अवंतिका एक छोटीशी प्रेमकथा

                                




                                                                   अवंतिका

          अंगणात प्राजक्ताच्या फुलांचा सडा पसरलेला होता, त्याचा सुगंध वातावरणात सर्वत्र दरवळत होता. सकाळचे नयनरम्य व आल्हाददायक वातावरण होते. अशातच आपल्या टुमदार कौलारू घराच्या खोलीत उघड्या खिडकीजवळ बसून अवंतिका बाहेरचे द्रुश्य पाहत होती. खिडकीतून येणाऱ्या वार्याच्या मंद झुळकीमुळे तिचे रेशमी केस भुरुभुरू उडत होते.
         सहज तिने घड्याळात पाहिले, सकाळचे आठ वाजले होते. वातावरणातील गारवा कमी झाला नव्हता. स्वयंपाकघरात भांड्यांची खुडबुड स्पष्टपणे ऐकू येत होती, आई तिथे असण्याचा तो संकेत होता. बाबा अजूनही सकाळच्या रपेटीहून आले नव्हते.
         समोरच्या मेजावर तिची डायरी ठेवलेली होती. ती पाहताच तिच्या गतकाळातील स्म्रुती जाग्या झाल्या. डायरी उचलून तिने लिहायला सुरवात केली.
           लहानपणापासूनच फुलपाखरा सारखी स्वच्छंद, अवखळ, हसरी होते मी. सर्वांशी प्रेमाने वागावे असे बाळकडू घरातुनच मिळाले होते. वर्गात पहिला नंबर कधी सोडला नाही.  बरोबरच खेळाचे मैदानही गाजवत होते. बाबांची लाडकी परी होते मी. माझ्या आई-वडिलांसाठीच तर माझे आयुष्य होते. पण मनात कुठेतरी प्रत्येक मुलीप्रमाणे आयुष्याच्या जोडीदाराची स्वप्ने होती. माझ्या स्वप्नातला राजकुमार घोड्यावरून नको, निदान छानश्या बाईकवर बसून यावा, असं अल्लड स्वप्न पडायचं मला. त्याने आपली काळजी घ्यावी, आपल्यासाठी वेळ द्यावा, आपलं सगळं ऐकावं अशी मनोमन अपेक्षा होती माझी.
             वयोमानानुसार माझ्यात होणारे बदल मला समजत होते. मलाही नवीन ओळखी करणे, मैत्री करणे आवडत होते. पण मलाही माझ्या मर्यादा माहिती होत्या.
             कौलेज मध्ये असताना first year मध्ये अशीच माझी ओळख दिपकशी झाली होती. किती साधा- सरळ व शांत वाटला होता मला तो. अभ्यासातही तो खुप हुशार होता. आमच्या मैत्रीच्या या अंकुराला प्रेमाची पालवी अखेर फुटलीच. आम्ही एकमेकांना पुरेसा वेळ देत होतो, पण कधी आमची मर्यादा ओलांडू दिली नाही. आमच्यातले प्रेम क्षणाक्षणाने उमलत, बहरत होते. या प्रेमप्रकरणाची आमच्या घरच्यांना मात्र आम्ही कल्पना दिली नव्हती. मी एक दोनदा दिपकशी या विषयावर बोललेही होते, पण त्याने मला पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत थांबायला सांगितले होते. शेवटी आमच्यातील प्रेमाखातर मी त्याच्यासाठी थांबले होते.
          कौलेजची तिन वर्षे भरभर निघून गेली. आमचे पदवी शिक्षण यशस्वीपणे पुर्ण झाले. आता मला दिपकशी लग्न करता येणार होते, आयुष्यभरासाठी त्याची अर्धांगिनी होता येणार होते. मी दिपकला माझ्याकडील मौल्यवान गोष्ट दिली होती, आणि ती म्हणजे त्याच्यावरील माझा विश्वास.
        दिपक मला मागणी घालायला घरी येणार होता. माझ्या मनाच्या गाभाऱ्यात असंख्य कारंजी उधळत होती. मन मोरासारखे पिसारा फुलवून थुईथुई नाचत होते, पण नियतीला मात्र हे मान्य नव्हते.
        कधी कधी वास्तव हे कल्पनेतल्या सुंदर स्वप्नापेक्षा खुपच वेगळं असतं. नियतीचे कालचक्र सामान्य माणसाच्या आकलना पलीकडचे असते, हेच खरे. दिपकने माझ्या अपरोक्ष दुसऱ्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढले होते. दोन दोन मुलींच्या आयुष्याशी तो खेळत होता. एवढा साधा- सरळ व शांत वाटणारा दिपक असा कसं वागु शकतो? हेच कळत नव्हतं, म्हणून हिंमत करुन मी त्याला त्याचा जाबही विचारला होता. पण त्याने मला चक्क उडवूनच लावले होते. मला त्या दुसऱ्या मुलीची सारिकाची चिंता वाटत होती. या प्रेमाच्या जाळ्यात फसून तिचीही माझ्या सारखी अवस्था झाली तर? का ती हा धक्का सहन करू शकणार होती?
        माझ्या साठी हा धक्का अनपेक्षीत होता. का खेळावसं वाटतं या लोकांना निष्पाप मुलींच्या आयुष्यासोबत? मुलगी म्हणजे काय खेळणं वाटतं की काय? पण देवाच्या काठीला आवाज नसतो म्हणतात. स्वतः च्या जाळ्यात फसुन दिपकने पोलिसांसमोर सगळे कबुल केलेले असते. तो हे सगळं पैशासाठी करत होता, याच्या आधीही त्याने दोन मुलींना नादाला लावून त्यांचे आयुष्य बर्बाद केलेले असते.
      वेळीच उमगलेले हे सत्य माझ्या सारख्या कुमारिकेच्या आयुष्याला नवी कलाटणी देणारे ठरले होते.  अशाप्रकारच्या पिडीत, शोषित मुली-महिलांना मानसिक पाठबळ देण्यासाठी एक छोटीशी संस्था सुरु केली होती.  वेळ कधी कुणासाठी थांबून राहत नाही, असं म्हणतात. माझे संस्थेचे काम खुप चांगल्या रितीने चालले होते, आणि अशातच माझी रोहितशी ओळख झाली.
        एका गरीब असहाय्य महिलेला मानसिक आधाराची गरज होती, तेव्हाच त्याच्याशी माझी ओळख झाली होती. दिपकपेक्षा तो खुप वेगळा होता, समजुतदार होता. पण माझ्या पुर्वानुभवामुळे मी त्याच्याशी जास्त मैत्री केली नव्हती. पहिल्या प्रेमात मिळालेला धोका अजूनही मनात सलत होता. प्रेम करणार्यालाच प्रेमभंगाचे दुःख समजू शकते. रोहीतच्या मनात मात्र माझ्या बद्दल Soft Corner होता. एक दिवस विश्वासात घेऊन त्याने माझ्याशी ही गोष्ट बोलून दाखवली. त्याला माझ्या गत आयुष्याशी काहीही देणे घेणे नव्हते. दिपकसारख्या पुरुषी मानसिकतेचा त्याला तिरस्कार वाटत होता. त्याने माझ्यावर त्याचे असलेले प्रेम सिध्द करण्यासाठी समोरच मला लग्नाची मागणी घातली होती.
        प्रेमभंगाचा विसर पाडून माझे आयुष्य सुखाच्या उंबरठ्यावर येऊन थांबले होते. हरवून गेलेली ती प्रेमाची हिरवळ आयुष्यात पुन्हा उमलुन आली होती.
         माझ्या व त्याच्या घरातल्यांनी चांगल्या मुहूर्तावर आमचे लग्न लावेन दिले. आज माझे मन फुलांच्या हिंदोळ्यावर बेधुंद होऊन झोके घेत होते. बागेतील फुलपाखरासारखे अल्लड होऊन हुंदडत होते. स्वप्नात आमच्या सुखी संसाराचे चित्र दिसत होते.
        रोहीतसारखा जोडीदार मला मिळाला हे मी माझे भाग्य मानत होते, आणि त्यानेही परोपरीने ते सिध्द केले होते. वार्याच्या झुळकीमुळे भुरुभुरू उडणारे माझे रेशमी केस , आणि हवेत बेभान होऊन उडणारी माझी ओढणी मला माझ्या पतीच्या गोड सहवासाच्या १० वर्षांची आठवण करुन देत होती.
         आज मी ४० शी पार केली आहे. माझा ४ वर्षांचा छोटा मुलगा अन्वेष मस्तपैकी इंग्लिश बोलतो. माझ्या काळजाचा तुकडा आहे तो, आणि रोहित तो तर माझी........
      एवढ्यात फाटक उघडल्याचा आवाज येतो, आणि धावतच अवंतिका बाहेर जाते. कामानिमित्त बाहेरगावी गेलेला रोहित परत आलेला असतो. सोबतच अन्वेष ही असतो. अवंतिका तशीच धावत जाते, रोहित आपले बाहू फैलावतो, आणि अगदी सहजच अवंतिका त्याच्या सुखद मिठीत बध्द होते.
----------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ये रिश्ता क्या कहलाता है!