहत कारमध्ये बसते, आणि कार मुंबईला जायला निघते.
    
मेघना स्वप्नात हरवते. दुर एका दरीजवळ ती उभी आहे आणि दरीत पाहत आवाज देत आहे.
"
ओ गॉड. कुठे आहे माझा राजकुमार? मला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणारा माझा राजकुमार कुठे आहे?" जोराचा वारा वाहु लागतो, आणि घोड्याच्या टापांचा आवाज येऊ लागतो. मेघना मागे वळुन पाहते. सफेद घोड्यावर बसुन तिचा राजकुमार येत असतो. मेघना खुश होते, पण एवढ्यात तो राजकुमार तिच्यासमोर हात जोडुन उभा राहतो. मेघना अचंबित होते.
"
तु तुच माझा राजकुमार. ये जवळ ये, माझा हात हातात धरुन मला दुरच्या देशी घेऊन जा." पण तो राजकुमार काहीच न बोलता मागे वळुन घोड्यावर बसतो, आणि.....आणि निघुन जातो. मेघना त्याला पाहत राहते.
"
राजकुमार......"मेघना दचकुन जागी होते.
"
ओ राजकुमारी मेघना. तुम्ही साताऱ्यात नाही आहे म्हटलं, आणि हा तुमचा महालही नाहीये." अन्वेषा हसते, तशी मेघना लाजते व नजर वळवुन कारमधुन बाहेर पाहत राहते.

ओले केस पुसत मल्हार घरात शिरतो. संध्याकाळ ची वेळ असते.
     "
नेमका याच वक्ताला पाऊस येतो बघ." मल्हार चे बाबा बोलत असतात. मल्हार हसतच शेकोटी जवळ धग घ्यायला बसतो. मल्हार ची आई गरमागरम भाकरी आणि कांद्याचा ठेचा घेऊन येते.
      "
काय रं, आज यायला उशीर झाला?" मल्हार ची आई विचारते.
"
अगं ते सायबांचे मिञ आले व्हते रावबहादूर का कोण. सायबांनी आम्हा सगळ्यांस्नी कामं सांगितली, म्हणुन उशीर झाला बघ." भाकरीचा तुकडा खाता खाता मल्हार सांगत होता.
"
रावबहादूर म्हंजे ते मुंबयचे सायेब नव्हं?" तंबाखु मळता मळता मल्हार चे बाबा विचारत होते.
"
व्हयं व्हयं तेच." मल्हार बोलला. मल्हार चे बाबा शांत बसले.
"
आये खुप दमायला झालं बघ."मल्हार हात धुता धुता बोलतो.
"
जा वायच झोप जा." मल्हार ची आई सांगते, मल्हार आत जातो.
   
पाऊस कोसळतच असतो. बंगल्याच्या गच्चीवर बसुन मेघना पावसाला पाहत असते. राहुन राहुन सारखा तिला मल्हार आठवत असतो.
"
कोण असेल तो? माझी पुन्हा भेट होईल का?" मेघना मनातच विचार करत असते.
"
मेघना बेटा अगं केवढी राञ झालीये, आणि अजुन तु झोपली नाहीस?" मेघना ची आई तेथे येते.
"
मौम हा पाऊसही कसा लहरी असतो ना! पण सारखा हवाहवासा वाटत राहतो."मेघना आपल्याच धुंदीत बोलत असते.
"
काय गं, आज एकदम अशी का बोलतेयस?"स्मितहास्य करत मेघना ची आई विचारते.
    
मेघना समोर येते, आणि आईचे खांदे पकडुन हसत बोलते.
"
काही नाही सहज." मेघना पळतच खोलीत जाते. आई एकटक तिला पाहत राहते.
   
दुसरीकडे मल्हार माञ शांतपणे झोपलेला असतो.
        
पहाटेची किरणे खिडकीतून अलगद येत मेघनाला जागी करतात. आळोखे पिळोखे देत मेघना ऊठुन बसते.
"
गुड मॉर्निंग." अन्वेषा हसतच खोलीत येते.
"
काय आज सकाळीच सकाळी?" मेघना आश्चर्याने हसत विचारते.
"
सरप्राइज......." अन्वेषा इशारा करते तसे मेघना चे आई बाबा आत येतात.
"
हैप्पी बर्थडे टु यू, हैप्पी बर्थडे डियर मेघु." म्हणत टाळ्या वाजवतात.
"
म्हणजे तुम्हाला माझा बर्थडे लक्षात होता तर?" हसत आई बाबांसमोर जात मेघना विचारते.
"
अगं मुलांचा वाढदिवस आई बाबांच्या लक्षात नसेल तर कोणाच्या असेल?" रावबहादूर बोलतात, आणि मेघनाच्या केसांवरुन मायेने हात फिरवतात.
"
बोल बेटा, तुला काय गिफ्ट पाहिजे आज?" रावबहादूर विचारतात. मेघना बाबांकडे पाहत राहते, पण मनात मल्हार चे विचार येत असतात. वाऱ्याने खिडक्यांची उघडझाप होत असते.
"
मेघु, अगं सांग ना." रावबहादूर विचारतात.
"
बाबा मला मुंबईला पुन्हा त्या कंपनीत जायचं आहे."मेघना सांगते.
"
काय? कंपनीत जायचं आहे?" रावबहादूर आश्चर्याने विचारतात.
    
मेघना मान डोलवते.
"
अगं पण का?"मेघना ची आई वैतागते.
"
जाऊ दे, तिला तिकडे जायचयं ना, मग ओके." रावबहादूर सांगतात.
"
, थैंक यू, डैड."म्हणत हसतच मेघना रावबहादुरांच्या गळ्यात मिठी मारते.

"मल्हार ए मल्हार आरं दिस उगवला तरी बी अजुन झोपुन हायेस व्हयं?" मल्हार चे बाबा हाक मारतात, तसा आळोखे पिळोखे देत मल्हार उठतो.
"
बाबा टायम काय झाला रं?"मल्हार डोळे चोळत बोलतो.
"
आठ वाजले की."तंबाखू मळता मळता मल्हार चे बाबा बोलतात.
"
आरर.........."म्हणत लगबगीने मल्हार उठतो, आणि तयारीला लागुन बाहेर पडतो.
"
आरं भाकर तुकडा तर खावुन जा की."मल्हार ची आई आवाज देत बोलली.
"
नगं, बांधून दे." मल्हार च्या आईने भाकऱ्या बांधुन दिल्या. मल्हार गडबडीने बाहेर पडला.
     
रावबहादूर नी दिलेल्या वचनामुळे मेघना खुश असते. ती खोलीत अधिकवेळ नुसता मेकअप करत असते.
"
मेघु, मेघु."अन्वेषा हाक मारत खोलीत येते.
"
ओफ हो!अगं किती वेळ मेकअप करणार आहेस?आपण तिकडे कंपनीत चाललोय, मुलगा बघायला नाही जात आहोत म्हटलं."अन्वेषा हसत बोलते.
"
अनु."म्हणत मेघना वळुन पाहत हसते व दोघीही बाहेर पडतात.
"
चला गं दोघी, किती वेळ तुम्हा मुलींचं?"मेघना ची आई ओरडते. दोघीही कारमध्ये बसतात. कारचा प्रवास चालु होतो. मेघनाचे मन मल्हार च्या विचारात हरवुन जाते.
      
सरतेशेवटी प्रवास करत ते साताऱ्याला कंपनीसमोर येऊन थांबतात. पावसाला सुरुवात होते. मेघना कारमधून उतरत स्वच्छंदपणे पावसात भिजु लागते. तिचे रुप एखाद्या फुलपाखरा प्रमाणे भासत असते.
"
मेघु अगं आजारी पडशील. अशी का भिजतेयस?" मेघना ची आई ओरडते. मेघना खिदळतच आईजवळ जाते.
"
काय गं, आज खुप खुश दिसतेयस?"मेघना ची आई विचारते.
"
अगं तिला तिचं गिफ्ट मिळालंय,म्हणुन खुश असणार?"मेघना चे बाबा बोलतात,आणि कंपनीत जायला वळतात.
"
बाबा,जा तुम्ही.मी आणि अनु राहतो इथे." मेघना बोलते.
"
अगं पण हा पाऊस........"मेघना ची आई बोलते.
"
अगं असु दे, राहु दे त्यांना." रावबहादूर आत जातात तशी त्यांची बायकोही आत जाते.
      
मेघना चहुबाजुला पाहत असते.
"
मेघु, अगं कुणाला शोधतेयस तु?"अन्वेषा विचारते.
"
मी बस एक मिनिटात आले."म्हणत मेघना अन्वेषाचा हात सोडत गडी उभे असलेल्या ठिकाणी जाते.
"
अरे मैडम आल्या बघ." सगळे गडी दचकुन पाहतात.
"
अं.......तुमच्यात तो मल्हार. मल्हार पाटील कोण आहे?" सगळे गडी कुजबुजतात.
"
त्यो गेलायं पलिकडच्या साईटवर." एक गडी इशारा करतो. मेघना पाहते.
"
काय काम होतं का?"एक गडी विचारतो.
"
नाही. " मेघना चुपचाप तिथुन निघते.
"
मेघु,अगं काय झालं?त्या गड्यांशी काय बोलत होतीस?"अन्वेषा तिथे पोहचत विचारते.
"
चल चल माझ्यासोबत." मेघना अन्वेषाचा हात धरत तिला ओढत नेते.
    
मेघना कंपनीच्या दुसऱ्या बाजुला पोहचते. गुदामाजवळ एका गड्या सोबत सामान ठेवताना तिला मल्हार दिसतो. मेघना गालातच हसते.
"
आरं चल आवर की पटापट."मल्हार गड्याला सांगत असतो.
"
काय रं मल्हार. ते साईडचं गुदाम कायम बंद का असतं रं?" गडी आश्चर्याने विचारतो. मल्हार मान वर करुन पाहतो.
"
मला काय माहीत? आनं तुला कशाला पायजे नसत्या चौकश्या?" मल्हार रागाने बोलतो तसा तो गडी शांत राहतो. तेवढ्यात मेघना मल्हार समोर येते. मल्हार व तो गडी परश्या चकित होत तिला पाहतात.

"हैलो माझं नाव मेघना. मेघना रावबहादूर साठे. मी तुम्हाला रोज या कंपनीत पाहते. नाव कायं तुमचं?" मेघना  समोर जात हात पुढे करते.
     
मल्हार अवाक होऊन पाहत असतो.
"
ऐ मल्हार, आरं नाव सांग की." सोबतचा गडी बोलतो.
     
मल्हार हात जोडतो.
"
म्या मल्हार. मल्हार पाटील आणि ह्यो परश्या. "
"
मल्हार." मेघना पुटपुटते आणि गालातच हसते.
"
काही कामं होतं का?" मल्हार सहज विचारतो.
"
काही काम असलं तरच भेटावं असं आहे का?" मल्हार खाली मान करतो. परश्या निघुन जातो.
"
आरं थांब की म्या बी येतोया." मल्हार ओरडतो.
"
जाऊ दे त्याला."
"
अवो पण मोठे साहेब बोलतील मला." मल्हार घाबरत बोलतो.
      "
नाही बोलणार." मेघना हसत पाहते. मल्हार बिचकतो.
"
घरी कोण कोण असतं तुझ्या?" मेघना विचारते.
"
अं....काय जी?" मल्हार दचकत भानावर येत विचारतो.
"
मी म्हटलं तुझ्या घरी कोण कोण असतं?"
"
जी मी आनं माझे आई- बाबा." मल्हार अजुनही दबकत सांगतो.
"
अरे वा! आमच्या घरला पन म्या, माझी बहिण आनं आय- बाबा असतात." मेघना तोंडावर हात ठेवत हसते. मल्हार बावरतो.
      
तेवढ्यात अन्वेषा तेथे पोहचते.
"
मेघु तु इथे याच्याशी काय बोलतेयस? "
"
आ गयी कबाब मे हड्डी." मेघना स्वतः तच पुटपुटते.
"
अगं एवढी मोठी कंपनी बघायची सोडुन तु इथे का आलीयेस अनु?" मेघना वरचेवर हसत विचारते.
"
ओफ हो म्हणजे तुला याच्याशी बोलायचं होतं म्हणून मला कटवु पाहतेयस होय?" अन्वेषा मेघनाला डोळा मारते.
     
मल्हार खाली मान घालून निघून जात असतो.
"
मल्हार.........."मेघना हाक मारते.
      
मल्हार मेघना कडे पाहतो. मेघना त्याला पाहत राहते. एकाएकी पाऊस कोसळु लागतो.
      
अन्वेषा मेघनाचा हात पकडुन तिला नेऊ लागते. मेघना माञ जातानाही मल्हार कडेच पाहत असते.
       
राञीची वेळ. हिराचंदानींच्या फार्म हाऊसमध्ये मेघना एकटीच गच्चीवर उभी असते. तिला मल्हार शी झालेली पहिली भेट आठवत असते. थंडगार हवा वाहत असते, तिचे केस भुरुभुरु उडत असतात.
     "
मल्हार....." मेघना गालातच हसते.
"
मेघु....." रावबहादूर मागुन आवाज देतात, तशी मेघना वळुन पाहते.
"
अगं तिथे का उभी आहेस ये आत ये." मेघना आत येते.
"
मला माफ कर बेटा लगोलग मुंबई ला परतुन आपल्या घरी तुझा मोठा वाढदिवस करायचा होता पण......."
"
इट्स ओके पापा. तुम्ही मला रियली खुप मोठं गिफ्ट दिलयं आज." मेघना हसते.
"
मला माहित नव्हतं तुला कंपनी ची एवढी आवड आहे?" रावबहादूर हसतात.
"
ओ रियली पापा बट ती तुमची." मेघना रावबहादूर च्या गळ्यात मिठी मारते.

बाहेरच्या पडवीत खांबाला टेकून मल्हार बसलेला असतो. त्याच्या डोळ्यासमोर मेघनाचा चेहरा येत असतो. मल्हार चे बाबा तेथे येतात.
"
काय रं मल्हार, आरं हितं का बसलायेस?"
"
काय नाय बा, ते सहज झोप येत नव्हती म्हणून बसलेलो."
"
का रं? कंपनीत काही झालयं का?" तंबाखू चार बार भरता भरता मल्हार चे बाबा विचारतात.
"
काय होणार हाय?" म्हणत मल्हार उठतो आणि आत निघून जातो.
       
पहाट होते. मेघना बेडवरून उठत उगवणारा सुर्य पाहत असते.
"
अरे वाह!आज एवढ्या सकाळीच?"मेघना ची आई आत येत विचारते.
       
मेघना मंदस्मित करते. आई मेघना जवळ येते.
"
आई काही दिवस इथेच राहता येणार नाही का?" अस्वस्थ पणे मेघना विचारते.
"
का गं? काही काम होतं का?" मेघना ची आई आश्चर्याने विचारते.
        
मेघना ला पुन्हा मल्हार आठवु लागतो.
"
अगं बाबांचा केवढा बिझनेस आहे तुला माहितच आहे. तेव्हा जास्त दिवस इथे राहुन कामं होणार नाहीत."
    
मेघना उदास होते.
"
काय बोलणी चाललीयत माय- लेकीची?" रावबहादूर खणखणीत आवाजात विचारत आत येतात.
"
अहो आपल्या मेघु ला सातारा खुप आवडलेलं दिसतयं." मेघना ची आई हसत हसत बोलते.
"
हो? मग राहुया अजुन चार दिवस." रावबहादूर बोलतात. मेघना चा चेहरा उजळतो.
"
रियली?" मेघना उत्साहाने विचारते. रावबहादूर हसतच मान डोलवतात.
"
थैंक यु डैड." मेघना खळखळत बाहेर जाते.
"
ही एवढी का खुश आहे?"मेघना ची आई आश्चर्य व्यक्त करते. रावबहादूर नकारार्थी मान हलवतात.
        
मल्हार एकटक समोरच्या भाकरीकडे पाहत निश्चल बसुन असतो.
"
आरं ये मल्हार. अरे खा की भाकर. कसला इचार करतोयस?" मल्हार ची आई विचारते.
"
माय आपली एवढी मोठी कंपनी समदीकडं माणसांचा राबता पन पलिकडचं गुदाम माञ कायम बंद, असं का?"
"
आरं असलं बंद. मोठ्या लोकांच्या गोष्टी तुला कशाला पायजे रं?" मल्हार चे बाबा डाफरतात. मल्हारच्या मनात मेघना चा विचार असतो. भाकर खाता खाता त्याला ठसका लागतो.
"
आरं हळु. आसं काय कुञा मागं लागल्यावानी खातुस?" मल्हार ची आई पाण्याचा ग्लास पुढे करत बोलते.  मल्हार पाणी पितो आणि उठतो.
       
मल्हार कंपनीत येतो. गुदामाजवळ खुप गर्दी जमलेली असते. मैनेजर एका गड्यावर ओरडत असतो.
"
काम करायला नको आणि फुकट पगार घेता का रे?" रागाने मैनेजर बाजूला पडलेली वेताची छडी गड्यावर उचलतो तेवढ्यात मेघना वरचेवर त्याचा हात पकडते.
"
मैडम....." मैनेजर ओरडतो.
"
चुक झाली तरी तो एक माणुस आहे, हे विसरताय तुम्ही."
"
मैडम तुम्हाला कळत नाही.या लोकांशी हे असंच वागलं पाहिजे." मैनेजर दात ओठ खात बोलतो.
"
तुम्ही यांना काही केलतं, तर काकांना सांगेन."मेघना निर्वाणीचं बोलते. मैनेजर जळफळाट करत निघून जातो. दुरवरुन मल्हार ने हे सगळं पाहिलेलं असतं. मल्हार समोर येतो. मल्हार मेघना ची नजरानजर होते. मल्हार खाली मान घालत निघून जात असतो.
"
मल्हार........" मेघना हाक मारते. मल्हार थबकतो आणि वळुन पाहतो.
"
नात्यात प्रेमाचा ओलावा असला की लहान मोठेपणा उरत नाही." मेघना शांतपणे बोलत निघून जाते. मल्हार चकित होत तिला पाहत राहतो.

 मेघना ने मैनेजरला गड्यावर हात उगारताना रोखल्या ची बातमी कुठुनतरी हिराचंदानी व रावबहादूर पर्यंत पोहोचते.
        
मेघना बंगल्यावर पोहोचते, तेव्हा रावबहादूर तिला हटकतात.
"
मेघना थांब. मला बोलायचं आहे तुझ्याशी." मेघना थांबते, तसे रावबहादूर जवळ जातात.
"
मेघना तु आज कंपनीच्या मैनेजरचा हात रोखलास?" रावबहादूर च्या आवाजात जरब होती.
"
मी काही चुकीचं नाही केलयं डैड." आत्मविश्वासाने मेघना बोलते.
"
हे बघ बेटा, अगं हे गडी, शिपाई आपल्या हाताखाली काम करतात. त्यांच्याशी कडक वागावं लागलं तर त्यात चुक काय?"
"
डैड चुकताय तुम्ही. उलट या लोकांना प्रेम दिलं, आपुलकी दिली तर ते खुप प्रामाणिकपणे वागतात."मेघना च्या नजरेसमोर मल्हार येत असतो.
"
जशी तुझी मर्जी. पण तुझ्या काकांचं मन दुखावेल असं काही वागु नको हं." रावबहादूर बाहेर निघून जातात.
     
कंपनीत ड्युटी वर काम करत असताना मल्हार लाही सारखा मेघनाचा च भास होत असतो.
"
नात्यात प्रेमाचा ओलावा असला की लहान मोठेपणा उरत नाही." त्याला सारखे ते वाक्य ऐकु येत असते.
"
मल्हार ए मल्हार." परशा गडी हाका मारत असतो. मल्हार भानावर येतो.
"
काय रं कुठं हरवलायस? मैडमांचा इचार चालु होता वाटतं. "परश्या हसत विचारतो.
"
गप रं उगा काय बी." मल्हार पुन्हा कामाला लागतो.
     
तेवढ्यात मागाहून कोणीतरी खाकरते. मेघना आलेली असते, ती हळुच इशारा करत परश्या ला तिथुन कटवते.
"
आरं खाकरतोय कशापायी? पन खरं सांगु परश्या मैडमांनी जे केलयं ते लयी बेस्ट केलं बघ."मल्हार पुन्हा कामाला लागतो. मेघना खाकरते.
"
आरं तुझ्या......"मल्हार मागे वळतो आणि मेघनाला पाहताच स्तब्ध राहतो.
"
सो मिस्टर मल्हार पाटील. तुमच्यात अशी मागाहून स्तुती करतात का?" मेघना हसते.
"
नाय ओ ते मी आपलं परश्या ला सांगत होतो......" मेघना पटकन मल्हार चा हात पकडते. मल्हार बोलायचा थांबुन मेघना कडे पाहत राहतो, पण नंतर भानावर येतो.
"
अरे किती घाबरलास? मला वाटलं मी तुला पळवुन न्यायला आले की काय?"मेघना तोंडावर हात ठेवून हसते. मल्हार हसणाऱ्या मेघना कडे डोळे भरून पाहत राहतो.
      
मेघना हसायची थांबते. मल्हार माञ तिच्यात हरवलेला असतो. मेघना त्याच्या नजरेसमोर चुटकी वाजवते.
"
काय! सुंदर मुलगी बघितली नाही वाटतं?"
       
मल्हार खाली मान घालत जाऊ लागतो.
"
थांब मल्हार." मल्हार ची पावले अडखळतात.
"
मल्हार कुठलंही नातं अधिक जवळ गेल्याशिवाय नाही समजत. मला आस आहे एका नव्या नात्याची." मेघना मंद श्वास घेत बोलते. मल्हार मागे वळुन तिला पाहतो, आणि ढगांचा गडगडाट होत पाऊस कोसळू लागतो.
       
मल्हार निघून जातो. मेघना भावुक होत त्याला पाहत राहते.
       
मल्हार आपल्याच विचारात हरवुन बसलेला असतो.
"
कुठलंही नातं अधिक जवळ गेल्याशिवाय समजत नाही." सोसाट्याचा वारा आणि पाऊस कोसळतच असतो. मल्हार चे मन प्रेमाच्या जाणिवेने चिंब भिजत असते.
      
दुसरीकडे मेघना ही पुस्तक वाचता वाचता मल्हार चाच विचार करत असते. अन्वेषा तेथे येत तिच्या नजरेसमोर चुटकी वाजवते.
"
ओ राणीसाहेब, किसकी ख्यालो मे खोयी हो?"
     
अन्वेषा हसते.
"
अनु किती सुंदर असतात ना काही नाती?हळवी, प्रेमळ हवीहवीशी वाटणारी." वाऱ्याची एक मंद झुळुक आत येते. मेघना गालातच हसते.
"
ओह हो, तो ये बात है? अब तुम्हारे ख्यालो मे वो आने लगे हैं."
   
अन्वेषा तोंडावर हात ठेवून हसु लागते.
"
शट अप यार. अजुन कशातच काही नाही आणि तु......" मेघना बेडवरून उठते.
"
अगं तु त्याला कमरेवर हात ठेवून ठणकावलं असशील, बोल तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही?"अन्वेषा हावभाव करुन दाखवते.
      
मेघना"चक" करत जाऊ लागते.
"
ओके ओके मग मी जाऊ का समजावायला जिजुंना? त्यांना म्हणेन जिजु प्लीज माझ्या ताईला हो म्हणा." अन्वेषा हात जोडत हावभाव करत बोलते.
"
अनु.....काय गं तुझं सारखं? पण डोन्ट वरी त्याने आता नाही म्हटलं असलं तरी उद्या तो हो म्हणेलच. मी त्याच्या नजरेत प्रेम बघितलयं."
        
मेघनाला पावसात भिजतानाचा मल्हार आठवतो.

मल्हार ची चुळबुळ चालु असते. सारखं त्याला मेघना चं बोलणं आठवतं असतं.
"
मैडम खरचं माझ्यावर प्रेम करत असतील का? " मल्हार विचार करत असतो.
"
नाय नाय. त्या किती मोठ्या, श्रीमंत घरच्या मैडम आनं म्या साधा गडी. त्या कशाला प्रेम करतील माझ्यावर?" मल्हार स्वतः तच विचार करत बाहेरच्या पडवीत बसुन राहतो.
        
तेवढ्यात त्याला खिडकीतून कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही संशयास्पद माणसं वावरताना दिसतात.
"
एवढ्या रातच्याला ही कोणं माणसं हायेत?"मल्हार आश्चर्याने उठतो, आणि बाहेर जातो.
"
जाऊन पाहु का?" मल्हार विचार करतो, आणि चुपचाप त्यांचा पाठलाग करत करत कंपनीकडे येतो.
"
आयला गेले कुठं?" मल्हार ची नजर कायम बंद राहणाऱ्या गुदामाकडे जाते, त्याचा दरवाजा थोडासा उघडलेला असतो.
"
गुदामाचा दरवाजा कुणी उघडला असलं?"मल्हार पुटपुटतो, तेवढ्यात त्याला खालच्या मातीत काही चमकत असलेलं दिसतं. तो खाली वाकून ती वस्तू हातात घेतो.
"
ही कुडी?" मल्हार पुटपुटतो. त्याला आठवतं मेघना च्या कानात अशीच कुडी होती.
"
मैडमांची कुडी?" तो आश्चर्याने पुटपुटतो. वर उभा राहत तो ती कुडी खिशात ठेवत मागे परततो.
         
दुसरा दिवस उजाडतो. मेघना अजुन उठलेली नसते. आई तिच्याजवळ जाते.
"
मेघु ए मेघु. अगं उठ लवकर आपल्याला मुंबई ला परत जायचयं माहित्येय ना?"
      
आळोखे पिळोखे देत मेघना उठते.
"
गुड मॉर्निंग ममा!"हसतच मेघना बोलते.
"
गुड मॉर्निंग!अगं चल बसुन काय राहिलीस? आपल्याला जायचं आहे मुंबई ला."
       
मेघना आईचा हात धरते. आई चकित होत तिला पाहते.
"
मौम आपण अजून दोन दिवसांनंतर गेलं तर नाही का चालणार?" मेघना उदास होत बोलते. मल्हार तिच्या नजरेसमोर येत असतो.
"
काय गं सातारा खुप आवडलयं वाटतं?"मेघनाची आई हसतच बोलते.
"
काय आवडलं म्हणताय माझ्या लेकीला?" रावबहादूर खोलीत येतात.
"
अहो तिला म्हणे अजुन दोन दिवस राहायचं आहे इथे."
"
का? " रावबहादूर विचारतात.
"
डैड, मला इथं खुप चांगलं वाटतयं. इथला परिसर, इथली माणसं......." वाऱ्याचा एक झोत येतो. मेघना मल्हार ची आठवण येताच हसते.
"
अगं हो बाळा. पण तुला माहित्येय ना, आपला केवढा मोठा बिझनेस आहे तो? जायला तर हवंच." रावबहादूर बोलतात.
     
मेघना काही काळ विचार करते.
"
डैड मी आलेच." मेघना बेडवरून उठत बाहेर पडते.
         
मेघना गडबडीने चालत कंपनीकडे येते. तिची नजर भिरभिरत मल्हार ला शोधत असते. एके ठिकाणी बरेच गडी जमलेले तिला दिसतात.
"
म.......मल्हार!"मेघना विचारते.
"
मल्हार?त्यो तर नाय आला आज." एक गडी सांगतो. मेघना उदास होते.
"
पन तुम्हाला त्याला भेटायचं असलं तर त्या तिथुन जावा. अगदी पाच मिनिटांच्या वाटेवर घर  हाय त्यांचं."गडी इशारा करुन सांगतो. मेघना लगबगीने त्या वाटेने जाऊ लागते. मल्हार चा चेहरा डोळ्यासमोर दिसत असतो.
      
मेघना मल्हार च्या घरासमोर पोहोचते. अंगणात ती उभी असताना मल्हार ची आई तेथे येते.
"
काय वं, काय पाहिजे होतं?" ती मेघनाला विचारते.
"
म..... मल्हार चे घर हेच आहे ना?"
"
व्हयं हेच घर हाय.पण तुम्ही कोण? आणि कशापायी भेटायचं हाय तुम्हाला?"
"
मी मेघना. मेघना रावबहादूर साठे. हिराचंदानी माझे काका आहेत."
       
मल्हार तेवढ्यात मेघनाला पाहुन दरवाजाआड लपुन राहतो.
"
अरं बापरं, मैडम हितं?"तो पुटपुटतो. मल्हार ला दरवाजाआड लपताना मेघना ने पाहिलेले असते.
"
लयी मोठ्या घरच्या हायत की तुम्ही मैडम? थांबा म्या बोलवते मल्हार ला." मल्हार ची आई वळते.
"
थांबा आई." मेघना तिला थांबवते.
"
मल्हार मला माहित आहे की तुझं माझ्यावर ही तेवढंच प्रेम आहे. पण तु घाबरतोयस की एवढ्या मोठ्या घरातली मुलगी श्रीमंत मुलगा सोडुन तुझ्या प्रेमात का पडली? पण मल्हार अरे प्रेमाला धर्म, जात पात, लहान मोठेपणा असं काही नसतं रे. प्रेम हे प्रेमच असतं." मेघना भावुक होते.
     
डोळे पुसत ती पुढे बोलु लागते.
"
मल्हार आज मी निघून जातेय मुंबई ला. माहित नाही परत आपली भेट होईल की नाही ते. पण कदाचित खुप उशीर झालेला असेल." दरवाजा आड लपलेला मल्हार हपापतो, खिशातील कुडी काढून तो न्याहाळुन पाहतो. त्याला त्याची व मेघना ची पहिली भेट आठवते. प्रेमाची भावना उचंबळुन येते.
    
मेघना जाण्यासाठी वळते. तेवढ्यात मल्हार बाहेर येतो.
"
मैडम......." मल्हार आर्त हाक मारतो. मेघना ची पावले अडखळतात, ती मागे वळुन पाहते. मल्हार तिच्याकडेच पाहत असतो. तो हळुच आपले बाहु फैलावतो, आणि धावतच जात मेघना त्याच्या मिठीत बद्ध होते. युगायुगाचा विरह असल्यासारखे ते दोघे समोर आई उभी आहे हे ही विसरलेले असतात.
"
आरं मी हाय म्हणं समोर." मल्हार ची आई हसत बोलते, तेव्हा तिघेही हसु लागतात. एवढ्यात मेघनाचा मोबाईल वाजतो. मेघना मोबाईल कानाला लावते.
"
हैलो मेघु अगं कुठं आहेस तु? डैडी वाट बघतायेत." अन्वेषा फोन ठेवते.
     
मेघना मोबाईल ठेवत मल्हार कडे पाहते. तिचे डोळे भरलेले असतात. मल्हार ला ती नजर सहन होत नाही, पण धीर करुन तो बोलतो.
"
जावा तुम्ही मैडम. मी वाट पाहेन तुमची." मल्हार बोलतो.
"
मल्हार एकदाच मेघना म्हण मला." भावुक पणे मेघना बोलते. मल्हार चकित होत पाहत राहतो, आणि मुसळधार पावसाला सुरुवात होते. दोघे एकमेकांना पाहत राहतात.
"
मेघना.........."मल्हार भावुक होत बोलतो. मेघना मल्हार चा हात सोडवत मागे वळते आणि तशीच चालु लागते. मल्हार रडवेला होत तिच्या पाठमोऱ्या आक्रुती कडे बराच वेळ पाहत राहतो.

मल्हार ला भेटुन  उदास होत मेघना परत येते.
"
अगं चल चल कारमध्ये बस. कुठे होतीस एवढा वेळ?" मेघना ची आई विचारते. मेघना वळुन मल्हार च्या घराकडे जाणाऱ्या वाटेने पाहते, आणि कारमध्ये बसते.
       
दुसरीकडे मल्हार मेघना ची कुडी न्याहाळत उभा राहतो.
       
मेघना व मल्हार एकमेकांपासून दुर होतात. त्यांची बैचेनी वाढत जाते. हिराचंदानी व रावबहादूर ची माञ गुप्त खलबते चालु असतात. काहीवेळा प्रत्यक्ष परस्पर भेटुन, फोन वरुन त्यांची संभाषणे चालु असतात.
       
एके रात्री मल्हार आपल्याच विचारात बसलेला असतो. त्याला झोप येत नसते. मेघना ची भेट त्याला आठवत असते.
"
लवकर या मैडम......."मिठी सोडवताना चे त्याचे शब्द त्याला आठवत असतात. एवढ्यात खिडकीतून त्याला दिसते की लपुनछपून कोणीतरी कंपनीकडे जात आहे.
   
मल्हार बाहेर येतो.
"
कोण हाय?" मल्हार मोठ्याने विचारतो, पण तो माणुस चेहरा लपवत पळ काढतो.
"
आरं........" मल्हार त्याचा पाठलाग करतो, आणि कंपनी जवळ येतो. बंद गुदामा चे दार उघडे असते.
"
आज जे काय हायं, ते समजेलच."मल्हार त्या गुदामात घुसतो. गुदामात बरेच मोठे मोठे बौक्स ठेवलेले असतात. मल्हार संथ पावलांनी अंधारातुन पुढे येत बौक्समागे लपतो. खाली दोन माणसे आपापसात बोलत असतात.
"
आज खुप मोठा फायदा होणारेय बघ." एकजण बोलत असतो.
"
व्हयं. साहेबांनी खुप मोठं डिल मिळवलं आज. चल कामाला लागु." मल्हार न्याहाळुन पाहतो, ते दोन गडी आपल्याकडील पाकिटे फोडुन त्या प्रत्येक बौक्समधल्या खाद्यपदार्थ बनवण्याच्या कच्च्या मालात मिसळतात. मल्हार चे डोळे विस्फारतात.
"
म्हणजे हे समदं चाललंय तर इथं." मल्हार दबक्या पावलांनी तिथुन सटकतो.
       
विचार करत करतच तो घराजवळ येतो. समोर त्याचे बाबा उभे असतात.
"
काय रं, एवढ्या रातच्याला कुठं गेला व्हतास?"
      
मल्हार काही न बोलता घरात जात असतो.
"
आरं बोल की."
"
काय नाय, सहज झोप येत नव्हती म्हणून फिरुन आलोय बघा." मल्हार जड मनाने बोलतो.
       
मल्हार चे विचार चक्र वेगाने फिरु लागते.
"
काय करावं, साहेबास्नी सांगावं का?" मल्हार विचार करत असतो, पण त्यावेळी त्याच्या नजरेसमोर सारखा मेघनाचा चेहरा येत असतो.
      
इकडे मेघना ही उदास होत चुळबुळ करत असते. तशीच ती ऊठुन बेडवर बसते. मनात मल्हार चे विचार येत असतात.
"
सो माय चार्मिंग प्रिन्स. आता राञी ही माझ्या स्वप्नात मला ञास देणारेयस का?" मेघना आपल्यातच बोलते आणि लाजत हसते. तेवढ्यात तिला गच्चीवरुन कोणाचातरी बोलण्याचा आवाज ऐकु येतो.
"
एवढ्या राञी, गच्चीवर कोण आहे?" मेघना तशीच बेडवरून खाली उतरते आणि अंधारातुन वाट काढत गच्चीवर पोहोचते. गच्चीचा दरवाजा उघडा असतो, ती पुढे जाणार तेवढ्यात रावबहादूर च्या हसण्याचा आवाज तिच्या कानी पडतो.
"
अरे आजकालच्या जमान्यात भेसळ हाच एकमेव जास्त नफा मिळविण्याचा फंडा आहे. अरे तुझ्यासोबत राहुन मला हा फंडा शिकायला मिळालाय." रावबहादूर हसत मोबाईल वर बोलत असतात. तेवढ्यात हलक्याशा आवाजाने ते मागे पाहतात, मेघना उभी असते. मेघना घाबरलेली असते, पण चेहऱ्यावर काही न दाखवता ती बोलायला सुरुवात करते.
"
डैड, तुम्ही एवढ्या राञी इथे?"
        
रावबहादूर ऊठुन उभे राहतात.
"
हां, ते बिझनेसचं काम खुप वाढलंय ना म्हणुन जरा.........पण तु काय करतेयस?"
     
रावबहादूर विषय बदलण्याचा प्रयत्न करतात.
"
हां ते मला झोप येत नव्हती म्हणून म्हटलं गच्चीवर जाऊ."
      
रावबहादूर मान डोलवतात. मेघना आश्चर्याने त्यांना पाहत असते.
"
अगं काय पाहतेयस माझ्याकडे? अगं खरचं कामचं करत होतो इथे."
      
मेघना खोटी खोटी चेहऱ्यावर हास्य आणत मान डोलवते.
"
आता खाली चल, खुप राञ झालीयं ना? " रावबहादूर मेघना चा खांदा थोपटत कावरे बावरे होत तिथुन खाली जातात. मेघना काही वेळ स्तब्धपणे उभी राहते.
"
नक्की काय चाललंय डैडचं?" मेघना आपल्यातच पुटपुटते.
"
मेघु........." रावबहादूर हाक मारतात तशी गडबडत मेघना गच्चीवरुन खाली जाते.

 मल्हार एकटाच उदास बसुन असतो. तेवढ्यात त्याचे बाबा तिथे येतात.
"
काय रं, एवढा उदास का दिसतोया?"
"
नाय काय नाय." मल्हार बोलतो. तेवढ्यात मल्हार ची आई त्याला गरमागरम भाकरी व मिरचीचा ठेचा वाढते. पण मल्हार चे माञ भलतीकडेच लक्ष असते.
"
आरं बाबा, काय झालं? काही खात पित बी नाही तु?" मल्हार ची आई विचारते.
"
काय नाय आये. भुक नाहीये." मल्हार बोलतो. मल्हार चे बाबा व आई त्याच्याकडे पाहत राहतात. तो मुकाट्याने भाकरी-ठेचा खाऊ लागतो, पण एकाएकीं त्याला ठसका लागतो.
"
आरं दमानं." मल्हार ची आई पाण्याचा ग्लास पुढे करते. मल्हार समोर मेघना चा चेहरा येतो.
       
दुसरीकडे झोपेत असलेली मेघना जागी होते.
"
मल्हार.........." ती दचकते आणि आजुबाजुला पाहते. घड्याळात पाहते. सकाळचे नऊ वाजुन गेलेले असतात. मेघना ची आई आतमध्ये येते.
"
काय गं, झाली सकाळ? अगं किती वेळ उठायला?" जवळ जात ती मेघनाच्या डोक्यावरून हात फिरवते. मेघना माञ मल्हार चा विचार करत असते.
"
मौम, आपण पुन्हा साताऱ्याला केव्हा जाणार आहोत?"  मेघना हळुवारपणे विचारते.
"
का गं? आजकाल तुला सातारा खुप भावलेलं दिसतयं? सारखं आपलं सातारा, सातारा." मेघना ची आई बोलते.
"
न....... नाही म्हणजे...." मेघना दबकत दबकत बोलत असते.
"
अगं घाबरतेस कशाला? मी सहजच विचारलं तुला. आणि तु यांनाच विचार ना कधी जायचं साताऱ्याला ते?" मेघना ची आई बोलते.
"
अरे आजकालच्या जमान्यात भेसळ हाच फंडा आहे प्रोफिट मिळवण्याचा.." मेघना ला रावबहादूर चे बोलणे आठवत असते, ते आठवुन ती घाबरते.
"
मेघु.....अगं काय झालं?" आई तिला मोठ्याने विचारते.
"
नाही काही नाही मौम." मेघना घाबरतच सांगते.
"
चल तर मग आवर बघु." मेघना ची आई बाहेर निघून जाते.
          
राञीची वेळ. मल्हार पडवीत गंभीर होत विचार करत असतो.
"
कंपनीत हे जे काय घडतंय ते मोठ्या साहेबास्नी ठावुक असेल काय?" मल्हार येरझारा घालत राहतो.
"
आर ये मल्हार.  आरं किती रात झाली आनं तु अजुन जागा हायेस होय?" मल्हार ची आई बाहेर येत विचारते.
"
काय नाय गं."मल्हार नजर चुकवून बोलतो.
"
हे बघ मल्हार. मी आय हाय तुझी. जे काय असलं ते समदं खरं खरं सांग."
"
आये......"
"
माझी शपथ हाय तुला."मल्हार ची आई मल्हार चा हात आपल्या डोक्यावर ठेवते. मल्हार समोर पेच पडतो, पण इलाज नसतो. तो कंपनीत घडत असलेले प्रसंग सविस्तर सांगतो. ते सांगताना ही मल्हार च्या नजरेसमोर मेघना चा हसरा चेहरा येत असतो. मल्हार कडुन सगळी हकीकत ऐकून मल्हार च्या आईचा हात तोंडावर जातो.
"
आरं माझ्या बाबा. हे समदं असं घडतंय वाटलं नव्हतं बघ." मल्हार ची आई अवाक होते.
"
म्हणुन म्हणत व्हतो की हे समदं मोठ्या साहेबांस्नी समजाया पाहिजे ."मल्हार आत्मविश्वासाने बोलतो.
"
आरं पनं तु कशाला उगाच या सगळ्यात पडतोया? आरं तुला काही झालं म्हणजे?"मल्हार ची आई चिंता व्यक्त करत बोलते.
"
आय मला काय बी नाय व्हणार."मल्हार आईचा हात हातात घेत दाबतो.
         
इकडे मेघना गच्चीवर उभी राहुन आकाशातल्या चंद्राला पाहत असते. त्या लोभसवाण्या रुपात तिला मल्हार दिसत असतो. एवढ्यात एक तुटता तारा तिच्या नजरेस पडतो, ती डोळे बंद करुन विश मागते.
"
ओ गौड प्लीज मला माझा मल्हार भेटु दे."
"
काय विश मागितली आमच्या राणीने?" रावबहादूर मागे उभे राहत विचारतात, तशी दचकुन ती मागे वळते.
"
काय गं, घाबरलीस वाटतं?" रावबहादूर हसतात. मेघना माञ काहीच न बोलता शांत राहते. रावबहादूर समोर येतात.
"
मला माहित आहे, तु काय विश मागितलीय ती."
      
मेघना बावरल्यासारखी त्यांच्याकडे पाहत राहते.
"
अगं आणखी काय? तुला साताऱ्याला पुन्हा कंपनीत जायला मिळु दे, अशीच विश मागितली असणार." मेघना घाबरतच होकारार्थी मान हलवते.
"
तुझी विश ती माझी विश. आपण जाऊया पुन्हा कंपनीत, ठिक आहे?" रावबहादूर मेघना च्या डोक्यावर हात ठेवतात. मेघना कावरीबावरी होत खाली मान घालते.
"
चल, आता खुप राञ झालीय."
"
हम्म" रावबहादूर खाली जातात, मागोमाग मुकाट्याने मेघना ही जाते. जाता जाता सहज ती चंद्राला न्याहाळते, एक मंद हवेचा झोत येत तिच्या केसांशी लडिवाळ खेळतो. मेघना खुश होते, आणि खाली जाते.

"आज तर म्या समदं साहेबांच्या कानावर घालणार."मल्हार पुटपुटत उठतो, आणि तयारी करुन बाहेर जातो.
"
काय रं, आज एवढ्या फाटफटीला जातोयस?"चुळ भरता भरता मल्हार चे बाबा विचारतात.
"
अवो आबा आमच्या कामाला काय काळ येळ नसतो बघा." मल्हार बाहेर पडतो.
"
शी!काय हा पाऊस?आणि त्यात ही कारही बंद पडलीय." मेघना ची आई वैतागत बोलते. मेघना माञ दुरवर एकटक अस्वस्थ पणे पाहत असते, तिला सारखा मल्हार आठवत असतो. रावबहादूर मात्र सारखे मनगटी घड्याळात पाहुन चुळबुळत असतात, मध्येच ड्रायव्हर वर भडकत असतात. मेघना ला त्यांचं हे वागणं खटकत असते.
"
मौम डैड एवढे का वैतागतायेत ड्रायव्हर काकांवर?" मेघना बाजुला उभ्या आईला विचारते.
"
अगं त्यांची आज हिराचंदानी काकांसोबत महत्वाची डिल होती, पण बघ ना गाडीच बंद पडली." मेघना ची आई चुकचुकते.
"
कसली डिल असेल?"मेघना मनातच पुटपुटते. एवढ्यात कार दुरुस्त होते आणि सगळे सुटकेचा निःश्वास टाकतात.
     
दिवसभरात मल्हार ला हिराचंदानी साहेबांना भेटायलाच मिळालेले नसते. संध्याकाळी त्याला थोडी उसंत मिळते, हिराचंदानी त्याच वेळी कंपनीत आलेले असतात.
"
हीच येळ हाय, भेटुन सांगतो समदं." मल्हार जाऊ लागतो की तेवढ्यात हौर्न वाजवत रावबहादूर ची कार आत येते.
"
मैडम....." मल्हार आश्चर्याने पुटपुटतो.
कारमधून गडबडीने उतरत रावबहादूर कंपनीत जातात. मेघना माञ आजुबाजुला पाहत रेंगाळु लागते.
"
मेघु चल ना आत." अन्वेषा बोलते.
      
मेघना ला तेवढ्यात दुरवर लपुन तिला पाहत असलेला मल्हार दिसतो.
"
अनु तु जा आत, मी येते."म्हणत मेघना मल्हार समोर जाऊ लागते. अन्वेषा आत निघून जाते.
     
मंद हवेचा झोत मेघना च्या अल्लड केसांशी खेळत असतो. मल्हार ही तिला न्याहाळत राहतो. मेघना वेगाने येते, आणि बाहु फैलावलेल्या मल्हारच्या मिठीत बद्ध होते.
"
मल्हार........." मेघना शहारते.
      
मिठी सोडवत मल्हार मेघनाला भावुक होत पाहु लागतो.
"
मल्हार तुझ्या पासुन दुर राहणं नाही रे शक्य होत मला."मेघना रडतच बोलते.
"
आवो खरं प्रेम असंच असतं बघा, मला बी चैन पडत नव्हती तुमच्याविना."मल्हार बोलतो. दुसरीकडे केबिनमध्ये बसलेल्या हिराचंदानीची नजर त्या दोघांवर जाते.
"
मेघना.........त्या गड्या सोबत?"आश्चर्याने डोळे विस्फारून ते पुटपुटतात.
"
गुड इव्हनिंग, हिरा." रावबहादूर हिराचंदानी समोर जातात.
     
मागे वळत हिराचंदानी बोलतात.
"
रावबहादूर तु आलास बरं केलंस."
"
अरे येणार कसा नव्हतो, डिल जी एवढी महत्वाची आहे." खुर्चीवर बसता बसता रावबहादूर बोलतो.
"
ती तर आहेच. पण त्या डिलपेक्षा तुझी मुलगी कोणाशी डिल करते ते ही पाहा." जरबी आवाजात हिराचंदानी बोलतात.
"
व्हौट डु यु मिन?"
        
हिराचंदानी खिडकीतून मेघना व मल्हार ला दाखवतात.
"
ओह माय गौड. अरे मेघना आणि त्या गड्या सोबत?" धक्का बसल्यागत रावबहादूर बोलतात.
"
तुझी मुलगी तर तुझ्यापेक्षा मोठी बिझनेस मैन निघाली."
        
रावबहादूर तिडकीने बाहेर जातात, आणि त्या दोघांजवळ येतात. मेघना व मल्हार चे त्यांच्याकडे लक्षच नसते.
"
मेघना..........." रावबहादूर मोठ्याने ओरडतात. तसे दचकत दोघेही त्यांच्याकडे पाहतात.

रावबहादूर खुनशी नजरेने मेघना व मल्हार ला पाहतात.
"
का यासाठीच कंपनीत यायचा हट्ट करत होतीस तु?" मोठ्याने दरडावत रावबहादूर मेघनाला विचारतात. रावबहादूर जबरदस्तीने मेघनाचा हात पकडतात.
"
डैड, सोडा डैड. माझं प्रेम आहे मल्हार वर."
"
हं प्रेम! अगं किडे आहेत हे वस्तीतले आमच्या जिवावर उड्या मारतात, आणि तु याच्यावर प्रेम करतेस?"अतिशय घ्रुणास्पद आवाजात रावबहादूर बोलतात.
      
मल्हार च्या अंगाची लाही लाही होत असते, पण मेघना कडे बघून तो गप्प असतो.
"
डैड, माणुस त्याच्या गरीबी श्रीमंतीने नाही तर मनाने, माणुसकीने मोठा होतो."
     
रावबहादूर मेघना चा हात जोराने आवळतात.
"
खुप चुरु चुरु बोलु लागलीस न हल्ली तु? चल मुकाट्याने." रावबहादूर आडदांड पणे मेघनाचा हात पकडत तिला खेचत घेऊन जातात.
"
सायेब......." मल्हार ओरडतो. रावबहादूर थांबुन त्याच्याकडे पाहतात.
"
अवो पोटची पोर हाय ती तुमची. तिच्याशी तरी नीट वागा." रावबहादूर मद्य प्यालेल्या रानटी माणसासारखे गुरगुरत मल्हार समोर जातात.
"
माझ्या मुलीला मी मारेन नाहीतर जाळेन. तु मध्ये यायचं नाहीस. नाहीतर याचे परिणाम खुप वाईट होतील." रावबहादूर च्या डोळ्यात रक्त उतरलेले असते. मल्हारचेही रक्त सळसळत असते, पण मेघनाकडे पाहुन तो काहीच बोलत नाही.
       
रावबहादूर मेघनाला घेऊन जातात. मुसळधार पावसाला सुरुवात होते. हाताच्या मुठी रागाने आवळत तो तसाच पावसातुन भिजत घरी येतो.
"
आरं कायं रं, भिजत का आलायस? छञी नव्हती का?"मल्हार चे बाबा विचारतात, पण मल्हार काही न बोलता घरात शिरतो, आणि बाथरुममध्ये जात थंड पाण्याची बादली डोक्यावर ओततो.
"
आरं ये, आरं थंड पाणी हाय ते." मल्हार ची आई ओरडते.
"
समदं संपलं आये, तिच्या बापाला समदं समजलंय." मल्हार च्या आईचा हात तोंडाजवळ जातो.
"
आरं ए बाबा, बाहीर ये, डोक्यात राख घालुन घेऊ नगसं." मल्हार ची आई बोलते. मल्हार शांत होत बाहेर येतो.
       
दुसरीकडे रावबहादूर नी मेघनाला एका खोलीत कोंडुन ठेवलेले असते. मेघना काही खात पित नसते. कधीमधी रावबहादूर ची नजर चुकवून अन्वेषा मेघनाला खुश करण्यासाठी प्रयत्न करत असते, पण त्याचा काहीच परिणाम होत नसतो. मेघना ची उदासी तिच्या आईला पाहवत नसते, ती हिंमत करुन रावबहादूर समोर जाते.
"
अहो, मेघना तुमचीच मुलगी आहे. एकदा बघा तिच्याकडे. अहो तिला काही झालं तर काय करणार आम्ही?" भावुक होत ती बोलते.
"
होतं तर होऊ दे काहीही. मला फरक नाही पडत. अगं रावबहादूर साठे आहे मी." मोठ्या ताठ्याने रावबहादूर बोलतात.
"
अहो ती नाही करणार परत असं, मी.......मी तुम्हाला शब्द देते."
   
रावबहादूर विचार करु लागतात.
"
या मेघना शी आपल्याला चांगलं वागावं लागेल, नाहीतर संशयाचे भुत तिच्या मानगुटीवर बसलेयं, ते कधीच उतरणार नाही."
       
रावबहादूर खोटं खोटं हसतात.
"
अगं ती माझीही मुलगी आहेच, मी तिला काय होऊ देणार आहे. फक्त एका बापाला जे वाटतं, ते मी तुला सांगितलं."
       
रावबहादूर च्या वागण्यात अचानक झालेला बदल मेघनाच्या आईच्या लक्षात आला नाही, ती साध्या मनाने रावबहादूर ना पाहु लागली.
        
खोलीचा दरवाजा उघडला गेला.
"
मेघु, मला माफ कर बाळा, मी वाईट वागलो तुझ्याशी. अगं पण त्या गड्या पेक्षा खुप चांगली स्थळं मिळतील तुला, हे का लक्षात घेत नाहीस तु?" शक्य तितका शांत आवाज ठेवत रावबहादूर बोलतात.
"
डैड, मल्हार मध्ये मी जे पाहिलंय ते कदाचित तुम्हाला दिसणार नाही." मेघना भावुक होत बोलते.
"
हं, तु काहीही पाहिलं असशील, पण एक लक्षात ठेव. हे जग त्याच माणसाची पुजा करतं, ज्याच्या कडे पैसा आहे." रावबहादूर जाण्यासाठी वळतात.
"
डैड, काल रात्री तुम्ही फोनवर कोणाशी बोलत होता?" मेघना रोखठोक विचारते. रावबहादूर चे डोके सणकु लागते, पण स्वतः ला कंट्रोल करत ते मागे वळतात.
"
अच्छा म्हणजे माझ्या वर पाळत ठेवून आहेस तर तु?"
"
डैड मी सहज विचारलय तुम्हाला".
"
हे बघ मी एक बिझनेसमन आहे, त्या भिकारड्या मल्हार सारखा गडी नाही. मला बिझनेस साठी राञी अपराञी फोन करावे लागतात, समजलं?" रावबहादूर तिडकीने बाहेर निघून जातात.
      
मेघना भिंतीला टेकून रडत बसते, तिला सारखा मल्हार आठवत असतो. मल्हार ही उदास असतो, त्याचेही लक्ष खाण्या पिण्यावरुन उठून गेलेले असते.
"
मल्हार, आरं ये मल्हार. आरं अशी चिंता करुन काय व्हणार हाय व्हयं. आरं बाबा, काही खात पित बी नाही तु." मल्हार ची आई काकुळतीने बोलते.
"
आये, आमचं प्रेम खरं हाय. मला आठवतं, मैडम म्हणल्या होत्या, नात्यात प्रेमाचा ओलावा असला तर लहान मोठेपणा राहत नाय." मल्हार च्या नजरेसमोर मेघना चा हसरा चेहरा तरळतो.
"
आरं पण काय करणार तु? आरं ती मोठी माणसं हायेत. उगा त्यांच्यासंग वाकड्यात जावु नगसं." मल्हार ची आई घाबरत बोलते.
"
आये प्रेमासाठी म्या काय बी कराया तयार हाय बघ." मल्हार आत्मविश्वासाने बोलतो, त्याची आई त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहते.
      
संध्याकाळच्या वेळी मेघना चे बाबा गडबडीत बाहेर पडतात.
"
मी काही कामानिमित्त बाहेरगावी जाणार आहे, दोन तिन  दिवसांनी परतेन." मेघना चे बाबा सांगतात, आणि बाहेर पडतात. मेघना काहीशा संशयाने त्यांना पाहत असते.
"
आई मी पण जरा मैञिणींसोबत पार्टीला जाणार आहे बाहेर. थोडा उशीर होईल बघ." मेघना बोलते.
"
अगं पण......." मेघना ची आई काही विचारायच्या आधी मेघना बाहेर पडते. रावबहादूर कार जवळ उभे असतात. राञीच्या वेळी तिने कारची डिकी रावबहादूर च्या अपरोक्ष चावी मिळवत खोललेली असते. रावबहादूर कारमध्ये बसतात, तशी दबा धरुन बसलेली मेघना हळुच कारची डिकी उघडत आत बसते. यावेळी ती मोबाईल स्विच ऑफ करायला विसरलेली नसते. थोड्या वेळातच कार सुरु होते.
       
राञीची वेळ. मल्हार अस्वस्थ पणे अंगणात फेऱ्या मारत असतो. तेवढ्यात त्याची आई दुधाचा ग्लास घेऊन येते.
"
घे रं मल्हार दुध घे."मल्हार दुधाचा ग्लास उचलतो.
"
आरं एवढं मनाला लावुन घेऊ नगसं. त्या देवानं ठरवलं तर समदं ठिक होईल बघ." मल्हार दुधाचा रिकामा ग्लास आईजवळ देतो.
"
आसं झालं तर बेस्टच होईल बघ. " मल्हार बोलतो, तेवढ्यात त्याचे लक्ष दुरवर कंपनीकडे जाते. कंपनीत काहीतरी हालचाली चालु असल्याचे त्याला जाणवते.
"
आयला रोज रातच्याला कोण हे समदे उद्योग करतायेत?छे मोठ्या साहेबास्नी भी काय सांगता नाय आलं." मल्हार आतमध्ये पाहतो. आई झोपायला गेलेली असते.
"
आज जावुन एकदाचा सोक्षमोक्ष च लावतो या सगळ्याचा." म्हणत कोणाला काही न सांगता मल्हार कंपनी जवळ जातो, आणि मोक्याच्या ठिकाणी राहुन हालचालींवर नजर ठेवतो.
       
मोठमोठे ट्रक सामान घेऊन जात असतात. काही अनोळखी नवीन गडी तिथेच दाटीवाटीने उभे असतात.
"
आयला हे कोण हायेत?" मल्हार आश्चर्याने पुटपुटतो, की तेवढ्यात हौर्न वाजवत रावबहादूर ची कार तेथे येते. मागोमाग हेडलाईट्स चे फ्लैश टाकत हिराचंदांनीची कारही आत येते.
       
दोन्ही कारचे ड्रायव्हर दरवाजे उघडतात, तेव्हा रावबहादूर व हिराचंदानी कारमधुन उतरत समोरासमोर येतात.
"
मोठे सायेब आणि रावबहादूर सायेब?" मल्हार चे डोळे आश्चर्याने विस्फारतात. तो समोर पाहत राहतो.
"
अखेर आपली डिल यशस्वी झाली रावबहादूर." दोघे मोठयाने हसत एकमेकांना मिठी मारतात.
"
हिराचंदानी धंदा शिकावा तर तुझ्याकडुन. अरे लोकांना काही कळत नसतं बघ. अरे आजच्या काळात पैसा कमवायला प्रामाणिकपणा उपयोगाचा नाही तर स्किल लागते. अरे लोकांना १०/-रुपयात तयार पदार्थ हवे असतात, पण या मुर्खांना हे नाही समजत की १०/- रुपयांत तर साधा चहाही येत नाही, हा हा हा हा." रावबहादूर हसतात.
"
अरे बिझनेसचा हाच फंडा आहे रावबहादूर. भेसळ करा आणि कमवत जा." दोघेही पुन्हा मोठमोठ्याने हसायला लागतात. तेवढ्यात डिकीचा दरवाजा उघडत मेघना समोर येते. रावबहादूर व हिराचंदानी दोघेही हसणं थांबवत चकित होत पाहतात.
"
म......म मेघना तु........?"रावबहादूर भयचकित होत बोलतात.
"
मला वाटलचं होतं डैड, की तुमचं काही ना काही चाललंय जे तुम्ही आमच्यापासून, लोकांपासून लपवुन करताय. म्हणुनच संधी साधुन मी तुमच्या कारच्या डिकीत लपुन तुमचा पाठलाग केला. डैड का......का करताय हे सगळं, कशासाठी?" धक्का बसलेली मेघना भावुक पणे विचारते.
"
अगं हाच बिझनेस आहे मेघना. बिझनेस नुसता प्रामाणिकपणावर नाही चालत, त्यासाठी हे असे फंडे वापरावे लागतात." रावबहादूर मोठ्या ऐटीत सांगतात.
"
फंडा?हा असा? लोकांच्या जिवाशी खेळुन पैसे कमवायचा हा कसला फंडा डैड?"रडतच मेघना बोलते.
"
अरे रावबहादूर आवर तुझ्या मुलीला, नायतर दोघेही अडचणीत येऊ." हिराचंदानी ओरडतात. रावबहादूर पुढे होतात, तेवढ्यात काळोखातून दबा धरून बसलेला मल्हार पुढे येत त्या दोघांसमोर उभा राहतो. मेघना मल्हार ला पाहते. दोघांच्या भावना डोळ्यात दाटुन येतात.

"ओह तु पण आहेस तर इथे?"रावबहादूर मल्हार ला विचारतात.
"
अवो जिथं मेघना तिथं मल्हार हायेच बघा. तुम्ही किती बी काय करा आम्हाला वेगळं नाही करु शकत." मेघना मल्हार चा हात हातात धरते.
"
यु बास्टर्ड. मी सोडणार नाही तुम्हाला." हिराचंदानी क्रोधाने आपल्या कारमधील गन बाहेर काढून मल्हार वर फायर करतात.
      
मल्हार नेम चुकवतो व मेघना चा हात पकडुन शिताफीने पळ काढतो.
"
रावबहादूर यांना सोडुन चालणार नाही, नाही तर आपला  पुर्ण प्लॅन पाण्यात जाईल." हिराचंदानी व रावबहादूर गड्यांसोबत मेघना व मल्हार चा कारमधून पाठलाग करतात. रावबहादूर व हिराचंदानी ची नजर चुकवून मेघना व मल्हार एका दाट जंगलात घुसतात. आपटत धडपडत जिवाच्या आकांताने ते पळत असतात.
"
ते याच जंगलात गेले असतील."हिराचंदानी बोलतात, तसे कार थांबवुन सगळे मेघना व मल्हार ला शोधत जंगलात शिरतात.
"
शोधा,शोधा सोडु नका दोघांना."हिराचंदानी ओरडत असतो. इकडे तिकडे उजेड मारत हातातले मोठे धारदार कोयते सपासप चालवत गडी दोघांना शोधत असतात.
     
एका मोठ्या खडकामागे मल्हार व मेघना लपुन असतात.
"
मल्हार मला खुप भिती वाटतेय रे." भावुक होत मेघना बोलते.
"
घाबरु नका मैडम. अवो मी हाय ना? आनं कुणाचं जगणं मरणं समदं त्या देवाच्या हाती असतय बघा.त्याच्या मनात आसल तर यातुन बी भायेर पडु आपण."
"
ए ते बघा." एका गड्याचे लक्ष दोघांवर जाते.
     
मेघना व मल्हार ठेचकाळत तिथुन उठत पळ काढतात. काळोखातून कशीबशी वाट काढत ते मोकळ्या मैदानावर येतात. काळोखातच ते एकमेकांना आधार देतात. तेवढ्यात रावबहादूर व हिराचंदानी तेथे पोचतात.
"
शेवटी आमच्या तावडीत आलात तर? आता कुठं जाणार?"हिराचंदानी बोलतात, आणि गन समोर धरतात. तोच मेघना चा पाय घसरतो आणि ती व मल्हार खाली दरीत कोसळतात. धावतच रावबहादूर व हिराचंदानी जात खाली पाहतात.
"
हा हा हा हा आपण काहीच न करता आपल्या वाटेतले काटे दुर झाले रावबहादूर." हिराचंदानी मोठ्याने हसतात.
"
सॉरी बेटा, पण व्यवहारापुढे मला काही महत्त्वाचं नाही." रावबहादूर हसतात. दोघेही तिथुन निघुन जातात.
       
इकडे दरीत मल्हार ने मेघना चा हात पकडुन ठेवलेला असतो.
"
घाबरु नका मैडम, मी काय बी होऊ देणार नाय तुमास्नी." मल्हार वर जाण्याचा प्रयत्न करत असतो.
"
मल्हार..........माझा मल्हार." रडत मेघना बोलते.
"
फक्त एकदाच एकदाच मला मेघना म्हणून हाक मार." मल्हार मेघना कडे घाबरत पाहतो. मेघना रडत असते.
"
प्लीज..."
"
मेघना.........." एकाएकी मेघना मल्हार चा हात सोडवते, आणि तशीच खोल दरीत कोसळते.
"
मे....... मेघना..........." मल्हार ची आर्त किंकाळी दरीत घुमते. मल्हार दरीत पाहत राहतो. धक्का बसल्यागत तो स्तब्ध होतो, त्याच्या शरीरातले ञाण जणु गेलेले असतात. कसाबसा तो वर येतो, आणि दरीत पाहत गुडघे टेकवुन आकाशाकडे पाहत ह्रदय दावक ओरडतो.
"
मेघना.....‌........." आणि टाहो फोडत रडु लागतो.

 मेघना च्या जाण्याने मल्हार सैरभैर झालेला असतो, अन्न पाणीही त्याला गोड लागत नसतं. रावबहादूर व हिराचंदानी शी प्रतिशोध घेण्याचं तो जणु विसरलेलाच असतो.
          
मेघना ची आई व बहिण अन्वेषा यांनी ही मेघना च्या जाण्याचा धसका घेतलेला असतो. रावबहादूर माञ खोटे नाटे रडत आपण दु:खी असल्याचे भासवत असतात.
         
तेराव्या दिवशी मेघना च्या फोटोसमोर सगळे सुतकी चेहऱ्याने बसलेले असतात. रावबहादूर अन्वेषा व तिच्या आईजवळ जातात. मेघना च्या आईच्या खांद्यावर हात ठेवत ते बोलु लागतात.
"
शांत हो शांत हो. अगं त्या देवाच्या मनात काय आहे ते कुणाला कळणार आहे का?" अन्वेषा मोठ्याने रडत रावबहादूर ला बिलगते.
"
रडु नको रडु नको. मला माहित आहे अनु. मेघना तुझी फक्त बहिण नव्हती, ती तुझी चांगली मैञिण सुध्दा होती."      
      
एवढ्यात रावबहादूर चा मोबाईल वाजतो. ते बाहेर जातात.
"
हैल्लो रावबहादूर आज खुप मोठी डिल मिळणार आहे आपल्याला, लवकर ये."
"
अरे पण आज मेघना चं तेरावं..........."
"
हे बघ रावबहादूर बिझनेस समोर नाती गोती महत्त्वाची नसतात. आणि विसरलास का आपणच तर तिला संपवलय. चल लवकर ये, मी वाट बघतोय."
    
हिराचंदानी कॉल कट करतो.  काहीसा विचार करत रावबहादूर आत जातो.
"
बेटा मला एका महत्त्वाच्या कामासाठी जावं लागणार आहे." अन्वेषा च्या खांद्यावर हात ठेवत रावबहादूर बोलतात.
"
अहो पण मेघना....."मेघना ची आई बोलते.
"
मला माहित आहे, पण मी तरी काय करणार? जावं तर लागणारच."रावबहादूर बोलतात, आणि बाहेर पडतात.
      
मल्हार ला माञ सारखं आपलं बोलणं आठवत असतं.
"
मी वाट पाहेन मैडम तुमची." हळुहळु ते शब्द हवेत विरत जातात. मल्हार ची आई जेवणाचं ताट घेऊन येते.
"
आरं बाळा दोन घास खावुन तर घे. त्या दिवसापासून तु काय बी पहिल्यासारखं खात पित नाही बघ."
"
आय पहिल्यांदाच तुझ्या शिवाय कोणी प्रेम करणारं भेटलं होतं गं, पन देवाला ते बी मान्य नाय." मल्हार भावुक होतो.
"
आरं पण त्याला आपण काय करणार?"मल्हार ची आई समजावत बोलते.
"
नाय आय. हे समदं कट कारस्थान त्या हिराचंदानी आणि रावबहादूर साहेबाचं हाय. त्यांनीच मैडम आणि मला मारायचा घात केला होता." मल्हार तिडकीने बोलतो. मल्हार च्या आईचा हात तोंडावर जातो.
"
आरं मग हे तु मला आधी का सांगितलं नाहीस?" मल्हार ची आई विचारते. मल्हार भावुक होत खाली मान करतो.
"
पनं त्यास्नी हे समदं करुन काय मिळणार होतं? मेघना मैडम तर रावबहादूर साहेबाची पोरगी हाय नवं?"
"
आय हे समदं जग पैशावर चालतं बघ. कुणाला बी पैशापेक्षा नाती महत्वाची नसतात."
     
मल्हार ची आई स्तब्ध राहते.
"
पण बाबा, आता जे झालं ते झालं. तु या मोठ्या माणसांच्या आड जावु नगसं. त्यांनी तुला काय केलं तर?" मल्हार ची आई घाबरत बोलते.
"
आय ते माझं काय बी करणार नाय बगं. मला फकस्त एक संधी मिळु दे नाय त्या दोघांना त्याच कंपनीत गाडलं तर नावाचा मल्हार नाय मी."आवेशात मल्हार बोलतो. मल्हार ची आई त्याच्याकडे पाहत राहते.
        
राञीच्या वेळी कंपनीच्या गोडाऊन समोर रावबहादूर ची कार येऊन थांबते.
"
हिराचंदानी, हिराचंदानी......" रावबहादूर हाका मारतो.
"
वेलकम वेलकम रावबहादूर. अगदी योग्य वेळी आला आहेस तु."
"
हिरा अरे घरी हे कार्य आहे आणि........."
      
हिराचंदानी नोटांच्या गड्ड्या त्याच्यासमोर फेकतो.
"
रोख कॅश एक कोटी." हिराचंदानी बोलतो.
     
रावबहादूर खाली वाकत ती बंडले हातात घेतो.
"
एक कोटी." रावबहादूर चे डोळे चमकतात.
"
रावबहादूर अरे ही नाती गोती काय कामाची? हा प्रामाणिकपणा, नाती गोती सगळी ठेवायची आपल्या घरात. "
"
बरोबर बोलतोयस तु हिरा." विचिञपणे हसत रावबहादूर नोटांच्या गड्ड्या समोर धरतो. मागोमाग हिराचंदानी ही मोठमोठ्याने हसु लागतो.

मल्हार माञ मेघना च्या आठवणीने झुरत असतो. पुन्हा पुन्हा त्या जागी जिथुन मेघना खाली कोसळली जात तो आपल्या आठवणीत हरवून जात असतो.
       
त्या दिवशीही तो असाच त्या दरीकडे येतो.
"
मैडम अवो आत्ता कुठं आमचं प्रेम जुळलं होतं, आणि हे समदं असं व्हावं?" मल्हार दु:खी होत बोलतो.
      
तेवढ्यात खालच्या दरीत त्याला काही माणसांचा वावर जाणवतो.
"
ही माणसं?"तो आश्चर्य चकित होतो, आणि वेगाने हालचाली करत तो वाट काढत खाचखळग्यातुन खाली दरीत उतरतो.
       
खाली एके ठिकाणी मोकळी हिरवी कुरणे दिसत असतात. मल्हार ला उतरताना खुप खरचटलेले असते, पण त्याची फिकीर न करता तो पुढे पुढे जात राहतो. जंगलातल्या कच्च्या रस्त्याने तो एका पाड्या जवळ पोहोचतो.
"
आयला,हे कुठलीतरी गावं हाय वाटतं?" मल्हार एकदम चकित होत पाहतो.
     
एके ठिकाणी त्याला बरीच गर्दी जमलेली दिसते, तो तिकडे जाणार, तेवढ्यात कच्च्या रस्त्यावरुन हरणांचा कळप मल्हार च्या समोरुन उड्या मारत जातो. मागोमाग एक तरुण मुलगी काही मुलींसोबत खळखळत जात असते.
"
मैडम........"मल्हार डोळे विस्फारून पाहत राहतो. तो कळप आणि त्याच्या मागुन त्या तरुणी गावात शिरतात. तसा पाठलाग करत मल्हार ही गावात शिरतो. मल्हार मेघना ला शोधत असतो, तोच मागुन खंबीर आवाज येतो.
"
कायं रं, कोण हायेस तु?" मल्हार मागे वळतो. एक उंचापुरा धिप्पाड आदिवासी उभा असतो. त्याच्या हातात तळपती चंद्रभान कुरहाड असते.
"
ते म्या एका मुलीला शोधत होतो जी." मल्हार सहज बोलतो.
"
काय?" तो आदिवासी ओरडतो.
"
आरं शिरप्या, भाल्या सगळे हिकडं या. ह्यो बघा हितं आमच्या पोरी पळवाया आलाय."
"
नाय तसं नाय." मल्हार खरं सांगेपर्यंत सगळा जमाव त्याच्याभोवती गोळा होतो.
    "
काय रं, कोण हायेस तु? कशापायी आलायस हितं?"एकजण दरडावत विचारतो.
"
म्या मल्हार. मल्हार पाटील. अवो मी मेघना मैडमना शोधत आलो होतो हितं"
"
मेघना........असं हिकडं कुणीबी नाय. खरं सांग का आलायस हितं? नायतर हितचं मुडदा पाडु तुझा."
       
तेवढ्यात दुरवर बायकांच्या घोळक्यात उभी असलेली मेघना त्याला दिसते.
"
अवो मैडम, तुम्ही सांगा की म्या खरं बोलतोय ते." बायकांच्या घोळक्याकडे जात मल्हार बोलतो. सगळ्या घाबरत मागे जातात.
"
आरं ये तुझा ह्यो शानपना हितं चालायचा नाय. मुकाट्यानं निघायचं हितंनं, नायतर......"एकजण हातातील चंद्रभान कुरहाड वर उचलतो. मल्हार मेघना कडे पाहतो. ती न समजल्यासारखी मल्हार ला पाहते. मल्हार उदास होत खाली मान घालून निघून जातो.
-----------------------------------------------------
       
रावबहादूर व हिराचंदानी भेसळ करुन बराच नफा कमावतात. रावबहादूर नी अन्वेषा व तिच्या आईला अंधारात ठेवलेले असते. दुसरीकडे मल्हार हरवला या दु:खात मल्हार चे आई बाबा वावरत असतात. असेच ते ओसरीवर बसलेले असतात. तेवढ्यात मोठ्याने हॉर्न वाजवत एक आलिशान कार घरासमोर येऊन थांबते.
"
अवो इतक्या रातच्याला कोण आलं असेल? मल्हार तर नाय?" आश्चर्याने बोलत मल्हार ची आई उठते. तसे मल्हार चे बाबाही उठतात.
"
आं.......सायेब तुम्ही?"भयचकित होत तोंडावर हात घेत मल्हार ची आई विचारते. हिराचंदानी अंधारातुन पुढे येतात, मागुन रावबहादूर व एक माणूस असतो.
"
कशा आहात मल्हार च्या आई तुम्ही?" कपटीपणाने हसत हिराचंदानी विचारतो.
"
सायेब मला माहित हाय, तुम्हीच माझ्या मल्हार ला गायब केलात ते."
      
हिराचंदानी व रावबहादूर गडगडाटी हसतात.
"
गायब?अगं त्याला तर संपवलय आम्ही कायमचं." दोघे क्रुरपणे हसतात.
"
काय?"भयचकित व गर्भगळीत होत मल्हार ची आई बोलते. मल्हार चे बाबा तर डोक्याला हात लावून खाली बसतात.
"
ओ सायेब काय बोलतायसा तुम्ही?" मल्हार ची आई फणकारत बोलते.
"
खरं तेच बोलतोय मी." गंभीर आवाजात हिराचंदानी सांगतो.
"
अरे हिरा आता यांनाही संपवणं गरजेचं आहे नाही का?" दोघेही कपटीपणाने हसतात. मल्हार चे आई बाबा घाबरतात. रावबहादूर सोबतचा माणुस विषारी भेसळयुक्त फुड पैकेट्स बाहेर काढतो. दांडगाई करत तो मल्हार च्या म्हाताऱ्या आई बाबांना भिंतीवर ढकलतो, आणि जबरदस्तीने ती फुड पैकेट्स त्या दोघांना खायला घालतो.
"
घुसव घुसव अजुन." हिराचंदानी व रावबहादूर मोठमोठ्याने हसत बोलतात.
"
पाणी........पाणी."मल्हार ची आई तडफडत बोलते. मल्हार चे बाबा ही जमिनीवर गडाबडा लोळत असतात.
"
चंदा पाणी दे रे बाबा यांना." कपटीपणाने हास्य करत हिराचंदानी बोलतो. चंदा बोटलमधले पाणी सरळ खाली जमिनीवर ओततो.
      
हिराचंदानी रावबहादूर व चंदा क्रुरपणाने हातवारे करत हसतात.
"
हीच लायकी आहे तुम्हा गरिबांची. गटारातले किडे आमच्याशी पंगा घेणार?" रागाने गरागरा डोळे फिरवत हिराचंदानी बोलतो.
"
सा........सायेब."वेदनेने कण्हत मल्हार ची आई संतापात बोलते.
"
विसरु नगा वाईटाला शिक्षा देवच देतो. मा.......माझा मल्हार येईल देव बनुन  तुमच्या पापाची शिक्षा द्यायला. हा शाप हाय एका आईचा......" मल्हार ची आई तडफडत जीव सोडते. तडफडून बापही मरण पावतो. क्रुरपणाने हसत ते तिघेही निघुन जातात.
"
आये......."  भयाने दचकुन झाडाखाली तंबुत झोपलेला मल्हार हडबडुन जागा होतो. घामाघूम होत तो आजुबाजुला पाहतो.
"
कसलं वंगाळ सपान होतं हे."मल्हार विचार करु लागतो.
"
पनं खरंच आय बाबाला काय झालं नसलं ना?" मल्हार भयाकुल होतो.
"
नाय नाय. त्यास्नी काय व्हणार नाय. म्या उगाच घाबरतुया."मनाला खोटा दिलासा देत मल्हार पुन्हा झोपी जातो.

पक्ष्यांच्या किलबिलाटाने पहाटेच मल्हार ला जाग येते. डोळे चोळतच तो आजुबाजुला पाहतो. पाड्यातील लोकांची लगबग त्याला दुरवरुन दिसत असते. मल्हार तंबुतुन बाहेर येतो. दुरवर पाड्याकडे जाणाऱ्या वाटेवर मेघना उभी असलेली त्याला दिसते.
"
आज काय बी झालं, तरी मैडमना समदं याद करुन दिल्याबिगर राहणार नाय." मल्हार सरळ चालत मेघना जवळ पोहोचतो.
"
मैडम........"मल्हार च्या हाकेने मेघना मागे वळुन पाहते, आणि मल्हार ला समोर पाहून घाबरत पाड्याकडे जायला वळते.
"
थांबा मैडम. ऐका माझं." मेघना जागेवरच थांबते.
"
मैडम अवो तुम्ही गेल्यापास्न माझ्या मनाला चैन पडत नव्हती हो. मला वाटलं देवानचं आपल्याला ही शिक्षा दिली असलं." मेघना ऐकत असते.
"
मैडम अवो काहीतरी आठवतंय का पाहा. तुमचे घरचे, कंपनी, काहीतरी....?"मल्हार आठवुन देण्याचा प्रयत्न करत बोलतो.
"
चक...."मेघना नकारार्थी मान हलवत जाऊ लागते.
"
मेघना....." मल्हार हाक मारतो, तशी मान वर करत दचकत मेघना जागीच थांबते.
"
एकदा तुम्हीच म्हणाला व्हतात ना, नात्यात प्रेम असलं की लहान -मोठेपणा, आपले-परकेपणा नाय राहत."मेघना वळुन मल्हार ला पाहते. त्याच्या नजरेतलं प्रेम तिला अस्वस्थ करत असते. काही न बोलता ती पाड्याकडे निघुन जाते.
"
मैडम मला माहिती हाय, एक दिस तुम्हास्नी समदं आठवलं, आणि तुम्ही याल माझ्यासंग."मल्हार पुटपुटतो, आणि तंबुकडे परततो.
------------------------------------------------------
      
मुंबईत एक धक्का दायक बातमी पसरते. हिराचंदानी एन्ड सन्स च्या फुड पैकेट्स मधुन विषबाधा.
       
हिराचंदानी व रावबहादूर चे धाबे दणाणलेले असतात. मेघना च्या आई व अन्वेषा ला धक्का बसलेला असतो, पण रावबहादूर शिताफीने आपला या व्यवहारात हात नसल्याचे दोघांना भासवत असतात.
       
मनातुन रावबहादूर खुप घाबरलेला असतो. राञीच्या वेळी गच्चीत आरामखुर्चीत बसुन रावबहादूर हिराचंदानीशी फोनवर बोलत असतो.
"
डोन्ट वरी रावबहादूर. मी सगळं मैनेज केलयं . अरे असं कुणीही येऊन आपल्या विरुद्ध, कंपनीविरुद्ध तक्रार करेल आणि मी स्वस्थ बसु?" हिराचंदानी सांगत असतो.
"
मला खाञी होतीच हिरा. फक्त मनात भिती होती. बस अरे या व्यवसायासाठी मी माझ्या पोटच्या मुलीची गय केली नाही तिथे इतरांचं काय?" रावबहादूर हसतो.
"
काय?"एकदम मागे आलेली अन्वेषा धक्का बसल्यागत विचारते, तसे रावबहादूर उभे राहुन मागे वळतात.
"
डैड तु..... तुम्ही मेघनाला मार मारलं?" घाबरत तुटकपणे अन्वेषा विचारत असते.
"
हे.....हे बघ बेटा, जवळ ये मी....मी तुला सगळं सांगतो." सावरुन घेण्यासाठी रावबहादूर बोलतात.
"
नो डैड नो. मी ऐकलंय सगळं. आय डोन्ट बिलिव्ह इट. तुम्ही...... तुम्ही मेघनाला मारुन टाकलत?" पाणावलेल्या डोळ्यांनी अन्वेषा रागाने विचारते.
"
म्हणजे तुला सगळं समजलयं तर?" रावबहादूर गंभीर होत बोलतात. अन्वेषा ऐकत असते.
"
तु जे काही ऐकलंय ते सगळं विसरून जा, नाहीतर......." धमकीवजा भाषेत रावबहादूर बोलतात.
"
नाहीतर....... नाहीतर काय डैड. मलाही मारुन टाकाल?" संतापत अन्वेषा विचारते.
"
वेळ पडली तर तेही करु शकतो." झडप घेत रावबहादूर अन्वेषा चा गळा दाबतात. अन्वेषा धडपड करु लागते, पण रावबहादूर च्या राक्षसी ताकदीसमोर तिचा निभाव लागत नाही. तडफडून ती मरण पावते.
"
अ........अहो हे काय केलंत?" गच्चीवर आलेली मेघना ची आई समोरचे भयानक द्रुश्य पाहुन ओरडते, आणि धावत जात अन्वेषा च्या म्रुतदेहाजवळ बसते.
"
अ....अनु ए अनु.......बाळा काय.....काय झालं तुला, उठ." भयाकुल होत मेघना ची आई बोलत असते.
"
अहो काय केलात हे?" भेदक स्वरात मेघना ची आई रावबहादूर ला विचारते.
"
माझ्या मध्ये येत होती, म्हणून मारुन टाकली तिला. आणि आता तु ही तिच्याबरोबर च जाशील." खुनशीपणे पाहत रावबहादूर बोलतात. तशी जिवाच्या आकांताने घाबरत मेघना ची आई धावत गच्चीवरुन पायऱ्यांनी खाली जाऊ लागते. रावबहादूर तिचा पाठलाग करतात. एके ठिकाणी अडखळुन मेघना ची आई खाली कोसळते. रावबहादूर तिच्या पर्यंत पोहचतात.
"
आता कुठे जाशील अं?"रावबहादूर विचिञपणे हसत बोलतात, आणि आजुबाजुला पाहतात. बाजुलाच पडलेल्या जाडजुड दोरखंडाने ते तिला बांधुन तिच्या तोंडावर पट्टी चिटकवतात, आणि बांधकामासाठी आणलेल्या ड्रील मशिनला आणतात. सैतानासारखा उभा राहत रावबहादूर ड्रील मशिन चालु करतो. मेघना च्या आईचे डोळे भयाने विस्फारतात, माथ्यावर घाम जमा होतो. सुटण्याची केविलवाणी धडपड अपयशी होते, आणि ड्रील मशिनने रावबहादूर तिच्या शरीराचे तुकडे पाडतात. मुकपणे भयंकर वेदना सहन करत मेघना ची आई मरण पावते. सगळीकडे रक्ताचा सडा पसरतो.
"
माझ्या वाटेत येणाऱ्याची मी अशीच अवस्था करेन." क्रुरपणे हसत ड्रील मशिन बाजुला फेकत रावबहादूर बोलतात. मुर्तीमंत सैतान जागा झालेला असतो.

तंबुत बसलेल्या मल्हार ला मेघना सोबत घालवलेले एक एक क्षण आठवत असतात.
"
मैडम ना कधीतरी समजेलचं,की त्या कोण हायेत.पन मला हे समजत नाय, की त्यांच्या संग नेमकं काय झालं व्हतं?"मल्हार विचारात पडतो.
"
आरं ये मल्हार." हाक ऐकताच मल्हार तंबुतुन बाहेर येतो.
"
कोण तु?"मल्हार आश्चर्याने विचारतो.
"
म्या सदाशिव. त्या पाड्यातुन आलोया." मल्हार चे आश्चर्य कायम असते.
"
आरं असं कशापायी बघतुयास? तुझ्या डोळ्यातले भाव समदं सांगुन गेले बघ की तु सच्चा हायेस."सदाशिव बोलतो. मल्हार ला आशा वाटु लागते.
"
काय झालं होतं मैडमसंग?"मल्हार विचारतो.
     
तंबुच्या बाहेर दोघेही बसतात, सदाशिव सांगत असतो.
"
कुणालाबी कायबी समजत नव्हतं. ही पोरगी कोण, कुठनं आली? एक माञ होतं एवढ्या उंचावरन पडुन ती वाचली व्हती. देवानचं वाचवलं होतं बघ तिला. आम्ही तिला पाड्यावर आणलं, तिच्या जखमा बऱ्या केल्या पण नशीब कुठल्या दिशेने जातं बघ त्या पोरीला आपलं नाव बी माहित नव्हतं."
"
लयी उपकार झाले बघा तुमचं!" मल्हार हात जोडतो.
"
आरं उपकार कसलं त्यात? माणसानं माणसाची सेवा करावी मग देवबी पावतो म्हणत्यात. उलट माफी तर आम्ही मागाया पाहिजे तुझी. तु हिकडं आमच्या पोरीस्नी ञास द्याया आलास असं समजुन काय बाय बोललो तुला."
"
पन आता इश्वास बसला नव्हं?" मल्हार विचारतो.
"
व्हयं आता समद्यांचा इश्वास बसलाय बघ."
"
पनं मैडम.......‌त्यास्नी तर कायबी याद नाय." निराश होत मल्हार पुटपुटतो आणि पाहत राहतो.
-------------------------------------------------------
         
कंपनीच्या एका गुप्त जागी रावबहादूर आणि हिराचंदानी चर्चा करत असतात.
"
हिरा, माझ्या वाटेतले सगळे अडसर दुर केलेयत मी. "
     
हिराचंदानी मोठ्याने हसतो.
"
अरे यालाच बिझनेस म्हणतात राव. काही मोठं करायचं, मिळवायचं तर प्रसंगी नात्याचाही गळा दाबावाच लागतो."
      
दोघेही मोठमोठ्याने हसतात. तेवढ्यात एक गडी धापा टाकत येतो.
"
मालक.......मालक."
"
काय रे, एवढा धापा टाकत यायला काय झालं? वाघबिघ मागे लागला की काय तुझ्या?" हिराचंदानी गुरगुरत विचारतात.
"
मल्हार........ मल्हार." तो धापा टाकतच बोलत असतो.
"
मल्हार....." रावबहादूर व हिराचंदानी एकमेकांना पाहतात.
"
त्याला पाहिलंय म्या. तो जंगलातल्या पाड्यात हाय."
"
काय? तुला काय वेडबिड लागलं नाही ना रे? का सकाळीच घेऊन आलायस? तुम्हा गरिबांना फुकटची जरी मिळाली तरी चढते." हिराचंदानी करड्या आवाजात बोलतात.
"
नाय म्या खरं सांगतोय. म्या पाहिलंय मल्हारला‌." गडी अजीजीने बोलतो.
"
हिरा कदाचित हा खरं बोलत असेल. ती थेरडी मल्हार ची आई पण म्हणत नव्हती का माझा मल्हार परत येणार म्हणून?" रावबहादूर संतापात बोलतो.
"
येऊ दे त्याला. तो जिवंत असला तरी आपलं काय बिघडवणार आहे? "हिराचंदानी संतापाने गड्याकडे पाहतो.
"
अनंताला सांग त्याच्या गुंडांना बरोबर घेऊन त्या मल्हार चे हातपाय तोडून त्याला ठार कर. चल जा‌."भयंकर संतापत हिराचंदानी आदेश देतो, तसा गडी निघुन जातो.
"
मल्हार..........आता कसा वाचणारेयस तु?" एकमेकांना पाहत क्रुरपणे हिराचंदानी व रावबहादूर  हसतात.
     
मल्हार चा शोध घेत अनंता व त्याचे गुंड धारदार कोयत्या-कुरहाडींसह बाहेर पडतात.

अन्नाच्या शोधार्थ मल्हार तंबुपासुन बराच दुर गेलेला असतो. इकडे अनंता व त्याचे गुंड मल्हार ला शोधत त्या जंगलात फिरत असतात. मल्हार ला एक ओढा दिसतो, तिथे पाणी पित असताना अनंता व साथीदाराची नजर मल्हार वर पडते. सगळे मल्हार ला घेराव घालतात.
"
काय रे मल्हारा एवढं सगळं होऊन सुध्दा तु जिवंत आहेस?" अनंता धमकावणीच्या भाषेत बोलतो. मल्हार आवेशाने सगळ्यांना पाहत अनंता ला सांगतो.
"
अनंता तुझ्या पापाचा घडा भरायलाच मी जिता हाय अजुन. बरं झालं हितसं भेटलास." रागाने मुठी आवळत मल्हार बोलतो.
     
अनंता व गुंड मोठमोठ्याने हसतात.
"
वाचलास तर भरणार ना घडा? ए हातपाय तोडा रे यांचे." अनंता आदेश देतो. सगळे मल्हार वर हल्ला करतात, पण अंगात बारा हत्तींचे बळ असलेला मल्हार एकेकाला उडवुन लावतो.
"
अरे लढुन काय होणार आहे मल्हार? तुझ्या आई-बापाला साहेबांनी ढगात पाठवलं, तुझी ती मैडम तिला सुध्दा वर पोहचवलं, आणि आता कोणासाठी लढतोयस तु?" विचित्र हास्य करत अनंता आवेशात बोलतो. मल्हार ला आपले आई-बाप गेल्याचे ऐकुन धक्का बसतो, पण तो स्वतः ला सावरतो.
"
आरं तुमच्या सारखं सैतान जितं हायेत म्हणुन लढतुया. आनं तुमची खांडोळी केल्याबिगर गप बसणार नाय." क्रोधाने पेटुन मल्हार बोलतो. मल्हार अनंताच्या गुंडांशी झटापट करतो. मल्हार ऐकत नाही असे पाहून अनंता एक घाणेरडा प्रकार करतो. हळुच मल्हार ची नजर चुकवून त्याच्या मागे जात अनंता मातीची धुळ त्याच्या डोळ्यात फेकतो आणि लाकडी दांड्याने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार करतो. अनंता क्रुरपणे हसतो.
"
मे......... मेघना........."मल्हार अर्धमेल्या स्थितीत खाली कोसळतो. दुरवर पाड्यात असलेली मेघना दचकते.
"
मल्हार...........‌‌"हवेचा एक मोठा झोत येतो. मेघना पाड्यातुन पळतच जंगलाच्या दिशेने जाते. पाड्यातले आदिवासी ही तिच्या मागुन जातात.
"
आता भोग तुझ्या कर्माची फळं." अनंता इशारा करतो, तसे त्याचे गुंड कोयते कुरहाडी उगारतात, आणि मल्हार वर प्रहार करणार एवढ्यात दगडांचा जोरदार वर्षाव त्यांच्यावर होतो. पाड्यातले आदिवासी व मेघना तिथे qपोहचतात. आदिवासी अनंता व गुंडांच्या तावडीतून मल्हार ला सोडवत अनंता व गुंडांची बेदम धुलाई करतात.
"
म.............. मल्हार......."पाणावलेल्या डोळ्यांनी मल्हार जवळ बसत मेघना त्याला पाहत बोलते.
        
पाड्यातले आदिवासी मल्हार वर उपचार करतात, तो शुध्दीवर येतो.
"
मल्हार........"भावनात्मक होत मेघना मल्हार ला पुकारते.
"
मेघना........मैडम...." मल्हार च्या चेहऱ्यावर हास्य उमलते.
"
मल्हार...."रडतच मेघना मल्हार च्या गळ्यात मिठी मारते.
"
खुप ञास सहन केलास ना रे माझ्यासाठी?"
"
अवो त्यात ञास कसला? तुमास्नी समदं आठवलं यातच सगळं आलं बघा मैडम."
"
अ हं मैडम नाही मेघना......"मल्हार च्या तोंडावर हात ठेवत मेघना त्याला सांगते.
      
मल्हार क्षणभर तिच्या नजरेच्या डोहात हरवतो, नंतर एकदम भानावर येतो.
"
काय झालं मल्हार?" आश्चर्याने मेघना विचारते.
"
मेघना अवो तुमची इकडं ही अवस्था झाली आणि हिराचंदानी आणि रावबहादूर सायेबांनी माझ्या आई-बापास्नी आनं तुमच्या आय-बहिणीला मारुन टाकलं बघा."
"
काय?" धक्का बसलेली मेघना बोलते.
"
आई.......अनु."धाय मोकलुन रडत मेघना बोलते.
"
मैडम रडु नगसा. अवो देव समदं बघतोय बघा. त्या सैतानांना शिक्षा द्यायलाच आम्हा दोघांना त्याने एकञ आणलय बघा." मल्हार मेघनाला प्रोत्साहन देत बोलतो. मेघना आपले डोळे पुसते.
"
नाही मल्हार आपण आता हार नाही मानायची. त्यांना दाखवुन द्यायच प्रेमाची ताकत काय असते ते?" मेघना मल्हार कडे पाहत आत्मविश्वासाने बोलते.

 मेघना व मल्हार कंपनीत येतात. त्यांना कळते की कंपनीवर पोलिसांची धाड पडलेली आहे, आणि त्यात गुदामातील सगळा भेसळयुक्त माल ताब्यात घेतलेला आहे.
"
मल्हार......."मल्हार ला पाहुन त्याला हाक मारत परश्या समोर येतो.
"
परश्या?"चकित होत मल्हार विचारतो.
"
मला माहित होतं मल्हार तु परत येशील. मैडम...." परश्या भावुक होत दोघांकडे पाहतो.
"
हे सगळं कसं झालं परश्या?आणि हिराचंदानी आणि रावबहादूर कुठे आहेत?"मेघना विचारते.
"
सांगतो." परश्या दोघांना ही थोडक्यात घडलेली घटना सांगतो.
"
धाड पडली माल सापडला पण ते दोघे गेले पळुन."
     
मेघना व मल्हार एकमेकांकडे पाहतात.
"
तुला माहित हाय ते कुठं गेलं असतील?" मल्हार विचारतो.
"
नक्की नाय माहित, पण एक जागा हाय इथनं जवळच ते तिथंच गेलं असतील." परश्या बोटाच्या इशाऱ्याने जागा दाखवतो.
"
परश्या तु पोलिसांना सगळं सांग." मेघना बोलते, तसा परश्या जातो.
"
सायेब आता नाय वाचणार तुम्ही माझ्या हातनं." मल्हार मेघना चा हात पकडुन निघतो.
     
एका गुप्त ठिकाणी रावबहादूर व हिराचंदानी बोलत बसलेले असतात. आजुबाजुला अनंता व गुंडांचा पहारा असतो.
"
एवढी सगळी सेटिंग असताना पोलिसांना ही बातमी कळलीच कशी हिरा?"संतापत रावबहादूर विचारतो.
"
मी पण तोच विचार करतोय. बट डोन्ट वरी होईल सगळं ठिक. अरे पैसा सब बोलता है."हसतच हिराचंदानी बोलतो.
"
म्हणुन लोकांचं जीव घेणार व्हयं तुम्ही?"मल्हार ओरडतो. बाकीचे सगळे दचकुन तिकडे पाहतात.
"
मल्हार" हिराचंदानी.
"
मेघना...."रावबहादूर.
       
दोघेही डोळे वटारत मेघना व मल्हार ला पाहत असतात. एकमेकांचा हात हातात धरत आत्मविश्वासाने पावले टाकत मल्हार -मेघना समोर येतात.
"
व्हयं मल्हार आणि मेघना. सायेब तुमच्या पापाचा घडा भरलाय आता, आणि त्यालाच शिक्षा द्यायला देवानंच माझी आणि मैडमची भेट घडवून आणली. नाय सोडणार म्या तुम्हाला."मल्हार क्रोधाने मुठी आवळून बोलतो.
"
तुझ्या आई-बापाला ठार केलं तरी तुझी रग जिरत नाही? अरे आमच्यासमोर तुझी लायकीच काय आहे? गवताच्या काडीसारखा उडवुन देऊ तुला." हिराचंदानी संतापत बोलतो.
"
हं... लायकी? काका कोणाची लायकी? माझ्या मल्हार ची लायकी आज तुमच्याहुन मोठी आहे. लक्षात ठेवा आमचं प्रेम हीच आमची शक्ती आहे, या शक्तीशी भिडुन कोणीही जिंकलेलं नाही. "मेघना संतापाने सांगते.
"
मेघना...... मेघना बेटा माझं ऐक." रावबहादूर उगाच साळसुदपणाचा आव आणत मेघना समोर जातात.
"
दुर व्हा माझ्यापासून मि.रावबहादुर साठे. वडील म्हणायचीही लाज वाटतेय मला, शी!" मेघना नजर फिरवते.
"
अरे तोंड काय बघता मुर्खांनो मारा या दोघांना." हिराचंदानी क्रोधाने अनंता व गुंडांना आदेश देतात. तसे अनंता व गुंड एकदमच मल्हार वर धावुन जातात.
"
मल्हार. खंडोबा चं दुसरं नावही मल्हार होतं. हो खंडोबा आणि कर संहार या राक्षसांचा."मेघना मल्हार ला प्रोत्साहन देत बोलते. मल्हार च्या अंगात बळ संचारते. साक्षात खंडोबाचे रुप त्यात अवतरते. मल्हार वर अनंता व गुंड तुटुन पडतात, पण मल्हार सगळ्यांना हवेत उडवून लावतो. मल्हार वाघासारखा डरकाळ्या फोडत सगळ्या गुंडांशी लढु लागतो. अनंता व गुंड जखमी होऊन विव्हळत खाली पडतात.
"
साहेब......"आसमंत भेदुन टाकणाऱ्या आवाजात मल्हार ओरडतो. हिराचंदानी व रावबहादूर जागेवरच थिजल्यासारखे राहतात. मल्हार बाजुलाच पडलेला एक धारदार कोयता घेऊन त्या दोघांवर उगारतो.
"
थांब मल्हार. कायदा हातात घेऊ नकोस." पोलिस तिथे पोहचतात.
"
सायेब या दोन राक्षसांना मारल्याबिगर मी गप राहणार नाय."क्रोधाचे अंगार फुलवत मल्हार बोलत असतो.
"
मल्हार......"पोलिस बोलणार तेवढ्यात मेघना त्यांना थांबवते.
"
त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळणार मल्हार. आपण मिळवुन द्यायची ती. पण आता या दोन सैतानांना मारुन तु तुझे हात रंगवु नकोस. मल्हार शस्ञ खाली घे."मेघना बोलते. मल्हार मेघना कडे पाहतो. मेघना नजरेने त्याला खुणावते, तसा तो हातातला कोयता खाली फेकतो. पोलिस हिराचंदानी व रावबहादूर ला बेड्या ठोकुन घेऊन जातात.
      
मेघना व मल्हार भावुक होत एकमेकांना पाहत राहतात. मेघना धावत जात मल्हार ला मिठी मारते.
"
मल्हार.......आता पुरे हा विरह." मल्हार मेघनाला मिठीतुन बाजुला करतो.
"
अवो त्यासाठीच तर देवानं पुन्हा एकत्र आणलयं आपल्याला. " मल्हार हसत बोलतो.
"
आता पुन्हा दुर जाणार नाही ना?"पाणावलेल्या डोळ्यांनी मेघना विचारते.
"
मैडम रडु नका, अवो हसताना लयी बेस्ट दिसता तुम्ही." मल्हार हसतच सांगतो.
"
मैडम नाही......... मेघना." मेघना हसतच मल्हार ला मिठी मारते. दोघे बराच वेळ एकमेकांच्या मिठीत सामावतात.

                                                 (समाप्त)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ये रिश्ता क्या कहलाता है!

अवंतिका एक छोटीशी प्रेमकथा