प्रतिघात- द ब्लड गेम Chapter 2
"आता ही लढाई तुझी एकटयाची आहे.......हा हा हा हा शिवमकुमार शी पंगा. बाबा........."
नवीन खडबडुन जागा होतो आणि आजुबाजुला पाहतो. ड्रॉवर मधील ते कार्ड बाजुला पडलेले असते.
"तुम जाके जावेद से मिलना......" अब्दुल चाचाचा चेहरा त्याच्या समोर येतो. तेवढ्यात दरवाजा ठोठावल्याचा आवाज येतो. नवीन कार्ड खिशात ठेवुन दरवाजा उघडतो.
"सारा........" समोर साराला पाहुन त्याला धक्का बसतो.
"नवीन......." सारा नवीन ला मिठी मारते.
सारा आत येते.
"तु अचानक इथे कशी काय?" नवीन खुर्चीवर बसतो.
"जेव्हापासून मी युएस ला गेले, ना तुझा फोन, ना मेसेज. माझ्याकडे ही तुझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा कुठलाच ऑप्शन नव्हता. त्यातच आमच्या शेजारचे गुजराती काका, त्यांच्या टिव्हीवर हिंदी न्युज चैनेलवरुन समजलं की तुझ्यासोबत हे असं घडलं. तेव्हापासून इथे येऊन तुला शोधत होते."
"काय उपयोग आहे सारा? आता तर सगळं संपलयं. राहिल्या त्या फक्त आठवणी." नवीन भावुक होतो.
"असं का बोलतोयस नवीन. मी आहे ना? आपण नव्याने सुरवात करु. " सारा नवीनच्या हातावर हात ठेवते.
"सारा माझी लाईफ आता अशा वळणावर थांबलीय, जिथुन मला मागे वळता येणार नाही." नवीन उठुन उभा राहतो.
"म्हणजे? काय करणार आहेस तु नवीन?" सारा आश्चर्याने विचारते.
"असं काहीतरी जे हे जग लक्षात ठेवेल. "
नवीन साराला हाताला धरुन बाहेर पडतो. तो रागाने व निर्धाराने चालत आहे. सारा चकित होत त्याला पाहतेय.
मंत्रालयासमोर आलिशान कार्स चा ताफा उभा राहतो. एका आलिशान कारमधुन मुख्यमंत्री दिक्षित मैडम उतरतात. पाठोपाठ सिक्युरिटी आणि त्यांचे सहकारी असतात.
दिक्षित मैडम केबिनचा दरवाजा उघडुन आत प्रवेश करतात. तेवढ्यात बाहेर आलिशान बीएमडब्ल्यू कारमधुन शिवमकुमार आणि वानखेडे खाली उतरतात. शिवमकुमार मस्तवाल हत्तीसारखा रुबाबात जात असतो. मागोमाग त्याचे दोन सशस्त्र गार्डस असतात. शिवमकुमार केबिनमध्ये प्रवेश करतो. आधीच सगळे मंत्रिमंडळ आणि आय एएस, आयपीएस अधिकारी तेथे उपस्थित असतात.
"मेरे सभी साथीयो और यहा मौजुद ऑफिसर्स. आज ये मिटींग अरेंज करने की एक खास वजह है. यु तो हम सब एक सिस्टम का भाग है, लेकिन सिस्टम से भी बढकर अपना भारत देश है. जब देश टिकेगा, सिस्टम भी चलेगी." दिक्षित मैडम सभोवार नजर फिरवत बोलतात.
"एक्सक्युज मी मैडम, आप क्या कहना चाहती है?" एक नेता हात वर करतो.
दिक्षित मैडम खुणेने त्यांच्या खाजगी सचिवास इशारा करताच स्क्रिनवर फोटो फ्लैश व्हायला सुरवात होते.
"ये है सुलतान. दुबई और दुनिया का एक खतरनाक अंडरकव्हर टेरेरिस्ट. इसने अमरिका, रशिया, चायना न जाने कितने देशो पर अपनी हुकुमत बनायी है. उस देश की आर्मी, गव्हर्नमेंट कोई भी उसका कुछ बिघाड नही सका है. उसकी हैवानियत का फुटेज भी हमे मिला है, ये देखो." म्हणत मैडम इशारा करताच स्क्रीन वर एक फुटेज फ्लैश होते.
एक जंगल एरिया असतो. जंगलाच्या मधोमध काही होस्टेजेसच्या चेहऱ्यावर काळे बुरखे बांधुन व त्या सगळ्यांचे हात पाठीमागे बांधून गुडघ्यावर बसवलेले असते. एके 47 घेऊन वावरणारे पुर्ण पणे काळ्या कपड्यात चेहऱ्यावर काळे नकाब घातलेले आतंकवादी उभे असतात. एक आतंकवादी त्या होस्टेजेसच्या चेहऱ्यावरील बुरखे काढतो. त्या चौघांच्यात एक स्त्री, दोन पुरुष आणि एक छोटी ३-४ वर्षाची गोंडस मुलगी असते. तो आतंकवादी हवेत फायर करतो.
"तबाही, तबाही" अशा घोषणा सगळे आतंकवादी सुरू करतात, आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच एके ४७ ने तो आतंकवादी त्या चौघांच्या डोक्यात गोळ्या घालतो. तडफडत ते दोघे पुरुष, ती स्त्री आणि ती गोंडस मुलगी मरण पावतात. सर्वत्र रक्त पसरते.
"हमारा एक ही मकसद तबाही." म्हणत तो आतंकवादी पुन्हा हवेत फैरी झाडतो, मागोमाग बाकीचे आतंकवादी हवेत फैऱ्या झाडत नारेबाजी करतात. फुटेज बंद होते.
"देखा आपने ये है उसकी हैवानियत. बुढे, बच्चे, औरतो तक किसी को नही छोडता ये. अब ये हमारे देश पर कब्जा करने की प्लैनिंग कर रहा है." मुख्यमंत्री मैडम आवेशाने बोलतात.
"हम उसका ये ख्वाब कभी पुरा नही होने देंगे." एक नेता बोलतो, बाकीचे उभे राहत त्याला अनुमोदन देतात.
"मुझे पता है, हम उसको जरुर धुल चटाएंगे. बस सारे ऑफिसर्स चौकन्ने रहना. मि.कपुर आपके डिपार्टमेंट की सिक्युरिटी की पुरी प्लैनिंग मुझे टेबलपर चाहिए. " दिक्षित मैडम मि.कपुरकडे पाहत बोलतात आणि उठुन उभ्या राहत बाहेर जातात. सगळे मंत्रिमंडळ व अधिकारी ही उठुन उभे राहतात. शिवमकुमार हळुच हसत वानखेडेकडे पाहतात, आणि भिंतीवरच्या घड्याळात पाहतात.
भरभर वेगाने ते दोघेही बाहेर पडत बीएमडब्ल्यू त बसतात.
"मान गये साहब आपको, इधर ये प्लैन करते रहेंगे और उधर सुलतान का कदम मुंबई पर पडेगा." वानखेडे बोलतो.
"यही पॉलिटिक्स है वानखेडे. ये सब मिलके भी मेरे चालों को नही समझ पायेगे." संशयास्पद हसत शिवमकुमार बोलतो.
कार वेगाने जाऊ लागते.
"नवीन, अरे कुठे घेऊन चाललायस मला?" सारा नवीनचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते. एका जुन्या घराजवळ येत नवीन तिचा हात सोडतो.
"सारा मी जे करायला जाणार आहे, ते कदाचित तुला आवडणार नाही, पण मला समजलयं की फक्त खरेपणा असुन चालत नाही, पैसा पाहिजे पॉवर पाहिजे तरच शिवमकुमार सारख्या लोकांचं आपण काहीतरी करु शकतो."
सारा नवीनकडे आश्चर्याने पाहते.
"सारा माझया बाबांनी इथल्या लोकांसाठी, त्यांच्या मागण्यांसाठी संघर्ष केलाय. त्यांचे राहिलेले स्वप्न मला पुर्ण करायचे आहे. माझया बाबांवरील आरोप मला पुसायचे आहेत सारा. " नवीन आवेशाने बोलतो.
"नवीन.............."
"सारा तु चल." म्हणत नवीन तिला त्या जुन्या घरात ठेवतो, आणि जवळच्या एका माणसाला काही सुचना करुन तिथुन बाहेर पडतो. खिशातील कार्ड काढुन तो ते पाहतो.
गेटवे ऑफ इंडिया. जेटीजवळ शिवमकुमार आणि वानखेडे आपल्या काही सहका-यांसह उभे असतात.
"सर सुलतान साहेब येणार आहेत ना नक्की?" वानखेडे पुटपुटतो.
"आजपर्यंत शिवमकुमारने कधी लहान खेळी केलीच नाही वानखेडे, ते बघ, तो येतोय काळ या मुंबईचा घास घ्यायला." शिवमकुमार बोटाने इशारा करतात.
स्पीडबोटीत बरेच सशस्त्र कमांडोज समोर उभे असतात, त्यांच्या ताफयात मध्यभागी सुलतान बसलेला असतो. मागे आणखी एक स्पीड बोट असते. स्पीड बोटी थांबतात, आणि शिवम कुमार सुलतान समोर जातो.
"आईये आईये सुलतान साहब. आपही का इंतजार था." शिवम कुमार हसतो.
सुलतान स्पीड बोटीतुन उतरतो. मागोमाग त्याची फलटण उतरते.
" आपको कोई तकलीफ तो नही हुई यहॉ आते वक्त?"
"शिवम कुमार. ये सुलतान तकलीफ देता है, लेता नही है. "
सुलतान आणि सगळे चालत असतात.
" वैसे आपके इंतजामात इतने सख्त थे की यहा आने के लिए कोई परेशानी नही हुई. शुक्रिया." सुलतान शिवम कुमारला शेकहँड करतो.
कमांडोज आजुबाजुला उभे राहतात, सुलतान आणि शिवम कुमार समोरासमोर बसतात.
"हमने तो आपका काम कर दिया सुलतान साहब. अब आप भी............." शिवम कुमार हसतो.
सुलतानचा खास माणुस नोटांनी भरगच्च भरलेल्या दोन मोठया बॅगा शिवम कुमार समोर ठेवतो.
शिवम कुमार बॅगांकडे पाहुन हसतो.
"हमारा बस एकही मकसद है शिवम कुमार, तबाही." सगळी फलटण जल्लोष करायला सुरवात करते.
"तबाही, तबाही" च्या घोषणा सुरु होतात. सुलतान हाताने इशारत करताच घोषणा थांबतात.
" हमारे यहा आने का आगाज तो सबको होना ही चाहिए. अशीर................"
सुलतान अशीरला काही सुचना करतो, आणि काही फौज घेऊन अशीर निघुन जातो.
जेटीचा किनारा. बऱ्याच बोटी उभ्या असतात. एका बोटीवर जावेद उभा राहुन सुचना देत असतो.
"हां हां आने दो, आने दो खिच." समोरचा जमाव दुसऱ्या बोटीवरचा माल वर खेचत आहेत. तेवढ्यात नवीन जावेदकडे येतो.
"जावेद भाई...."
जावेद नवीनला न्याहाळतो. नवीन अब्दुल चाचाकडील कार्ड समोर धरतो.
"मुझे आपको शामिल होना है."
जावेद आश्चर्याने त्याला पाहतो.
"मेरे पिछे आ." जावेद आत जातो, मागोमाग नवीन आत जातो.ते आमने सामने बसतात.
"चाचा ने कहा और तुम आ गये?" एका ग्लासात व्हिस्की ओतत जावेद विचारतो.
"मुझे पता है."
"क्या?" जावेद चकित होतो.
"तुम्हारे टिम मे १० ऐसे लोग है, जो तुम्हारा सारा बिझनेस संभालते है. हत्यारो की लेनदेन करते है."
जावेदचा हातातला ग्लास तसाच राहतो.
"तुम ये सब कैसे जानते हो?"
"मै बहुत कुछ जानता हु जावेद." नवीन करारी नजरेने पाहतो.
"क्या चाहते हो तुम?" थोडसं रागाने व आश्चर्याने जावेद विचारतो.
"सुलतान और शिवमकुमार का खात्मा." नवीन उभा राहत चिडुन बोलतो.
"सुलतान वो दुबई का डॉन........." जावेद जोरजोरात हसु लागतो.
"ए तु पागल है क्या? तुम उस सुलतान और उस MLA को मारेगा?" नवीनचा राग अनावर होतो. समोर बोटीच्या डेस्कवर लोडेड गन असते. झटक्यात ती गन उचलुन तो जावेदवर ताणतो.
"ए ए भाई, क्या कर रहा है?" नवीन जावेदच्या कानाजवळुन मागच्या भिंतीवरील पेंटिंग वर गोळी झाडतो. जावेद भयचकित होत पाहतो.
"अब पता चला, पागल नही हु मै." नवीन हातातील गन जावेद समोर भिरकावतो.
"ए तु गन चलाना कहा सिखा?" जावेद विचारतो.
"सिखा नही, बस एक जुनुन सा आ गया." नवीन आवेशात उत्तर देतो.
"तु तो बडा काम का है रे. आज से तुम अपुन को शामिल. चल आ जा." जावेद नवीनला आपल्यासोबत घेऊन जातो.
गोरेगावचा एक वर्दळ असलेला भाग. एका मोठ्या शॉपिंग कॉम्पलेक्स समोर मोठा पुतळा उभा आहे. आजुबाजुला फेरीवाले, गर्दी चा संमिश्र आवाज. एक छोटा मुलगा त्या पुतळ्याच्या खाली उभा आहे. पुतळ्याच्या आजुबाजुला कारंजा आहे. तो मुलगा आपल्या आईकडे फुग्यासाठी हट्ट करत आहे, आणि अचानक त्या मोठ्या पुतळ्याचा स्फोट होतो, आणि त्यातुन झेपावत अशीर सगळ्या गर्दी वर एके ४७ ने धडाधड फायरींग करु लागतो. त्याची बाकीची फौज ही "तबाही, तबाही" च्या घोषणा देत जमावावर गोळीबार करते. सगळीकडे पळापळ, चेंगराचेंगरी होते. तेवढ्यात अशीर हवेत फायरींग करुन सगळ्यांना थांबवतो.
"सुन लो बम्बयी वालो अब इस शहर पर सुलतानका कब्जा है, जान प्यारी है तो हमारा हुक्म मानो. शहर छोडकर चले जाओ." त्याच्यामागोमाग त्याची फौजही हवेत फैऱ्या झाडते.
"पण आम्ही जाणार कुठे?" एक म्हातारा हिंमत करुन पुढे येत विचारतो. अशीर म्हाताऱ्यावर धडाधड गोळ्या चालवतो. रक्ताच्या थारोळ्यात तो खाली पडतो.
"और किसीको कोई सवाल है?" अशीर ओरडतो. सगळे थिजुन मान खाली घालुन उभे राहतात. अशीर व त्याची फौज "तबाही, तबाही" च्या घोषणा देत निघुन जाते.
मिडियामध्ये या घटनेची बातमी पसरते. सगळी यंत्रणा कामाला लागते. मुंबईत अस्थिर वातावरण तयार होते. विरोधी पक्षाकडुन सरकारवर दबाव वाढत असतो. जमाव चिडलेला असतो, पोलिसांना स्पेशल फोर्स मागवावी लागते.
मुख्यमंत्री दिक्षित मैडम केबिनमध्ये खुर्चीवर बसलेल्या आहेत, तेवढ्यात समोरचा फोन वाजतो. मैडम फोन उचलतात. पक्षश्रेष्ठींंचा फोन असतो.
"ये आपके शहर मे क्या चल रहा है दिक्षित मैडम? इतनी बडी पोलिस फोर्स और प्रशासन होते हुए ऐसा टेरर अटैक?"
" आय नो सर. पर हम छान बिन कर रहे है. "
"छानबिन छोडिए. आप छान बिन करते रहेगी और उधर अटैक होते रहेंगे. आपको जवाब देना होगा उनको, उनिकी भाषा मे." पक्षश्रेष्ठी फोन कट करतात. सीएम मैडम काही काळ स्तब्ध राहतात. थोड्या वेळाने फोन फिरवतात.
"सारे ऑफिसर्स और मंत्रियोंकी आज ही मिटींग लगाओ. इटस अर्जंट." सीएम मैडम फोन कट करतात.
समुद्रकिनाऱ्याच्या नजिक शिवमकुमार च्या फार्महाऊसवर मोठ्या रूबाबात समोरासमोर सुलतान व शिवमकुमार आरामखुर्चीत बसुन चहा पित आहेत. आजुबाजुला सशस्त्र कमांडोजचा ताफा उभा आहे.
शिवमकुमार चहाचा कप टिपॉयवर ठेवतो.
"अबतक सबको पता चल गया होगा, की आपके नेक कदम इस शहर पे पडे है." शिवमकुमार हसत बोलतो.
"पता चलने दो सबको. एक बार सुलतान जिस जमी पर पैर रखता है, वो बस उसकी हो जाती है."
"वो तो जरुर होनी चाहिए. जिसके पास ताकत है, पैसा है वही तो राज करेगा. ये लोग क्या जाने ये पॉलिटिक्स." शिवमकुमार व सुलतान मोठ्याने हसतात.
मुख्यमंत्री दिक्षित मैडमांच्या केबिनमध्ये गोलाकार टेबलभोवती सगळे मंत्रिमंडळ व अधिकारी बसले आहेत. आपापसात कुजबुज चालु आहे.
"सायलेंस." मैडम इशारा करतात, तसे सगळे शांत होतात.
"आज ये मिटींग लगाने का कुछ तो अंदाजा होगा आप सभी को. क्यो मि.कपुर?" मि.कपुर आयपीएस ऑफिसर मान खाली घालतात.
"ऐसे चुप बैठने से कुछ नही होगा. इतनी सिक्युरिटी होने के बावजुद ये टेरर अटैक?" मैडम चिडुन सभोवार नजर फिरवतात. सगळे चिडीचुप. तेवढ्यात एक अधिकारी उभा राहतो.
"मैडम हमने पुरी जॉच करली है. मुझे लगता है की ये सब किसी लोकल टेरेरिस्ट ग्रुप का काम है."
"लगता है? हं.....लगने से कुछ नही होगा ऑफिसर. आय वॉन्ट इमिजिएट एक्शन. अपनी सिक्युरिटी को लेकर इतने घमंड मे मत रहो. ये शहर और देश के सुरक्षा का मामला है."
पुन्हा सगळ्यांच्यात कुजबुज सुरु होते.
"पण एवढी सुरक्षा यंत्रणा असताना हे सगळं झालचं कसं?" एक मंत्री प्रश्न करतो.
"ये जरुर कोई घर का भेदी है, जो रावण से मिला हुआ है." सिएम मैडम रागाने नजर शिवमकुमार वर टाकतात. शिवमकुमार खाली पाहतो. पण त्याची छुपी नजर घड्याळाच्या काट्यावर असते.
"मै सभी ऑफीसर्स को ऑर्डर देती हु. किसी पर भी शक हो यु विल बी शुट एट साईट. आय रिपिट शुट एट साईट."
मुख्यमंत्री मैडम उभ्या राहतात. सगळे मंत्रिमंडळ आणि ऑफिसर्स उभे राहतात.
"अबतक को सुलतान ने अपना काम कर दिया होगा, दिक्षित मैडम बचा सकती हो तो बचालो तुम्हारे बम्बयी को." शिवमकुमार स्वतः तच पुटपुटतो आणि कमांडोज सोबत कारमध्ये जाऊन बसतो.
मुंबईत एकापाठोपाठ एक साखळी बॉम्बस्फोट होतात. सगळीकडे भितीचे वातावरण, जिकडेतिकडे रक्ताचा , मांसाचा चिखल. कोणाचे हात तुटलेले, पाय तुटलेले. एम्ब्युलन्स चे आवाज. लोकांचे टाहो फोडण्याचे, किंकाळ्यांचे भिषण आवाज. अशीर विंटेज कारमधुन भरधाव वेगाने मशिनगनने फायरींग करत जातो, आणि पोलिस स्टेशनला आग लावतो. जमावात चेंगराचेंगरी सुरु होते. पोलिस आणि सिआरपिएफ ची स्पेशल फोर्स अशीर व त्याच्या फौजेवर हल्ला करतात. जोरदार चकमकी सुरु होतात. एकाएकी ग्रेनेड हल्ला होतो, आणि पोलिसांच्या आणि लष्कराच्या व्हैन्स एकमेकांवर आपटत आजुबाजुला जाऊन आदळतात. त्याखाली बरेच लोक दबले जातात. अशीर च्या मागुन सशस्त्र आतंकवाद्यांची फौज धडाधड गोळ्या चालवत , आग लावत जातात.
"तबाही, तबाही जिंदाबाद" अशी नारेबाजी करत ते फायरींग करत सुटतात.
सगळीकडे म्रुतांचा खच, रस्त्यावर छोटी अनाथ मुले, आणि एक चिमुरडी रक्ताच्या थारोळ्यात त्यांचे म्रुतदेह पडलेले. स्त्रियांचा ह्रदय पिळवटणारा आक्रोश सुरु असतो.
"मैडम हे सगळं कसं होतयं, का होतयं काहीच कळत नाही. आम्ही सगळी शक्ती पणाला लावली होती." दिक्षित मैडमांच्या केबिनमध्ये मि.कपुर खाली मान घालत बोलत होते.
"वो तो दिख ही रहा है. जब कसाब आया था, तो वो आपको बताके आया था? याद किजिए ताज होटल का हमला? ये टेरेरिस्ट सिधा घुस के मारते है मि.कपुर. हमे भी उन्हे ऐसा ही मारना होगा." दिक्षित मैडम आवेशात बोलतात. मि.कपुर सैल्युट करुन केबिनमधुन बाहेर पडतात.
"कोई तो होगा ये सब रोकनेवाला." सिएम मैडम स्वगत बोलतात.
समुद्राच्या आत एका जहाजावर शस्त्रांची तस्करी सुरु असते. काळ्या सुटाबुटातील सशस्त्र आतंकवादी उभे असतात.
"कम ऑन, कम ऑन." एक उंच माणुस ओरडत असतो. तेवढ्यात घुं घु आवाज करत दोन स्पीड बोटी त्यांच्या अवतीभवती फिरु लागतात. समुद्राचे पाणी उसळत राहते. आतंकवादी सावध होऊन मशिनगन सावरतात, की पाण्यातुन सरकन उसळी घेत स्निपर गनने रॉनी जहाजावर उभ्या अहमदचा नेम घेतो. अहमद खाली कोसळतो, तशी त्यांच्यात चकामक सुरु होते. रॉनी पाण्यात सुर मारतो. आतंकवादी गनफायर करत राहतात, पण अचानक रॉनी पाण्यातुन वर येतो. आतंकवादी त्याच्यावर फायरींग करणार तोच तो म्हणतो,
"बुम.........." आणि मागोमाग जहाजाचा जोरदार स्फोट होतो. रॉनी स्पीड बोटीने किनाऱ्यावर येत असतो. किनाऱ्याच्या एका बाजुला छोट्या बोटीवर जावेद आणि त्याची टिम उभी असते.
"अरे वो देख मेरा शेर आ रहा है. " जावेद इशारा करतो. रॉनी रुबाबात चालत येत असतो.
"ए रॉनी, आ गले लग जा." जावेद रॉनीला मिठी मारतो.
जावेद भाय,.कितनी बार बोला तुमको अपुन को रॉनी मत बुला." रॉनी मिठीतुन बाजुला होत बोलतो.
"अरे अब यही तेरी पहचान है रे." जावेद हसतो आणि निघुन जातो. रॉनी किनाऱ्यावरुन दुर समुद्रात पाहतो. त्याच्या आईचा चेहरा त्याला आठवत असतो.
पोलिसांच्या व्हैन्सचा ताफा मंत्रालयासमोर उभा राहतो. झेड सिक्युरिटी मध्ये मुख्यमंत्री दिक्षित मैडम एका फॉरच्युनर कारमधुन उतरतात. केबिनबाहेर बराच जमाव जमलेला असतो.
"इतने दिनो मे जो नही हुआ, किसीने वो किया है." जमावातुन एकजण दुसऱ्याशी बोलत असतो.
"ये खुदा का कोई नेक बंदा ही होगा." एक महिला आकाशाकडे पाहत पदर पसरते. दिक्षित मैडम केबिनमध्ये येतात.सगळे मंत्रिमंडळ उभे राहते.
"सिट डाऊन." इशारा होताच सगळे खाली बसतात.
"लगभग चार महिने हुए है, बम्बयी की हालत हम सुधार नही पा रहे है. हमारी ताकत कम पड रही है. लेकिन आज इसी बिच खबर आयी की समंदर मे चलने वाली हत्यारोकी बडी तस्करी को रोक किसीने सुलतान से जंग छेडी है."
उपस्थितांमध्ये कुजबुज सुरु होते.
"या तो ये कोई पुलिस अफसर है या जवान. लेकिन जो भी हो हमे उससे मिलना होगा."
सगळे मंत्रिमंडळ हात उंचावत त्याला अनुमोदन देतात. शिवमकुमार ची चुळबुळ चालु होते. मैडमांची चाणाक्ष नजर ते हेरते.
"वैसे बम्बयी को नुकसान पहुचाकर आपका तो फायदा ही होगा ना मि.कुमार?" सगळे दचकत पाहतात. शिवमकुमार ही दचकुन पाहु लागतो.
"ये आप क्या कह रही मैडम, मै......मै." शिवमकुमार च्या घशाला कोरड पडते.
"मैने बस यु ही हवा मे तीर चलाया है, मि.कुमार. और आप तो पसिना पसिना हो गये." शिवमकुमार समोरचा पाण्याचा ग्लास उचलतात.
"डियर ऑल. कुछ भी हो अब हमे जोर लगाके अपने शहर, अपने देश को बचानाही होगा. चाहे तो एअरफोर्स की मदद क्यो ना लेनी पडे." दिक्षित मैडम खवळुन बोलतात, आणि शिवमकुमार कडे पाहतात. मैडम उठुन उभ्या राहतात. सगळे मंत्रिमंडळ उठुन उभे राहते. शिवमकुमार वैतागत वानखेडे कडे पाहतो.
समुद्राकडे पाहत सुलतान पाठमोरा उभा असतो. त्याची सशस्त्र फौज आजुबाजुला उभी असते.
"इतने साल लगे है मुझे इस मुकाम तक आने के लिए. और किसीने एक झटके मे उसे तोड दिया. "
"या अल्ला......." सुलतान हवेत हात फैलावत जोरात ओरडतो. तेवढ्यात अशीर आपल्या फौजेसह येतो.
"क्या हुआ अशीर, तुम्हारे होते हुए कोई आकर हमारे आदमी को मारकर हमारे हत्यारो की चोरी करता है?" सुलतान चिडुन बोलतो.
"ये जो कोई है, नही छोडुंगा उसे. तबाही, तबाही."
सगळे मागोमाग नारेबाजी करत हवेत फैऱ्या झाडतात.
नारेबाजी करत अशीर व त्याची फौज धडाधड गोळ्यांचा वर्षाव करत व जाळपोळ करत शहरात फिरते. लोक घाबरुन दडुन राहतात. एका मोठ्या आर्मी टैंकने नो मिसाईल्सचा मारा करत राहतो.
"ये मत समझना शहरवालो, की तुम्हे बचाने कोई आयेगा. यहा के मसिहा हम है." सगळी फौज हवेत फायरींग करत नारेबाजी करते, की तेवढ्यात झुं झुं आवाज करत एक विंटेज कार एका बिल्डिंग मधुन आकाशात झेपावते. रॉनी वेगाने त्यातुन खाली झेपावत कारवर गोळीबार करतो. कार पेट घेत अशीरच्या आर्मी टैंकवर पडते व त्याचा स्फोट होतो.
"बॉयज बी रेडी." आपल्या ब्ल्यु ट्रुथ वरुन रॉनी कमांड देतो, आणि दोन्ही हातातल्या मशिनगनने अशीरच्या फौजेवर फायरींग करत जातो. रॉनीची फोर्स मागोमाग फायरींग करते. चकामक सुरु होते. एकमेकांच्या फौजेतील बरेच कमांडोज ठार होतात. सगळीकडे रक्ताच्या चिळकांड्या, सडा पडलेला असतो. रॉनीची फोर्स अशीरला एकटं पाडते, व सगळे चौफेर मशिनगन रोखुन उभे राहतात.
"अशीर भुलना मत ये शहर मेरा है, इस रॉनी का. अगर सलामती चाहते हो तो तुम और तुम्हारा सुलतान यहा से लौट जाओ." अशीर रागाने पाहत राहतो. रॉनी व त्याची फोर्स निघुन जाते.
सुलतान मोबाईल कॉल कट करतो.
"रॉनी, रॉनी. कौन है ये?" सुलतान चिडुन क्रोधाने शिवमकुमार ला विचारतो.
" शांती रखिये सुलतान साहब. ये रॉनी वॉनी जो कोई है, उसे मै देख लुंगा. आप बस शहर पर राज करे." शिवमकुमार बोलतो.
शिवमकुमार वानखेडेसोबत फार्म हाऊसच्या आत येतो.
"ये रॉनी है कौन? जर माझी शंका खरी असेल तर हा रॉनी तोच तर नसेल......?" शिवमकुमार आश्चर्य व्यक्त करत पुटपुटतो.
नेहमीप्रमाणे शहरात वर्दळ असते. लोक शॉपिंग करत असतात. जा-ये करत असतात, की तेवढ्यात सगळ्या सैटेलाईटवर शिवमकुमार फ्लैश होतो.
"तमाम जनतेला तुमच्या लाडक्या शिवमकुमार चे विनम्र अभिवादन. लोकहो गेली कित्येक वर्षे मी या शहरासाठी, लोकांसाठी काम करत आलोय. पण आज कोणीतरी माझ्याविरुद्ध खोटे पुरावे उभे करुन मला संपवु पाहतोय. मला माहित आहे तो कोण आहे. त्याची हिंमत असेल तर त्याने समोर यावं."
न्युज बंद होते. शहरात चर्चा सुरु होते.
शिवमकुमार बंगल्याच्या बाहेर लॉनवर मस्त मजेत आरामखुर्चीत बसुन सिगारेट ओढतो आहे, की तेवढ्यात रॉनीच्या गाड्यांचा ताफा शिवमकुमार च्या बंगल्यासमोर उभा राहतो, आणि सशस्त्र कमांडोजच्या ताफ्यात रॉनी आत येतो. शिवमकुमार चकित होत उभा राहतो. रॉनी सरळ येत समोरच्या मोठ्या खुर्चीवर रुबाबात पायावर पाय ठेवुन बसतो. हाताने इशारा करुन तो शिवमकुमार ला बसायला सांगतो.
"हां, तो तु क्या कह रहा था मेरे बारे मे?" नवीन विचारतो.
"नवीन. तुच ना तो? आता नाव बदलुन फिरतोय, आणि माझ्याशी दुश्मनी घेतोस?"
नवीन हसतो.
"दुश्मनी? मेरी दुश्मनी अभी देखी कहा है तुमने कुमार." रॉनी करडी नजर रोखत बोलतो.
"काय पाहिजे काय तुला? पैसा? हे बघ." म्हणत शिवमकुमार वानखेडेकडे कडुन पैशाने भरलेली बैग मागवुन समोर ठेवतो.
"हे घे. अजुन पाहिजे तर माग, पण सगळं विसरुन निघुन जा."
रॉनी बैगेतील बंडले उचलतो, शिवमकुमार पाहत आहे, तेवढ्यात तो ती बंडले खाली टाकतो. बाजुलाच अन्नाच्या शोधात आलेला कुत्रा पळुन जातो.
"पाहिलस कुमार. पैसा तर साधा कुत्रापण खात नाही. कधीपर्यंत लोकांना वेडं करुन त्यांच्यावर राज्य करणार तुम्ही लोक? महागाई वाढली त्रास गरीब, मध्यमवर्गीयांना, बेकारी वाढली त्याचा त्रास. कुठे रस्ते चांगले नाहीत, कुठे आणखी काही समस्या. सगळे त्रास फक्त गरीब, मिडलक्लासना. का ? कशासाठी? त्यासाठी निवडुन देतो का तुम्हाला? तुम्ही मारे ऐटीत जगता. लोकांचं ध्यान भरकटवुन महत्वाचे प्रश्नच दुर ठेवता, आणि आम्ही ते सहन करायचं, हट."
शिवमकुमार टाळ्या वाजवतो.
"वा वा. असं भाषण मंत्रिमंडळात केलं असतसं तर तुला मुख्यमंत्री बनवलं असतं, पण इथे त्याचा काय उपयोग? अरे राजकारण कशाशी खातात, हे तरी माहित आहे का तुला?"
रॉनी खुर्चीत मागे टेकुन बसतो.
"अगर मै तेरे बाप को मारता तो भी क्या तु पॉलिटिक्स ही करता?"
"ए........." शिवमकुमार चिडुन ओरडतो.
"क्यो, दिल पे वार लगा? कुमार, एक राकेश के मरने से एक रॉनी पैदा हुआ, सोच तुने ऐसे कितने राकेश मारे होंगे?" रॉनी चिडुन उभा राहतो, आणि रागाने खालच्या जमिनीवर गनफायर करतो.
रॉनी त्याच्या ताफ्यासह बाहेर येतो. शिवमकुमार त्याला पाहत राहतो.
गाड्यांचा ताफा जात आहे.
"भाई, उस शिवमकुमार को वहीच टपकाना था." अहमद रॉनीला सांगत असतो.
"वो साला जरुर मरेगा अहमद. लेकिन अभी उसका हिसाब बाकी है" तो असं बोलतच असतो की कारवर धाडकन रॉकेट आदळते व समोरची कार गडगडत रस्ता सोडुन खाली जाते. गाड्यांचा ताफा थांबतो.
"मुव्ह, मुव्ह." अहमद ओरडतो. तेवढ्यात एक गोळी चकाकत अहमदच्या छातीत घुसते. दुसरी गोळी कारची काच फोडुन रॉनीच्या उजव्या कुशीत घुसते. सगळ्या कारमधुन पटापट रॉनीची फोर्स मशिनगन, रॉकेट लॉन्चर्स घेत सावध पवित्रा घेते. समोर सुलतानची फौज उभी असते. अशीरच्या हातात रॉकेट लॉन्चर असते.
"शुट" सुलतान ऑर्डर देतो. दोन्ही फौजांमध्ये भयंकर चकामक सुरु होते. रॉनीच्या फोर्स ची ताकत कमी पडते. सुलतानची फौज धडाधड त्यांना ठार करते. रॉनी दोन्ही हातात मशिनगन्स घेऊन एकटाच सामना करत राहतो, पण सुलतान जखमी रॉनीवर एयर रायफलने नेम धरतो. धक्का बसुन रॉनी रस्त्यावर कोसळतो. सुलतान व फोर्स धावतच येत त्याला घेरते.
"इस मूकाम तक मै ऐसेही नही पहुचा रॉनि. तुम्हे क्या लगा, मुझे मारकर इस शहर, इस देश को बचाओगे?" सुलतान हसतो, त्याचे साथीदारही हसतात.
"ए............सुलतान. अरे मेरे जैसे जिगर रखने वाले एक आम आदमी ने तुम्हारी आधी फोर्स को खत्म कर दिया. सोच ऐसे दस रॉनी उठे, तो क्या होगा तुम्हारा." जखमी वाघासारखा दिसणारा रॉनी बसत बोलतो.
"अरे किंग वो नही,जो बंदुक की नोक पे दुनिया झुकाये. किंग तो वो है आम आदमी जो अपनी जिम्मेदारी समझता है, हालातो से झुंजकर अपने परिवार को संभालता है. "
"या........" सुलतान राक्षसासारखा त्याच्या अंगावर धावुन त्याला उचलतो, आणि रस्त्याच्या खाली खोल दरीत फेकुन देतो. रॉनी गडगडत खाली जात आहे..
"तबाही." सुलतान हवेत हात फैलावत ओरडतो.
"तबाही, तबाही" सगळी फौज हवेत फैऱ्या झाडत नारेबाजी करते. अशीर रॉनीच्या सगळ्या गाड्या पेटवुन देतो, आणि नारेबाजी करत सगळे निघुन जातात.
जावेदच्या अड्डयाकडे त्याचे सगळे साथीदार गोळा होतात.
"बहोत ढुं ढा रॉनी को, कही नही मिला." ऐकुन साराचे अवसानच गळते. भिंतीला टेकुन ती मटकन खाली बसत ओरडते.
"नवीन........" आणि तिच्या अश्रूंंचा बांध फुटतो.
मस्तवाल हत्तीप्रमाणे सोकावलेली सुलतान आणि त्याची फौज अधिकच आक्रमक होत शहरात विध्वंस घडवते. शिवमकुमार पॉलिटिकल खेळी खेळत राहतो. जावेद व त्याची टिम चिंतेत असते.
"कितने दिन ढुंढ रहे है रॉनी को. इधर सुलतान तो और भी खतरनाक हो गया है." जावेद बोलतो.
"लेकिन हमे हारना नही है." सारा समोर येत बोलते.
"याद करो, रॉनी ने क्या कहा था. ये लडाई सिर्फ सुलतान या शिवमकुमार से नही है, जो कोई गलत है उसके खिलाफ भी है. इन सबको एक एक करके सजा दो." सारा चिडुन बोलते. जावेद व त्याचे साथीदार इशारा समजतात.
साराच्या लिडरशीपखाली जावेद व साथीदार सुलतानला मदत करणाऱ्या एका एका गुंडाला त्याच्या गल्लीत घुसुन ठार मारत सुटतात. गुंडांमध्ये भितीचे, पळापळीचे वातावरण तयार होते.
"नवीन..........." सारा गनफायर करत आकाशाकडे पाहत ओरडते. तिचा आवाज आसमंतात घुमतो.
जंगलाचा एक सुनसान भाग. दुरवर घनदाट जंगल. एका टोकाकडुन एक भला मोठा रानडुक्कर वेगाने पळत जात असतो. त्याच्या मागुन अनेक भालाधारी आदिवासी पळत असतात.
"पळाला बघ." एक आदिवासी बोलतो. तेवढ्यात झेपा टाकत एक रांगडा तरुण सपासप धनुष्यातुन बाण सोडत डुकराच्या मागे जातो.
"आता तो डुक्कर काय जिता राह्यत नाय." एक जण बोलतो. झपाझप झेपा घेत तो तरुण जात असतो.
"चंद्रा तिकडं" म्हणत झुडपाकडे बोट दाखवत एक अदिवासी ओरडतो. झटक्यात उंच झेप घेत चंद्रा नेम धरतो. बाण थेट डुकराच्या काळजात घुसतो. ते प्रचंड धुड खाली कोसळते.
भाले उंचावत सगळे जल्लोष करतात, आणि सगळे त्या रानडुकराभोवती जमतात.
"जैत रे जैत. चंद्राच्या बाणानं आजपतुर कोण वाचलं हाय होय." तेवढ्यात एका आदिवासीच्या पाठीवर काहीतरी ठिपकते, तो वर पाहतो.
"अबोबोबोबो." तो ओरडतो, सगळे वर पाहतात. फांद्या वेलींमध्ये बेशुद्धावस्थेत रॉनी लटकलेला असतो. आदिवासी कबिला त्याला खाली उतरवतो, आणि पाड्याकडे घेऊन जातात.
"आरं देवा, आता ह्यो रं कोण?"कबिल्याचा व्रुध्द प्रमुख भैरु विचारतो.
कबिला त्याला भैरुबाबांच्या झोपडीत ठेवतो. भैरु काही औषधींचा लेप रॉनीच्या जखमांवर लावतात. रॉनीला विश्रांती साठी सोडुन सगळे बाहेर येतात.
"कोण हाय ह्यो? इथं कसा आला?" भैरु विचारतो.
"कुणीबी का असेना एवढ्या उंचावरुन पडुनबी जीव वाचला हे महत्वाचं." एकजण बोलतो.
सगळे रॉनीच्या शुध्दीत येण्याची वाट पाहत बसतात.
मंत्रालयासमोर आलिशान कार्सचा ताफा उभा राहतो. सिक्युरिटी एका कारचा दरवाजा उघडते. शहराची आणि राज्याची खराब होत चाललेली स्थिती पाहुन दिल्लीतुन पक्षश्रेष्ठी दिक्षित मैडमांच्या भेटीला आलेले असतात.
केबिनचा दरवाजा उघडुन ते आत येतात.
"ये क्या हो रहा है आपके राज्य मे दिक्षित मैडम?" येताक्षणीच चिडुन ते प्रश्न विचारतात. मुख्यमंत्री दिक्षित मैडम उभ्या राहतात.
"सर, पहले आप बैठिये." आवाजात नम्रपणा आणत मैडम बोलतात.
पक्षश्रेष्ठी अरुण राज समोर बसतात. मैडमही खुर्चीवर बसतात.
"अभी छह महिने हुए है मैडम. लेकिन अभी तक आप एक टेरेरिस्ट को खत्म कर नही पाये है, क्यो?" अरुण राज करड्या आवाजात विचारतात.
"सर हमने काफी हद तक हालातो पर काबु पा लिया था, लेकिन सिर्फ एक आदमी के वजह से ये हालात फिर बिघडे है."
"कौन आदमी? कोई नेता, एम एल ए, कौन है?"
"सर वो कौन है कोई नही जानता. लेकिन शहर की खराब हालात मे वो यहा का मसीहा बन चुका है. पता नही वो अचानक से कहा चला गया."
"मैडम आप सच मै सिएमही है ना? ये देखिये पुरा देश हमसे सवाल कर रहा है. आप कुछ भी किजिये, लेकिन शहर के हालात पहले जैसे होने चाहिए." अरुण राज उठतात व केबिनबाहेर निघुन जातात. दिक्षीत मैडम हैराण होत बसुन राहतात.
सुलतानची फौज शहरात जाळपोळ करतच असते. जावेद व सारा सगळं डोळ्यासमोर पाहत असतात.
"नवीन, कुठे आहेस तु?" सारा भावुक होत ओरडते.
कबिल्यात सोसाट्याचा वारा वाहु लागतो. धुळ उडत असते.
"तुफान आलयं, पळा." म्हणत जो तो पळत असतो.
"हा हा हा हा मी शिवमकुमार. तबाही, तबाही. हा संघर्ष तुला एकट्यालाच करायचा आहे. न्युजपेपर. मार्च १९९३." रॉनी ओरडतच उठतो. भैरु व कबिल्यातले आदिवासी आत येतात. रॉनी शुध्दीवर आलेला पाहुन त्यांना आनंद होतो.
"अरंं कोण तु? इथ कसा आलास?" एका ठिकाणी बसुन भैरु बाबा रॉनीला विचारत असतात, की तेवढ्यात भरधाव वेगाने घोडा दौडवत एकजण समोर येत लगाम खेचतो.
"आरं धावा, रंगा डाकु येतोया." सगळीकडे पळापळ सुरु होते.
"या बेन्याला आता सोडतच नाही." म्हणत चंद्रा चंद्रभान कुऱ्हाड घेऊन येतो.
तुफान वेगाने घोडे दौडवत रंगा व त्याचे डाकु साथीदार तेथे पोहोचतात. आपल्या हातातल्या रायफली हवेत उंचावत ते फैऱ्या झाडतात, तेवढ्यात चवताळलेला चंद्रा रंगावर चंद्रभान कुऱ्हाड फेकतो. रंगा खाली कोसळतो तसा झेप घेत चंद्रा त्याच्यावर तुटुन पडतो. सावध रंगा त्याचा नेम चुकवतो आणि घोड्यावर बसतो. रंगाचे साथीदार चंद्राला घोड्याला बांधुन जंगलात फरफटत नेतात.
"आता तु संपलास." म्हणत रंगा चंद्रावर रायफल ताणतो. इतक्यात तुफान वेगाने घोड्यावर उभा राहुन रॉनी तिथे येतो. आणि काही समजायच्या आत रंगावर झेप घेतो, आणि त्याच्या हातातील रायफल हिसकावून त्याच्यावर रोखतो.
"मार, मार त्याला."कबिला तिथे पोचलेला असतो.
"कोण रं तु? जिता जायचं असेल तर निघुन जा इथुन." रंगा धमकावणीच्या भाषेत बोलतो. तेवढ्यात जंगलातुन एकाएकी गाड्यांचा जोरदार आवाज घुमतो, आणि जंगलातुन सशस्त्र मशिनगन्स हातात असणाऱ्या गाड्यांचा ताफा चौफेर उभा राहतो. जावेद व सारा समोर येतात. रॉनी मळलेल्या कपड्यात अगदी रुबाबात त्यांच्या समोर जातो. कबिला व रंगा डाकु आश्चर्याने पाहत रहतात.
"रॉनी कैसा है रे तु?" म्हणत जावेद त्याला मिठी मारतो. सारा मात्र काही न बोलता त्याला पाहत राहते. रॉनी मागे वळतो.
"अगर जिंदा रहना चाहते हो तो तुम यहा से चले जाओ. और फिर यहा कभी लौट के मत आना." जरबी नजरेने रंगाला पाहत रॉनी बोलतो. रंगा व त्याचे साथीदार मागे हटत जंगलात पळ काढतात.
भैरु व चंद्रा आश्चर्याने पाहत रॉनीजवळ येतात व हात जोडतात.
"ये हात जोडने के लिए नही है बाबा, आशिर्वाद के लिए है." रॉनी झुकुन भैरुच्या पाया पडतो. सगळे भावुक होत पाहत राहतात.
आपल्या साथीदारांसह रॉनी तिथुन बाहेर पडतो. सगळा कबिला भावुक होत त्याला पाहत राहतो.
"अल्लाह का शुक्र है जो तु बच गया रॉनी." जावेदच्या अड्डयावर सगळे जमलेले असतात.
"हम तो हिंमत ही हार चुके थे. लेकिन इसने हिंमत दिखायी." जावेद साराकडे इशारा करतो. रॉनी तिच्याकडे पाहतो.
"हमने एक एक कर सुलतान को मदद करनेवाले सारे गुंडों को मार डाला, लेकिन एक दिन..........." जावेद भुतकाळात जातो.
जावेद और सारा अपने मिशन पे निकल चुके थे, तेवढ्यात एक लष्करी ट्रक भरधाव वेगाने येत त्यांच्या अंगावर जातो. जावेद, सारा व टिम बाजूला उड्या मारतात. सगळी टिम सावध होऊन गन्स ताणत पाहत राहते, तेवढ्यात अशीर RPG -71 ने धडाधड गोळ्यांचा वर्षाव करतो. त्याचे इतर साथीदार M 60 आणि एके -47 ने जावेद व सारावर हल्ले करतात. त्यांच्या हल्ल्याचा मुकाबला त्यांना शक्य होत नाही. सुलतान समोर येतो.
"तुम्हारे शेर को तो पहुचा चुका हु. तुम तो सब उसके कुत्ते हो." सुलतान ची फौज त्यांच्यावर हसते, आणि नारेबाजी करत ते निघुन जातात.
"अब तो नही छोडुंगा उसको." भेदक नजरेने रॉनी बोलतो.
"क्या करेगा अब तु?" जावेद.
"ऐसा धमाका की सुलतान बौखला जाये." तेवढ्यात सारा इशारा करते, सगळे बाहेर जातात. सारा व रॉनी दोघेच तिथे राहतात.
"काय झालं सारा?" रॉनी आश्चर्याने विचारतो.
"नवीन तु हे सगळं सोडून दे." वैतागत सारा बोलते.
"सोडुन देऊ? जेव्हा लक्ष्य एवढ्या जवळ आहे, आणि तु बोलतेस हे सोडुन देऊ?" रॉनी चिड व्यक्त करत बोलतो.
"नवीन अरे कोण आहेस तु? नेता, पोलिस की गुंड? नाही नवीन. ज्या नवीनला मी ओळखत होते, तो तु नाही आहेस."
"तो नवीन आता रॉनी बनलाय सारा. सारा, मलाही हौस नाही या सगळ्याची, पण सगळेच प्रश्न सामान्य राहुन नाही सोडवता येत. तुला माहिती आहे, लहानपणी एकदा आईसोबत जेव्हा कधी गावी जायचो, ती मला शेताच्या बांधावर घेऊन जायची. तेथे काही अंतरावर काही मजुर एका शेतजमिनीत काम करायचे. एक दिवस........"
रॉनी भुतकाळात जातो.
मोठ्याने हसण्याचा आवाज-
"अरे कसला पैसा पाहिजे तुम्हाला? माज आलाय का? चला निघा." जमिनमालक मजुरांवर खेकसत होता. मजुर मान खाली घालुन उभे होते.
"अरे जगायचं तर आमच्यासारख्या मालकानी, मजुरांनी फक्त आमची सेवा करावी. चला निघा, मसणातलं लोणी खावा नायतर मरा."
"आई त्या मजुरांना त्यांचा पैसा मिळायला हवा, हो ना? " दुर बांधावर असलेला नवीन आईला विचारतो.
"तु या फंदात पडु नकोस नवीन. हे मोठे लोक काय करतील समजणार नाही. त्यासाठी आपण त्यांच्याहीपेक्षा मोठं असलं पाहिजे."
रॉनी भावुक होत वर्तमानकाळात येतो. सारा पाहते आहे.
"सारा हे जग आपल्या हिशेबाने नाही चालत, पण ते चालवण्यासाठी कोणीतरी शेर पुढे यायला पाहिजे. आणि तो शेर मी आहे." जरबी आवाजात रॉनी बोलतो.
"सारा डोंट वरी. मला काही होणार नाही." रॉनी साराच्या चेहऱ्यावरुन हात फिरवतो. सारा भावुक होत त्याच्या हाताचे मुके घेते.
रॉनी व जावेद चवताळुन उठतात. सुलतानच्या अड्डयांवत ते थेट हल्ले करतात. समुद्रात उभे असलेले त्याचे शस्त्रकोठार ब्लास्ट होते. दुसरीकडे शिवमकुमार विरुध्द भक्कम पुरावे सापडल्यामुळे मुख्यमंत्री दिक्षित मैडमांच्या अध्यक्षतेखाली एक प्रामाणिक पोलिस अधिकारी अभिमन्यु कडुन चौकशीस सुरवात होते. शिवमकुमार ला आमदार पदावरुन हटवले जाते. संतापलेला शिवमकुमार एकटाच बंगल्याच्या गच्चीवर उभा राहुन ओरडतो.
"नवीन............."
सुलतानला असलेला शिवमकुमार चा पाठिंबा नाहीसा होतो. सुलतान आणि अशीरची फौज जावेद व त्याच्या टिमसमोर येते.
"मैने कहा था, मेरे रास्ते से हट जाओ. पर तुम हिंदुस्तानी अपने हरकतो से बाज नही आओगे." सुलतान व फौज त्यांच्यावर शस्त्रे रोकते. तेवढ्यात रो रो आवाज करत एक क्रुझर हवेत झेपावते, आणि रॉनी दोन्ही हातात मशिनगन्स घेत खाली झेप घेत क्रुझरवर फायरींग करतो. क्रुझर पेट घेत सुलतानच्या फौजेवर पडते व तिचा ब्लास्ट होतो. रॉनी सुलतान समोर येतो.
"क्या कह रहे थे तुम. हम हिंदोस्तानी अपने अकड से बाज नही आयेंगे?अरे अभी तो हमने अपनी अकड दिखायी ही कहा है, अगर दिखायेंगे तो तुम्हारे पुरे मुल्ख को तबाह कर देंगे." रॉनी आवेशात बोलतो.
"आज तो तुझे और तेरे हिंदुस्तानी अकड को खत्म कर देता हु." सुलतान रॉनी वर रायफल ताणतो. तेवढ्यात एक लष्करी ट्रक भरधाव वेगाने सुलतानच्या ताफ्यावर आदळतो. सुलतान दुर जाऊन पडतो. लष्करी ट्रक चे वरचे छत फोडत कमांडोज बाहेर येत झेपावत रॉकेट लॉन्चर्स ने सुलतानच्या फौजेवर रॉकेट्सचा मारा करतात. सगळीकडुन वेगाने रॉकेट्स फौजेवर आदळत ब्लासट करु लागतात. रॉनी मशिनगनने फायरींग करत सुलतान व अशीर आणि फौजेशी सामना करु लागतो. चकमकीला सुरवात होते.
"तबाही, तबाही......." म्हणत अशीर राक्षसासारखा रॉनीच्या फौजेवर तुटुन पडतो, पण खवळलेला रॉनी धडाधड गोळ्या घालत अशीरला ठार करतो. सगळी फौज "तबाही, तबाही" करत त्याच्यावर हल्ला करते. पण रॉनीची टिम जोरदार फायरींग व ग्रेनेड हल्ला करत सुलतानची उरलीसुरली फौज नष्ट करते. रॉनीचे काही निवडक साथीदार व जावेद, सारा एवढेच शिल्लक राहतात. सुलतान आपले अस्तित्व नष्ट होतेय असे पाहुन जोरदार ओरडत राक्षसासारखा रॉनीवर धावुन येतो. रॉनीही त्याच्यावर धावुन जातो. दोघांमध्ये जोरदार फाईट सुरु होते. रॉनीचे साथीदार रॉनीच्या इशाऱ्याने तिथुन निसटतात. रॉनी व सुलतान अगदी रक्तबंबाळ होईपर्यंत लढत राहतात, पण शेवटी राक्षसासारखा सुलतान रॉनीला खाली पाडतो.
"मैने कहा था, मेरे रास्ते मे मत आ." सुलतान जवळच पडलेली रायफल उचलतो.
"तबाही." म्हणत तो रॉनीवर फायरींग करणार तेवढ्यात खुंखार वाघासारखा पिंजारलेल्या केसांचा रॉनी उभा राहतो.
"चेक मेट." अचानक रॉनीच्या मागुन हेलिकॉप्टर मधुन सुलतानवर धडाधड गोळ्यांचा वर्षाव होतो.
"त......तबाही." म्हणत रक्ताच्या थारोळ्यात सुलतान खाली कोसळतो. सगळीकडे रक्तामांसाचा चिखल, जागोजागी स्फोट, लागलेली आग. पण घाबरलेले शहरातले लोक रॉनीचा जयघोष करत जल्लोष करतात. रॉनी आकाशाकडे पाहतो.
सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. सुलतानच्या जुलमाने कंटाळलेली जनता, आर्मी, पोलिस फोर्स सर्वत्र रॉनीचे कौतुक होत असते. सामान्य जनतेचा रॉनी आवाज बनलेला असतो. दुसरीकडे शिवमकुमार ची चौकशी पुर्ण होत आलेली असते, तो पुर्णपणे दोषी सिध्द होतो. राकेश कोरेगावकर वर लावलेले सगळे आरोप खोटे सिद्ध होतात. न्युज चैनेलवरुन न्युज प्रक्षेपित केल्या जातात. नवीनचे एक लक्ष्य पुर्ण होते.
सामान्य जनतेचा सरकार व प्रशासनावरील दबाव वाढत असतो, त्यामुळे मुख्यमंत्री दिक्षित मैडम विधिमंडळात खास ठराव संमत करण्यासाठी येतात.
विधिमंडळ भवनात सगळ्यांचे लक्ष सिएम मैडमांच्या बोलण्याकडे असते.
"मै मुख्यमंत्री अनिता दिक्षित. आज से और अभी से ये ऑर्डर जारी करती हु, की जो भी शहर के सडको, पथदिपों के काम पेंडींग है, वो फौरन कोई वजह न देते हुए शुरु किये जाए. महंगाई और बढती बेकारी कम करने के लिए स्पेशल ऑर्डिनन्स आज ही पास होंगे. आम आदमी की समस्याओ के लिए पब्लिक पोल शुरु किया जाएगा."
सगळ्या विधिमंडळात टाळ्यांचा कडकडाट होतो. सिएम मैडम उठुन बाहेर जातात.
"ये रॉनी का कुछ पता चला?" केबिनकडे जाता जाता मैडम आपल्या पिए रजतला विचारतात. रजत मैडमांच्या कानात पुटपुटतो.
"नवीन कोरेगावकर............राकेश का बेटा." मैडम स्वगत बोलतात.
रॉनी जावेदच्या अड्डयावर बसलेला असतो. साराही बाजुलाच उभी असते, ती गरोदर असते. तेवढ्यात टिव्हीवर न्युज फ्लैश होते.
"ये रॉनी समझता होगा की उसने सुलतान को मारा और वो लोगों का मसिहा बन गया. असल मे वो एक क्रिमिनल है, क्रिमिनल. ऐसे क्रिमिनल्स के साथ क्या करना है, मुझे पता है." सिएम मैडम रॉनीला वॉर्निंग देतात.
"खुद से तो कुछ हुआ नही, और रॉनी के बारे मे बोल रही है, हं." जावेद हसत बोलतो.
"आता तु काय करणार नवीन?" सारा घाबरुन चिंता व्यक्त करत बोलते.
रॉनी काही न बोलता साराचा हात प्रेमाने हातात घेत तिच्या कपाळाचे चुंबन घेतो.
एका मागोमाग एक आलिशान कार्सचा ताफा मंत्रालयाबाहेर उभा राहतो, आणि पिंजारलेल्या केसांचा रॉनी रागात सरळ दिक्षित मैडमांच्या केबिनकडे जाऊ लागतो. कुणीही त्याला अडवु शकत नाही. केबिनचा दरवाजा ढकलुन तो आत येतो.
"मुझे पता था, तुम जरुर आओगे नवीन." पाठमोऱ्या उभ्या सिएम मैडम बोलतात. नवीन आश्चर्याने पाहत राहतो.
"चौंक क्यो गये? यही नाम है ना तुम्हारा?" मैडम खुर्चीवर बसतात.
"नाम मे क्या रखा है मैडम. हो सके तो काम की बाते भी करले." रॉनी रोखठोक बोलतो.
"तुम्हे लगता होगा की लोगो का सपोर्ट पाकर तुम कुछ भी करोगे, तो ऐसा नही है. एक क्रिमिनल के सामने क्या हमारा सरकार झुकेगा?" मैडम आवेशाने बोलतात.
"क्रिमिनल. मैडम आपको पता है क्रिमिनल कौन है. पेट भरने के लिए मजबुरन जो चोरी करे या शहर को ऐसे करप्ट पॉलिटिशयन से बचाने के लिए लढे वो क्रिमिनल? बडी बडी गाडियो मे घुमके जो आम आदमीयो के तरफ ध्यान भी ना दे, या पैसो के लिए अपने देश तक को बेचे वो क्रिमिनल? क्रिमिनल वो नही जो आप समझती हो." रॉनी चिडुन बोलतो.
"कुछ भी हो नवीन. ये मत भुलो गुनाह का रास्ता सबकुछ बरबाद कर देता है. तुम्हारे पिताजी राकेश को मै अच्छे से जानती थी. वो तो ऐसे नही थे. हालात कैसे भी हो समझदारी से काम लेते थे."
"क्या हुआ था उनके साथ मैडम? उनको मार दिया गया, और केस रफादफा कर दी? मैडम यहा सच को हमेशा तकलीफ ही होती है." रॉनी रागाने पाहत बोलतो.
"आय विल किल यु रॉनी." मैडम चिडुन वॉर्निंग देतात.
"कोशिश करके देखिये मैडम आपके हाथ नही आऊंगा." रॉनी गरकन मागे वळतो, आणि चालु लागतो. बाहेर आल्यावर रॉनीचा फोन वाजतो. फोन ठेवल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकतो.
रॉनी धावतच सिटी हॉस्पिटलमध्ये जातो.
"भाई आपके जाने के बाद भाभी के पेट मे जोर से दुखने लगा." फिमेल वॉर्ड समोर एक जण त्याला सांगतो.
"कहा है वो?"रॉनी विचारतो, तसा तो फिमेल वॉर्ड कडे इशारा करतो. रॉनी आत जातो, आणि पाहतो. बेडवर साराशेजारी तान्हुले बाळ झोपलेले असते. सारा रॉनीला पाहुन खुश होते. रॉनी भावनिक होत अलगद बाळाला उचलुन घेतो, आणि साराकडे पाहतो. बाळाला जवळ घेत त्याचा प्रेमाने मुका घेतो.
"आता तरी सगळं सोडणार ना नवीन?" सारा आतुरतेने विचारते. तसा रॉनी साराला जवळ घेतो.
शिवमकुमार वरील सर्व आरोप सिद्ध झालेले असतात, व पोलिस व्हैन ने त्याला नेत असतात. सुनसान रस्त्यावर व्हैन येते. तेवढ्यात एका ट्रकची आडवी धडक व्हैनला बसते. व्हैन गडगडत रस्ता ओलांडून पलीकडे दगडाला आपटते. दोन बाईकस्वार हवेत झेपावत व्हैनमध्ये बसलेल्या पोलिसांवर नेम धरतात. पोलिस ठार होतात. ते दोघे व्हैनचा मागचा दरवाजा उघडतात.
"भाऊ चला." शिवमकुमार त्या दोघांसोबत जाऊ लागतो. ते दोघे पलटुन व्हैनच्या इंधन टाकीवर फायरींग करतात. व्हैनचा ब्लास्ट होतो.
"भाऊ नवीन कुठे आहे ते मला माहित आहे." शिवमकुमार द्रुष्टपणे हसतो, आणि चालु लागतो.
मुख्यमंत्री दिक्षित मैडमनी पोलिस फोर्सला कमांड्स दिलेल्या असतात. जावेदच्या साथीदारांची धरपकड सुरु होते. त्याचे काही साथीदार लपुन छपुन फिरत असतात. साराला डिस्चार्ज मिळालेला असतो, व नवीन सारासोबत आपल्या नवीन आयुष्याची स्वप्ने रंगवत गार्डन मध्ये बसलेला असतो.
"सारा, आता खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची नव्याने सुरवात होणार आहे." नवीन खुश होत साराच्या कपाळाचे चुंबन घेत बाळाकडे पाहतो. तेवढ्यात सारा किंचाळते, तिच्या हातातुन बाळ निसटुन खाली पडते. नवीन तिच्याकडे पाहतो. तिचे सताड उघडे डोळे घाबरुन मागे पाहत असतात. नवीन वळुन पाहतो. शिवमकुमार नेम धरून असतो, तो गोळी चालवणार तेवढ्यात नवीनचे दोस्तदार तिथे पोहोचुन शिवमकुमार वर गोळ्यांचा वर्षाव करतात, रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळतो.
"भाई बच्चे को लेकर जाओ." एकजण ओरडतो. रॉनी हपापत साराच्या कलेवराकडे पाहतो, आणि भावुक होत गुडघ्यावर बसतो. बाळ रडतच असते, रॉनी बाळाला कवेत घेतो आणि ढसाढसा रडु लागतो.
"भाई जल्दी. पुलिस कभी भी आ सकती है."
रॉनी बाळाला कवेत घेऊन वाट फुटेल तिथे पळत राहतो. एका चौकासमोर तो येतो, तेथे लोकांनी मोठ्या प्रेमाने राकेश कोरेगावकर चा पुतळा उभारलेला असतो. रॉनी अभिमानाने तिकडे पाहतो, त्याची नजर एका बंगल्यावर जाते. बंगल्याचं गेट उघडत तो बंद दरवाजासमोर येतो. कोणाची नजर नाही असे पाहुन तो जड मनाने बाळाला खाली ठेवतो, आणि तसाच मागे वळुन गेटमधून बाहेर पडतो.
"अहो हे बघा, कोणाचं बाळ आहे ते?" त्या बंगल्यातले जोडपे बाहेर येते.
"अरे कुणाचं आहे हे बाळ?" त्यातला पुरुष आवाज देतो, पण कोणीच येत नाही.
"देवानं आमचं ऐकलं बघा. पहा तुम्हाला मुलगा हवा होता ना?" ती महिला बाळाचे पटापट मुके घेते.
"अगं पण......"
"पण बिण काही नाही, चला आत."महिला बाळाला आत घेऊन जाते, तो पुरुषही आत जातो. एका झाडामागे लपुन बसलेला रॉनी हे पाहत असतो. जोडपं बंगल्यात गेल्यावर तो झाडामागुन पुढे येतो, आणि तसाच चालत चौकातल्या राकेश कोरेगावकर च्या पुतळ्या समोर उभा राहतो. तो डोळे मिटतो. क्षणभर त्याच्या नजरेसमोर आईचा चेहरा झळकतो. खांद्यावर हात ठेवून बोलणारे अब्दुल चाचा, सलीम. आणि रक्ताच्या थारोळ्यात त्यांची प्रेते. शिवमकुमार चे राक्षसी हास्य, सुलतानचा हल्ला. बाबांचा पेपरमधील फोटो, अचानक तो फोटो जळु लागतो. आर्त हाक मारणारी सारा आणि रडणारे बाळ" नवीन दचकुन डोळे उघडतो. पोलिसांचे पथक श्वान पथकासोबत त्याला शोधत येत असते. नवीन आपली गन काढुन खोपडीला लावतो, आणि...........
"ठों.........."गोळीचा आवाज घुमतो. पुतळ्यासमोर रक्ताचा सडा पसरलेला असतो. पोलिस श्वान पथकासोबत तिथे पोहोचतात, पण रॉनी मेलेला असतो.
--------------------Chapter 2 Closed--------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा