या जन्मावर शतदा प्रेम करावे!😑

 


   

         एक माणुस असाच चालत जात असतो. चालता चालता तो एका दुकानात येतो. त्याचे घड्याळाकडे लक्ष जाते. त्यात तारीख असते १ जानेवारी २०२३. दुकानात काचेच्या बॉक्सकडे त्याची नजर जाते. त्यात तुरडाळ ५००/- रु किलो, साखर ३००/- रु किलो असे प्रत्येक जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तुंचे भाव असतात. 

         तो माणुस पाहत असतो, पाहत असतो तेवढ्यात त्याला उजवीकडच्या कोपऱ्यात एका कपड्याखाली वस्तु झाकलेल्या दिसतात. तो दुकानदाराला विचारतो, हे काय आहे?

"या खुप खास गोष्टी आहेत साहेब." 

       तो ते कापड बाजुला करायला सांगतो, त्याला वाटतं खास म्हणजे बहुतेक काहीतरी सोन्याचं वगैरे असेल. जेव्हा तो पाहतो तो काचेच्या बॉक्स मध्ये ठेवलेला भरलेला सिलिंडर असतो, त्या बॉक्सवर सोनेरी अक्षरात भाव लिहलेला असतो ५०००/- रुपये, आणि त्याच्या बाजुच्या बॉक्सवर त्याची नजर जाते, तिथे सोन्याच्या वेष्टनात ठेवलेले पैकेट दिसते त्यावर लिहलेले असते पेट्रोल १०००/- रुपये लिटर. 

       तो माणुस सगळे बॉक्स पाहतो. चिकन १०००/- रु किलो. आता काय करावं तो खिशात हात घालतो. पगारदार मध्यमवर्गीय माणुस असतो तो. ५००/- ची नोट शिल्लक असते. बाकीचे पगाराचे पैसे भाडे १००००/- गाडीत २०००/- चे पेट्रोल (एकदाच😀) भरुन कधीच रसातळाला गेलेले असतात. तो पाहत असतो, पाहत असतो तेव्हा डावीकडच्या कोपऱ्यात त्याला एक कटोरा दिसतो. त्याच्या बाजुला पानांपासुन(झाडांच्या😉) तयार केला केलेले आदिमानवाचे वस्त्र असते.😂

        तो पाहतो काय करावे. तो तुरडाळ घेतो १००/- रु ची तेव्हा दुकानदार एका पुडित त्याला तुरडाळ देतो २० ग्रैम. शेवटी असे १० ग्रैम, २० ग्रैम घेऊन त्याच्याकडे १०/- रुपये शिल्लक राहतात. तो दुकानदाराला पाहतो, दुकानदार त्याला पाहतो. दुकानदार कटोरा देऊन त्याला सांगतो.

"शेअर करो, खुश रहो. मरेपर्यंत तरी अच्छे दिन जरुर आयेंगे."

           त्याला कटोरा घ्यायला थोडे पैसे कमी पडतात. तेव्हा तो आपले कपडे काढतो. दुकानदार खास डिझाइन केलेले पानांचे वस्त्र त्याला फुकटात देतो. हातात कटोरा घेऊन तो माणुस आदिमानवाचे वस्त्र घालुन जातो. 

                     Situation out of control

पुढे शेअरींग करत जगत तो बिचारा मरतो, मरताना ही तो म्हणत असतो.

"अच्छे दिन जरुर आयेंगे." त्याचा अंत्यसंस्कार करण्यासाठी घरातले सदस्यही आपले कपडे विकतात. तो माणुस मात्र सुखाने मरतो कारण आता तो मेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला LIC, PLI म्युचुअल फंड(😢😢) पैसे मिळणारे असतात.

                                                   जगत रहा, हसत रहा!



     

   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अवंतिका एक छोटीशी प्रेमकथा

प्रतिघात- द रिव्हेंज Chapter-1

आठवणीतला पाऊस