प्रतिघात- द रिव्हेंज Chapter-1

        

 

 




           मुंबईतील एक चाळवजा भाग. त्या जागेत नवीन आपल्या आईसोबत राहत आहे. तो बीएस्सीच्या अखेरच्या वर्षाला आहे, आज त्याचा २१ वा वाढदिवस होणार आहे. 

"नवीन, नवीन. कुठे गेलाय हा मुलगा, काय माहित?" नवीनची आई त्याला शोधत असते.

"काकु तो पलिकडच्या गार्डन मध्ये बसलाय."शेजारीच गैरेजमध्ये काम करणारा सलीम बोलला.

"अरे देवा! काय करु या मुलाचं?" म्हणत डोक्यावर हात मारत नवीनची आई गार्डन कडे जाते. नवीन गार्डन मध्ये बेंचवर बसुन समोर खेळणाऱ्या मुलांकडे पाहत आहे. 

"नवीन तु इथे काय करतोयस? तुझा वाढदिवस आहे ना आज?" नवीनची आई जवळ बसत बोलते.

"काय उपयोग आहे आई?" नवीन उदास होत दुरवर पाहत बोलतो.

"म्हणजे?" नवीनची आई आश्चर्याने विचारते.

"आई, आज कॉलेजमधुन घरी येताना-" 

       नवीन काहीसे आठवुन बोलतो.

       कॉलेजकडे जाणारा भरगच्च गर्दीचा रस्ता. वाहनांचा, फेरीवाल्यांचा संमिश्र आवाज. छोटी छोटी अनाथ, गरीब मुले सिग्नलवर भिक मागत आहेत. काही लोक जाता जाता रस्त्यावर पानाच्या पिचकाऱ्या उडवत आहेत, थुंकत आहेत. नवीन शांतपणे सगळं पाहत फुटपाथवरुन घरी परतत आहे. फुटपाथ उखडलेला, पथदिपही व्यवस्थित नाहीत. 

        अचानक करकचुन ब्रेक दाबल्याचा आवाज येतो, तशी सगळी गर्दी तिकडे पाहते. 

"साले, बघुन पण चालत नाही." तो बाईकस्वार रस्त्यावर पचकन थुंकत रागाने बोलतो. रस्त्यावर एक अनाथ मुलगा जखमी अवस्थेत विव्हळत असतो. काय झालं, कसं झालं, आणि चुक कोणाची काहीच समजत नव्हते. जो तो एकमेकांना पाहत होता.

"पाणी, पाणी....." रस्त्याच्या मधोमध पडलेला तो मुलगा विव्हळत होता. लोक बघ्घे बनुन पाहत होते, कोणी हातावर चुना मळता मळता पाहत होते, पण पाणी दयायला पुढे कोणीच येत नव्हते. 

"हे घे पाणी." नवीन पटकन पुढे होत आपल्या बॉटलमधील पाणी देतो.

"काय रे, तु ओळखतोस काय याला?" गर्दीतुन वाट काढत एक ट्रैफिक पोलिस पुढे येत बोलतो.

"साहेब, जखमी माणसाला पाणी पाजण्यासाठी ओळख लागत नाही." नवीन शक्य तेवढ्या शांतपणाने बोलतो, आणि आजूबाजूच्या गर्दीतुन वाट काढत बाहेर पडतो.

"आता सांग आई, लोकांची जर अशी मानसिकता असेल, तर कसं होईल?" 

       आजुबाजुला मुलांचा गोंगाट, आकाशातुन झेपावणाऱ्या विमानाचा आवाज, त्यातच नवीनकडे चकित होऊन त्याची आई पाहत होती.

"अगं आई, बोलना काहीतरी." नवीन ओरडतो, तशी ती भानावर येते.

"तु खुप चांगलं केलसं बाळा,पण लोकांची मानसिकता, त्यांचा बदल असल्या गोष्टींचा विचार करत जाऊ नकोस." 

"पण का आई? तुला नाही वाटत, परिस्थिती बदलायला हवी." नवीन आत्मविश्वासाने बोलतो. आपले अश्रू लपवत नवीनची आई उभी राहते, एक चेहरा तिच्या नजरेसमोर येतो. झटकन मागे वळुन ती बोलते.

"तुझ्या एकट्याच्या विचार करण्याने परिस्थिती बदलणार नाही, नवीन." आई नवीनचा हात पकडुन त्याला घरी आणते. 

"अरे नवीन कहा था इतनी देर?" सलीम विचारतो, पण त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता दोघे आत शिरतात.

       "हैप्पी बर्थडे टु यु. हैप्पी बर्थडे डियर नवीन." सगळ्या मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत नवीन केक कापतो आणि तो आईला भरवण्यासाठी त्याने पाहिले, तर आई तेथे नव्हती.

"काय पाहतेयस आई?" खिडकीजवळ उभी राहुन बाहेर पाहणाऱ्या आईजवळ जात नवीन आश्चर्याने विचारतो.

"नवीन, आज तुझा वाढदिवस आहे. पण तु जे सकाळी बोललास ते काही मनातुन जात नाही." आई त्याच्याकडे पाहत बोलते. नवीन अजुनही आश्चर्य व्यक्त करतो.

"नवीन तु म्हणालास ना, परिस्थिती कुणीतरी बदलायला पाहिजे. असं वाटलं, की जणु तुझे बाबाच उभे आहेत." 

    नवीनच्या आईचे डोळे भरुन येतात. ती तशीच घरात निघुन जाते. नवीन तिला जाताना पाहत राहतो. 

"नवीन, चल कैरम खेळायला चलायचं ना?" शेजारचा राहुल येत विचारत होता.

       नवीनने हळुच डोकावुन घरात पाहिले.

"जा, पण लवकर ये." नवीन राहुलसोबत निघाला. चिंचोळ्या गल्लीतुन वाट काढत तो व राहुल कैरम क्लबकडे पोहोचले. तिथे रवि, अविनाश त्यांचीच वाट पाहत होते.

"आज तुम्हाला यायला उशीर झाला." अविनाश कैरम बोर्ड समोर बसत बोलला. पण त्याची नजर नवीनवर गेली.

"काय रे, हा खुप उदास दिसतोय?" अविनाश राहुलला विचारत होता. 

"यार आई सुध्दा कधी कधी काय बोलते, काही कळत नाही बघ." नवीन खुर्चीवर बसत बोलतो.

"काय कळतं नाही?" रवि विचारतो.

नवीन दोघांकडे पाहत घडलेली सगळी घटना सांगतो. 

"मग बरोबर आहे तिचं. तु कशाला एवढा विचार करतोयस नवीन?" अविनाश बोलतो.

"अविनाश पण मग त्या मुलाची काय चुक होती? अरुंद रस्ते, अस्वच्छता यांचा विचार का नाही करत कोण?" नवीन तळमळीने बोलत असतो.

"अरे पण तु काय समाजसेवक आहेस, प्रत्येक गोष्टीचा विचार करायला? तु काय करणार आहेस?" अविनाश बोलतो.

"लढा. मी या सगळ्याविरुध्द लढा देणार आहे. " नवीन एका वेगळ्या आत्मविश्वासाने बोलतो.

        नेहमीप्रमाणे त्या रस्त्यावर वर्दळ होती, त्यात फेरीवाले, पेपर विक्रेत्यांचा संमिश्र आवाज येत होता. लोक रस्त्यावर पान खाऊन थुंकत होते, काहीजण मोठमोठयाने हातवारे करत बोलत होते. नवीन नेहमीप्रमाणे कॉलेजला चालला होता. 

       तेवढयात एक आलिशान कार येत रस्त्याच्या कडेला थांबते.

"ए चल चल बाजु हट" एक राकट चेहऱ्याचा हट्टाकट्टा माणुस सगळ्यांना दरडावत येऊ लागला. 

"ए चल ये सब साफ कर." एक छोटा अनाथ मुलगा बुटपॉलिश करत असतो, त्याच्याजवळ जात तो बोलतो. बाजुलाच रस्त्यावर कोणीतरी थुंकलेले असते.

" साहब, मै तो बुटपॉलिश करता हु, मै नही करुंगा ये काम." तो बाजुला पाहत बोलतो.

"तुझे तो अब........" म्हणत तो जाडा माणुस त्याच्यावर लाथ उगारतो, तेवढ्यात नवीन तेथे पोहोचतो.

"तुम्हाला त्याला मारायचा काही हक्क नाहीये. मारायचचं असेल तर अशी घाण करणाऱ्या, आपल्या घरचाच रस्ता आहे असं वागणाऱ्यांना शिक्षा करा."

"ए कौन है तु मुझे सिखायेगा?" म्हणत संतापाने तो नवीनवर हात उगारणार, तेवढ्यात त्याचा हात रोकला जातो.

"ए रुक जावेद, बच्चे पर हाथ उठाते हो?" अब्दुल चाचा बोलतात.

"और तुम सब, यहा क्या तमाशा चल रहा है, चलो निकलो." अब्दुल चाचा गर्दी कडे पाहत बोलतात, तशी गर्दी पांगते.

"आपने रोका इसलिए, वरना इस लडके को दिखाता, की मै कौन हु." तो जाड माणुस रागाने डोळे गरगरवत कारमध्ये जाऊन बसतो.

"बेटा ऐसे लोगो का सामना ऐसे ही नही कर सकते, तुम मेरे घर पर आ मै तुम्हे सब बताऊंगा." अब्दुल चाचा निघुन जातात. 

"एक्सक्युज मी" म्हणत एक १९-२० वर्षांची मुलगी हसत हसत त्याच्या समोर येते.  नवीन तिला निरखुन पाहतो.

"हाय माझं नाव सारा. फ्रेंड्स?" म्हणत हसतच ती हात पुढे करते. नवीन चमकुन तिच्याकडे पाहत राहतो, तेवढ्यात ती मुलगी निघुन जाते.  

        संध्याकाळी नवीन कॉलेजमधुन त्या चिंचोळ्या गल्लीकडे येतो.

"अब्दुल चाचा का घर?" एक माणुस त्याला बोटाने इशारा करतो. एक जुने पडके घर असते, नवीन दरवाजा ठोठावतो. 

"कौन?" म्हणत दरवाजा उघडला जातो. 

"अरे तुम? आओ आओ अंदर आओ." म्हणत अब्दुल चाचा त्याला आत घेतात.

"क्या लोगे? चाय, कॉफी?" अब्दुल चाचा विचारतात.

"जी, काहीच नको." नवीन हसुन बोलतो.

"चाचा वो आपने बोला था, मुझसे मिल. मै तुम्हे बताऊंगा की ऐसे गुंडे, मवालीयों से कैसे उलझना है." 

    अब्दुल चाचा सोफ्यावरुन उठत खिडकीजवळ जातात.

"तुम करते क्या हो?" खिडकीतुन बाहेर पाहत ते विचारतात.

"आं....." प्रश्न न कळल्याने नवीन आश्चर्य व्यक्त करतो.

"मेरा मतलब, काम क्या करते हो?" अब्दुल चाचा मागे वळुन विचारतात.

"अभी मै बीएस्सी के लास्ट इयर मै हु."

       अब्दुल चाचा सोफ्यावर बसतात.

"चाचा, मै रोज देखता हु, लोग रास्ते पर से गुजरते हुए कितनी गंदगी फैलाते है. बहुत भीड भाड करते है. उपर से ये छोटी सडके, ट्रैफिक की भी हालत खराब. सडको पर रात के टाईम निकलना भी मुश्कील." नवीन गंभीरपणे बोलत असतो.

"तो तुम क्या करना चाहते हो?" अब्दुल चाचा शांतपणे विचारतात.

"इन सबको ये बताना चाहता हु की ये गलत है." नवीन निर्धारपुर्वक बोलतो.

"तुम्हारे चाहने से क्या ये हो पाएगा?" अब्दुल चाचा जमिनीकडे पाहत बोलतात. 

      नवीन निराशेने खाली पाहतो. आपण इथे येऊन काही उपयोग झाला नाही, असे त्याला वाटते.

"तुम निराश मत हो बेटा. अगर कुछ बडा करना हो, तो बडी रिस्क लेनी चाहिए." अब्दुल चाचा आत जातात, आणि एक मोठी कापडी पिशवी घेऊन बाहेर येतात.

"बहुत साल पहले मै और मेरा दोस्त राकेश यही सोच लेके निकले थे, की ये जो लोग अपनी मनमानी कर रहे है वो सुधर जाए." अब्दुल चाचा पिशवीतुन काही जुने न्युजपेपर्स व फोटो काढुन  समोर ठेवतात. न्युजपेपर वर तारीख असते १० मार्च १९९०. नवीन डोळे विस्फारुन पाहु लागतो.

"वो भी क्या दिन थे. हमने यहा के लोकल पॉलिटिशियन के सामने रस्ते पर होनेवाली गंदगी, दुर्घटनाए, भीडभाड सभीकी तरफ ध्यान खिचने की कोशिश कियी थी. राकेश ने रास्ते पर कोई सुविधा ना होने के, और लोगों के कही प्रश्न उनके सामने रखे. लेकिन उस वक्त किसीने उसकी तरफ ध्यान भी नही दिया." 

      नवीन सारखा त्या फोटोंकडे पाहत असतो.

"चाचा, यही राकेश है न?" नवीन एका फोटोवर बोट ठेवतो.

"हां, यही है मेरा दोस्त राकेश कोरेगावकर." 

       नवीन शॉक लागल्यागत वर पाहतो.

"बहुत याद आती है उसकी बेटा. बहुत बहादुर था वो." अब्दुल चाचाचे डोळे पाणावतात.

"उनके साथ क्या हुआ था चाचा?" नवीन आवंढा गिळत विचारतो.

"पता नही. बस एक दिन खबर आयी की एक ट्रक के नीचे आकर वो मर गया. " अब्दुल चाचा बोलतात.

"क्या ये सच है?" 

"सच या झुठ. पुलिस और पॉलिटिशियन जो भी कहेंगे चुपचाप से मानना होगा. उन्होने कहा एक्सिडेंट है तो है. उससे मेरे दोस्त की जान वापस तो नही आयेगी." 

      अब्दुल चाचा सगळे फोटो, न्युजपेपर्स गोळा करतात. 

"पर तुम ये सब क्यो पुछ रहे हो?" 

"क्योंकी वो मेरे बाबा थे." नवीन भावुक होत बोलतो.

        बराच वेळ अब्दुल चाचा नवीनकडे पाहत राहतात. नवीन तसाच उठुन तिथुन बाहेर पडतो. घरी जाईपर्यंत त्याच्या नजरेसमोर त्याच्या वडिलांचा चेहरा फिरत असतो.

"कुठे होतास इतका वेळ?" नवीनची आई विचारते.

     नवीन काहीच न बोलता सोफ्यावर बसतो.

"काय झालं? एवढा उदास का आहेस?" 

"आई तु अब्दुल चाचाला ओळखतेस?" नवीन आईकडे पाहत अनपेक्षितपणे विचारतो. नवीनची आई शॉक लागल्यागत दरवाजाला टेकुन उभी राहते.

"बाबांचे खास मित्र होते ना ते?" नवीन समोर जात बोलतो.

"ते तुला कुठे भेटले?" आई भावुक होते. 

"ते महत्वाचं नाहीये आई. बोल ना काय झालं होतं बाबांसोबत?" नवीन प्रश्न विचारतो.

"नवीन........तु फक्त एवढं लक्षात ठेव की तुझ्या बाबांचा अपघात झाला होता, बस." नवीनची आई आत निघुन जाते. 

"आई......." नवीन तसाच आत जातो. तेवढ्यात खिडकीतून त्याचे लक्ष सलीमकडे जाते.

"आई, तो सलीम बघितलास? दिवसभर काम करून पैसे कमवतो, पण त्याचे बाबा मात्र दारु पिऊन धिंगाणा घालतात." नवीन पुन्हा आईकडे पाहतो.

"माझे बाबा तसे नव्हते आई." नवीन बाहेर निघुन जातो. आई त्याच्याकडे पाहत राहते.

" आज बऱ्याच उशिरापर्यंत जागा आहेस?" रात्रीच्या वेळी नवीनला बराच वेळ जागं पाहुन आई विचारत असते.

"हो आई एक्झाम्स जवळ आल्यात ना!" 

"परीक्षा तर आता सुरु झालीय बाळा." नवीनची आई त्याच्या पाठीवर हात ठेवते. 

"बाळा तु हो पुढे. पण जे काही करशील ते विचारपूर्वक कर." नवीन चमकुन तिला पाहतो, व मिठी मारतो.

–-----------------------------------------------------------

      आमदार शिवम कुमारच्या बंगल्यावर धावपळ सुरु असते. बाहेरच्या लॉनमध्ये आराम खुर्चीत बसुन रुबाबात शिवम कुमार पेपर वाचत असतो. तेवढ्यात गडबडीत त्याचा पी.ए तिथे येतो.

"काय रे , काय झालं?" करड्या आवाजात शिवम कुमार विचारतो.

       तो माणुस चिट्ठी पुढे करतो. चिट्ठी वाचताच खवळुन शिवम कुमार उभा राहतो.

"कोण आहे हा?" 

"साहेब हा कोण ते माहीत नाही. पण बाहेरच्या लेटरबॉक्स मध्ये चिट्ठी होती." अदबीने पी.ए बोलतो.

"हं......जा तु. मी बघतो काय ते." पी.ए निघुन जातो. 

      आमदार शिवम कुमार बोटातल्या हिऱ्याच्या अंगठीकडे पाहतात. 

       नेहमीप्रमाणे नवीन कॉलेजला जात होता. रस्त्यावर तीच वर्दळ, गलिच्छ पणा, फेरीवाले, पेपरवाल्यांचा आवाज. एवढ्यात त्या कोंडीत भली मोठी फॉरच्युनर कार उभी राहते. 

"ए चला बाजुला व्हा, आमदार साहेब आले." म्हणत दोन कमांडोज खाली उतरले. सगळा जमाव जमा झाला.  शिवम कुमार हात जोडुन बोलु लागला.

"बंधु आणि भगिनींनो. मी तुमचा आमदार शिवम कुमार. या भागासाठी कित्येक वर्षांपासून विकासात्मक कामे करत आलोय. माझं काम मी खुप इमाने इतबारे केलं आहे, पण आज कोणीतरी माझ्यावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही निश्चिंत रहा. तो जो कोणी असेल तो माझे काही वाकडं करु शकणार नाही. तुमचा आशिर्वाद सदैव माझ्या मागे आहे." 

      जमाव मान डोलवतो.

"लोकांना गाढव बनवणं, कधी बंद करणार आहेत हे लोक काय माहित?" म्हणत नवीन कॉलेजला निघुन जातो.

     संध्याकाळी कॉलेजमधुन परतत असताना नवीन उभा राहुन वाहनांंची वर्दळ, अन्न शोधण्यासाठी धडपडणारी गरीब मुले यांना पाहत असतो.  समोरच एक मोठी बिल्डिंग उभी असते, तिकडे पाहत असतानाच अचानक अब्दुल चाचा तिथे येतात.

"चाचा....." 

"क्या देख रहे हो बेटा?" 

"चाचा देख रहा हु कुछ लोग इतना बडा बंगला बांधके रहते है और कुछ को खाने को भी नसीब नही होता." 

"बेटा नसीब वसीब सब इन बडे लोगो के लाए है. गरीब और मिडल क्लास आदमी कब तक नसीब को कोसता रहेगा? अपनी किस्मत बदलना अपनेही हाथ मे है." अब्दुल चाचा नवीनची पाठ थोपटत निघुन जातात. नवीन मनाशी पक्का निश्चय करतो, की ही परिस्थिती बदलणार आणि घरी निघुन जातो. 

      नवीन एक दिवस खिडकीजवळ बसुन बाहेर पाहत असतो. बाहेर खिडकीतुन त्याला फुटपाथवर फिरणारी गरीब मुलं दिसत असतात, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली उखडवलेला रस्ता दिसत असतो. तो उठतो, आणि टेबलजवळ जात ड्रॉवर उघडतो, त्यात काही महत्वाची कात्रणे त्याने मिळवलेली असतात. 

"माझ्या बाबांचं अपुर्ण स्वप्न मी पुर्ण करणार."

"नवीन........" हाक मारत आई आत येते. तसा नवीन ती कात्रणे पाठीमागे लपवतो. 

"काय लपवतोयस ते?" नवीनची आई विचारते, तसा नवीन ती कात्रणे पुढे करतो.

"ही तुला कुठे मिळाली नवीन? याचं काय करणार आहेस तु?" आई घाबरत विचारते.

"हा माझा पहिला डाव आहे आई या संघर्षातला." 

"अरे कसला संघर्ष? कोणाशी? तु आहेस कोण? भाई, नेता की समाजसुधारक?" नवीनची आई चिडते.

"आई शांत हो. बाबांनी या एरियासाठी, लोकांसाठी आपला जीव गमावला हे तरी मान्य करतेस ना तु?" नवीन रोखठोक विचारतो. नवीनची आई भावुक होते.

"नवीन तुझं बरोबर नाही असं म्हणत नाहीये. अरे पण तुझं वय काय? कशाला अशा लोकांच्या नादी लागायचं? ही चांगली लोकं नाहीयेत बाळा." कळवळून नवीनची आई सांगत असते.

"आई हेच तर चालत आलयं. हे बडे लोक आपल्यावर राज्य करतील. महागाई, बेकारी आणि असंख्य सामाजिक प्रश्न डोक्यावर मारतील, आणि ते घेऊन मुकाट्याने गुरा ढोरासारखे आपण राहायचे. का? कशासाठी आई?" नवीन आत्मविश्वासाने बोलत असतो. त्याच्या डोळ्यातील तो निर्धार तिला राकेश ची आठवण करुन देत असतो. आठवतो तिला तो दिवस, ज्या दिवशी तिचं सर्वस्व तिच्यापासून हिरावले होते. मोठ्याने टाहो फोडुन तिने आक्रोश केला होता आणि......आणि ते पुतळ्याचे भग्नावशेष!

"आई........." नवीनच्या हाकेने आई भानावर येते.

"हा बदल करायला हवा आई. मी करणार तो, बस मला तुझा आशिर्वाद दे." 

"नवीन कुठे शिकलास रे हे सगळं? तुझे बाबा पण असचं सांगायचे, बोलायचे. पण काळाने एकच थप्पड लगावली आणि मला माझी पायरी दाखवुन दिली. बाळा, अरे समाजाची मानसिकता, हे प्रश्न असेच राहणार आहेत. राजकारण मात्र चालत राहणार. मुठभर श्रीमंत गरीब, मध्यमवर्गीय लोकांवर राज्य करत राहणार, आणि आमच्या उघड्या पाठी फोडत राहणार रक्ताचे ओघळ वाहेपर्यंत." आई आक्रंदत बोलत असते.

"आई....." नवीन भयचकित होत बोलतो.

"मी तुला नाही रोकणार नवीन. कुणीतरी बदल करायलाच हवा. सत्तांध झालेल्या या लोकांना सामान्य माणसाची ताकत दाखवायला हवी. नवीन मी आहे तुझ्या पाठीशी, आता मागे हटु नकोस."

       नवीनला एक वेगळाच हुरुप येतो, आणि तो घराबाहेर पडतो.

        रस्यावरुन चालत जाताना पुन्हा त्याला रोजचेच चित्र दिसते.  बरेच लोक पान खाऊन थुंकत आहेत, जिकडे तिकडे घाण करत आहेत, कचरा करत आहेत. फेरीवाले, पेपरवाल्यांचा आवाज घुमतो आहे, आणि त्यातच बेदकारपणे वाहने चालवत काहीजण चालले आहेत.  नवीनला या सगळयांचीच किळस वाटत होती, त्यातही रस्त्याकडे लक्ष न देणा-या सत्ताधा-यांचाही त्याला राग होता.

     नवीन तेवढयातच काही लोकांना पचापचा थुंकत असताना रोकतो.

"काय रे, काय झालं तुझं?" म्हणत गुरगुरत एक माणुस येतो.

" हे पाहा, तुम्ही हे जे पान खाऊन रस्त्यावर थुंकताय ते बरोबर नाही करत आहात." नवीन कडक भाषेत बोलतो.

"तु कोण आहेस रे समजावयाला आलेला? पोलिस आहेस का? की सफाईवाला?" ते लोक नवीनची खिल्ली उडवतात.

"मी कोण, काय ते तुम्हांला समजेलच. पण एक लक्षात ठेवा. तुमच्यासारख्या लोकांमुळे आणि अश्या मानसिकतेमुळेच आपली मुंबई, आपल्या देशाची वाट लागलेली आहे."

        तेवढयात बराच जमाव त्यांच्या आजुबाजुला जमा होतो. नवीन चौकात उभा राहुन बोलायला सुरवात करतो.

"लोकहो, मी कोणी नेता, समाजसुधारक नाही. ना ही कोणी सफाई कर्मचारी. पण तुम्हीच विचार करा तुमच्या आजुबाजुला किती गोष्टी घडतात. काही लोक रस्ता आपल्या बापाचा असल्यासारखे वागतात, घाण करतात, बेदकार वाहने चालवुन सर्वसामान्यांचा जिव धोक्यात घालतात."

" मग तुझं काय म्हणणं आहे, आम्ही ही रस्त्यावरची घाण साफ करायची. या बेदकार वाहने चालवणा-यांबरोबर भांडायचं?"

"हेच, हेच चुकतयं तुम्हां लोकांच. आपण आपली मानसिकता बदलायला पाहिजे. विचार करा, किती प्रकारच्या प्रश्नांशी, महागाईशी आपण लढत असतो. याविरुध्द आपण केव्हा आवाज उठवणार?"

       नवीनच्या आवेशपुर्ण बोलण्याने उपस्थितांमध्ये चर्चेला सुरवात होते. एवढासा कॉलेजचा मुलगा हिंमत करुन बोलतो त्याचेच सगळयांना कौतुक वाटत असते.

"हो. हा मुलगा बोलतो ते बरोबर आहे. कितीवेळा मला रस्त्यावरुन जाताना या घाणीतुन जावं लागतं. रस्त्यावरच्या गर्दीतुन आणि या अरुंद रस्त्यावरुन धड चालणेही जमत नाही. वाहने तर अगदी विमाने चालवल्यासारखी चालवली जातात." एक म्हातारासा माणुस बोलत असतो.

"मुला तु हो पुढे. आपणच जर आपल्या प्रश्नांविरुध्द आवाज उठवला नाही, तर कायमच सहन करण्याची सवय लागेल. मुकाटयाने मार खाण्याशिवाय आपण काहीच का करु शकणार नाही?" सगळीकडे मोठयाने कुजबुज चालु होते.

"साहेब, एक मुलगा या लोकांना भडकवतोय." गर्दीतुन कोणीतरी नवीनला पाहत असते, आणि तो शिवम कुमारला फोन लावतो.

"पाठलाग करा त्याचा" शिवमकुमार ऑर्डर देतो. गर्दी तुन वाट काढत नवीन जाऊ लागतो. शिवम कुमारची माणसे त्याच्या पाळतीवर राहतात. एवढ्यात नवीन कुठे गायब होतो, त्यांनाच समजत नाही. ते शोधत राहतात.

       नवीन चकवा देऊन थेट शिवम कुमारच्या बंगल्यात प्रवेश करतो. 

"अरे कौन हो तुम? निकल जाओ यहासे" वॉचमन नवीन मागोमाग आलेला असतो.

"काय रे काय झालयं?" शिवम कुमारचा पी.ए वानखेडे विचारतो.

"साहब ये देखो. बिना रुके ही अंदर आ गया. मैने पुछा तो बोला साहब से मिलना है." 

"ए कोण आहेस तु? असा थेट बंगल्यात कसा आलास? तुला माहिती आहे का, हा कोणाचा बंगला आहे ते?" वानखेडे गुर्मीत बोलतो.

"मला शिवम कुमारला भेटायचं आहे." नवीन हाताची घडी घालत निग्रहाने बोलतो.

"साहेब असेच कुणाला भेटत नाहीत, आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते. असचं यायला हा काय अड्डा वाटला तुला?" वानखेडे अजूनही रागातच आहे.

"तसं हा बंगलाही अड्ड्यापेक्षा कमी नाही." नवीन जोमात बोलतो.

"ए..........." वानखेडे गुरगुरत त्याच्यावर धावुन जातो.

"थांब." म्हणत जिन्याच्या पायऱ्या उतरुन शिवम कुमार समोर येतो.

"काय  रे ? अजुन अंड्यातुन बाहेर नाही आलास, आणि येथे येऊन दादागिरी दाखवतोयस?" 

"साहेब ती बाहेर उन्हातान्हात फिरणारी मुलं बघितलीत? तो अरुंद रस्ता, ते ट्रैफिक. अजुनही फुटपाथवरुन जाताना जीव मुठीत घेऊन जावं लागतं." 

"हं हं. अरे तुझी कम्पेंल्ट असेल तर साहेबांच्या ऑफिसमध्ये नोंदणी कर. इथे येऊन कशाला त्रास देतोयस? "वानखेडे नवीन ची खिल्ली उडवतो.

"कम्पेंल्ट? अशा किती कम्पेंल्टी धुळ खात पडल्या असतील." नवीन शिवम कुमारच्या नजरेत नजर रोखतो.

"अरे ए......." वानखेडे संतापतो. शिवम कुमार हाताने इशारा करतात.

"कोण आहेस तु? कोणी पाठवलयं? " शिवम कुमार दरडावून विचारतो.

"एक सामान्य मुलगा आहे मी साहेब. आठवतयं का काही १६ मार्च १९९०. रस्ता आंदोलन........राकेश कोरेगावकर......"

     नवीन गंभीरपणे बोलतो. शिवम कुमारला भुतकाळ आठवु लागतो. घोषणांचे आवाज कानात घुमत राहतात.

"तु कसं ओळखतोस त्याला?" संशयाने पाहत शिवम कुमार विचारतो.

"कारण ते माझे बाबा होते." शिवम कुमारला एकदम शॉक बसतो. 

"काय झालं साहेब. बोला ना! हे गरीब सरीब, मिडलक्लास लोक जिवंत माणसं आहेत. तुमच्या ताटाखालची कुत्री नाहीयेत." 

"हे बघ. तु काहीही बोललास तरी माझं काही वाकडं करु शकत नाहीस." 

          नवीन मोठ्याने हसतो.

"जरा टिव्ही ऑन करा साहेब. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील." नवीन तसाच वळुन बाहेर पडतो. वानखडे न्युज चैनेल लावतो.

"आमदार शिवम कुमार यांनी विकासकामाच्या निधीत बराच भ्रष्टाचार केल्याचे धक्कादायक पुरावे समोर आले आहेत. लोकांची कामे करतो असं म्हणुन बऱ्याच लोकांना त्यांनी फसवले आहे." 

    वानखेडे टिव्ही बंद करतो.

"अरे ही काय न्युज आहे? उगाच माझी खोटी नाटी बदनामी करतोय हा मुलगा? " रागाने गुरगुरत शिवम कुमार बोलतो.

"साहेब आता?" वानखेडे विचारतो.

      शिवम कुमार फोन लावतो.

"सलीम आता इथुन एक मुलगा बाहेर पडला आहे, त्याला अशी अद्दल घडव, की पुन्हा माझ्या विरोधात उभं राहु नये."

         शिवम कुमार फोन कट करतो. 

------------------------------------------------------ 

        नवीन रस्त्यावरुन चालत जात असतो.  तेवढ्यात बाईकवरुन दोघेजण त्याच्या समोर येतात.

"नवीन कोरेगावकर?" एकजण विचारतो. नवीन मान डोलवतो.

" साले अभी अंडे से निकला भी नही और पॉलिटिक्स करता है?" ते दोघेही नवीनला मारहाण करायला सुरवात करतात. जवळपास कुणीही नसते. ते दोघे नवीनला बेशुध्द होईपर्यंत मारहाण करतात. 

"ए चल हो गया. इतना काफी है इसके लिए." ते दोघे गुंड नवीनला तसाच सोडुन वाटेला लागतात. 

         नवीन बेशुध्दावस्थेत असतो. बऱ्याच वेळाने एका घोळक्याची नजर त्याच्यावर पडते. ते लोक नवीनला उचलुन सिटी हॉस्पिटलमध्ये नेतात. एकजण त्याच्या खिशातील पुराव्यावरुन सलीम गैरेजवाल्याला फोन करतो. 

"नवीन की अम्मी जल्दी चलो. नवीन सिटी अस्पताल मे है." सलीम ओरडत नवीनच्या घराबाहेर जातो. 

"काय झालं माझ्या नवीनला?" म्हणत घाबरत नवीनची आई बाहेर येते. सलीम सोबत ती सिटी हॉस्पिटलला जाते.

"नवीन कोरेगावकर?" सलीम काऊंटरवर विचारतो, तसा नर्स बोटाने इशारा करते. सलीम व नवीनची आई धावतच मेल वॉर्ड ला जातात. 

"नवीन........." एका कॉटवर जखमी अवस्थेतील नवीन झोपलेला असतो. 

"हे.....हे सगळं कसं झालं नवीन?" आई रडत नवीनच्या केसांवरुन हात फिरवते. 

"आई एकदा लढायचं ठरवलं की अशा छोट्या मोठ्या आघातांना घाबरायचं नसतं. "

"मुझे पता है ये किसने किया होगा." सलीम बोलतो.

"सलीम......." तेवढ्यात दरवाजावर सारा उभी दिसते.

"सारा......" नवीन आश्चर्याने बोलतो.

"नवीन...." सारा तशीच आत येते, आणि नवीनला न्याहाळते.

"आई ही सारा........."

नवीनची आई व सलीम मान डोलवतात व तिथुन बाहेर येतात.

"तुझ्या घरीच गेले होते, तेव्हा मला समजलं की तुझ्यासोबत हे सगळं घडलयं." सारा घाबरत बोलते.

     नवीन हसतो.

"हे सगळं तर होत राहणार सारा. चांगल्या कामात अशीच विघ्नं येतात." 

"पण तु तुझी काळजी घे नवीन." सारा नवीनचा हात दाबते. नवीन चमकुन पाहतो.

"मी युएस ला चालली आहे. पप्पांनी माझं मेडिकल चं एडमिशन केलयं." 

      नवीन बराच वेळ बाजुला पाहतो.

"जा तु सारा. मी तुझी वाट पाहेन. या सत्तेविरुद्ध च्या लढाईत आता माझं काय होणार हे मलाच माहीत नाही." नवीन आत्मविश्वासाने बोलतो. सारा उठते, आणि डोळ्यातले अश्रू पुसत बाहेर पडते.

             एखादा वणवा पेटावा, तशी नवीनच्या घराच्या आजुबाजुच्या वस्तीत ही बातमी पसरते. लोकात उलट सुलट चर्चा सुरु होतात.

"मोठा आला होता, आम्हाला सांगणारा. आता स्वतः हॉस्पिटलात पडलाय." कोणीतरी उपहासाने बोलतं.

"पण त्याने काय वाईट केलं. सिस्टीम विरुध्द लढणं, मनमानी करणाऱ्या लोकांना सरळ करण्यासाठी आवाज उठवणं, हे करायलाचं हवं कोणीतरी." अशा संमिश्र चर्चा सुरु होतात. पण जनतेत नवीनला पाठिंबा वाढत असतो. लोक स्वतः हुन शिस्त पाळत असतात. रस्त्यावर विनाकारण थुंकुन घाण करणाऱ्यांना पब्लिक च शिक्षा करत असते. स्वतः पब्लिक चर्चा घडवुन रस्त्याची कामे पुर्ण करण्यासाठी धडपडत असते. 

        नवीन बरा होऊन घरी येतो.

"ए नवीन देख तो क्या न्युज आयी है!" सलीम न्युजपेपर दाखवत खुशीने बोलतो. नवीन व त्याची आई न्युज वाचते.

"नवीन आता तुझ्यामागे लोकांचाही पाठिंबा वाढतोय. तुझी लढाई आता खऱ्या अर्थाने सुरु झाली." नवीनची आई बोलते.

"आई, बाबांचं स्वप्न मी पुर्ण करणार. जो पर्यंत त्यांच्यावरचे आरोप खोटे आहेत हे सिध्द होत नाहीत तोपर्यंत मी मागे हटणार नाही." 

------------------------------------------------------

         शिवम कुमारच्या बंगल्याबाहेर बरीच गर्दी जमलेली असते. टिव्ही वरच्या न्युजमुळे सगळे खवळलेले असतात. 

"शिवम कुमार, हाय हाय. अपनी कुर्सी खाली करो." अशा घोषणांनी परिसर दणाणत असतो. शिवम कुमारची सेक्युरिटी जमलेल्या जनतेवर लाठीचार्ज करत असते.

"साहेब, सीएम मैडमांचा फोन आहे."वानखेडे मोबाईल शिवम कुमारच्या कानाला लावतो.

"हे काय चाललयं, मि. कुमार. सब पब्लिक भडकी हुई है. मुझे दिल्ली से भी कॉल आ रहे है." 

"मैडम, अहो असं कोणी उठुन आरोप करेल आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का?" 

"बात मेरे यकीन की नही है. मै मिडिया और पब्लिक को क्या जवाब दु?" सीएम दिक्षित मैडम रागाने बोलतात.

"उनको मै संभालुगा मैडम. आप चिंता ना करे." शिवम कुमार फोन कट करतो. 

शिवम कुमार खिडकीतून बाहेर पाहतो. गर्दी उसळलेली असते. 

"या मुलाचं काहीतरी केलं पाहिजे."

     शिवम कुमार फोन फिरवतो.

---------------------------------------------------

         गैरेजमध्ये काम करणाऱ्या सलीमला पाहत नवीन बराच वेळ दरवाजावर उभा असतो. राहुन राहुन त्याला आपल्यावरील हल्ला आणि लोकांचा नवीनला असलेला पाठिंबा आठवत असतो. नवीन तसाच सलीम जवळ जातो. 

"सलीम तुमसे एक बात पुछनी थी."

"हा बोलो ना" सलीम मान वर न करता बोलतो.

"जिंदगी के बारे मे क्या सोचते हो तुम?" 

"जिंदगी!" सलीम हसतो.

"१९९३ के बमब्लास्ट मे मेरा बाप मर गया. मॉ भी चल बसी. तब से मै इनके साथ रह रहा हु. ये मेरे असली मा बाप नही है. बमब्लास्ट के वक्त मै स्कुल का बच्चा था. मैने देखा, जगह जगह लाशे बिछी हुई है. लोग रेंगते किडे की तरह भाग रहे थे. जिंदगी की भीख मॉंग रहे थे. अरे जिंदगी ये नही जो तुम और मै जी रहे है, वो तो उसकी है जो शान से पैसा और पॉवर के साथ जिता हो. हम जैसों की तो बैंड बज गयी है." सलीम तिडकीने बोलतो. 

       नवीन मनात काहीतरी घोळवत बाहेर पडतो. कोणीतरी त्याचवेळी त्याच्यावर लक्ष ठेवुन असते.  नवीन चालत चालत अब्दुल चाचाच्या घराजवळ थांबतो. बराच वेळ तिकडे पाहतो, आणि तसाच भरभर चालत शिवम कुमारच्या बंगल्याकडे येतो. आज त्याच्या हातात बाजी असते. शिवम कुमार पुरता अडचणीत असतो. 

"तो बघ आला." शिवम कुमार खिडकीतून आत येत असलेल्या नवीन कडे पाहतात.

"आता माझी खेळी बघ." शिवमकुमार एका हातात गन घेऊन ती कमरेच्या खिशात ठेवतो, आणि दुसऱ्या हातात काही डॉक्युमेंट्स, तो बाहेर येतो.

"ये आलास? मला माहित होतं हे सगळं तुझचं कारस्थान असणार." जमलेली गर्दी शांत होत त्या दोघांना पाहते.

"शिवम कुमार जे खरं आहे ते लोकांसमोर येणारच." नवीन हाताची घडी घालतो.

         शिवम कुमार मोठ्याने हसतो. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात.

"खरं?" शिवम कुमार पायऱ्या उतरुन समोर येतो.

"लोकहो हा मला खरं दाखवणार? माझ्यावर उगाचच आरोप करणार? अरे आरोप करायलाही तयारी असावी लागते. लोकहो याचा बाप स्वतः किती खोटा होता हे तुम्ही पाहा." शिवमकुमार हातातले कागद हवेत उडवतो. ते जमलेल्या गर्दी वर पडतात. 

"शिवम कुमार............." नवीन रागाने मुठी आवळत ओरडतो.

"अरे हा पोरगा खोटं बोलतोय. याचा बापच चोर होता. " गर्दी तला एकजण बोलतो.

"उगाच साहेबांबद्दल खोटे नाटे पसरवतोस, मारा याला." एक संतप्त महिला बोलते. चिडलेला जमाव नवीनवर धावुन येतो. तसा शिवमकुमार गन काढुन हवेत फायर करतो.

"लोकहो, असल्या खोटया माणसांना तुमचा लाडका शिवमकुमार घाबरत नाही. तुमचे आशिर्वाद असता, माझं कोणी वाकडं करु शकत नाही. चला आता निघा तुम्ही." शिवम कुमार हवेत हात जोडतो. चिडलेला जमाव गलका करत बाहेर जातो.

"पाहिलसं पॉलिटिक्स ची ताकत? मला एक्सपोज करणार होतास?" शिवमकुमार हसतो.

"हरामखोरा, तुच.........तुच मारलसं माझ्या बाबांना." नवीन रागाने दात ओठ खातो.

"सिद्ध कसं करणार आहेस? आणखी एक तु ज्या मुंबई चा मसिहा बनु पाहतोयस ना. ती अख्खी मुंबई, हा पुरा भारत देश विकुन टाकणार आहे मी . बसं काही दिवस." 

"शिवम कुमार......" नवीन चिडतो.

"अरे अरे अरे. राग आला, बाळाला? जा घरी जा सोन्या. अजुन एक सरप्राईज तुझी वाट पाहतेय." 

        शिवमकुमार आणि वानखेडे मोठ्याने हसतात.

"काय केलसं तु?" नवीन रागाने बेभान होतो. नवीन तसाच मागे वळुन पळतच घराकडे निघतो. घराच्या दरवाजातुन तो पाहतो. रक्ताचा सडा पसरलेला आहे. सलीम एका कोपऱ्यात मरुन पडलेला असतो.

"न.....नवीन" आई विव्हळत असते. 

"आई" नवीन धावत तिच्याजवळ जातो.

"बा....बाळा आता.....आता ही लढाई तु....तुलाच लढावी लागणार आहे." 

"आई मी डॉक्टर ला बोलवतो, तुला काही होणार नाही." 

"अ......अब्दुल चाचाकडे जा, नवीन. अब्दुल चाचाकडे जा." नवीनची आई दम सोडते.

"आई........."नवीन मोठ्याने आक्रोश करतो आणि रडु लागतो. तो तसाच उठतो, आणि तांबुसलेल्या डोळ्यांनी अब्दुल चाचाकडे पोहोचतो.

"चाचा......." जमिनीवर जखमी अवस्थेत विव्हळत अब्दुल चाचा असतात.

"अल्लाह का शुक्र है नवीन की तुम आ गये. बेटा मेरी बात ध्यान से सुन. अब........अब ये लडाई तुम्हे अकेले ही लडनी होगी. ये खुन की कहानी खुन से ही पुरी होगी. " अब्दुल चाचा बोटाने इशारा करतात.

"उस ड्रॉवर मे एक कार्ड है, जा...जावेद का, उससे मिल और बोल मुझे......मुझे आपको शामिल होना है." 

"चाचा......" अब्दुल चाचा ही मरण पावलेले असतात. तांबुस डोळ्यांनी तो गुडघ्यावर बसतो. शिवम कुमारचा क्रुर चेहरा त्याला दिसत असतो. आई, सलीम, अब्दुल चाचा सगळे डोळ्यासमोर फिरु लागतात. नवीन उठतो, आणि ड्रॉवर मधील ते कार्ड बाहेर काढतो. त्यावर लिहलेले असते, "जावेद अहमद."

        सात आठ लक्झरी कार्स चा ताफा रस्त्यावरुन जात असतो. दुतर्फा उभी असलेली माणसे आश्चर्याने पाहत असतात. मध्यभागी जाणाऱ्या एका मोठ्या काळ्या कारवर जैग्वारचे निशाण असते. सगळा ताफा शिवम कुमारच्या बंगल्याबाहेर थांबतो. धडाधड काळ्या सुटाबुटातील माणसे बाहेर पडतात. जैग्वारचे चिन्ह असलेल्या कारचा दरवाजा उघडतो. त्यातुन सुटाबुटातील अक्राळ विक्राळ माणुस रुबाबात बाहेर पडतो.

            सगळा ताफा बंगल्याकडे जायला निघतो. शिवम कुमारच्या बंगल्यावर बरेच कार्यकर्ते, नेते मंडळी जमलेली असतात. ती सगळी उभी राहुन डोळे विस्फारत पाहु लागतात. 

"आईये, आईये रशित साहब. यहा तक आने को कोई तकलीफ तो नही हुई ना आपको?" शिवमकुमार बाहेर येत विचारतो. सगळे पाहत असतात. 

"आपके बदोलत कुछ तकलीफ नही हुई." सगळ्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यात कुजबुज सुरु होते. 

"यहा बडा शोर है, चलो अंदर चलते है." शिवमकुमार च्या मागोमाग रशीत आणि सगळा ताफा आत जातो. रशीत व शिवमकुमार समोरासमोर बसतात. ताफा लांबवर उभा राहतो.

"सुलतान  साहब कब आ रहे है?" शिवमकुमार विचारतो.

"इशाह अल्लाह वो भी आयेंगे. हिंदोस्तान की धरती पर उनकाही राज होगा." 

"वो तो होगा, बस मेहेरबान की नजर हम पे हो." शिवमकुमार हसतो. 

         रशित एक ब्रिफकेस समोर ठेवत उघडतो. त्यात नोटांची बंडले असतात. 

"ये तो बस एक मामुली तोहफा है आपके लिए." शिवमकुमार चा पी.ए ती बैग घेतो. 

"बस आप इसी तरह हमारी मदद करना और हम आपकी." रशित उठतो. सगळा ताफा रशितसह गाड्यांमध्ये बसतो आणि निघुन जातो.

"हा हा हा हा. पाहिलसं वानखेडे याला म्हणतात पॉलिटिक्स. अरे ही सिस्टीम आम्हीच बनवतो. छोट्या मोठ्या लाटा माझं काय करणार आहेत? " 

          शिवमकुमार आणि वानखेडे मोठमोठ्याने हसु लागतात.

--------------------Chapter 1 closed----------




      









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ये रिश्ता क्या कहलाता है!

अवंतिका एक छोटीशी प्रेमकथा