औपरेशन वज्र

 


                                                       औपरेशन वज्र
(मित्रांनो युध्दस्थ कथा रम्यः अशी एक उक्ती आहे. त्यानुसार साहसी कथेची मालिका आपल्यासमोर सादर करत आहे. आपल्याला निश्चितच आवडेल अशी आशा करतो. कथेतील पात्रे, प्रसंग इ. काल्पनिक आहेत.)

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
                भाग -१               कैप्टन कैडिटी

               सन १९८०-८१ चा काळ होता. अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात ब्लॅक पैंथर या गैंगस्टरच्या गैंगवौरच्या घटना चर्चेत होत्या. त्याच्या नावाची एवढी दहशत होती की लोक दिवसाढवळ्या सुध्दा घराबाहेर पडत नसत. आणि अशातच कुविख्यात गैंगस्टर जेकौब जेल मधून फरार झाल्याची बातमी इन्स्पेक्टर हेडलींना समजते. या बातमीने त्यांची डोकेदुखी वाढलेली असते. जेकौब एक खतरनाक क्रिमिनल असतो तसाच ब्लॅक पैंथरचा खास असतो. एक महत्वाचे सिक्रेट घेऊन तो पळालेला असतो. इन्स्पेक्टर हेडली त्याला शोधण्यासाठी जंग जंग पछाडतात.
             जेलमधून बाहेर पडून जैकोब काळोखाचा फायदा घेत मागे पुढे आपल्याला कोणी पाहत नसल्याची खात्री करत जात असतो. ओव्हरकोटाच्या खिशात त्याने ते सिक्रेट लपवलेले असते. चौकातील एका बिल्डिंग समोर येऊन तो उभा राहतो. सहज म्हणून ओव्हरकोटाच्या खिशातून सिगारेट काढून शिलगावतो. धुराचे लोट काढल्यानंतर त्याला थोडे बरे वाटते. एवढ्यात समोरच्या त्या निर्जन परिसरात ४-५ मवाली एका महिलेची चेन खेचून तिला छेडण्याचा प्रयत्न करत असताना दिसतात. ती महिला त्यांचा कसोशीने प्रतिकार करत असते. जैकोब सिगारेटचे थोटुक फेकुन देतो आणि घड्याळात पाहतो. रात्रीचे ९-९.१५ वाजलेले असतात. तो एरिया खुपच सुनसान, निर्जन असा असतो. कोणाची सहजासहजी नजर जाणार नाही अशातला. जैकोब ला लवकरात लवकर टेक्सास सोडून ब्लॅक पैंथर पर्यंत पोचायचे असते, पण गंमत म्हणून तो एका बिल्डिंग च्या आड उभा राहून समोरचा नजारा पाहत असतो.
        काही वेळ जातो, आणि अचानक त्या निरव शांततेत बुटांचा टप टप टप टप असा आवाज घुमु लागतो. तो अधिकच जवळ येऊ लागतो. ते मवाली व त्या महिलेचे तिकडे लक्ष जाते. जैकोब ही तिकडे पाहत असतो. काळोखातून धुराचे लोट हवेत उडवत एक काळ्या ओव्हरकोटातील धिप्पाड माणूस समोर उभा राहतो. तोंडातील सिगारेटचा पाईप तसाच ठेवत तो पुढे पुढे येत असतो. त्या मवाल्यातील एकजण त्याला हटकतो.
"ए मैन. व्हु आर यु. चुपचाप तुझ्या रस्त्याने जा. आमच्याशी पंगा घेऊ नकोस."
     तरीही तो ओव्हरकोटातील व्यक्ती काही बोलत नाही, तसा चेकाळून तो मवाली त्याच्यावर हल्ला करतो, पण काही कळायच्या आतच तो खाली जमिनीवर कोसळलेला असतो. तोंडातला पाईप बाजूला करत तो समोर पाहत बोलतो.
"माय नेम इज कैडिटी. कैप्टन कैडिटी."
      जेकौब कैप्टन कैडिटी कडे पाहतच राहतो. बाकीचे मवाली त्या महिलेला सोडून पळ काढतात. कैप्टन त्या महिलेला टैक्सी अरेंज करून देतो, आणि जसा आला तसा पुन्हा मागे फिरत चालू लागतो. तेवढ्यातच जेकौब च्या मोबाईलवर कोणाचातरी फोन येतो, तो ब्लॅक पैंथर असतो. त्या शांत वातावरणात घुमलेल्या रिंगच्या आवाजामुळे कैप्टन कैडिटी मागे वळून पाहतो, परंतु आवाज बंद झाल्याने तो पुन्हा पुढे चालू लागतो.
        जैकोब चुपचाप पणे तिथून निसटतो. इन्स्पेक्टर हेडलींनी टेक्सासच्या सर्व सिमा बंद केलेल्या असतात, त्यामुळे जेकौब चा टेक्सास मधून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झालेला असतो. टेक्सासच्या बौर्डरवरच ब्लॅक पैंथरने यायला सांगितलेले असते. कसाबसा तो तिथपर्यंत पोहोचतो, पण कुठूनतरी इन्स्पेक्टर हेडलींना या गोष्टीची कुणकुण लागते. इन्सपेक्टर हेडलींना जैकोब आणि त्या ब्लॅक पैंथरच्या माणसाला रंगेहाथ पकडायचे असते, पण त्याआधीच तो माणूस तेथून निसटतो आणि जैकोब गुंगारा देत इन्स्पेक्टर हेडलींपासून दूर पळतो. आपल्यापर्यंत इन्स्पेक्टर हेडली पोहोचून, सगळा खेळ खल्लास होईल या भितीने जैकोब ओव्हरकोटाच्या खिशातून सायनाईटची गोळी काढून तोंडात टाकतो. इन्स्पेक्टर हेडली तिथे पोहोचेपर्यंत तो मेलेला असतो.
         अतिशय उदास मनाने इन्स्पेक्टर हेडली हेडक्वार्टरला परतलेले असतात. घडलेला घटनाक्रम त्यांच्या नजरेसमोरून जात असतो. एक अतिशय महत्वाचे सिक्रेट ब्लॅक पैंथरपर्यंत पोहोचले आहे अशी शक्यता त्यांना वाटत असते. पण त्याही पेक्षा ते सिक्रेट मौत का सौदागर म्हणवल्या जाणाऱ्या बौम्बर पर्यंत पोहोचेल की काय याची जास्त चिंता वाटत असते. तात्काळ ते आपल्या हाताखालील अधिकार्यांची मिटींग आयोजित करतात.
          अतिशय गंभीर चेहरा करुन इन्स्पेक्टर हेडली मिटींग रुममध्ये बसलेले असतात. पिंगपौंग सारख्या टेबलच्या आजुबाजुला सर्व सिनियर अधिकारी हतबध्दपणे बसलेले असतात. बर्याच वेळेनंतर उभे राहत समोर बसलेल्या अधिकार्यांना पाहत ते बोलायला सुरवात करतात.
"माय डियर फ्रेंडस. दुर्दैवाने जैकोब ला जिवंत पकडण्यात आपल्याला अपयश आले आहे, पण त्याने कोणतेतरी खास सिक्रेट ब्लॅक पैंथर पर्यंत पोहचविले असण्याची शक्यता आहे. आमच्या विश्वसनीय सुत्रांनुसार ब्लॅक पैंथर यावेळी अलास्का मध्ये लपून बसला असण्याची शक्यता आहे. आपल्याला काहीतरी ठोस उपाय करून त्याच्यापर्यंत पोहोचलेले ते सिक्रेट परत आणायचे आहे, नाहीतर एकदा का ते बौम्बर कडे गेले तर....?"
        जमलेल्या सर्व अधिकार्यांत कुजबुज सुरु होते. बौम्बरशी मुकाबला कोणालाच नको असतो. आर्मी ही त्याच्यापासून दोन हात दूर राहणे पसंत करत असते. त्याच्याकडे अशी एक की होती, ज्यामुळे अमेरिकन पोलिसांच्याही एक पाऊल तो पुढे होता, त्याचा मुकाबला फक्त एकच व्यक्ती करु शकत होता आणि तो म्हणजे, कैप्टन कैडिटी.
         टेक्सास आर्मी कैंम्प. सकाळची वेळ. मेजर ब्रेझिल आर्मी हेडक्वार्टर मध्ये आपल्या खुर्चीवर बसुन आहेत. समोर टेबलवर इन्स्पेक्टर हेडलींनी पाठवलेले पत्र ठेवलेले आहे. बराच वेळ ते त्याच्याकडे पाहत असतात. तेवढ्यात एकजण येऊन त्यांना कैप्टन कैडिटी येत असल्याची सूचना देतो. आपल्या खुर्चीत सावरून बसत मेजर ब्रेझिल दरवाजाकडे पाहतात. दरवाजावर टकटक होते. बाहेरून कैप्टन कैडिटी विचारतात.
"मे आय कम इन सर ब्रेझिल?"
"येस कम इन कैप्टन. मी तुमचीच वाट पाहत होतो."
       कैप्टन आत येत मेजर ब्रेझिल समोरच्या खुर्चीवर बसतात.
मेजर ब्रेझिल त्यांच्या कडे पाहत बोलायला सुरवात करतात.
"कैप्टन. एका महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी खास तुम्हांला बोलावलं आहे."
"येस सर ब्रेझिल. काय बोलायचं आहे?"
"कैप्टन. इन्स्पेक्टर हेडलींना तुम्ही ओळखतच असाल?"
       मेजर ब्रेझिल च्या अनपेक्षित प्रश्नाने कैप्टन काही वेळ त्यांच्याकडे पाहत राहतो. मग आपल्या खुर्चीवरुन उठत कोटाच्या खिशातून सिगारेटचा पाईप काढून तोंडात ठेवतो, आणि बोलू लागतो.
"आय नो हिम व्हेरी वेल सर ब्रेझिल. अटलांटामध्ये ट्रेनिंगवेळी आम्ही एकत्र होतो."
"इन्सपेक्टर हेडली या वेळी एका मोठ्या संकटात आहेत, कैप्टन. आपल्याला त्यांची मदत केली पाहिजे."
      कैप्टन काही काळ स्तब्ध राहतात, आणि पुढे बोलू लागतात.
"sorry सर ब्रेझिल. पण या वेळी मी बोस्टनमध्ये  एका दहशतवादी गिरोच्या म्होरक्याला पकडण्याच्या मिशनवर आहे. ते मिशन खुप महत्त्वाचे आहे. मी ते Abort नाही करू शकत."
"मला माहिती आहे, कैप्टन. पण हे मिशन त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचे आहे. बौम्बर बद्दल तुम्हांला माहिती असेलच?"
बौम्बरचं नाव ऐकून कैप्टन कैडिटी काहीच न बोलता सर ब्रेझिल ना अभिवादन करुन मागे वळून बाहेर पडतात. मेजर ब्रेझिल त्यांना पाठमोरे जाताना पाहत असतात. तेवढ्यात थोडे अंतर चालून गेल्यावर कैप्टन कैडिटी मागे वळून पाहतात, आणि विचारतात.
"तसं मला तिथे चेरी खायला तर मिळतीलच ना?"
   मेजर ब्रेझिल कैप्टनच्या या अनपेक्षित प्रश्नाने भांबावतात, पण नंतर मोठमोठ्याने हसायला सुरवात करतात. कैप्टन कैडिटी अखेर इन्स्पेक्टर हेडलींना भेटायला तयार झाले याचाच त्यांना आनंद झालेला असतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                    भाग -२         बोस्टन ग्लैशियरची सफर
(मित्रांनो मागच्या भागात आपण पाहिलं की मेजर ब्रेझिलच्या सांगण्यावरून कैप्टन कैडिटी इन्स्पेक्टर हेडलींना भेटायला तयार झाले आहेत.)
         इन्स्पेक्टर हेडली पोलिस हेडक्वार्टरला बसलेले असतात. तेवढ्यात त्यांना तारेच्या मशीन मधून मेजर ब्रेझिल ची तार मिळते. कैप्टन कैडिटी इन्स्पेक्टर हेडलींना भेटायला तयार झालेले असतात. संदेश मिळताच मनोमन इन्स्पेक्टर हेडली खुप खुश झालेले असतात. आनंदाने ते आपली आवडीची ब्लॅक कौफी पित खुर्चीवर बसतात.
          दुपारची वेळ असते. दरवाजावर टकटक होते. कैप्टन कैडिटी हळूच दरवाजातून आत डोकावून पाहतात, आणि इन्स्पेक्टर हेडलींना पाहत विचारतात.
"मे आय कम इन इन्स्पेक्टर हेडली?'
"येस कम इन कम इन जौन."
       कैप्टन कैडिटी आत येत खुर्चीवर बसतात.
"सौरी हेडली. पण माझे नाव जौन नाहीये.'
"जौन जगासाठी तु कैप्टन कैडिटी असशील, पण माझ्या साठी तर तु जौन आहेस."
"अं. आपण कामाबद्दल बोलूया का हेडली? इफ यु डोंट माईंड. आणि हो इथे ब्लॅक कौफी चांगली मिळते असं ऐकलय."
      इन्स्पेक्टर हेडली कैप्टन कैडिटी साठी ब्लॅक कौफी मागवतो.
"जौन आय मिन कैप्टन कैडिटी. मी आता सरळ मुद्दयाचचं बोलतो. बौम्बर बद्दल तुला माहितच असेल ना?"
"ओ हां . तो तर माझा मेहुणा आहे."
"काय? म्हणजे?"
      कैप्टन कैडिटी हसून इन्स्पेक्टर हेडलींना पाहतो.
"हेडली प्लीज मला ओळख परेड नको आहे. काय आहे ते स्पष्ट सांग."
"ओके सांगतो. जैकोब ब्लॅक पैंथरचा खास माणूस होता. काही दिवसांपूर्वी तो एक महत्वाचे सिक्रेट घेऊन फरार झाला होता. आमच्याशी चकामकीत तो मारला गेला पण ते सिक्रेट त्याच्याकडून मिळवण्यात आम्हाला अपयश आले."
    कैप्टन कैडिटी ओव्हरकोटाच्या खिशात हात घालून सिगारेटचा पाईप बाहेर काढतो. आणि समोर बसलेल्या हेडलीकडे लायटर मागतो.  हेडली थक्क होत त्याच्याकडेच पाहत असतो, त्याला तसे पाहताना कैप्टन कैडिटी बोलायला सुरवात करतो.
"तु काहीतरी सांगत होतास हेडली?"
"अं. तेच की ......"
"हां हा आठवलं की कोणतं तरी सिक्रेट जेकौब घेऊन पळाला होता आणि तो तुमच्याशी झालेल्या चकमकीत मारला गेला."
"हो."
"पण हे सांगताना तु चुक केलीस असं नाही वाटत तुला? जैकोब तुमच्याशी झालेल्या चकमकीत मारला गेला नव्हता तर त्याने सायनाईटची गोळी खाऊन आत्महत्या केली होती, राईट?"
       इन्स्पेक्टर हेडली चकित होत कैप्टन कडे पाहतो. कैप्टन कैडिटी च्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य पसरते.
"हो. असचं घडलं होतं, पण तुम्हांला ही गोष्ट कशी माहित?"
"हेडली, सध्या ते महत्त्वाचे नाही. तुला आता माझी काय मदत हवी आहे ते सांग."
"कैप्टन मला ते सिक्रेट ब्लॅक पैंथर कडून परत मिळवायचे आहे. आणि यासाठी तुच योग्य आहेस."
       कैप्टन तोंडातील पाईप बाजूला ठेवत हेडलीकडे पाहतो.
"थैंक यु तुझा अजून माझ्यावर विश्वास आहे."
   इन्स्पेक्टर हेडली आपल्या खुर्चीतुन उठत कैप्टन कडे येतात आणि त्यांच्या पाठीवर हात ठेवतात.
"जौन हे खुप महत्वाचं मिशन आहे, आणि तुझ्याशिवाय ते पुर्णही होऊ शकणार नाही, असं मला वाटतं."
      कैप्टन कैडिटी आपल्या खुर्चीतुन उठत हेडलीच्या नजरेला नजर मिळवत बोलतात.
"ओके देन. पण माझी टिम मात्र मीच ठरवणार."
"ठिक आहे कैप्टन. मी उद्याच सर्व अधिकार्यां समक्ष तुझे नाव या मिशन साठी अनाऊंस करणार आहे."
"उद्या? हेडली माझ्यासाठी वेळ किती महत्वाची आहे ते तुला माहीत असेलच? तु आजच सर्व अधिकार्यांची मिटींग अरेंज कर. तोपर्यंत मला तुझ्याकडे पाहुणचारही करता येईल. तसं चेरी तर मिळतीलच ना इथे?
        इन्स्पेक्टर हेडली बराच वेळ कैप्टन कैडिटी कडे पाहत राहतात. शेवटी कैप्टन कैडिटी पुन्हा आपल्या खुर्चीत बसत बोलतात.
"ओह. काही चुकलं का माझ? ते जाऊ दे. मला एका प्लेनची गरज लागणार आहे."
इन्स्पेक्टर हेडली डोळे विस्फारून कैप्टन कडे पाहतात.
"प्लेन, ते कशाला?"
"माझ्या एका जुन्या मित्राला भेटायला जायचं आहे बोस्टनमध्ये."
"पण कैप्टन......"
"ओके. प्लेन नसेल तर हेलिकॉप्टर, कार, बाईक,बैलगाडी काहीतरी असेलच ना?"
     कैप्टन कैडिटी शी बोलण्यात आपली बरीच उर्जा वाया जातेय असे वाटून हेडली बाहेरच्या साईडला इशारा करत बोलतात.
"इथे एक बंद कैंपबेस एरिया आहे, तिथे एक फायटर प्लेन आहे, पण ते बरेच जुने आहे, मला वाटत नाही......"
इन्स्पेक्टर हेडलीचे पुढचे बोलणे पुर्ण व्हायच्या आधी कैप्टन बाहेर पडलेला असतो.
"आभारी आहे मित्रा. सिव्हील वौर वेळी अशी जुनी विमानं रिपेयर करुन उडवली आहेत आम्ही."
       इन्स्पेक्टर हेडली मटकन आपल्या खुर्चीत बसतात. कैप्टनच्या साहसावर त्याचा विश्वास असतो, पण तो कुणाचं ऐकणारा नसतो. कायम आव्हानासाठी तयार असणारा असतो. इन्स्पेक्टर हेडली लागलीच अधिकार्यांची मिटींग अरेंज करुन मिशन ब्लॅक पैंथर साठी कैप्टन कैडिटी च्या नावाची घोषणा करतात.
    शोध घेत घेत कैप्टन त्या कैम्पबेस एरियात पोहोचतात, तिथेच त्यांना ते जुने, जीर्ण फायटर प्लेन उभे ठेवलेले दिसते. प्लेन चालु करुन त्यांना बोस्टनला जायचे असते, पण त्याआधी आणखी दोघांना सोबत घेऊन जायचे असते, त्यासाठी त्यांनी त्या दोघांना तार पाठवलेली असते.
     टोरेंटो. संध्याकाळची वेळ. सुनसान अशा रस्त्यावर एक व्रुध्द महिला हातात पर्स घेऊन चालत असते. तेवढ्यात स्टंटबाजी करत एक बाईकस्वार येतो, आणि तिच्या हातातील पर्स हिसकावून पळ काढतो. आणखीही दोन-तीन बाईकस्वार त्याच्या सोबत जातात. एवढ्यात काही कळायच्या आतच पुढे गेलेला बाईकस्वार अडखळत खाली पडतो. मागुन असलेले बाईकस्वार करकन ब्रेक दाबून आपल्या बाईक्स थांबवतात. ते समोर पाहतात, एक काळ्या ड्रेस मधील तरुण मुलगी तलवार घेऊन उभी असते. ती वेगाने त्यांच्या कडे धावत येते आणि त्या पडलेल्या बाईकस्वारावर किक मारत त्याच्या हातातील पर्स हिसकावून घेते. बाकीचे तिच्यावर हल्ला करतात, पण आपली थरारक तलवारबाजी दाखवत ती त्या सर्वांना गारद करते. सर्व जण पळ काढतात. ती तरुणी आपल्या हातातील पर्स त्या महिलेला देते, ती महिला धन्यवाद मानत तिला तिचे नाव विचारते. शेकहैंड करत ती बोलते.
"माय नेम इज शैला. कमांडर शैला टोरेस."
      तेवढ्यात कैप्टन कैडिटी नी पाठवलेला संदेश तिला मिळतो आणि त्यांना भेटण्यासाठी टोरेंटोहून ती टेक्सास ला रवाना होते.
      कैप्टन कैडिटीने आपली टेक्निक वापरून प्लेन सुरु केलेले असते. त्यांच्यासोबत रोमान नावाचा त्यांचा सहकारी ही आलेला असतो. रोमान दिसायला काळा व जाड असतो.
कैप्टन व रोमान प्लेन मध्ये असतात, तेवढ्यात शैलाचा तिथे प्रवेश होतो. कैप्टन व रोमान प्लेन मधून बाहेर येतात. कैप्टन खुश झालेले असतात, शैलाकडे पाहत ते बोलतात.
"ओ मेरी लैला माय डिअर शैला"
शैला हसत हसत कैप्टनजवळ येते.
"हाऊ आर यु कैप्टन. जसं मला समजलं की एका नवीन मिशनवर जायचं आहे मी लगोलग टोरेंटो तुन बाहेर पडले."
"तुला पाहुन खुप आनंद झाला शैला. तुझ्याशिवाय तर हे मिशन पुर्ण होणार नव्हते."
शैला रोमानकडे पाहत विचारते.
"हे कोण आहेत कैप्टन?"
कैप्टन हसून शैलाकडे पाहतात.
"असं समज की तो तुझा मोठा भाऊ आहे."
    शैला ओरडते.
"कैप्टन."
"शैला मिट हिम. मि.रोमान. यु.एस आर्मी तील हुशार अधिकारी आणि माझा जिगरी."
"तुमची निवड योग्यच असणार कैप्टन. पण आपलं मिशन काय आहे?"
"सांगतो. पण त्याआधी बोस्टनला जाऊन आणखी एका सहकाऱ्याला सोबत घ्यायचे आहे."
शैला चुपचाप काही प्रश्न न विचारता कैप्टन व रोमानसह प्लेन मध्ये येऊन बसते. एक रोमहर्षक विमान प्रवास सुरु होतो. प्रवासात कैप्टन शैलाला मिशन विषयी सांगतात.
"शैला, तुला ब्लॅक पैंथर बददल माहिती असेलच?"
"तो कुविख्यात गैंगस्टर, ज्याला पकडण्यात अमेरिकन पोलिसही अपयशी ठरले होते?"
"हो तोच. आपल्याला त्याच्या ताब्यातुन एक महत्वाचे सिक्रेट घेऊन यायचे आहे."
"कोणतं सिक्रेट?"
"वेल तेही अजून सिक्रेटच आहे माय डियर शैला. पण त्या ब्लॅक पैंथर आणि बौम्बरचा खात्मा करणे हे आपले मेन मिशन आहे."
"बौम्बर?ज्याला सर्व जण मौत का सौदागर म्हणतात?"
"हां हां हां. मौत का सौदागर? एकदा माझ्या हाती लागु तर दे त्याला मौत का सौदा करायला विसरेल तो."
"पण कैप्टन आपल्याकडे त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी कोणतीच हत्यारं नाहीयेत."
"मला माहित आहे माय डियर. म्हणूनच आपण बोस्टनला जात आहोत."
"मला समजलं नाही. आपल्याला हत्यारं इथे टेक्सास मध्येही मिळू शकली असती?"
"जस्ट वेट ऐण्ड वौच माय डियर शैला."
       विमान डल्लास शहरावरून जात असताना अचानक रोमान ओरडतो.
"अरे कुणीतरी या पापी पोटाचं काहीतरी करा रे?"
कैप्टन हसतात, आणि थोडे गंभीर चेहरा करत बोलतात.
"अरेरे रोमान आपले खाण्याचे पदार्थ तर टेक्सास मध्येच राहिले."
     यावर रोमान आणि शैला डोळे विस्फारून कैप्टनकडे पाहतात. कैप्टन मोठमोठ्याने हसतात.
"माय डियर फ्रेंडस. मागे पेटारा ठेवला आहे, तो उघडुन बघा."
रोमान तो पेटारा उघडून पाहतो. आतमधील खाण्याचे पदार्थ पाहिल्यावर तो त्यावर तुटून पडतो. कैप्टन व शैलाचे त्याच्याकडे लक्ष आहे याचेही त्याला भान नसते. कैप्टन गमतीने शैलाला म्हणतात.
"राहू दे शैला. खाऊ दे त्याला. काही शिल्लक राहिले तर आपल्यालाही मिळेल."
   कैप्टन व शैला एकमेकांना पाहून खळखळून हसतात.
सरतेशेवटी एक दिर्घ प्रवास करुन ते बोस्टन ग्लैशियरला पोहचतात. एका मोक्याच्या ठिकाणी कैप्टन कैडिटी प्लेन लैंड करतात. प्लेन मधून सर्व जण खाली उतरतात. बोस्टन ग्लैशियर मधल्या कडाक्याच्या थंडीची त्यांना जाणीव होते. समोरच एक व्यक्ती थंडी च्या पोशाखात त्यांची वाट पाहत उभा असतो, त्याला पाहताच कैप्टन त्याला मिठी मारतात.
"माय डियर एलेक्स कसा आहेस तु?"
"आय एम फाईन कैप्टन."
"आणि आपलं मिशन?"
"परफेक्टली डन कैप्टन."
       शैला व रोमान आश्चर्य मिश्रित भावाने दोघांनाही पाहत असतात. कैप्टन ओव्हरकोटाच्या खिशातून सिगारेटचा पाईप काढून झुरका घेत बोलतात.
"एलेक्स मिट हर शैला. कमांडर शैला टोरेस आणि हा रोमान. U.Sआर्मी तला एक खतरनाक औफिसर."
एलेकस शेकहैंड करत बोलतो.
"नाईस टु मिट यु डियर फ्रेंडस."
शैला व रोमान थंडीने कुडकुडत असतात, एवढ्या दूर यावं लागेल याची त्यांनी कल्पना केलेली नसते. ते समजून कैप्टन एलेक्सशी बोलतात.
"एलेक्स आम्ही एका महत्वाच्या आणि खतरनाक मिशनसाठी बाहेर पडलो आहोत. ब्लॅक पैंथर तुला माहीतच असेल?"
एलेक्स काहीस आठवल्यासारखे करत मान डोलावतो.
"कैप्टन तुम्हांला माझी काय मदत हवी आहे?"
"वेल. आधी माझ्या सहकाऱ्यांना थंडीचा पोशाख उपलब्ध करून दे. बघ दोघेही कसे कुडकुडतायेत."
   शैला व रोमान चकित होत कैप्टन कडे पाहतात. कैप्टन कैडिटी हसून त्यांच्याकडे पाहतात.
       एलेक्स सर्वांसाठी खास थंडीचा तसेच विविध ऋतुत चालु शकणारे पोशाख उपलब्ध करून देतो. बरोबरच एका बौक्समधून मिशनसाठी लागणारा विशिष्ट स्वरूपाचा पोशाख ही देतो.
"थैंक यु एलेक्स. आणि अजून एक काम कर मित्रा. आपल्या बोस्टनमधल्या या मिशनवेळी तुला मिळालेली अत्याधुनिक वेपनरी या मिशनसाठी खुप महत्वाची आहे. आणि आणखी एक माझ्या फेवरिट चेरी तर इथे मिळतीलच ना?"
एलेक्स हसतो. कैप्टन व बाकी सहकाऱ्यांना घेऊन तो एका मोठ्या हिमनगाकडे येतो. हिमनगावरील बर्फ दूर करताच अत्याधुनिक प्रकारची वेपन्स तिथे आढळतात. ज्यात मशिन गन, स्टेनगन, रौकेट लौन्चर्स, ग्रेनेडस, प्लाझ्मा गन्स, रेल गन्स सारखी हत्यारे असतात. ती वेपनरी ब्लॅक पैंथर व बौम्बरशी टक्कर देण्यासाठी पुरेशी असते. कैप्टन खुश होत एलेक्सच्या पाठीवर हात ठेवतात.
"वेल डन एलेक्स. सिव्हिल वौर वेळचा तुझा पराक्रम आजही सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे. तुझ्यासारखा धाडसी मित्र मला मिळाला याशिवाय मोठं भाग्य कोणतं असू शकेल?"
कैप्टन कैडिटी एलेक्सला मिठी मारतात, तेव्हा त्यांच्या जवळ शैला व रोमानही येतात. कैप्टन आपली मिठी सैल करतात आणि आपला हात पुढे करत बोलतात.
"लेटस डु इट फ्रेंडस.  लेटस द स्टार्ट औपरेशन वज्र."
"औपरेशन वज्र?"
"येस फ्रेंडस औपरेशन वज्र. आपल्या चौघांच्या टिमवर्कसमोर  कोणतीही शक्ती टिकाव धरू शकणार नाही. आपली ही टीम म्हणजे वज्र आहे हे त्या ब्लॅक पैंथर आणि बौम्बरलाही कळू दे, कम औन लेटस डु धिस फ्रेंडस."
      सर्वजण मोठ्या जोमाने कैप्टन कैडिटी नी पुढे केलेल्या हातावर आपले हात ठेवतात.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                   भाग-3-अटलांटामधील थरार
(मागील भागात आपण पाहिलं की कैप्टन कैडिटी आपल्या दोन सहकारी शैला व रोमान सोबत बोस्टन ग्लैशियरची सफर करतात, तिथेच त्यांना त्यांचा जुना सहकारी भेटतो आणि तिथुनच त्यांच्या औपरेशन वज्र ला सुरवात झालेली असते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कैप्टन कैडिटी, शैला, एलेकस व रोमानसोबत प्लेनमध्ये बसतात. प्लेन सुरु होताच शैला कैप्टनला प्रश्न विचारते.
"कैप्टन आता सुरवात कुठून करायची आहे?"
"शैला आता आपल्याला अटलांटामध्ये जायला पाहिजे."
"पण कैप्टन हेडलींनी सांगितल्याप्रमाणे ब्लॅक पैंथर अलास्कात आहे ना?"
कैप्टन कैडिटी स्मितहास्य करत बोलतात.
"माय डियर फ्रेंडस. धोका खाल्लात ना. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ब्लॅक पैंथर अलास्कात आहे, पण खरतर तो तिथे नाही आहे."
"काय?म्हणजे काय म्हणायचं आहे?"
कैप्टन शैलाला अलीकडचा न्युजपेपर दाखवतात.
"शैला ही बातमी पहा"
  शैला मथळा वाचून म्हणते.
"अटलांटामध्ये कुठलीशी बिल्डिंग कोसळली आहे, आणि त्यात  शेकडो लोक मरण पावले आहेत. पण त्याचा या औपरेशनशी काय संबंध?"
"संबंध आहे शैला, संबंध आहे. नीट पाहा तुला एक गोष्ट लक्षात येतेय का की ही इमारत कोसळली नाही तर उडवण्यात आली आहे?"
शैला नीट पाहत काहीतरी तर्क लावत बोलते.
"पण मग अलास्कात आहे तो कोण?की पोलिसांनी खोटी बातमी दिलीय आपल्याला?
कैप्टन एलेक्स कडे पाहतात, आपल्याकडील जुना न्युजपेपर पुढे करत तो बोलतो.
"नो शैला. पोलिसांची बातमी खोटी नाही, पण त्यांचा अंदाज चुकलेला आहे. अलास्कात यावेळी ब्लॅक पैंथरचा जुळा भाऊ टायगर आहे. याचं नाव टायगर आहे, पण हा एक अत्यंत निरुपद्रवी प्राणी आहे."
शैला मागे पुढे करत बोलते.
"पण कैप्टन तुम्हांला खरंच खात्री आहे की ब्लॅक पैंथर अटलांटात आहे?"
कैप्टन कैडिटी मिश्कील हास्य करत शैलाकडे पाहतात.
"माय डियर शैला. माझा अनुभव खोटा ठरेल असं वाटतयं का तुला? बिलिव्ह मी आणि या चेरी खा. बघ मस्त गोड आहेत."
शैला काही बोलत नाही.
   अटलांटिक ओशियनचे विहंगम द्रुश्य दिसू लागते, पण अचानक प्लेनमध्ये कुठलातरी तांत्रिक बिघाड होतो बरोबरच फ्युएल इंडिकेटरचा बीप बीप बीप बीप आवाजही सुरु होतो. कैप्टन कैडिटी ओरडतात.
"ओह नो. फ्रेंडस आपल्याला या प्लेनमधून जंप करावं लागेल."
शैला घाबरत विचारते.
"व्हाट कैप्टन, पण........"
"ही बोलण्याची वेळ नाहीये चला घाई करा. रोमान, एलेक्स तुम्ही ते बॉक्स घेऊन जंप करा. आम्ही मागाहून येतोच."
      कैप्टनच्या आदेशानुसार रोमान व एलेक्स ते बॉक्स घेत पैराशुट उघडत खाली उडी मारतात. बीप बीप आवाज वाढतच असतो. एवढ्यात प्लेनच्या मागच्या पंख्याला आग लागते. कैप्टन ओरडतात.
"शैला आर यु रेडी? वन, टु, थ्री."
कैप्टन कैडिटी आणि शैला प्लेनमधून पैराशुट उघडत खाली उडी मारतात. प्लेनचा ब्लास्ट होतो. सर्वजण अटलांटिक ओशियन मध्ये पडतात.
कैप्टन कैडिटी, शैला, रोमान व एलेक्स किनाऱ्यावर पोहोचायची धडपड सुरू करतात. रोमान ला बॉक्स घेऊन पोहणे कठीण वाटत असते, तो ओरडतो.
"अरे हा एवढा जड बॉक्स घेऊन पोहणे सोपे आहे का?"
कैप्टन कैडिटी रोमानच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देतात.
"रोमान आपली जिददच आपला मार्ग ठरवते. डोंट रिमेम्बर अवर मिशन."
महत्प्रयासाने ते सर्व जण किनाऱ्यावर पोहोचतात. कंटाळत रोमान आणि एलेक्स आपल्या हातातील बॉक्स खालच्या वाळुत टाकतात. कैप्टन त्यांना पाहत हसत बोलतात.
"अरे सावकाश बॉक्स फुटतील."
रोमान व एलेकस हैराण होत बोलतात.
"कैप्टन तुम्हांला या बॉक्सची काळजी. किती जड आहेत हे."
कैप्टन त्यांना पाहत बोलतात.
"अरे हो बाबा. मिशन म्हटलं की अशी संकटं येणारच. कम ऑन. तुम्हांला जमत नसतील बॉक्स तर मी घेतो."
त्यावर एकमेकांना पाहत रोमान व एलेक्स म्हणतात.
"नो नो कैप्टन. वुई आर रेडी."
कैप्टन कैडिटी आपल्या ओव्हरकोटाच्या खिशातुन वॉकीटॉकी कढून हेडलीशी संपर्क करतात.
"हैलो हेडली कैन यु हिअर मी?"
"कैप्टन कुठे आहात तुम्ही? मी कधीपासून ट्राय करतोय संपर्क करायचा तुम्हांला."
"हेडली आत्ता या वेळी आम्ही अटलांटात आहोत."
"काय अटलांटा? पण कैप्टन तुम्ही तिकडे काय करताय. ब्लॅक पैंथर तर अलास्कात आहे. "
"ते तुला मी नंतर सांगेन. सध्यातरी आम्ही अटलांटिक ओशियनच्या एका किनाऱ्यावर फसलोय. इथून बाहेर पडायचा मार्ग दिसत नाही. प्लीज हेल्प अस."
     हेडली आपल्या माहितीनुसार त्यांना तेथून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो, त्या डिरेक्शनने जात ते अटलांटाच्या मुख्य रस्त्यावर पोहचतात.
      हत्यारांचा बॉक्स कसाबसा सांभाळत रोमान चालत असतो. कैप्टन, शैला व एलेक्स मात्र झपझप चालत असतात. काही अंतर गेल्यावर रोमान थांबत म्हणतो.
"अरे बापरे कैप्टन. अजून किती चालावं लागणार आहे?"
"बस थोडा वेळ अजून माय डियर रोमान."
शैला विचार करत कैप्टनशी बोलते.
"कैप्टन आपण इथपर्यंत तर आलो, आता ब्लॅक पैंथर पर्यंत कसे पोहचणार?"
       त्यावर एलेक्स सांगतो.
"माझ्या माहिती प्रमाणे ब्लॅक पैंथरची अटलांटिक ओशियनमध्ये एक महाकाय क्रुझ आहे. त्याचे नाव आहे"ब्लॅक कैरेबियन पायरेट्स" तिथे देश विदेशातुन आणलेल्या गुलामांच्या मदतीने तो आपली अवैध कामे करत असतो. त्या क्रुझवर काही सायंटिस्टही आहेत. संपूर्ण क्रुझवर सशस्त्र फौज तैनात केली आहे. कैप्टन आपल्याला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल."
       तेवढ्यात रस्त्यावर लक्ष नसलेला एलेकस अडखळत खाली पडतो. कैप्टन त्याला हात देत ऊठवतात.
"वेल जॉब एलेक्स, पण सध्या तुझी पावलं सावकाश टाक."
           सर्वजण हसू लागतात.
        काही अंतर चालल्यावर त्या सर्वांना एक रेस्टॉरंट दिसते. रोमान ची भुक अनावर झालेली असते, रेस्टॉरंटकडे पाहत बोलतो.
"कैप्टन बराच वेळ झाला आपण चालतच आहोत. खुप भुक लागली आहे."
शैला रोमान चे बोलणे ऐकून त्याला डिवचते.
"एवढा वेळ प्लेनमध्ये तुच तर खात होतास."
कैप्टन मिश्कील हसत बोलतात.
"काल्म डाऊन शैला. रोमान म्हणतो ते बरोबरच आहे. आपल्याला उपाशी राहून चालणार नाही."
कैप्टन त्यांच्या सहकाऱ्यासोबत तिथे पोहचतो.
सर्वजण बाहेर च्या खुर्च्यांवर बसतात. रोमान व एलेक्स आपापले बॉक्स बाजुला ठेवतात.
  कैप्टन कैडिटी रोमान कडे मेन्यु कार्ड सरकवतो. एलेकस व शैला कैप्टनकडे पाहतात. कैप्टन एव्हाना आपल्या ओव्हरकोटाच्या खिशातून सिगारेट पाईप काढत त्याचे झुरके घेत असतात. तेवढ्यात त्या रेस्टॉरंटचा वेटर त्यांच्यापाशी येत ऑर्डर विचारतो. कैप्टन त्याला और्डर सांगतात, पण ओर्डर घेताना त्या वेटरची नजर रोमान जवळ असणाऱ्या बॉक्सवर असते.
      वेटर निघून गेल्यावर शैला कैप्टन कैडिटी ला हाक मारते.
"कैप्टन कैडिटी....."
      समयसुचक कैप्टन शैलाला हात दाखवत गप्प राहायला सांगतात, आणि लोकांचे आपल्याकडे लक्ष असलेले पाहून शैलाशी बोलायला सुरवात करतात.
"हो हो शैला तुला पाहिजे तर कैंडी, आईसक्रीम हवं ते घेऊ शकतेस."
       लोक त्यांच्या कडे दुर्लक्ष करत पुन्हा आपल्या कामात गुंततात. शैला सुटकेचा निश्वास टाकते. तेवढ्यात तो मघाचा वेटर ऑर्डर घेऊन येतो, आणि हळूच बॉक्सकडे पाहत कैप्टन कैडिटी ला प्रश्न विचारतो.
"प्लीज डोंट माईंड सर, पण त्या जाड्या माणसाच्या बॉक्समध्ये काय आहे?"
कैप्टनला त्या प्रश्नाची अपेक्षा असतेच, पण तोपर्यंत रोमानला आपल्याला जाडा म्हटलेलं पाहून राग आलेला असतो, तो तसाच ऊठत वेटरवर ओरडतो.
"ए जाड्या कोणाला म्हणतोस?"
कैप्टन हळूच आपला पाय त्याच्या पायावर ठेवत त्याला खाली बसवतात, आणि वेटरकडे वळून बोलतात.
"आय एम सॉरी. हा माझा मित्र रोमान. याला पुस्तक वाचनाची प्रचंड आवड आहे. कुठेही जा , झोपताना, उठताना अगदी बाथरूममध्ये ही पुस्तक पाहिजे असते याला. एवढे प्रचंड वेड आहे त्याला.तुम्हांला कोणतं पुस्तक हवयं का?"
      कैप्टनचे ते प्रभावी बोलणे ऐकून वेटर गप्प राहत आत निघून जातो. शैला संधी पाहून हळूच कैप्टनच्या कानाशी पुटपुटते.
"कैप्टन आपल्याला या बॉक्सचं काहीतरी करावं लागेल."
कैप्टन स्मितहास्य करतात. तेवढ्यात एलेकस ची नजर बाजूला ठेवलेल्या न्युजपेपरवरच्या जाहिराती वर जाते. तिथे ठळक अक्षरात लिहलेले असते.
'पाहिजेत. ब्लॅक कैरेबियन पायरेट्स या क्रुझवर कामासाठी कामगार पाहिजेत.'
       एलेक्स तसाच न्युजपेपर उचलून ती जाहिरात कैप्टनला दाखवतो. कैप्टन एलेक्सची पाठ थोपटतात. सिगारेटचे झुरके घेत ते जाहिरात पाहत असतात. तो न्युजपेपर तसाच कोणाची नजर नाही असे पाहत आपल्या ओव्हरकोटाच्या खिशात ठेवतात, आणि नाश्ता आटोपुन सर्व जण उठतात.
        कैप्टन एका वेगळ्याच रस्त्याने जात असतात, ते पाहून शैला विचारते.
"कैप्टन हायवे तर तिकडे आहे मग?"
   कैप्टन मिश्कील हासत चालू लागतात. मागोमाम शैला, एलेक्स व रोमान ही जातात. ते एका चिंचोळया रस्त्याने अटलांटिक ओशियनच्या एका निर्जन पण महत्वाच्या किनाऱ्यावर पोहचतात. तिथून दूरवर ब्लॅक कैरेबियन पायरेटस स्पष्ट दिसत असते. शांतपणे स्माईल करत कैप्टन बोलतो.
"माय डियर फ्रेंडस. इथे आपण शांतपणे पुढचा प्लॅन ठरवू शकतो. आय थिंक इथे आपल्याला कुणी पाहू शकणार नाही. रोमान, शैला आणि एलेक्स आपल्याला ज्या ब्लॅक कैरिबियन पायरेटस क्रुझवर जायचं आहे, तिथे असेच जाणार का?"
शैला आश्चर्य चकित होत प्रतिक्रिया देते.
"म्हणजे?"
"माय डियर फ्रेंडस आपल्याला क्रुझवर वेषांतर करूनच जावं लागणार आहे."
रोमान डोळे विस्फारून पाहत बोलतो.
"वेषांतर? पण कैप्टन या गेट अप मध्ये काय खराबी आहे?"
"ओह माय डियर रोमान. आपल्याला तिथे गुलाम म्हणून जायचं आहे, समजलं?"
    शैला, रोमान, एलेकस ला ती गोष्ट पटते आणि कैप्टनकडे पाहत ते माना हलवतात.
        कैप्टन कैडिटी रोमान च्या हातातील बॉक्स खाली ठेवायला सांगुन तो उघडतात. आतमध्ये बोस्टनमधून आणलेले सिझनल कपडे, सोल्जर्स कॉस्टयुम वगैरे असतात, पण त्याच्याखाली एक सिक्रेट कप्पा असतो. कैप्टन तो कप्पा उघडतात, आतमध्ये बरेच जुनाट कपडे, काही आयडी कार्डस असं सामान असते."
          शैला रोमांचित होत तिकडे पाहते, आणि कैप्टनकडे पाहत बोलते.
"कैप्टन. तुम्ही याविषयी आम्हांला का नाही सांगितल? इटस ग्रेट."
     कैप्टन दूर जाणाऱ्या महासागराच्या लाटांकडे पाहत बोलतात.
"माय डियर शैला. मी जे मिशन हाती घेतो, तेव्हा प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असतो. माझ्या प्रत्येक मिशनमधून मी नवीन काहीतरी शिकत गेलो, त्यामुळे असेल कदाचित. लेट्स ओके, आता बोलण्यात वेळ नको. पटापट हे कपडे उचला आणि तुमचा गेट अप चेंज करा."
       रोमान ओरडून विचारतो.
"कैप्टन युवर ड्रेस?"
         कैप्टन कैडिटी हसतो. आकाशात पाहत आपले दोन्ही बाहु विस्फारतात. बघता बघता त्यांच्या अंगावर जुने गुलामासारखे कपडे येतात.
    शैला, रोमान व एलेक्स डोळे विस्फारून तिकडे पाहतात, तेव्हा कैप्टन एक स्मितहास्य करत बोलतात.
"ओह तुम्हांला वाटलं असेल ही जादू आहे, बट फ्रेंडस इटस अ टेक्नॉलॉजी."
कैप्टन आपल्या ओव्हरकोटातील खिशाच्या खाली असणारे एक विशिष्ट बटण दाखवतात, जे दाबताच आपल्या मनाजोगा पोशाख बदलता येत असतो. सिव्हील वॉर वेळी खास हा ओव्हरकोट तयार करून घेतलेला असतो.
     शैला काहीशी त्रासिक होत बोलते.
"कैप्टन आम्ही इथे ड्रेस कुठे चेंज करायचा?"
      कैप्टन हसून बाजूच्या ढिगाऱ्याकडे बोट दाखवतात. ढिगाऱ्याखाली एक जुनी बोट दडलेली असते. काही माणसं सहज तिथे लपून बसावीत एवढी जागा त्यात असते. शैला, रोमान, एलेक्स आपले गेट अप चेंज करतात, आता ते खरोखरचे गुलाम वाटत असतात.
       रोमान हसत हसत कैप्टनला विचारतो.
"कैप्टन आता कसा दिसतोय मी?"
"मस्तच. तुला पाहून खरेखुरे गुलामही बुचकळ्यात पडतील."
     शैला बॉक्सकडे पाहत बोलते.
"कैप्टन या बॉक्सेसचे काय करायचं?"
        कैप्टन कमरेवर हात ठेवत दूर पाहतात. त्यांना एक आयडिया सुचलेली असते. तिथल्याच वाळुत कुणाला दिसणार आणि कळणार नाही अशा रितीने बॉक्सेस गाडले जातात.
       सर्व जण ते जुने पुराणे कपडे परिधान करून एकमेकांच्या हातात हात देत चढण चढून वर जातात, आणि मुख्य रस्त्यावर येतात. मुख्य रस्त्यावर आल्यानंतर समोरच एक पीसीओ बुथ त्यांना दिसतो. कैप्टन व सहकारी तिथे पोहचतात. आपल्या ओव्हरकोटाच्या खिशातील न्युजपेपर बाहेर काढत कैप्टन एक नंबर डायल करतात, आणि आवाज बदलून बोलायला सुरवात करतात.
"हैलो सर बेंथम?"
पलिकडून आवाज येतो.
"येस बोला."
"साहेब आम्ही न्युजपेपरमध्ये तुमची जाहिरात पाहिली होती, ब्लॅक कैरिबियन पायरेट्स वर कामगार पाहिजे असल्याची."
"ओ येस येस. पण तुम्ही कोण आणि कुठून बोलत आहात?"
"सर माझे नाव जौन. माझ्यासोबत अजून तिघेजण आहेत. यावेळी आम्ही क्रोस रोड वरून बोलत आहोत."
"क्रोस रोड. वेल असं करा तुम्ही मला शार्प १२.०० वाजता येऊन भेटा."
कैप्टन सहजच समोरच्या दुकानात लावलेल्या घड्याळात पाहतात, सकाळचे ११.०० वाजलेले असतात. अजून एक तास बाकी असतो, सर बेंथम ला भेटण्यासाठी. त्यांच्यापासून ते ऑफीस तसे जास्त दूर नसते, जास्तीत जास्त १५-२० मिनिटे लागतील एवढे अंतर असते. कैप्टन आपल्या सहकाऱ्यांसोबत चालू लागतात.
    पण तेवढ्यात एक बाईकस्वार स्टंट करत वेगाने समोरून येताना दिसतो. मागोमाग एक पांढऱ्या रंगाची बहुधा पोलिसांची बाईक पाठलाग करत येत असते. त्या बाईकवर बसलेला तो पोलिस गनफायर करत पुढे जाणाऱ्या बाईकला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु तो वेगाने पळ काढत असतो. आणि अचानक त्या वेगाने जाणाऱ्या बाईकरवर शैला विजेच्या वेगाने किक मारते, तसा बाईकवरून तो खाली पडतो. बाईक वेगाने रस्त्यावरून घसटत पुढे जाते. तो बाईकर त्याही स्थिती त मागाहून बाईकवरून येणाऱ्या पोलिसांचा वेध घेत पळत सुटतो. अचानक सहज म्हणुन रस्त्याच्या कडेने जाणारे कैप्टन कैडिटी आपला एक हात बाजूला करतात. लक्ष नसलेला तो बाईकर त्या हाताच्या फटक्याबरोबर खाली पडतो. तेवढ्यात पोलिसही तिथे पोहचतात, आणि त्या बाईकरवर गन रोखत म्हणतात.
"बरं झालं सापडलास. आता चल जेलमध्ये. धन्यवाद आजोबा."
कैप्टन आवाज बदलत बोलतात.
"मि.जॉन नाव आहे माझं"
     कैप्टन शैला, रोमान व एलेक्सकडे पाहतात. ते आपापसात हसत असतात, पण पोलिसाचे तिकडे लक्ष नसते. त्याची नजर खाली पडलेल्या पाकिटावर जाते, तो खाली वाकून ते उचलणार एवढ्यात पटकन कैप्टन ते पाकिट उचलतात.
"ओह माझ्या मुलाने दिलेलं पाकिट. खाली पडलं होतं होय?"
     पोलिस तसाच कैप्टनला पुन्हा धन्यवाद देत निघून जातो. शैला मंदस्मित करत कैप्टनजवळ येत बोलते.
"काय आजोबा निघायचं का मग?"
         कैप्टन डोळे मिचकावत शैलाकडे पाहून हसू लागतात, बाकीचे ही त्यांच्या हसण्यात सामील होतात.
    १२.०० वाजायला पाच मिनिटे शिल्लक असताना ते सर बेंथमच्या ऑफिसमध्ये पोहचतात. सर बैंथम त्यांचीच वाट पाहत असतात. कैप्टन व त्याचे सहकारी आलेले पाहून खुर्चीतुन उठत त्यांना आत बोलावतात.
"या या मी तुमचीच वाट पाहत होतो, पण तुमच्यापैकी मला फोन कुणी केला होता?"
कैप्टन हसत समोर जात सर बैंथमशी शेकहैंड करत बोलतात.
"हेलो सर माय नेम इज जॉन. तुम्हांला मीच फोन केला होता, आणि हे माझे सहकारी."
      सर बैंथम काहीसे गोंधळल्यासारखे कैप्टन व त्या तिघांकडे पाहत असतात. चेहऱ्यावरुन ते कोणीही गुलाम असल्यासारखे वाटत नसतात.
"तुम्हांला काय काम करायचं माहित आहे ना?"
"हो सर माहीत आहे, आम्हांला तिथे गुलामाचे काम करायचे आहे." कैप्टन बोलतात.
"पण तुमच्या चेहऱ्याकडे पाहून असं नाही वाटत की तुम्ही गुलाम असाल."
      काही वेळ कोणी काहीच बोलत नाही, पण थोड्या वेळाने कैप्टन आपल्या खिशात ठेवलेला काळा रंग आपल्या चेहऱ्यावर फासतात.
"आता वाटतो का मी गुलाम, सर बैंथम?"
      कैप्टनचा हा नवीन अवतार पाहून सर्व जण हसायला सुरवात करतात. सर बैंथम बोलतात.
"ओके ओके आय एग्री. पण तुझ्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांची ओळख करशील की नाही?"
      कैप्टन एलेक्स ची ओळख जोसेफ म्हणून करून देतात, जो की साऊथ कैरोलिनामधून आलेला असतो. शैलाचे नाव अमांडा असते ती कोलंबिया तुन आलेली असते, आणि शेवटी राहतो रोमान त्याची ओळख बाबुराव म्हणून करुन देतात, जो भारतातुन आलेला असतो. सर बैंथम आश्चर्याने रोमानला आपादमस्तक न्याहाळत बोलतात.
"बाबुराव?"
"हो सर. तो खास भारतातुन इथे आला आहे."
        सर बैंथम रोमान कडे पाहत बोलतात.
"आय लव्ह इंडिया. बाबुराव मला हम होंगे कामयाब म्हणून दाखवशील?"
   रोमान डोळे विस्फारुन कैप्टनकडे पाहतो.
"अरे बाबुराव म्हण म्हण. आम्हांला ही तुझा तो सुरेल आवाज ऐकू दे."
     रोमान आपल्या भसाड्या आवाजात कुठेतरी ऐकलेले हम होंगे कामयाब हे गीत म्हणून दाखवतो, त्याला मध्येच हाताने थांबवत सर बैंथम कैप्टनकडे नजर वळवून बोलतात.
"ओके जॉन. मी तुम्हांला त्या क्रुझवर अशा माणसाला भेटवतो, तोच ठरवेल, तुम्हांला तिथे घ्यायचं की नाही."
       कैप्टन कैडिटी व सहकारी सर बैंथमसोबत चालू लागतात. सर बैंथम मुख्य रस्ता ओलांडून एका चिंचोळ्या वाटेने जात असतात. कैप्टन व सहकारी मागेच असतात. चालत चालत ते अखेर ब्लॅक कैरेबियन पायरेटस वर पोहोचतात.
       अतिशय आलिशान अशी ती क्रुझ असते. बरीच उंच आणि प्रशस्त. क्रुझवर जिकडे तिकडे सशस्त्र कमांडोज तैनात केलेले असतात. क्रुझच्या बाहेर च्या शिपिंग एरियात एक धिप्पाड पण राकट चेहऱ्याचा माणूस उभा असतो. जो हातातल्या हंटरचे फटके काम करणाऱ्या गुलामांना मारत असतो. बिचारे गुलाम जिवाच्या आकांताने ओझी घेऊन जात असतात, ते सर्व पाहून शैला भावुक बनते, आणि हळू आवाजात बाजूने जात असणाऱ्या कैप्टनशी बोलते.
"धिस इज हॉरीबल कैप्टन. या गुलामांकडून कामं करवून घेऊन वर जनावरांसारखी वागणूक दिली जात आहे. पहा कैप्टन ही लोकं म्हातारे, स्त्रियामुले काहीच पाहत नाहीयेत.असं वाटतं त्या ब्लॅक पैंथरच्या........."
कैप्टन नजरेने तिला शांत करतात आणि बोलतात.
"शैला मिशन मध्ये इमोशन्सला ताब्यात ठेवावं लागतं. संयम ठेवल्यावर आपले काम नक्की साध्य होते. काल्म डाऊन."
         तेवढ्यात पुढे गेलेले सर बैंथम थांबून मागे पाहत हाक मारतात.
"जॉन तुम्ही आणि तुमचे सहकारी लवकर या इकडे."
         कैप्टन व सहकारी भरभर चालत सर बैंथम कडे पोहोचतात. सर बैंथम मघाशी हंटरने गुलामांना मारणाऱ्या त्या माणसाची ओळख करून देतात.
"जॉन मिट मि.स्टिव्हॉन. या क्रुझचे व्यवस्थापक. यांच्याच हाताखाली तुम्हांला इथे काम करायचं आहे."
      कैप्टन स्टिव्हॉन कडे पाहतात. स्टिव्हॉन ही कैप्टन व सहकाऱ्यांना आपादमस्तक न्याहाळतात, आणि वळून सर बैंथमना विचारतात.
"सर बैंथम माणसं काम करणारी, विश्वासाची आहेत ना?"
"डोंट वरी स्टिव्हॉन. खुप मजा आली बघ यांना भेटून. हा जॉन तर खुपच गंमतीशीर बोलतो. तु निश्चितच यांना क्रुझवर घेऊ शकतोस."
       स्टिव्हॉन काही वेळ शांत राहत बोलतो.
"वेल सर बैंथम. मला तुमचा आदर आहे. तुमची पारख चुकणार नाही, पण यांना आपलं काम तर माहीत आहे ना?"
"मी सर्व सांगितलयं स्टिव्हॉन. तुला काही विचारायचं असेल तर विचार."
       स्टिव्हॉन चौघांना पुन्हा पुन्हा पाहत असतो, पण ते आपल्याला नुकसान पोहचवतील, असं स्टिव्हॉन ला वाटत नाही. फक्त शैला कडे पाहत तो तिला विचारतो.
"तु तर खुपच तरुण मुलगी आहेस आणि खुपच बारीक दिसतेस, मला नाही वाटतं सर बैंथम हिला इथलं काम जमेल."
शैला स्टिव्हॉन कडे काहीशा रागाने पाहते, पण राग आवरत ती झुकत विचारते.
"सरकार, मी कोणतेही काम करायला तयार आहे, तुम्ही ऑर्डर
द्या." यावेळी शैलाच्या मनात स्टिव्हॉन च्या पेकाटात लाथ घालावी असे विचार येत असतात, पण ती आपली नजर वर करत नाही.
   स्टिव्हॉन आजुबाजुला पाहतो. दूरवर लोखंडी हत्यारांना धार काढण्यासाठी वापरात येणारा मजबुत ग्रेनाईटचा दगड असतो, स्टिव्हॉन तिकडे बोट दाखवून सांगतो.
"तिथे दूरवर असलेल्या ग्रेनाईटच्या दगडाचे दोन तुकडे करायचे. तुला मी यासाठी तिन संध्या देतो. तो पहा तिथे हातोडापण आहे."
    शैला चोरट्या नजरेने कैप्टनला पाहते. कैप्टन नजरेनेच तिला बेस्ट ऑफ लक म्हणतात. स्टिव्हॉन व त्याचे साथीदार कुत्सितपणे हासत शैलाकडे पाहतात, आपापसात बोलत असतात की तेवढ्यात ढप असा आवाज येतो. शैलाने एकाच घावात त्या दगडाचे दोन तुकडे केलेले असतात. स्टिव्हॉन थोडा गंभीर होत तिच्या जवळ येतो.
"ओह गुड. मला वाटते तुम्ही खुप कामाची माणसं आहात. वेलकम टु क्रुझ. निकोलस यांना १०१ नंबरच्या तुकडीत सामील कर."
       कैप्टन, रोमान व एलेक्स शैलाकडे अभिमानाने पाहतात. कैप्टन मात्र आपल्या अनुभवी नजरेने क्रुझचे निरीक्षण करत असतात. या ठिकाणीच ते सिक्रेट असण्याची त्यांना खात्री असते, म्हणूनच मुद्दाम स्वतः हून त्यांनी व त्यांच्या टिमने हा धोका पत्करलेला असतो.
      सर बैंथम स्टिव्हॉन ला शेकहैंड करुन त्याचा निरोप घेतात. कैप्टन व त्यांच्या सहकाऱ्यांना क्रुझच्या आत नेले जात असते, तिथे जुन्या गुलामांना डांबण्यासाठी खास पिंजरा केलेला असतो, जिथे त्या गुलामांना डांबुन त्यांचे हाल केले जात असतात. त्यातल्या कोणत्याही गुलामाकडुन शुल्लक शी जरी चुक झाली तरी त्याचे हातपाय तोडले जात होते आणि डोळे फोडले जात असत. काही गुलामांना ठार करून त्याच्या म्रुतदेहाला रक्ताला चटावलेली पाळीव माणसं सगळ्यांसमोर लचके तोडून खात असत. एवढी थरारक परिस्थिती होती तिथे.
         जुन्या गुलामांच्या पिंजऱ्याला लागूनच नवीन आलेल्या गुलामांचा पिंजरा होता, आणि त्याच्या समोरच ब्लॅक पैंथरची केमिकल लैब होती, जिथे देश विदेशातुन पकडून आणलेल्या सायंटिस्टना एका विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन देऊन कामे करवून घेतली जात होती.
         गुलामांना धड खायला-प्यायला ही व्यवस्थित मिळत नसे. स्टिव्हॉन आणि त्याचे साथीदार कुत्र्यांना घालावे तसे पिंजऱ्यात पदार्थ फेकून देत आणि गुलामांची मजा पाहत, त्या गुलामात म्हातारी माणसं, मुले, महिलाही होत्या.
         नवीन गुलामांच्या त्या पिंजऱ्यात कैप्टन आणि त्यांची टिम एवढेच होते, पण त्यांचेही कमी हाल होत नव्हते. त्यांना ही कैद्यांसारखे खाणे दिले जात होते, पण एकमेकांना प्रेमाने आपल्यातील घास भरवत ते इतर गुलामांशी हसत खेळत राहत होते.
          तब्बल १५ दिवस झाले होते त्यांना तेथे येऊन. त्या १५ दिवसात कैप्टनच्या अनुभवाचा फायदा घेऊन मोक्याच्या ठिकाणी कमांडोज व स्टिव्हॉन ची नजर चुकवून त्यांनी ते सिक्रेट शोधण्याचा प्रयत्न केला होता, पण हाती यश आले नव्हते. स्टिव्हॉन व साथीदारांची त्यांच्यावर नजर होती, पण ते सहजासहजी त्यांच्या नजरेत येत नव्हते.
             त्यांच्या पिंजऱ्याबाहेरसुध्दा कडक पहारा होता, पण गुप्त रित्या कैप्टन व सहकाऱ्यांची खलबतं सुरु होती. कैप्टन नी आपल्या चाणाक्ष व अनुभवी नजरेने हेरले होते, की तिथे ब्लॅक पैंथरची सिक्रेट रुम आहे, आणि ते सिक्रेट तिथेच असायला हवे. पण १५ दिवसांत त्यांना त्या रूममध्ये जाऊन शोध घेण्याची संधी मिळाली नव्हती, कारण तिथले पहारे इतर ठिकाणांपेक्षा खुप कडक होते.
         कैप्टन व त्याच्या सहकाऱ्यांनी खुप हाल सहन केले होते त्या १५ दिवसात. अटलांटातील त्या क्रुझवर आल्या दिवसा ते थरार अनुभवत होते. गुलामांची होणारी छळणूक, त्यांची कत्तल पाहून त्यांची मने व्यथित होत होती, डगमगत होती. पण त्यांना काही करता येत नव्हते.
         ब्लॅक पैंथरचा ती क्रुझ हा महत्वाचा अड्डा होता असं म्हणायला हरकत नव्हती. कारण स्वतः ब्लॅक पैंथर अटलांटातील एका गुप्त बंकर मध्ये लपून बसला होता, आणि तिथूनच सर्व गाडे हाकत होता. स्टिव्हॉन वर त्याचा प्रमाणापेक्षा जास्त विश्वाह होता, त्यामुळे एकाअर्थी स्टिव्हॉनच त्या क्रुझचा राजा होता. म्रुत्यु कोणी पाहिला नसेल तर तो स्टिव्हॉन च्या रूपात दिसत होता.
         असेच एक दिवस कैप्टन व सहकाऱ्यांची गुप्त चर्चा चालली होती. कैप्टन सोडून शैला, रोमान व एलेक्स तिघांचीही हिंमत व संयम डगमगू लागला होता. कैप्टनना सिव्हील वौर वेळी बंकरमध्ये घालवलेले ते हलाखीचे दिवस आठवत होते. शैला बाजुला बसुन कैप्टनला सांगत होती.
"कैप्टन १५ दिवस झाले आपल्याला इथे येऊन, पण ते सिक्रेट काही हाती लागले नाही."
"मला तर या नरकाचा कंटाळा आलाय, इथून कधी आणि कसे बाहेर पडणार आपण?" एलेक्स हताश होत बोलत असतो.
     रोमान मागच्या भिंतीला टेकून काहीसा उदास आणि रडवेला चेहरा करत बोलतो.
"कैप्टन काय आयुष्यभर आपणही इथे असेच गुलाम बनून राहणार? त्यापेक्षा प्रत्यक्ष हल्ला करुन हौतात्म्य पत्करणं चांगलं."
       कैप्टन सर्वांचं बोलणंं ऐकून घेतात, सर्व जण त्या परिस्थितीत डगमगलेले आहेत याची त्यांना प्रकर्षाने जाणीव होते, आणि गंभीर होत ते बोलतात.
"माय डियर फ्रेंडस. आपण सोल्जर्स आहोत. सोल्जर्स कधी रडत नाहीत, हार मानुन डगमगत नाहीत. सिव्हिल वौर वेळी मित्रांनो अक्षरशः झुरळं, पाली खाऊन राहावं लागलं होतं. माय फ्रेंडस हिंमत बुलंद असेल, संयम असेल तर सर्व होऊ शकते. आणि मला वाटते ते सिक्रेट त्या पैंथरच्या सिक्रेट रुममध्ये असेल."
      "सिक्रेट रुम?"
     "हो त्या ब्लॅक पैंथरची सिक्रेट रूम."
    कैप्टन संक्षिप्त पणे त्याच्याबद्दल आणि तिथे असणाऱ्या पहाऱ्याबद्दल सांगतात. कैप्टन आपल्या सहकाऱ्यांना कवेत घेतात, सर्वांच चेहरे त्यावेळी भावनिक बनलेले असतात.
         आता सर्वांना त्या सिक्रेट रुममध्ये जाऊन शोध घेण्याची संधी हवी असते, १५ दिवसात त्यांना ती मिळालेली नसते.
        पण ती संधी त्यांना लवकरच चालून येते.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                        भाग-४- मिटींग विथ ब्लॅक पैंथर
(मागच्या भागात आपण पाहिलं की कैप्टन कैडिटी आणि त्यांचे सहकारी वेषांतर करुन ब्लॅक कैरिबियन पायरेटस वर गुलाम बनुन प्रवेश करतात, आणि सिक्रेट चा शोध घेत असतात, तिथे अनुभवतात ते थरार.)
       ब्लॅक कैरेबियन पायरेटस वर स्टिव्हॉन व त्याचे साथीदार यांनाच चांगले उंची पदार्थ खायला व वाईन प्यायला मिळत असे, पण एक दिवस एका गुलामाने कोणाची नजर नाही असं पाहून थोडीशी वाईन घेतली होती, आणि त्याच्या दुर्दैवाने स्टिव्हॉन च्या एका साथीदाराने ती गोष्ट पाहिली होती. मग काय व्हायचे सर्व गुलामांसमोर त्याला शिक्षा होणार होती, स्टिव्हॉन च्या हातून. पण कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा अजुन काही म्हणा त्याचवेळी केमिकल लैब मध्ये एका सायंटिस्टच्या हातुनही मोठी चुक घडली होती, आणि तिसरी गोष्ट म्हणजे ब्लॅक पैंथर, तो क्रुझवर येणार असल्याची बातमी. अशा तिहेरी घटनांमुळे काही कमांडोज व सहकारी स्टिव्हॉन सोबत त्या गुलामाला शिक्षेसाठी तयार करत होते, तर काही कमांडोज व गार्डस स्टिव्हॉनचा सहकारी निकोलस सोबत केमिकल लैब मध्ये त्या सायंटिस्टचा समाचार घेत होते. उरलेले गार्डस व कमांडोज ब्लॅक पैंथर येणार म्हणून कंट्रोल रुम व स्वागत कक्षात गेलेले होते.
       या सर्व गडबडीत सिक्रेट रुमजवळ कोणीच नव्हते, आणि त्याचा दरवाजा तसाच उघडा राहिला होता. कैप्टन व त्यांच्या सहकाऱ्यांना ही एक नामी संधी होती, सिक्रेट रुममध्ये जाण्याची. कैप्टननी झटपट आपला प्लॅन बनवला होता, आणि  तो शैला, रोमान आणि एलेकस ला सांगितला होता. कमी वेळेत त्यांना हे काम करायचे होते, ऑपरेशन वज्र त्यांच्या नजरेसमोर होते.
          त्या गुलामाला घेऊन मोठ्या आनंदाने आपल्याच धुंदीत गार्डस व कमांडोज चालले होते. त्याला स्टिव्हॉन समोर उभे केले जाणार होते. मागाहून बऱ्याच मोठ्या संख्येने येत असणाऱ्या गुलामांकडे त्या गार्डस व कमांडोज चे तितकेसे लक्ष नव्हते. शेवटी गुलाम हा त्यांची खास शिकार होता, तो ही एक माणूस आहे, हे ते लोक विसरलेले असतात. तिथे असणाऱ्या त्या पाळीव राक्षसी माणसांसाठी गुलाम म्हणजे खाद्य होते. कैप्टनचे मन त्यामुळेच विषण्ण बनले होते, पण त्यांनी आपल्या मनाचा संयम बनवून ठेवला होता. या आधी त्यांनी ३० मिशन्स पाहिलेली असतात, ती यशस्वीरीत्या पुर्ण केलेली असतात, परंतु यासारखा अमानुष पणा कुठल्याही मिशनमध्ये त्यांनी पाहिलेला नसतो.
           कैप्टननी बनवलेल्या योजनेप्रमाणे गर्दीचा फायदा घेत शैला व रोमान तिथुन निसटत सिक्रेट रुमच्या बाहेर लपुन राहतात, एलेक्स सरसरत एका गुप्त मार्गाने क्रुझच्या एकदम पहिल्या मजल्यावर पोहोचतो. जिथुन त्याला स्टिव्हॉन व सर्व गुलाम स्पष्ट दिसत असतात, पण जमेची बाजू म्हणजे तो तिथून कोणालाही सहजासहजी दिसणारा नसतो. त्या जागेवर अनेक रिकामे लाकडी पण वजनदार बैरल ठेवलेले असतात, योग्य संधीची वाट पाहत तो तिथेच उभा राहतो.
        इकडे सिक्रेट रुमच्या बाहेर बुटांचा टपटप आवाज ऐकून शैला व रोमान सावध होतात. सिक्रेट रूम व संपुर्ण क्रुझ च्या चाव्या सांभाळणारा एक सशस्त्र गार्ड दरवाजा उघडा पाहून तो बंद करायला जात असतो, पण तेवढ्यातच जोराजी किक मारत शैला व रोमान त्याला खाली पाडतात. क्षणाचाही विलंब न लावता रोमान त्याची मान मुरगाळतो. कुणाला त्याचा पुसटसाही आवाज ऐकु आलेला नसतो.
          शैला व रोमान गार्डस कडील चाव्या व मशिनगन घेतात. शैला आपल्या कपड्यांमध्ये विशिष्ट रित्या मशिनगन लपवते, व ते सिक्रेट रुम मध्ये शिरतात.
           त्या गुलामाला स्टिव्हॉन समोर आणले जाते, तो भितीने थरथर कापत असतो. कैप्टनला त्याची ही अवस्था पाहवत नाही. आपले हे मिशन अशाच लोकांसाठी आहे, याची त्यांना जाणीव असते. स्टिव्हॉन हातात हंटर घेऊन यमासारखा त्या गुलामाच्या समोर उभा राहतो. त्याचे साथीदार व कमांडोज त्या गुलामाची गंमत पाहत असतात. बाकीचे गुलाम थरथर कापत हात जोडून गुडघ्यावर बसलेले असतात. आता स्टिव्हॉन त्या गुलामावर वार करणार तेवढ्यात कैप्टन आपला हात उंचावत उठून उभे राहतात. सर्वांच्या नजरा तिकडे वळतात तसे कैप्टन बोलायला सुरवात करतात.
"थांबा सरकार थांबा. या गुलामाने काही केलं नाही, याला सोडा. खरतर या म्हातारवयात थोडीशी हुक्की आली म्हणून मीच पिली होती वाईन. खुपच मस्त होती ती आणि हो ते पदार्थ पण... वाह वाह काय स्वाद होता त्यांचा."
        डोळे वटारत स्टिव्हॉन कैप्टनकडे पाहतो, आणि नंतर वळून आपल्या साथीदारांना पाहतो, त्यातला एकजण हिंमत करुन म्हणतो.
"पण स्टिव्हॉन आम्ही त्या गुलामाला रंगेहाथ पकडले आहे."
कैप्टन मोठ्याने हसतात, स्टिव्हॉन कडे पाहत सांगतात.
"स्टिव्हॉन माय लौर्ड. या तुमच्या माणसांचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय, तिथे मीच होतो. जरा पाहा तरी त्या गुलामाच्या चेहऱ्याकडे. तो असं करेल असं वाटतं का?"
    स्टिव्हॉन त्या गुडघ्यावर बसुन दयेची भिक मागणाऱ्या गुलामाकडे पाहतो. भित्र्या सशाचे भाव त्याच्या नजरेत असतात. स्टिव्हॉन तसाच कैप्टन कैडिटी कडे येतो, आता तो वरून पाहत असलेल्या एलेकस च्या टप्प्यात आलेला असतो. स्टिव्हॉन आपल्या हंटरचा आसुड कैप्टनवर ओढतो, त्याच्या नजरेत पाहत बोलतो.
"तुझी ही हिंमत? अजुन इथे तुला येऊन जास्त दिवसही झाले नाहीत आणि आमची वाईन पितोस?"
   स्टिव्हॉन रागाने हंटरचे आसुड कैप्टनवर ओढतो. वर उभ्या असलेल्या एलेकस ला ते पाहवत नसते, पण योग्य वेळ आलेली नसते. कैप्टन खाली गुडघ्यावर बसतात, आणि त्याचवेळी चोरट्या नजरेने आजुबाजुला पाहतात, तेव्हा शैला व रोमान त्यांना आलेले दिसतात. शैलाही त्यांना पाहत हळूच थम्स अप करते, म्हणजेच ते सिक्रेट त्यांना मिळालेले असते. शैला व रोमानला कैप्टन स्टिव्हॉन समोर गुडघ्यावर बसले आहेत, ही गोष्ट सहन होत नसते. ते कैप्टनच्या हालचालींकडे नजर ठेवून राहतात.
      स्टिव्हॉन आता कैप्टनवर वार करणारच असतो, की कैप्टन मोठमोठ्याने हसू लागतात. क्षणभर स्टिव्हॉन ला कळत नाही की काय झालं, तो कैप्टनच्या चेहऱ्याकडे आपले तोंड नेत  संतापाने विचारतो.
"ए काय झालं? का हसतोस तु? बहुतेक आपली काय अवस्था होणार म्हणुन परिणाम तर झाला नाही ना तुझ्या मनावर?"
       एवढ्यात कैप्टनने केलेली इशारत एलेक्सला समजते, आणि एक मोठा वजनदार लाकडी बैरल तो घरंगळत खाली सोडून देतो, त्याचा धक्का लागत स्टिव्हॉन खाली पडतो, तसा हलकल्लोळ माजतो. सर्व गुलाम पळु लागतात, स्टिव्हॉन उठायचा प्रयत्न करत गुलामांना रोकण्याच्या ऑर्डर्स देत असतो ,की तेवढ्यातच धडाधड गोळीबार होतो, आणि पाहता पाहता स्टिव्हॉन चे कमांडोज, गार्डस व साथीदार खाली कोसळतात.
        स्टिव्हॉन उठून उभा राहत पाहतो. गुलामही स्तंभित होऊन पाहत असतात. हातात मशिनगन घेऊन कमांडर शैला टोरेस उभी असते. सोबत रोमानही असतो. एलेक्सने त्या एवढ्याशा वेळातच केमिकल लैब मधल्या निकोलस व त्याच्या साथीदारांचा आणि कंट्रोल केबिन व स्वागतकक्षातील कमांडोजचा खात्मा केलेला असतो, केमिकल लैब मधील सायंटिस्टना सुरक्षित स्थळी पाठवून , तो आपल्या टिमला जॉईन झालेला असतो.
         काय झालं, कसं झालं याचा स्टिव्हॉन विचार करत असतो, तो क्रोधाने उभा थरथरत असतो. भयानक रित्या ओरडत तो शैलावर धावून जातो, पण तेवढ्यात खाली बसलेले कैप्टन कैडिटी उठून उभे राहतात. आकाशाकडे पाहत आपले दोन्ही हात विस्फारतात, तेव्हा स्टिव्हॉन ला त्याचे खरे रुप समजते. कैप्टन शांतपणे ओव्हरकोटाच्या खिशातून सिगारेटचा पाईप काढून शिलगावतात.
         संतापाने लाल होत स्टिव्हॉन ओरडतो.
"धोका. माझ्याशी या स्टिव्हॉन शी धोका? कोण आहात तुम्ही? मी तुम्हांला सोडणार नाही."
        एव्हाना रोमान व एलेकस ने खाली पडलेल्या गार्डस कडील मशिनगन उचललेले असतात. शैला, रोमान व एलेक्स स्टिव्हॉन वर गन रोखून उभे राहतात.
      कैप्टन बोलायला सुरवात करतात.
"स्टिव्हॉन तु इथे या निष्पाप माणसांकडून खुप अवैध कामे करून घेतलीयेस, त्यांच्या वर अमानुष पणे अन्याय केलेत, त्यांच्या कत्तली केल्यात. अरे तुमच्या स्वार्थापायी हे ही विसरलात की ही माणसं आहेत? तु स्वतः ला शेर म्हणवतोस, म्रुत्यु चे दुसरं रुप म्हणवतोस. तु तर एक जंगली लांडगा आहेस, लांडगा."
"ए गप्प बस. तुझी भाषणबाजी पुरे कर, आणि बऱ्या बोलाने कोण आहेस ते सांग? नाहीतर..."
    शैला विचारते.
"नाहीतर काय स्टिव्हॉन?"
"नाहीतर आतमध्ये निकोलस आणि कमांडोज तुम्हांला नाही सोडणार."
       एलेक्स हसून कैप्टन कडे पाहतो. कैप्टन बोलायला सुरवात करतात.
"कोण? निकोलस? तो गेलाय वर. आय थिंक त्याला नरकात सीट मिळेल, हो ना माय डियर शैला?"
       स्टिव्हॉन आळीपाळीने त्या दोघांकडे पाहतो.
"ओह गप्प बसा. तुम्ही खोटं बोलताय."
     एलेक्स हसत पुढे येत बोलतो.
"अच्छा मग कुठे आहेत ते बोलाव त्यांना."
      स्टिव्हॉन आजुबाजुला पाहतो, त्याच्याशिवाय कुणीच नसते. कैप्टन व त्यांच्या टिमने सर्वांचा खात्मा केलेला असतो.
स्टिव्हॉन ओरडत एलेक्स वर जातो.
"आता तुम्हांला नाही सोडणार मी."
     शैला, रोमान गन रोखत बोलतात.
"डोंट मुव्ह स्टिव्हॉन."
         स्टिव्हॉन त्या स्थितीत असतानाही मोठमोठ्याने हसू लागतो, आणि लालभडक नजर कैप्टनवर रोकत बोलतो.
"कैप्टन तुम्ही कदाचित इथून जाणार, पण ब्लॅक पैंथर पासून कसे वाचणार ? तो तुम्हांला सोडणार नाही. हा हा हा हा हा..."
        तेवढ्यात मशिनगन मधून त्याच्या छातीवर धडाधड फायरिंग होते, आणि किंचाळत स्टिव्हॉन खाली कोसळतो.
        महासागरावरुन घोंघावत जाणाऱ्या वाऱ्याचा आणि उसळणाऱ्या लाटांचा आवाज घुमत असतो. कैप्टन व त्यांच्या सहकाऱ्यांकडे अभिमानाने पाहत तिथले गुलाम स्तब्ध उभे असतात. कैप्टन दूरवर अथांग पसरलेला महासागर पाहत असतात. तेवढ्यात मोठ्या नम्रतेने ते गुलाम कैप्टनजवळ येतात, त्यातला एक गुलाम बोलतो.
"खरचं तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही कैप्टन. आम्ही तर इथुन बाहेर पडण्याची आशाच सोडली होती. खरंच तुम्ही आमचे मसिहा आहात."
        तो गुलाम कैप्टनसमोर हात जोडून गुडघ्यावर बसतो, आणि रडू लागतो, त्याच्या भावनांना त्याने वाट करून दिलेली असते. बाकीचे गुलामही कैप्टन समोर हात जोडून गुडघ्यावर बसलेले असतात.
         कैप्टन खाली वाकत त्या गुलामाला वर उठवतात, आणि त्याला मिठी मारतात. बाकीचे गुलाम त्यांची ही क्रुती डोळे भरून पाहत असतात. तेवढ्यात गर्दीतुन वाट काढत एक जोडपे त्यांच्या जवळ येऊन उभे राहते. त्या महिलेच्या हातात तिचे काही दिवसांपूर्वी जन्मलेले लहान मुल असते. कैप्टन त्या मुलाकडे पाहतात, आणि हलकेच त्याला उचलून घेतात. त्याच्याकडे पाहत ते विचारतात.
"किती गोंडस मुलगा आहे हा,याचं नावं काय आहे?"
"कैप्टन. जॉन."
     कैप्टन नजर वर करत त्या जोडप्याकडे पाहतात.
"जॉन नाव आहे याचं."
   कैप्टन पुन्हा त्या बाळाकडे पाहतात, डोळे किलकिले करत, हसत ते कैप्टन कडे पाहत असते. कैप्टन त्याचा प्रेमाने मुका घेतात आणि काहीसे भावनिक होत बोलतात.
"खरचं खुप छान नाव आहे."
       ते त्या मुलाला त्या जोडप्याकडे देतात. त्या गुलामांना एका वीर पुरूषाबरोबरच एका सह्रुदयी माणसाचेही दर्शन झालेले असते.
        तेवढ्यात सायरनचा आवाज येऊ लागतो कैप्टन सह सर्व जण तिकडे पाहतात. एलेक्स पासून लपुन राहिलेल्या एका गार्डने ब्लॅक पैंथरला क्रुझवर घडलेली सारी हकिकत सांगितलेली असते, ब्लॅक पैंथर तसाच आपल्या हातातील कामे टाकून चवताळत बाहेर पडलेला असतो.
        गार्ड नजरेत येताच रोमान आपल्याकडील M-16 गनने त्याचा भेद करतात. कैप्टन एलेक्स ने केमिकल लैब मधून आणलेली स्फोटके तसेच आपल्याकडील ग्रेनेडस एक्टिव्हेट करून क्रुझवर रोवतात, आणि पटापट रोमान करवी गुलामांना एका बोटीतुन पाठवून देतात, जी त्यांच्या योजनेचा एक भाग असते. कैप्टन, शैला व एलेक्स तिघेही क्षणाचाही अवधी न घेता अटलांटिक ओशियनच्या प्रवाहात उड्या मारतात, आणि मागाहुन धडधडत क्रुझचा ब्लास्ट होतो . कैप्टन, शैला व एलेक्स सोबत सुखरूपपणे किनाऱ्यावर येतात. गुलामांची सुरक्षित स्थळी पाठवण्याची व्यवस्था करून रोमानही तिथे पोहोचतो. किनाऱ्यावर गाडलेला हत्यारांचा बॉक्स बाहेर काढून कैप्टन आपल्या पाठीवर घेतात, आणि एकमेकांचे हात हातात घेऊन एक चढण चढत ते मुख्य रस्त्यावर येतात.
         मुख्य रस्त्यावरुन झपझप पावले टाकत ते जात असतात. त्यांच्या हातातल्या मशिनगन्स त्यांनी कमरेला खोवलेल्या असतात.  शैलाजवळ ते सिक्रेट असते. मुख्य रस्त्यावरून ते सरळ एका ब्रीजवर येतात, आणि अचानक घुं घुं आवाज करत भरधाव वेगाने एक विंटेज कार त्यांच्यापासून काही अंतरावर उभी राहते. कारचा दरवाजा उघडून मशिनगन्सने फायरिंग करत ब्लॅक पैंथर आणि त्याचे ब्लॅक कमांडोज समोरुन चालत त्यांच्या जवळ जात असतात, तसा सावध पवित्रा घेत मागे मागे जात कैप्टन व सहकारी त्यांच्या चकमकीला प्रत्युत्तर देतात. कैप्टन व सहकारी ब्लॅक पैंथरच्या ब्लॅक कमांडोज चा खात्मा करतात. शेवटी ब्लॅक पैंथरच्याही गनमधील बुलेट संपतात, तो त्वेषाने आपल्या हातातील गन बाजुला फेकुन देत ओरडतो.
"कैप्टन आय विल किल यु."
        कैप्टनही आपली मशिनगन शैलाकडे फेकत पवित्रा घेतात, आणि बोलतात.
"नाईस टु मिट यु ब्लॅक पैंथर."
       दोघांची समोरासमोर फाईट होते. किकफाईट, पंचेस दोन्ही बाजूने चालू असतात. शैला, रोमान व एलेक्स भान विसरुन त्यांची फाईट पाहत असतात. कधी ब्लॅक पैंथरची सरशी होत असते तर कधी कैप्टनची. अखेर एक खतरनाक हेड पंच देत कैप्टन ब्लॅक पैंथरला बेशुध्द करतात. ब्लॅक पैंथरला बेशुध्द पाहत शैला धावत येत त्याच्यावर गन रोखते. कैप्टन कैडिटी तिच्याकडे पाहतात.
"कैप्टन मी याला जिवंत सोडणार नाही. आय विल किल हिम."
"काल्म डाउन शैला, हा हेडलीचा अपराधी आहे, मी हेडलीला शब्द दिला होता की ब्लॅक पैंथरला जिवंत पकडुन आणीन."
"पण कैप्टन....."
"आता चर्चा नको शैला. रोमान याचे हातपाय बांध, आणि या कारमध्ये टाक. चला लवकरच आपल्याला टेक्सासला जायची व्यवस्था करावी लागेल."
        रोमान ब्लॅक पैंथरचे हात पाय बांधतो, तोंडाला पट्टी बांधतो आणि त्या विंटेज कारमध्ये त्याला टाकतो. सर्व जण कारमध्ये बसणारच असतात, की भरधाव वेगाने त्यांच्या मागाहून एक विंटेज कार येत आडवी राहते.  काही कळायच्या आत कुठुनतरी गैसच्या नळकांड्यातुन सर्वत्र धुर पसरतो, आणि बघता बघता कैप्टन व त्यांचे सहकारी बेशुध्द पडतात.  त्या विंटेज कारमधून अतिशय धिप्पाड, सुमो मल्लासारखा एक माणुस बाहेर पडतो, आणि कैप्टन, त्याचे सहकारी व कारमध्ये असलेल्या ब्लॅक पैंथरला ओढत नेत आपल्या विंटेज कारमध्ये टाकतो, आणि कार चालु करुन त्यांना घेऊन जातो. तो बॉम्बरचा माणुस असतो.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

                               भाग-५- दि फायनल बैटल
(कैप्टन कैडिटी एका सच्चा सोल्जर, एक सच्चा माणूस . आयुष्यात अतिशय खतरनाक ३० मिशन्स यशस्वीपणे पूर्ण केलेला, आज अटलांटातील या मिशनच्या अंतिम टप्प्यावर पोहोचला आहे. थेट बॉम्बरशी मुकाबला, काय होणार आहे ऑपरेशन वज्रचा शेवट, आणि कसा होणार?)
       बॉम्बरचा माणूस कैप्टन कैडिटी सह त्याचे सहकारी व ब्लॅक पैंथरला आपल्यासोबत घेऊन जात असतो. बऱ्याच वेळाने ब्लॅक पैंथर शुध्दीवर येतो, आणि आपण कोणासोबत तरी कारमधून जात असल्याचे त्याला समजल्यावर तो हातपाय झटकायला व तोंडातुन काही बोलायचा प्रयत्न करत असतो, त्याचवेळी तो माणूस त्याच्या तोंडावरील पट्टी काढतो, आणि हातपाय सोडतो, तशी झटकन जाग्यावर उडी मारत तो त्या कारचालकाच्या बाजूला येऊन बसतो.
"बॉब, काय आहे हे मला कुठे घेऊन चाललास?"
बॉब वळून मागच्या सिटवर पाहतो. ब्लॅक पैंथरचे तिकडे लक्ष जाताच त्याचे रक्त खवळते, तो बॉब समोर ठेवलेली गन उचलून कैप्टनवर रोकतो, बॉब त्याला अडवत सांगतो.
"काल्म डाऊन पैंथर. तुला त्यांना काही करता येणार नाही. बॉसचा हुकुम आहे त्यांना आहे तसं घेऊन येण्याचा."
     ब्लॅक पैंथर हताश होत बोलतो.
"बॉब हा कैप्टन कैडिटी आहे, त्याला हलक्यात घेऊ नकोस. आत्ताच याला संपवलं नाही तर......."
"तरीही नो मिन्स नो पैंथर."
           ब्लॅक पैंथर काहीच बोलत नाही, तो बॉबला पाहत हताशपणे बसून राहतो. बॉब आपली कार थांबवत त्यातुन उतरतो, मागोमाग ब्लॅक पैंथरही उतरतो. गैसच्या प्रभावामुळे कैप्टन व त्यांच्या सहकाऱ्यांना शुध्द आलेली नसते. समोरच्या मोकळ्या जागेवर एक हेलिकॉप्टर उभे असते. बॉब खुणेनेच रायडर सिटवर बसलेल्या माणसाला विचारतो, तसा तो थम्स अप करतो. बॉब पैंथरसह कैप्टन कैडिटी व त्यांच्या सहकाऱ्यांना हेलिकॉप्टर मध्ये कोंबतो, आणि हेलिकॉप्टर सुरु होते.
          एका भव्यदिव्य अशा आलिशान पैलेसच्या समोर असलेल्या हेलिपॅड वर हेलिकॉप्टर उतरवले जाते. पैलेस खुप विस्तीर्ण व सुशोभित केलेला असतो. जागोजागी टॉवर्स उभे केलेले असतात, जिथे सशस्त्र गार्डस उभे असतात. पैलेसच्या प्रवेशद्वारापासून मुख्य दरवाजापर्यंत ही कमांडोजचा पहारा असतो.  पैलेस समोरच्या मोठ्या पटांगणात रंगीबेरंगी पाण्याचे उंचच उंच फवारे उडणारा कारंजा असतो.
        बॉब व ब्लॅक पैंथर बेशुद्धावस्थेतील कैप्टन कैडिटी व त्यांच्या सहकाऱ्यांना उचलुन मुख्य दरवाजाकडे येतात. मुख्य दरवाजावर पुर्ण दरवाजा व्यापेल अशा आकारात डेंजर(विद्युत बॉक्सवर असते ते चिन्ह) ची मार्बल मधील प्रतिमा असते. बॉब व पैंथर कैप्टन व सहकाऱ्यांना टॉप फ्लोअर वरील एका खास रुम मध्ये नेऊन बांधून ठेवतात.  बॉब कैप्टन जवळचा हत्यारांचा बॉक्स आपल्या ताब्यात घेतो.
           बराच वळ होतो, गैसचा प्रभाव कमी झाल्यामुळे कैप्टन कैडिटी व त्यांचे सहकारी शुध्दीवर आलेले असतात. डोळ्यांची मंद उघडझाप करत कैप्टन आजुबाजुला पाहतात. ती एक प्रशस्त पण जुनाट अशी खोली असते. त्या खोलीत ना जास्त उजेड असतो, ना जास्त अंधार. कैप्टन समोर पाहतात, एक धिप्पाड मल्लासारखी आक्रुती त्यांच्या नजरेसमोर येते. डोळे सताड उघडे करत ते पाहतात. समोरच बॉब कमरेवर हात ठेवून उभा असतो. कैप्टन आपली सोडवणुक करण्याची धडपड करत बाजुला पाहतात, त्यांच्या डाव्या हाताला बांधुन ठेवलेले शैला, रोमान व एलेक्स शुध्दीवर येत स्वतः ची सोडवणुक करण्याची धडपड करत असतात, तेवढ्यात त्या अंधाऱ्या खोलीतुन बुटांचा टप टप टप टप असा आवाज येतो. कैप्टन व सहकारी आवाजाच्या रोखाने पाहतात, तिथे ब्लॅक पैंथर हसत हसत उभा असतो. कैप्टनकडे पाहत तो बोलतो.
"नाईस टु मिट यु कैप्टन."
         ब्लॅक पैंथरला समोर पाहून तर कैप्टन च्या सहकाऱ्यांचे पित्त खवळते, ते आपले हात सोडण्याचा बराच आटापिटा चालवतात. ब्लॅक पैंथर तसाच पुढे येतो. आपल्याकडील शॉक देणाऱ्या गनने तो कैप्टनला व सहकाऱ्यांना झटके देतो. शैला त्वेषाने बोलते.
"पैंथर तुझी शंभरी आता भरली आहे. अरे भ्याडा एकदा आमचे हात मोकळे कर मग तुला दाखवतो."
    शैला दात ओठ खात आपले हात मोकळे खरायचा प्रयत्न करते, तेव्हा आपल्या तोंडावर बोट ठेवून शांत राहण्याची खुण करत ब्लॅक पैंथर बोलतो.
"शु..... एवढा राग सोल्जर्स ना शोभत नाही. कैप्टन इथुन तु वाचुन जाऊच शकणार नाही. या सिक्रेट साठी इथपर्यंत आला होतास. बहुतेक तुझं हे अखेरचं मिशन असेल."
    कैप्टन हसून ब्लॅक पैंथरला पाहतो.
"पैंथर ते तर येणारी वेळच ठरवेल."
       एवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज येतो, आणि बाहेरचा उजेड कैप्टनच्या डोळ्यांवर पडतो. कैप्टन नजर तिकडे करत पाहतात, बॉब व पैंथर मागे वळतात. दरवाजातुन धिप्पाड, कैप्टनसारखाच ओव्हरकोट घातलेला, तोंडात सिगारेटचा पाईप शिलगावलेला आणि डोळ्यांवर काळा गॉगल असलेला बॉम्बर आपल्यासोबत दोन ब्लॅक कमांडोजना घेऊन आलेला असतो. कमांडोज बाहेरच थांबतात, आणि अतिशय रूबाबात, आवेशाने तो कैप्टनजवळ येता येता बोलतो.
"वेलकम, वेलकम, वेलकम. वेलकम कैप्टन कैडिटी. अटलांटामध्ये तुझं स्वागत आहे."
       मौत का सौदागर म्हणवला जाणारा बॉम्बर कैप्टन व सहकाऱ्यांसमोर येऊन उभा राहतो.
"जर आधी माहित असतं की तु येणार आहेस तर तुझ्या स्वागताची चांगली तयारी करता आली असती. पण जाऊ दे जसं मला पैंथरकडून समजलं की तु आला आहेस मी माझ्या या माणुस बॉबला खास पाठवलं तुझ्या स्वागतासाठी."
    कैप्टन बॉम्बरकडे पाहत मोठ्याने हसतात.
"बॉम्बर. मागच्या वेळी भेटलेलास तेव्हाचा मार विसरलास वाटतं? मी इथे आलोय तुला घेऊन जाण्यासाठी, आणि तिथे खुपं चांगलं स्वागत करणार मी तुझं, बिलिव्ह मी."
       बॉम्बर तरातरा त्यांच्या समोर जातो. नजरेत नजर मिळवत रागाने पाहतो, आणि मागे मागे जात हसत हसत आपला हात पैंथरच्या पुढ्यात करतो. पैंथर कैप्टन कैडिटी चा वॉकीटॉकी त्याच्या हातात देतो.
"कैप्टन समजेलच माझं स्वागत कोण आणि कसं करणार ते?"
      बॉम्बर वॉकीटॉकी वरुन कैप्टन कोणाशी बोलला होता, ते शोधून संपर्क करतो. पलिकडून आवाज येतो.
"हैल्लो कैप्टन कैडिटी. कुठे आहेस तु? मी किती प्रयत्न करतोय पण तुझ्याशी संपर्कच होत नव्हता."
"हेडली? हा हा हा हा."
"हैलो कोण बोलतयं कैप्टन, कैप्टन."
"हाय माय डियर हेडली बॉम्बर हिअर"
बॉम्बरचं नाव ऐकताच थोडा घाबरत पण त्वेषाने हेडली बोलतो.
"बॉम्बर तु? कैप्टनचा वॉकीटॉकी तुझ्याकडे कसा? कैप्टन आणि त्यांचे सहकारी कुठे आहेत?काय केलसं तु त्यांच्यासोबत?"
"काल्म डाऊन. काल्म डाऊन हेडली. कैप्टन आणि त्याचे सहकारी माझ्या ताब्यात आहेत. तसा तुझा प्लैन चांगला होता, पण या बॉम्बरसमोर तो फेल ठरला. हेडली हिंमत असेल तर कैप्टन व त्याच्या सहकाऱ्यांना इथनं घेऊन जा."
हैलो बॉम्बर लिसन टु मी, बॉम्बर..बॉम्बर."
     बॉम्बर तो वॉकीटॉकी क्रोधाने दूर फेकून देतो, त्याचे तुकडे तुकडे होतात. तो कैप्टनकडे पाहत बोलतो.
"सी यु सुन कैप्टन. बाय बाय"  आणि मागे वळत दरवाजातून बाहेर पडतो. पैंथर आपल्या कोटाच्या खिशातील सिक्रेट त्याला बाहेर काढून दाखवत म्हणतो.
"हेच सिक्रेट पाहिजे होते ना तुला? पण सॉरी कैप्टन तुला ते कधीच मिळणार नाही. या सिक्रेटच्या मदतीने बॉस पूर्ण अमेरिकेवर राज्य करतील. हा हा हा हा कैप्टन आय विल कम बैक."
     दोन बोटांनी इशारा करत मागे मागे जात पैंथरही तिथून बाहेर पडतो.  तिथे फक्त बॉब, कैप्टन व त्याचे सहकारी राहतात. बराच वेळ होतो. कैप्टनना आपले मिशन डोळ्यासमोर स्पष्ट दिसत असतं, ते आजुबाजुला पाहत असतात. कैप्टनच्या उजव्या बाजुला काहीशा अंतरावर जाड काचेची एक भिंत असते, आणि त्याला सरकवता येणारे पडदे लावलेले असतात. कैप्टन हळुच आपली नजर बॉबकडे वळवतात, तो तिथल्याच एका खांबाला टेकून गाणे गुणगुणत असतो.
        कैप्टनला एक कल्पना सुचते, बॉबला जाळ्यात ओढून तिथून निसटण्याची. कैप्टन आपल्या बाजुच्या सहकाऱ्यांना सांकेतिक भाषेत खुणा करतात, तसा एलेक्स बॉबकडे पाहत हळू आवाजात बोलायला सुरवात करतो.
"कैप्टन खरचं ग्रेट आहात तुम्ही."
   कैप्टन हळुच एलेक्सला डोळा मारत बॉबला ऐकू जाईल अशा आवाजात बोलतात.
"अरे ही कमाल तर बदामाच्या दुधाची आहे."
      एलेक्स विस्मयचकित होत विचारतो.
"बदामाचं दुध?"
"हो . बदामाचं दुध. फ्रेंडस त्याच्यामुळेच आजवर मी यशस्वी झालो आहे, आणि हा रोमान याच्या पोटाकडे बघा. लहानपणापासून बघा बदामाचं दुध पिऊन कसं झालयं ते?"
      रोमान कैप्टनच्या बोलण्यावर ढेकर देतो. तेवढ्यात बॉब उठून त्यांच्याजवळ येतो, आणि कैप्टनला पाहत प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारतो.
"काय बदामाचं दुध?"
     त्यावर एलेक्स काहीसा भावुक चेहरा करत बोलतो.
"हो माझ्या भावा. तु पाहा एवढा धिप्पाड, पैलवान, पण या बॉम्बरने तुला पाळीव कुत्रा बनवलं आहे."
"ए माझ्या बॉसबद्दल काही बोलू नकोस."
"ठिक आहे, ठिक आहे पण तु विचार कर. बदामाचं दुध पिऊन कैप्टन ३० मिशन्स पुर्ण करु शकतात, तर तुझ्यासारखा एवढा धिप्पाड माणुस काय काय करु शकतो."
    बॉब विचार करु लागतो, आणि एलेक्सला पाहत ढसाढसा रडत बोलु लागतो.
"पहिल्यांदाच मला कुणीतरी भावा म्हणुन हाक मारली आणि एवढ्या प्रेमाने मला सांगितलं, माझं ह्रदय भरुन आलं."
      बॉब एलेक्सच्या छातीवर डोकं ठेवत रडत असतो, पण त्याच्या वजनाने एलेक्सला मात्र कसतरीच होत असते. कैप्टन मिश्कील हास्य करत बॉबला सांगतात.
"बॉब, बच्चे की जान लोगे क्या?"
       बॉब नजर वर करत कैप्टनकडे पाहतो, आणि एलेक्स पासून दुर होतो. कैप्टन त्याच्या कडे पाहत बोलतात.
"बॉब आता एवढ्यावरच भागवणार आहेस का आम्हांला?"
"म्हणजे?"
"अरे बाबा किती वेळ झालाय, आम्ही उपाशी आहोत. काही खायला देशील की नाही, हा रोमान बघ किती सुकलाय, आणि ही शैला मघापासून रागाने पाहतेय मला."
      शैला चकित होत डोळे वटारत कैप्टनला पाहते. तेवढ्यात रोमान बोलतो.
"हो माझ्या पोटात तर उंदरांनी भांगडा करायला सुरवात केलीय."
       बॉब भावुक चेहरा करत आत जातो आणि आपल्यासोबत  दोन ताटं घेऊन बाहेर येतो. कैप्टन त्या दोन ताटांकडे पाहत बॉबला सांगतात.
"हे काय बॉब दोनच ताटं? म्हणुन लहानपणापासून बदामाचं दुध प्यायचं असतं."
"पण कैप्टन एवढचं जेवण शिल्लक आहे."
कैप्टन विस्मयचकित होत बोलतात.
"बॉब? ओके ऑलराईट आम्ही करु एडजस्ट."
    कैप्टन आपल्या सहकाऱ्यांना पाहत बोलतात. बॉब तसाच उभा असतो, तेव्हा कैप्टन वर आपल्या बांधलेल्या हातांकडे पाहून त्याला विचारतात,
"काय बॉब आता जेवण तुच भरवणार आहेस काय?"
     बॉबला कैप्टनचा इशारा समजतो, व तो त्या चौघांचे हात मोकळे करतो. बॉब बोलतो.
"पण तुम्ही इथुन कुठं हलायचं नाही."
"छे छे बॉब. अरे तुझ्यासारखा सुमो पैलवान असताना आमची हिंमत आहे का पळून जाण्याची, काय फ्रेंडस?"
     सर्व जण माना डोलावतात. बॉबच्या अंगावर ते ऐकून मुठभर मांस चढते, त्याला सिगारेटची तलफ येते आणि तो दूर पाठमोरा उभा राहतो.
       कैप्टन त्या दोन ताटातलं एक ताट रोमानला देतो आणि दुसरे ताट शैलाकडे.
"फ्रेंडस या मिशनमध्ये मी तुम्हाला सामिल केलं होतं, त्यामुळे या अन्नावरही पहिला तुमचा हक्क आहे. तुमचं पोट भरलं की मलाही धन्य वाटेल."
       शैला भावुक होत कैप्टनकडे पाहते.
"कैप्टन तुम्हीच तर आम्हाला शिकवलं कुठल्याही परिस्थितीशी सामना देणे. कैप्टन तुम्ही आम्हांला फ्रेंडस म्हणता ना? मग फ्रेंडसच्या नात्याने तुमचाही हक्क बनतोच."
       कैप्टन भावुक होतात, आणि सर्वांना आपल्या कवेत घेतात, त्यांच्यातील हे प्रेम, ही मैत्री पाहून बॉबला अजुन तलफ आलेली असते.
      कैप्टन व सहकारी एकमेकांना शेअर करत जेवण संपवतात, तरीही बॉब आपल्याच धुंदीत पाठमोरा उभा असतो. कैप्टन नजरेनेच शैला, रोमान व एलेक्सला इशारा करतात, तसा आवाज न करता सावध पवित्रा घेत ते तिघे मागाहुन जात बॉबवर हल्ला करतात, आणि किकफाईट आणि पंचेस देत त्याला खाली पाडतात.
बॉब ओरडतो.
"धोका कैप्टन धोका."
"सॉरी बॉब. वाईटाच्या संगतीने वाईटच होतं."
     कैप्टन एक जोरदार गुद्दा बॉबला लगावतात, पण बॉब कोणालाही आवरत नसतो, तो आपल्या ताकदीने कैप्टन व त्यांच्या सहकाऱ्यांना दूर फेकत असतो. कैप्टन व सहकारी तिथल्या खांबांना आदळून खाली पडतात. बराच वेळ फाईट चालते, पण शेवटी  धावत उडी मारत एक खतरनाक हेडपंच देत कैप्टन बॉबला खाली कोसळवतात, आणि त्याच्या गळ्यात आपल्या हातांचा फास आवळून विचारतात.
"बोल बॉब आमचा हत्यारांचा बॉक्स कुठे आहे? तो ब्लॅक पैंथर कुठे आहे?"
      फाजील आत्मविश्वास व अहंकार असल्याने ब्लॅक पैंथर, बॉम्बर किंवा बॉब नेही तो बॉक्स उघडुन पाहिलेला नसतो. 'विनाशकाले विपरीत बुध्दी' ही उकती खरी ठरत असते.
      कैप्टनच्या फासाने बेजार होत बॉब आतमध्ये बॉक्स असल्याचे सांगत बेशुध्द होतो. ब्लॅक पैंथर बद्दल त्याने काही सांगितलेले नसते. कैप्टन त्याला हलवून पाहतात, पण तो शुध्दीवर येत नाही.
         कैप्टन व सहकारी तिथल्याच एका मजबुत दोरीने बॉबला खांबाला बांधतात. एलेक्स आतमध्ये जाऊन शोध घेत हत्यारांचा बॉक्स घेऊन बाहेर येतो. कैप्टन हत्यारांचा बॉक्स उघडतात, आतमधून खास एअर शुज बाहेर काढतात, ते पाहून शैला उद्गारते.
"वॉव कैप्टन एअर शुज."
     कैप्टन स्मितहास्य करत बोलतात, "येस शैला."
     कैप्टन बॉक्समधुन ग्रेनेडस काढून एक्टिव्हेट करत तिकडे फेकतात, आणि बॉब कडे पाहत बोलतात.
"सॉरी बॉब"
आणि वळून पाहत सहकाऱ्यांना मोठ्याने सांगतात .
"लेटस डु इट फ्रेंडस. गेट सेट गो."
      कैप्टन आणि सहकारी आपल्या हातात मशिनगन, शॉटगन, M 16 वगैरे गन्स घेत एअर शुज द्वारे स्केटींग करत त्या जाड काचेच्या भिंतीला धडक देतात. त्या काचेचे तुकडे तुकडे होतात. विशिष्ट प्रकारचे सोल्जर्स कॉस्टयुम असल्याने त्यांना काही इजा होत नाही.
      कैप्टन व सहकारी दुतर्फा गन फायर करुन टॉवरवरील गार्डस व कमांडोजला टिपतात, त्यांच्या एअर शुज च्या स्केट मधून ब्ल्यु लाईटस बाहेर पडतात, व ते हवेत तरंगत अलगद खाली येतात. रोमान आपल्याकडील एअर गनने आकाशात जवळून टेहाळणी करणाऱ्या हेलिकॉप्टर च्या रायडरचा वेध घेतात, तसे हेलिकॉप्टर आकाशात कसेतरीच भरकटत ब्लास्ट होते.
         कैप्टन व सहकारी जसे आपले पाय जमिनीवर टेकवतात, तसा मागाहून त्या वरच्या मजल्याचा ब्लास्ट होतो. कैप्टन व सहकारी गन फायर करत जातात. एवढा मोठा ब्लास्ट चा आवाज व गन फायर ऐकून त्या पैलेसवरील सर्व कमांडोज व गार्डस कैप्टनला रोकण्यासाठी येत असतात, पण धमाकेदार फायरींग करत आणि किक फाईट व पंचेस देत ते त्या सर्वांना धडाधड खाली कोसळवत जातात. कैप्टन व त्यांच्या टिमसमोर कुणीच टिकाव धरू शकत नाहीत.
          तसेच फायरींग करत व कमांडोज चा प्रतिकार करत ते ब्लॅक पैंथरला शोधत त्या मोठ्या ग्राऊंडवरील कारंजाकडे येतात. तेवढ्यात उंचच उंच उडणाऱ्या फवाऱ्यातुन ते बॉम्बरला येताना पाहतात, त्याच्या सोबत ब्लॅक पैंथर आणि मागे सशस्त्र ब्लॅक कमांडोज असतात. त्याच्या मागुनच आकाशात दोन्ही बाजुंना हेलिकॉप्टर येऊन राहतात, आणि रोपच्या सहाय्याने त्यातुन बॉम्बरचे खास पैराकमांडोज व रोबो कमांडोज उतरून कैप्टन व त्यांच्या सहकाऱ्यांवर फायरींग करतात, कैप्टनही त्याला प्रत्युत्तर देतात, पण बुलेटप्रुफ जैकेट व रोबोशिल्डने युकत सोल्जर्स कॉस्टयुम घातलेल्या कमांडोज वर त्याचा परिणाम होत नाही. कैप्टनच्या गनफायर मध्ये जखमी झालेल्या एका कमांडोने कैप्टन पळून जात असल्याची बातमी बॉम्बरला कळवलेली असते, त्यामुळे आपले महत्त्वाचे काम टाकून तो तिथे आलेला असतो.
         कमांडोज फायर करत कैप्टन व सहकाऱ्यांच्या हातातील गन्स खाली पाडतात, आणि त्यांच्याभोवती चौफेर कडे करत मशिनगन्स रोकतात. एक कमांडोज त्यांच्या जवळील हत्यारांचा बॉक्सही काढून घेतो.
         बॉम्बर त्वेषाने उसळत कैप्टनकडे येतो आणि एक जोरदार गुद्दा लगावतो, आणि म्हणतो.
"कैप्टन पळण्याचा प्रयत्न करत होतास? पण तुला माहीत नाही, या मौत का पैलेस मधुन बॉम्बरच्या हातुन कुणी निसटु शकत नाही. नाऊ यु आर फिनिश कैप्टन."
        बॉम्बर कैप्टनवर गन रोकतो, परंतु प्रसंगावधानी कैप्टन अचानक आपले हात वर करतो, आणि आपल्या सहकाऱ्यांकडे पाहतो, तेव्हा तेही आपले हात वर करतात. कैप्टन कातर आवाजात बोलतो.
"आय विल सरेंडर बॉम्बर, आय अनेबल टु फाईट यु."
       बॉम्बर आपली गन खाली करत पैंथर कडे पाहत हसू लागतो, आणि कैप्टनकडे वळून पाहत म्हणतो.
"दैटस बेटर कैप्टन. अखेर तुलाही मान्य करावचं लागलं की या बॉम्बरसमोर कैप्टन कैडिटी द मेगा सोल्जर, लाईफ मधील ३० मिशन्स पूर्ण केलेला ब्रेव्ह मैन सुध्दा कमीच आहे. हा हा हा हा हा."
       पैंथरला ही कैप्टनची चाल वाटत असते, तो हळूच पैंथरच्या कानात कुजबुजतो.
"बॉस आय थिंक कैप्टन कुठलीतरी चाल खेळतोय."
"हा हा हा हा पैंथर डोंट वरी. कैप्टन आता घाबरलाय, तो ज्या सिक्रेटसाठी आला होता ते ही त्याने गमावले, तो या बॉम्बरचं काही करु शकणार नाही."
        पण कैप्टनचे त्याच्याकडे लक्ष असते कुठे, तो ओव्हरकोटाच्या खिशात हात घालतो तसे त्याच्याभोवतीचे कमांडोज व बॉम्बर त्याला पाहतात, पण तो सिगारेटचा पाईप काढत तोंडात ठेवून शिलगावतो, तसा चवताळून पुढे येत तो कैप्टनच्या तोंडातील पाईप ओढून काढत म्हणतो.
"कैप्टन समोर म्रुत्यु बघुन बावरलास वाटतं?"
      सगळेजण हसू लागतात. बॉम्बर तो पाईप दूर फेकतो, आणि अचानक सगळीकडे धूर पसरतो. कैप्टन बोलतात.
"तु मोठी चुक केलीस बॉम्बर."
       कैप्टन व टीम खास प्रकारचे गॉगल्स घालतात, ज्यामुळे त्यांना धुराचा त्रास होत नाही. कैप्टन झटपट आपल्या मनगटावरील रिमोट सारख्या दिसणाऱ्या उपकरणाने फायर गन काढत आपल्या सभोवतीचे कडे फोडतात कमांडोज कडील मशिनगन्स व हत्यारांचा बॉक्स काढून घेतात व  दूरवरचा अंदाज घेत पैलेसच्या गेट बाहेर असणाऱ्या मोठ्या झाडाच्या बुंध्यावर आपल्याजवळच्या खास रोपचे एक टोक गाडतात, आणि दुसरे टोक आपल्या बाजुलाच असणाऱ्या दगडी चबुतऱ्याला बांधतात, आणि ते चौघेही चौफेर गन फायर करत  रोपवरून मागे मागे जात त्या मोठ्या झाडाच्या बुंध्यापाशी उतरतात. बॉम्बर व त्याच्या कमांडोजना धुरामुळे काही दिसत नसते, ते अंधारात चाचपडल्यासारखे हवेत फायरींग करत राहतात.
           कैप्टन बुंध्यापाशी पोहोचल्यावर गनफायर करत रोप तोडतात, आणि सावध पवित्रा घेत बॉम्बर व कमांडोज वर फायरिंग करतात. काही वेळाने धूर कमी झाल्यावर बॉम्बर व त्याच्या टिमला कैप्टन व त्याची टिम त्या झाडाकडे उभी असलेली दिसते, तेव्हा बॉम्बर चवताळून गन फायर करायला सांगतो. बॉम्बरचे खास रोबोट कमांडोज व बुलेट शिल्ड फोर्स कैप्टनवर फायरींग करत असतात, पण त्यातून बचावत कैप्टन फायर गनने (आग ओकणारी एक गन) त्या कमांडोज चा खात्मा करतात.
         बॉम्बर व पैंथर आपली फोर्स त्यांच्यावर सोडतात. जोरदार धुमश्चक्री चालु होते, आणि तेवढ्यात एक एअर स्ट्राईक होतो. आकाशातुन दोन फायटर प्लेन एअरगनने फायर करत व रौकेट्सचा मारा करत बॉम्बरचे सर्व बंकर्स नष्ट करतातत्याचे तळ उध्वस्त करतात. अचानक झालेल्या या हल्लयाने बॉम्बर व पैंथर सोबत त्याची फोर्स ही हडबडते. हेडली वेळेचे गांभीर्य ओळखून अटलांटातील एअर फोर्स ची मदत घेतलेली असते कैप्टन व त्यांच्या टिमला सोडवण्यासाठी.
       कैप्टन व टिम समोर ही अखेरची संधी असते. कैप्टन बाजूला पाहतात. कुणा कमांडो ची क्रुझर बाईक तिथेच कडेला उभी असते. गडबडीत तो कमांडो चावी त्यालाच विसरून गेलेला असतो. कैप्टन झपकन त्याच्याकडे झडप घालत बाईक चालु करतात, आणि आपले पाय फाकत दोन्ही हातात मशिनगनने फायर करत बाईकवर उभे राहतात, आणि पैलेसच्या गेटवरून बाईक हवेत उंच उडवत चौफेर फायर करत बॉम्बर व पैंथर समोर उडी मारतात. बाईक वेगाने जात दूर पडते व तिचा ब्लास्ट होतो. शैला, रोमान व एलेक्स फायटर प्लेनसोबत आलेल्या पैराकमांडोज सोबत तिथे पोहोचते. बाजी पलटलेली असते. पैराकमांडोज ची स्पेशल फोर्स बॉम्बर व पैंथरवर एअर गन रोकत कडे करतात.
          कैप्टन तरातरा त्या दोघांजवळ येत त्यांना पोटावर एक एक गुद्दा लगावतो, आणि आपली करडी नजर दोघांवर रोकत बोलतो.
"तुम्हा दोघांमुळे खुप काही सहन करावं लागलं आहे आम्हाला. खुप अन्याय केलात, विध्वंस केलात, पण याची शिक्षा तुम्हांला मिळणारच. बॉम्बर मौत का सौदागर आता मौत का सौदा काय असतो कळेलच तुला."
    बॉम्बर त्वेषाने झटापट करत ओरडत म्हणतो.
"कैप्टन आय विल किल यु"
        कैप्टन नुसतेच हसतात, आणि पुन्हा आपली भेदक नजर पैंथरवर वळवत आपला हात पुढे करतात.
"पैंथर गिव्ह मी द सिक्रेट."
       ब्लॅक पैंथर कैप्टनच्या नजरेला नजर मिळवण्याचे धाडस न करता आपल्या कोटातुन मुकाट्याने ते सिक्रेट कैप्टनकडे सोपवतो.
         कैप्टन हेडलीला इन्फार्म करतात आणि सशस्त्र अशा पैराकमांडोज सोबत पैंथर व बॉम्बरला घेऊन टेक्सास एअरपोर्टवर येतात. एअरपोर्टवर हेडली सह सर ब्रेझिल, काही पोलिस कॉप्स आणि सोल्जर्स उभे असतात.
        जेव्हा कैप्टन प्लेनमधून उतरतात तेव्हा आनंदातिशयाने हेडली समोर जात त्याला मिठी मारतो, त्याच्या डोळ्यातील भावना जणू शब्द बनलेले असतात.
"कैप्टन माय फ्रेंड".
        कैप्टन आपल्याजवळील सिक्रेट हेडलीकडे देतात, ते पाहुन अजून खुश होत हेडली बोलतो.
"ओह कैप्टन थैंक्स मेनी मेनी थैंक्स."
        तेवढ्यात बॉम्बरला हात बांधलेल्या अवस्थेत नेत असताना तो आपली भेदक नजर हेडलीच्या नजरेवर रोकत बोलतो.
"आय विल कम बैक."
      कैप्टन समोरच त्याच्यावर नजर गाडत बोलतात.
"यु नेव्हर कम बैक बॉम्बर."
       कमांडोज बॉम्बर व पैंथरला घेऊन जातात. कैप्टन सिगारेटचा पाईप ओढत असतात. वातावरणात तणाव पाहून ते सर्वांकडे पाहत हसून बोलतात.
"लेट्स एन्जॉय फ्रेंडस."
       वातावरण पुन्हा खेळीमेळीचे बनते. सर ब्रेझिल कैप्टनच्या कामगिरीवर खुप खुश असतात. गदगद होत ते कैप्टनला आपल्या मिठीत घेत बोलतात.
"आय प्राऊड ऑफ कैप्टन. तुझ्या आयुष्यातील ३१ वे मिशन यशस्वी झाले."
       दुसरीकडे संधी पाहत एलेक्स पटकन शैला ला किस करतो. विस्फारलेल्या नजरेने ती एलेक्सला पाहते तेव्हा एलेक्स हसत आपली मान तुकवत शैलाला "आय लव्ह यु" म्हणतो, आणि हसुन लाजत शैला त्याला मिठी मारते. ते पाहत असलेला रोमान हळूच कैप्टनला कोपरखळी मारत बोलतो.
"चला कैप्टन आता कुणालातरी एकांत हवा असणार बहुतेक."
         सर्वजण मोकळेपणाने हसतात, आणि चालू लागतात. कैप्टन व त्यांची टिम चालत असते आता एका नव्या दिशेने, नव्या मिशनच्या शोधात.
---------------------------------------समाप्त-----------------------------------------------------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ये रिश्ता क्या कहलाता है!

अवंतिका एक छोटीशी प्रेमकथा