ज्ञानेश्वर माऊली

 


 

 

 

 

                                     "माझा मराठीचा बोलु कौतुके,परी अम्रुतातही पैजा जिंके"

     ज्ञानेश्वर माऊलींनी सुमारे ७०० वर्षांपूर्वी 'भावार्थ दिपिका' ग्रंथ लिहिला. तिच ही ज्ञानेश्वरी. भगवतगीतेचे शुद्ध मराठीत निरुपण म्हणजे ज्ञानेश्वरी.

        अवघ्या १५-२० वर्षाच्या कोवळ्या वयात संतपदाला पोहचलेले एक महान व्यक्तिमत्त्व. आपले थोरले बंधु निव्रुत्तीनाथ यांना गुरुस्थानी मानुन ज्ञानदेवांनी संत साहित्याचा पाया रचला.

"ज्ञानदेवे रचला पाया, तुका झालासे कळस"

     प्रेम दिल्याने प्रेम वाढते, पशुही माणसासारखा बोलु शकतो. नव्हे मंत्र म्हणु शकतो हे त्यांनी पैठणच्या भर सभेसमोर रेड्यामुखी वेद वदवुन सिध्द करुन दाखवले. 

      आपल्या रसाळ वाणीने माऊलींनी समजण्यास कठीण अशा गितेतील ओव्या सहज सोप्या भाषेत सांगितल्या. स्वतःला ते निव्रुत्तीनाथांचा दास मानत. त्यांच्या वागण्यात एक नम्रता होती.

"जो जे वांछिल, तो ते लाहो प्राणिजात" 

     स्वतः दुःखाचे कढ पचवुन माऊली भगवंताजवळ पसायदान मागतायेत. केवढे हे दिव्यत्व!  विठ्ठलाचा साक्षात्कार झाल्यावर भक्तीत तल्लीन होणारे माऊली त्या देवाचे दुसरे रुपच नाही का?

       ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या ओव्यातुन जिवनाचे सारे सार सांगितले आहे. चिरंतन सुखाची आस म्हणुन त्यांनी अवघ्या २२ व्या वर्षी जिवंत समाधी घेतली, पण माऊली आजही ओवीरुपात प्रत्येकाच्या तनामनात जागे आहेत. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ये रिश्ता क्या कहलाता है!

अवंतिका एक छोटीशी प्रेमकथा