On duty 24 hour
१.
अमरावती जिल्हयातील एक गाव. ओसाड माळरान. संध्याकाळचे 6-6.15 वाजले असतील. सोसाट्याचा वारा, पावसाळी वातावरण तयार झाले आहे. अशातच काही गावरान लोकांचा समुह माळरानावरून जात होता. सर्वजण भरभर पावले टाकत जात आहेत, आणि अचानक सळसळ झाडीतून कसलातरी आवाज आला, आणि डोळ्याचे पाते लवते न लवते तोच एक हिंस्त्र अस्वल त्यातल्या एकावर हल्ला करते. बाकीचे लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत सुटतात.
काही वेळाने सर्व शांत होते, अस्वल दूर निघून गेलेले असते. समुहातले बाकीचे सदस्य निपचित पडलेल्या माणसाजवळ जातात. त्यातला एक दुसऱ्याला म्हणतो,"नशिब आमचं त्या अस्वलाने याला ठार केलं नाही. चला रं जवळच डॉक्टर प्रशांत साहेबांचा तपासणी कैम्प आहे तिकडे नेऊया याला.
सर्वजण त्याला ऊचलून भराभर पावले टाकत डॉक्टर प्रशांत च्या तपासणी कैम्प मध्ये पोहोचतात. डॉक्टर प्रशांत आपल्या तपासणी कैम्प मध्ये एका लहान मुलाला तपासत असतात, तेवढ्यात गलबला ऐकून डॉक्टर प्रशांत बाहेर येतात. डॉक्टर चा पोशाख, गळ्यात स्टेथोस्कोप घातलेला डॉक्टर प्रशांत त्यांच्यासाठी देवदूतच वाटत असतो.
"अरे काय झालं? कसला गलबला चालला आहे?" डॉक्टर प्रशांत विचारतात. "डॉक्टर,डॉक्टर बघा ना आमच्या माणसाला कायं झालयं?" समुहातला एक जण धाप लागल्यागत बोलत असतो. डॉक्टर प्रशांत समोरच्या माणसाकडे पाहतात, त्याची गंभीर परिस्थिती पाहून ते नर्सला First-Aid आणण्यासाठी आत पाठवतात.
"कसं झालं हे?आणि नाव काय याचं?" डॉक्टर प्रशांत जमलेल्या समुहाला विचारतात."याचे नाव देवा" जमलेल्यातील एकजण डॉक्टर प्रशांत ला घडलेली सारी हकिकत थोडक्यात सांगतो. तेवढ्यात नर्स First-Aid ब्लॉक्स आणते. डॉक्टर प्रशांत त्या माणसाचे तिथेच Dressing करतात, आणि तेवढ्यातच पावसाला सुरवात होते. डॉक्टर प्रशांत ताबडतोब त्या पेशंटला आतमध्ये घेऊन जातात.
कैम्प च्या आतमध्ये पेशंट शेजारच्या खुर्चीवर डॉक्टर प्रशांत बसून राहतात, त्यांना आपला भुतकाळ आठवत असतो, आणि आठवत असते ती डॉक्टर आदिती. सिटी हौस्पिटल मध्ये ती त्यांच्या सोबत internship करत असते. त्याला ती आवडत असते आणि तिला तो. दोघेही लग्न करणार असते, पण तो माणूस आणि तो प्रसंग डॉक्टर प्रशांतला जशास तसा आठवतो. त्या माणसाला मेडिकल प्रोफेशन मधले कुणीच आवडत नसते, आणि त्याला डॉक्टर आदिती सोबत त्याचे लग्न मान्य नसते. विचारांच्या तंद्रीत असताना अचानक'डॉक्टर अहो डॉक्टर' अशा हाकेने डॉक्टर प्रशांत भानावर येतात.
"कायं झालं?"डॉक्टर प्रशांत विचारतात.
"अहो आमचा पेशंट?"
"पेशंट?अरे हो, तो आता बरा आहे. मी त्याच्या जखमांना मलमपट्टी केली आहे व इंजेक्शन ही दिले आहे. थोड्या वेळाने तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकता."
तो माणूस निघून जातो, आणि डॉक्टर प्रशांत कैम्पबाहेर येतात.
दुसरीकडे मुंबई ला सिटी हौस्पिटल मध्ये डॉक्टर आदिती केबिनमध्ये महत्वाच्या केसची फाईल चाळत असते. एवढ्यात मागाहून तिची मैत्रीण काम्या तिला हाक मारते.
"आदिती, अशी काय उभी आहेस? कोणती फाईल पाहतेयस?"
"अगं ती मिस भरुचांची फाईल पाहत होते, दोन दिवसांनी त्यांचे औपरेशन आहे ना?"
"ओके, ओके. आय होप ती केस तु चांगल्या रितीने हैंडल करशील. पण आत्ता चल. डॉक्टर शशांक नी तुला आपल्या केबिनमध्ये बोलावलयं."
"मला, पण का?"डॉक्टर आदिती आश्चर्य चकित होत विचारते.
"आय डोंट नो."
"ठिक आहे, चल."
डॉक्टर आदिती आपल्या मैत्रीण काम्यासोबत डॉक्टर शशांक यांच्या केबिनकडे जात असते. तेव्हा काही लोकांना ती डॉक्टर शशांक च्या केबिनमधून बाहेर जाताना पाहते. धीर करून डॉक्टर आदिती शशांक च्या केबिनचा दरवाजा उघडते.
" मे आय कम इन सर?" डॉक्टर आदिती व काम्या पाठमोऱ्या उभ्या असलेल्या डॉक्टर शशांक ना पाहून विचारतात.
"येस कम इन डॉक्टर आदिती, प्लीज सिट डाउन. काम्या यु मे गो नाऊ."
काम्या डॉक्टर शशांक कडे पाहत केबिनमधून बाहेर जाते. केबीनमध्ये डॉक्टर शशांक आणि आदिती दोघेच राहतात.
"डॉक्टर आदिती, मी तुम्हांला इथे खास बोलावलं आहे, त्याची कल्पना तुम्हांला आलीच असेल."
"हो सर"
"ओके. आत्ता माझ्या केबिनमधून जो घोळका बाहेर जाताना पाहिला, तो का आला होता माहीती आहे?"
"आय हैव नो आयडिया सर."
डॉक्टर शशांक आपल्या खुर्चीतून उठून खिडकीजवळ जातात.
" आपल्या हौस्पिटलचे नाव मोठे करण्यात ज्या काही स्पेशल डॉक्टर्स चा समावेश आहे, त्यात डॉक्टर प्रशांत आणि यु डॉक्टर आदिती, तुमचाही समावेश आहेच. एम आय राईट?"
डॉक्टर प्रशांतचे नाव ऐकताच डॉक्टर आदिती सावरून बसते.
"डॉक्टर आदिती, यु नो व्हेरी वेल. डॉक्टर प्रशांतच्या कुठल्याही निर्णयाला मी कधीच विरोध केला नाही. इव्हन त्यांनी ग्रामीण भागात मेडिकल कैम्प उभे करण्यालाही. डु यु agree वुइथ मी?"
"येस आय agree सर." डॉक्टर आदिती काहीशी भावुक होत सांगते.
"गुड. नाऊ लेट्स कम टु द पौईंट. मि. चौहान........"
डॉक्टर शशांक काही बोलायच्या आधीच डॉक्टर आदिती चमकुन त्यांच्या कडे पाहते.
" व्हाट हैपन्ड डॉक्टर आदिती? oh माझ्या तोंडून मि.चौहान चे नाव बाहेर पडले का? येस डॉक्टर. मि.चौहान आत्ता इथे मला भेटून गेले."
डॉक्टर आदिती चमकून डॉक्टर शशांक कडे पाहते.
डॉक्टर शशांक पुढे बोलायला सूरवात करतात.
"डॉक्टर आदिती, मि.चौहान नी मला २४ तासांची मुदत दिली आहे. एकतर हे हौस्पिटल बंद करा नाहीतर डॉक्टर प्रशांतचं मेडिकल लायसेन्स रद्द करा."
डॉक्टर आदिती आपल्या खुर्चीतुन उठून उभी राहते.
"नो सर नो. यु नो व्हेरी वेल, डॉक्टर प्रशांत इज मोस्ट इलिजिबल डॉक्टर इन इंडिया. त्यांनी त्या दिवशी हे मुद्दाम केले नव्हते. इट्स an इमर्जन्सी. आणि त्या वेळी तुम्हीही इथे नव्हता सर, यु नो दैट."
"प्लीज काल्म डाऊन डॉक्टर आदिती. बी सिट डाऊन. आय नो डॉक्टर प्रशांत इज मोस्ट इलिजिबल डॉक्टर. पण मला हौस्पिटलचाही विचार करायला हवा. 24 तास तहान भूक विसरून on duty असणाऱ्या डॉक्टर्सच्या भवितव्याचा प्रश्न आहे."
एव्हाना डॉक्टर आदिती शांत झालेली असते.
"सर गिव्ह मी अ वन चान्स. मि. चौहान ना मी समजावते."
"ओ रियली डॉक्टर आदिती. व्हाट डु यु थिंक, तुमचं म्हणणं ते ऐकणार आहेत. मि. चौहान एक मोठे प्रस्थ आहेत या शहरातले. तुम्हांला जर या हौस्पिटलला वाचवायचं असेल तर डॉक्टर प्रशांतना या हौस्पिटलमध्ये परत आणावं लागेल. कैन यू डु इट डॉक्टर?"
डॉक्टर आदिती तशीच उठून उभी राहते, तिला गतकाळातील स्मृती आठवू लागतात. ती लोकांची गर्दी, ती पळापळ आणि OT मध्ये झालेला एका बाईचा म्रुत्यु. सारे आठवतच ती आपल्या केबिनकडे जात असते. केबिनमध्ये गेल्यावर तिला आठवतात डॉक्टर प्रशांत सोबत घालवलेले काही सोनेरी क्षण. दोघांचेही एकमेकांवर प्रेम असते. डॉक्टर प्रशांत ने आदितीला प्रपोज केलेले असते, आणि तिनेही लाजून त्या प्रेमाचा स्विकार केलेला असतो, पण तो एक प्रसंग त्या दोघांना एकमेकांपासून वेगळा करतो.
डॉक्टर आदिती डॉक्टर प्रशांत ना आणण्यासाठी अमरावती ला जायला निघतात, तिला त्याला भेटायचे असते. डॉक्टर प्रशांतने घातलेल्या शपथेमुळे त्या दोघांना एकत्र राहता आलेले नसते. बस मध्ये बसल्यावर डॉक्टर आदितीला त्या रात्री घडलेला तो प्रसंग आठवू लागतो.
ती रात्रीची वेळ असते. सिटी हौस्पिटलच्या बाहेर बरीच गर्दी जमलेली असते. एक मोठा ब्लास्ट झालेला असतो, आणि त्यात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना तिथे आणले जात असते. रुग्णांच्या नातेवाईकांची, डॉक्टर्सची धावपळ चालू असते, आणि तेवढ्यातच एक मोठी आलिशान कार येऊन तिथे उभी राहते. कारमधून मि.चौहान खाली उतरतात. मि.चौहान शहरातील एक बडे प्रस्थ असल्याने त्यांच्या अवतीभवती सिक्युरिटी गार्ड़सचा राबता असायचा. मागोमाग एक महिला मि.चौहान च्या बायकोला धरून आणत असते. जमलेली गर्दी त्यांना पटापट वाट करुन देत असते. एवढ्यात इमर्जन्सी ओळखून डॉक्टर प्रशांत व आदिती त्यांच्यासमोर येतात.
मि.चौहान त्यांना आपादमस्तक न्याहाळतात, आणि मोठ्याने बोलायला सुरवात करतात.
"तुम कौन हो?डॉक्टर शशांक कहा है? अरे मेरी बिवी को बहुत तकलिफ हो रही है."
"sorry सर. डॉक्टर शशांक प्रेस कौन्फरन्स साठी दिल्लीला गेलेत. मी डॉक्टर प्रशांत आणि या डॉक्टर आदिती. Please सर इटस एन इमर्जन्सी. वुई विल हैंडल धिज."
डॉक्टर प्रशांत एक on duty डॉक्टर आणि माणूसकीच्या द्रुष्टीने बोलत असतात, पण मि. चौहान ला मात्र त्यांचे बोलणे ऐकायचे नसते.
"लुक डॉक्टर. हमे किसी ऐसे वैसे डॉक्टर से इलाज नही करवाना है, अगर डॉक्टर शशांक नही तो कोई और सिनियर डॉक्टर तो होगा यहापर?"
"नाही सर. इथे थोड्यावेळापुर्वी ब्लास्ट मध्ये गंभीर जखमी पेशंट्सना आणले आहे, सगळे सिनियर्स तिकडे बिझी आहेत."
"तो क्या मै मेरी बिवी को मरने दू? अरे भाड मै जाए बाकी लोग. मुझे बस मेरी बिवी को ठिक करना है."
"सर प्लीज यु ट्रस्ट मी. वेळ खूप कमी आहे" डॉक्टर प्रशांत त्यांना कळकळीची विनंती करतात, पण त्याही परिस्थितीत मि.चौहान चा हेका चालूच असतो.
शेवटी एका टोकाला जाऊन डॉक्टर प्रशांत डॉक्टर शशांक ना फोन लावतात, सोबत डॉक्टर आदितीही असते. खुप वेळाने फोन लागतो. पलिकडून डॉक्टर शशांक बोलत असतात.
"हैलो"
"हैलो, सर डॉक्टर प्रशांत हिअर."
"बोला डॉक्टर प्रशांत, काय झालं?"
डॉक्टर प्रशांत घडलेली सर्व घटना संक्षिप्त पणे सांगतात, सर्व ऐकून घेतल्यावर डॉक्टर शशांक बोलायला सुरवात करतात.
"डॉक्टर प्रशांत. रियली धिस ईज मेजर प्रोब्लेम, पण यु नो मी इकडे प्रेस कौन्फरन्स मध्ये आहे, तरीही मी बोलतो मि.चौहानशी." डॉक्टर प्रशांत लगबगीने मोबाईल घेऊन मि.चौहान कडे येतात. पलिकडून डॉक्टर शशांक चा आवाज ऐकून ते बोलायला सुरवात करतात.
"हैलो डॉक्टर शशांक. यहा पर मेरी बिवी को तकलिफ है और ये कह रहे ही विल हैंडल धिस. क्या मजाक चल रहा है?"
"आय रियली सौरी मि.चौहान. मै सचमुच यहा प्रेस कौन्फरन्स मे बिझी हू. लेकिन डोंट वरी, डॉक्टर प्रशांत इज मोस्ट इलिजिबल डॉक्टर. आय शुअर ही विल डन अवर जौब."
"ठिक है अगर आप कहते है तो मान लेता हू"
डॉक्टर शशांक फोन ठेवून देतात. मि. चौहान गरकन फिरून डॉक्टर प्रशांतला पाहतात, त्यांच्या नजरेत अविश्वास भरलेला असतो.
"डॉक्टर शशांक कहते है तो मान लेता हू. लेकिन अगर कुछ भी हुआ तो, याद रखना."
डॉक्टर आदिती काळजीने डॉक्टर प्रशांतना पाहते. तिला माहिती असते, यापूर्वी डॉक्टर प्रशांत कडून कुठलीही केस फेल गेलेली नसते. on duty 24 तास त्यांनी हौस्पिटल साठी दिलेले असतात, पण इथे मात्र तिच्या मनात काळजी आणि भितीने घर बनवले होते. तरीही आपली ड्युटी महत्वाची मानून ती तयार झालेली असते.
डॉक्टर प्रशांत व आदिती मि.चौहान च्या बायकोला O.T Ward मध्ये घेतात. औपरेशनला सुरवात होते, डॉक्टर आदिती देवाकडे प्रार्थना करत असते, तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात एक अनामिक भिती दडलेली असते. आजुबाजुला रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ चालूच असते. डॉक्टर आदितीने गणेश मुर्ती समोर आपले डोळे मिटलेले असतात, व ती प्रार्थना करत असते, तेवढयात मि.चौहान O.T Ward च्या बाहेर उभे राहतात.
मि. चौहान ना तिथे उभे पाहून डॉक्टर आदिती त्यांच्या जवळ जाते.
"डोंट वरी सर मैम नक्कीच ठिक होतील."
मि.चौहान वळून तिच्याकडे पाहतात.
"उनको ठिक होना ही पडेगा."
डॉक्टर आदिती मुकपणे नजर खाली करत मागे जाते, आणि एक अर्जंट call घेण्यासाठी मि.चौहान थोडे बाजूला जातात.
तेवढ्यातच O.T ward मध्ये गोंधळ ऐकू येतो. डॉक्टर आदिती धावत जात O.T ward च्या बाहेर उभी राहून पाहते. मि.चौहान च्या बायकोची कंडिशन खराब झालेली असते, तिचा श्वास वर-खाली होत असतो. डॉक्टर प्रशांत आपल्या परीने प्रयत्न करत असतात, पण काहीच होताना दिसत नसते. तेव्हा वेळेचे गांभीर्य ओळखून डॉक्टर आदिती O.T ward मध्ये प्रवेश करते.
डॉक्टर आदिती ने अचानक O.T ward मध्ये प्रवेश केलेला पाहून डॉक्टर प्रशांत स्तब्ध राहतात.
"डॉक्टर आदिती, व्हाय आर यु कम हिअर? इथे पेशंट ची कंडिशन क्रिटिकल बनत चालली आहे."
"आय नो डॉक्टर प्रशांत. बट प्लीज आता बोलण्यात वेळ नको. हरी अप."
डॉक्टर आदिती आल्यामुळे खरतर डॉक्टर प्रशांतना एकप्रकारचा धीर आलेला असतो. दोघेही मि.चौहान च्या बायकोला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, पण नियतीसमोर डॉक्टर तरी काय करणार? पल्समीटर अचानक स्टौप होतो. मि. चौहान च्या बायकोने अखेरचा श्वास घेतलेला असतो. खरतरं मि.चौहान नी आपल्या बायकोची कंडिशन ओळखून तिला ताबडतोब Admitt करायला पाहिजे होते, पण सरतेशेवटी दोष डॉक्टर वरच येणार होता. डॉक्टर प्रशांतच्या आयुष्यात ही वेळ पहिल्यांदाच आलेली असते. ओंजळीत चेहरा लपवत ते जवळच्याच खुर्चीत बसून रडू लागतात. डॉक्टर आदितीला त्यांची ही अवस्था पाहवत नसते. शेवटी डॉक्टर ही एक माणूसच आहे ना? जवळ जात ती डॉक्टर प्रशांतच्या खांद्यावर हा ठेवते.
"रिलॅक्स डॉक्टर प्रशांत. आपण त्यांना वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला, पण सगळचं शेवटी आपल्या हातात नसतं. प्लीज डोंट क्राय."
"डोंट क्राय आदिती? अगं माझ्या हातून एकाचे प्राण गेले आहेत. मि.चौहान असो वा कोणी दुसरं रुग्ण वाचणं महत्वाचं आहे. यु रिमेम्बर एकदा सिझेरियन औपरेशन ची क्रिटिकल केस आली होती, आणि आपण ती सक्सेसफुलही केली होती, त्यावेळी त्या महिलेच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ना, तीच तर आपल्या कामाची पोच पावती असते,आदिती."
"आय नो इट. पण डॉक्टर इज नौट अ जगलर. आपण काय करू शकतो?"
तेवढ्यात O.T ward च्या बाहेर डॉक्टर आदिती ला मि.चौहान दिसतात, तशी ती डॉक्टर प्रशांत त्यांना दिसणार नाही अशा रितीने त्यांना कव्हर करते.
डॉक्टर प्रशांत बोलत असतात.
"मी बाहेर जाऊन मि. चौहान ना सगळं खरं सांगणार आहे, आणि त्यांची माफी मागणार आहे."
डॉक्टर आदिती त्यांना अडवते, आणि त्यांना सांगते.
"डॉक्टर प्रशांत इथे डॉक्टर शशांक ही नाही आहेत. मी सर्व जबाबदारी घेते, मी बाहेर जाते."
"नाही नाही आदिती. आय एम अ डॉक्टर, आणि फेल्युअर ची जबाबदारी तुझ्यावर का?"
डॉक्टर आदिती डॉक्टर प्रशांतला आपल्या प्रेमाची शपथ देतात, आणि बाहेर मि. चौहान कडे जातात.
मि.चौहान O.T ward च्या बाहेरच उभे असतात, डॉक्टर आदिती ना पाहून ते मोठ्याने दरडावून विचारतात.
"अरे ओ डॉक्टर क्या हुआ?मेरी बिवी ठिक हुई या नही?"
डॉक्टर आदिती घाबरत खाली पाहते.
"अरे हम आपको कुछ पुछ रहे है, और वो डॉक्टर प्रशांत क्यो नही आये?"
अखेरीस धीर करून डॉक्टर आदिती मि.चौहान ना खरं काय ते सांगते. त्यावर मि.चौहान बिथरतात.
"अरे ओ डॉक्टर, क्या कह रही हो? मेरी बिवी मर गयी? कहा है वो डॉक्टर प्रशांत?सामने लावो उसको."
शेवटी गोंधळ ऐकल्यानंतर धीर करुन डॉक्टर प्रशांत मि.चौहान च्या समोर येतात. डॉक्टर आदिती थोड्याशा रागातच त्यांच्याकडे पाहते, तेव्हा डॉक्टर प्रशांत नजरेनेच तिचा राग शांत करतात.
मि. चौहान ची तळपायाची आग मस्तकात जाते, त्यांची माणसे हौस्पिटलची मोडतोड करु लागतात. मि. चौहान डॉक्टर प्रशांत च्या अंगावर धावून जातात. डॉक्टर आदिती वेळेचे गांभीर्य ओळखून मि.चौहान ना विनंती करते.
"मि. चौहान, प्लीज पेशन्स ठेवा. आम्ही पुर्ण प्रयत्न केला मैडम ना वाचवण्याचा, पण already उशीर झाला होता. पण माझी रिक्वेस्ट आहे तुम्हांला डॉक्टर शशांक ना इथे येउ दे. डॉक्टर प्रशांतचा निर्णय ते घेतील."
मि.चौहान डॉक्टर आदितीचे बोलणे मान्य करतात, पण आपला एक माणूस हौस्पिटलमध्ये ठेवून तडक निघून जातात. डॉक्टर प्रशांत आदिती कडे पाहत स्तब्ध उभे राहतात.
दोन दिवसांनी डॉक्टर शशांक दिल्लीतून प्रेस कौन्फरन्स आटोपुन परत येतात, कुठूनतरी त्यांना हौस्पिटलमध्ये घडलेली घटना समजलेली असते. डॉक्टर प्रशांत व डॉक्टर आदिती ला विश्वासात घेउन ते सगळं विचारतात. मि.चौहान डॉक्टर शशांक वर दबाव टाकायला लागतात.
चौकशी होते, चौकशी समिती समोर सर्व सदस्यांच्या समोर डॉक्टर प्रशांत माफी मागतात. मि. चौहानच्या दबावामुळे मनात नसतानाही डॉक्टर शशांक डॉक्टर प्रशांतचे मेडिकल लायसेन्स रदद करण्याचा निर्णय घेतात, परंतु डॉक्टर प्रशांत व आदिती त्याला कडाडून विरोध करतात. डॉक्टर प्रशांत ते हौस्पिटल सोडून जाण्याचा निर्णय घेतो. डॉक्टर आदिती त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते, पण शपथ देउन अखेरीस भावुक होत डॉक्टर प्रशांत तिथून बाहेर पडतात. ते कुठे जाणार ही गोष्ट फक्त डॉक्टर शशांक व आदिती ला माहीत असते, आणि ती गोष्ट ते कुणालाच सांगत नाहीत अगदी मि.चौहान ना ही नाही सांगत.
हौस्पिटलमधून बाहेर पडताना डॉक्टर प्रशांतने एक वाक्य म्हटलेले असते.
"आदिती. डॉक्टर आणि पोलिस २४ तास on duty असतात, आणि आपले कर्तव्य बजावतात. मी हे हौस्पिटल सोडून गेलो तरी डॉक्टर म्हणून कर्तव्य पार पाडायला विसरणार नाही"
कुठुनतरी हवेची एक मंद झुळूक येते, आणि ते शब्द वार्यावर विरल्यासारखे वाटतात. अचानक डॉक्टर आदिती ना जाग येते, त्या अमरावतीला पोचलेल्या असतात.
२.
अमरावतीच्या ओसाड माळरानावरून पुढे गेल्यानंतर डॉक्टर प्रशांतचा कैम्प उभा असतो. हातातील बैग सावरत डॉक्टर आदिती शोध घेत जात असतात. डॉक्टर प्रशांतनी घातलेल्या शपथेमुळे मनात असूनही ६ महिने तिला भेटता आलेले नसते. डॉक्टर प्रशांतनी अमरावतीत आल्यावर मोबाईल नंबरही बदललेला असतो.
बरेच चालल्यावर तिला शेवटी डॉक्टर प्रशांतचा कैम्प दिसू लागतो. क्षणभर नजरेसमोरून काही क्षणचित्रे सरकन निघून जातात.
एका प्रशस्त अशा जागेत मेडिकल कैम्प उभा असतो. डॉक्टर प्रशांत गोरगरीब रुग्णांची सेवा करून आपले कर्तव्य बजावत असतात. अनेक नवशिके डॉक्टर्स त्यांना असिस्ट करत असतात. डॉक्टर आदिती कैम्प मध्ये येते, तेव्हा डॉक्टर प्रशांत एका पेशंटला तपासत असतात. त्यांचे डॉक्टर आदिती कडे लक्ष नसते. काही वेळानंतर डॉक्टर प्रशांत नजर वर करून पाहतात, आणि समोर डॉक्टर आदीतीला उभे असलेले पाहून दचकतात.
"आदिती तु?तु इथे?"
"प्रशांत कसा आहेस?"
काही क्षण दोघेही स्तब्ध उभे राहतात. मग अचानक दोघांना जाणीव होते, आपण कैम्प मध्ये असल्याची. कैम्पच्या बाहेर दूरवर धुळीचा लोट आकाशात जात असतो. एखाद्या चित्राप्रमाणे द्रुश्य असते. शेवटी त्या शांततेला चिरत डॉक्टर प्रशांत बोलायला सुरवात करतात.
"आदिती कशी आहेस तु? आणि एवढ्या दिवसानंतर आज भेटावसं वाटलं तुला?"
डॉक्टर आदिती आजबाजूला पाहत बोलते.
"डॉक्टर प्रशांत आपण बर्याच दिवसांनी भेटलो, कुठेतरी बाहेर जाऊन बोलुया का?म्हणजे आपल्याला निवांतपणा मिळेल."
डॉक्टर प्रशांतलाही तिचं बोलणं पटतं. एका स्टुडंट कडे कैम्पची जबाबदारी देऊन ते दोघेही तिथून बाहेर पडून माळरानावर येतात. डॉक्टर प्रशांत व आदिती एकमेकांच्या डोळ्यात खोलवर पाहत असतात. हवेने माळरानावरील सुकलेली पाने दूर उडून जात असतात. डॉक्टर प्रशांत आदिती च्या नजरेतून दूरवर पाहत बोलतात.
"बोल आदिती, कशी आहेस तू? आणि इज तुला माझी आठवण कशी झाली?"
डॉक्टर आदिती डॉक्टर प्रशांत कडे पाहत असते, आणि तिने दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडतो, तिला रडताना पाहून डॉक्टर प्रशांत तिला आपल्या मिठीत सामावून घेतो. तशी डोळे पुसत बाजुला होत ती बोलते.
"प्रशांत, अरे तु विचारतोयस, मला तुझी आठवण का आली नाही? पण एवढे दिवस मला काय वाटलं असेल याचा विचार केलास कधी? तु घातलेल्या शपथेमुळे माझी इच्छा असूनही मला तुला भेटता आले नाही."
"ती वेळच तशी होती आदिती. मलाही तुझी आठवण कायम येत असायची, ट्रस्ट मी. पण मी माझ्या डॉक्टरी कर्तव्याला तिलांजली देऊ शकणार नव्हतो."
"प्रशांत आय नो इट. पण आता त्याच मि.चौहाननी हौस्पिटल बंद करण्याची धमकी दिलीय."
डॉक्टर प्रशांत निशब्द होतात, ते हौस्पिटल ही त्याची कर्मभूमी असते. त्याला आठवतात ते हौस्पिटल चे दिवस. तो पहिल्यांदाच घातलेला डॉक्टरी युनिफॉर्म. ते हौस्पिटल कोणा एकामुळे बंद पडू देणे डॉक्टर प्रशांतला मान्य नव्हते. आपण त्या हौस्पिटलला वाचवले पाहिजे. भले आपला जीव गेला तरी बेहत्तर, असा विचार करून तो डॉक्टर आदितीला सर्व सविस्तर सांगायला सांगतो. सर्व ऐकून घेतल्यावर मनाशी एक निश्चय करत तो डॉक्टर आदिती सोबत मुंबई ला जायला तयार होतो.
डॉक्टर प्रशांतला कैम्पचीही चिंता असतेच , इकडे येउन तिथल्या गरीब जनतेचे त्याने मिळवलेले प्रेम हीच त्याची शिदोरी असते. डॉक्टर सुरज नावाच्या हुशार, होतकरु तरुणाला कैम्पची जबाबदारी सोपवून साश्रु नयनांनी डॉक्टर प्रशांत त्या सर्वांचा निरोप घेऊन डॉक्टर आदिती सोबत मुंबई ला प्रयाण करतो.
३.
डॉक्टर प्रशांत आदिती सोबत मुंबई ला पोचतात. सिटी हौस्पिटल कडे जाणाऱ्या रोडवर त्यांच्या डोळ्यासमोर बर्याच आठवणी उभ्या राहतात. आपली डॉक्टर म्हणून पहिली सुरवात, आपण हाताळलेल्या केसेस, आजारातून बरे झाल्यानंतर पेशंटच्या चेहऱ्यावर येणारे हसू सगळे त्यांना आत्ता घडल्यासारखे आठवत असते. डॉक्टर आदिती चे मात्र बाहेर लक्ष असते, कारण डॉक्टर प्रशांत परत आल्याचे समजले तर मि.चौहान काहीही करू शकणार होते. डॉक्टर आदिती ला हौस्पिटल च्या पाळतीवर असलेला एक माणूस दिसतो, तसा संभाव्य धोका ओळखून डॉक्टर आदिती आपल्या एका पोलीस मित्राला मेसेज करते.
डॉक्टर प्रशांत अखेरीस हौस्पिटल मध्ये पोचतात. टैक्सीतून उतरल्यावर मंद मंद पावले टाकत, ते हौस्पिटल च्या मेन डोअर कडे येतात. त्यांची पावले काही काळ तिथेच अडखळतात, समोरून त्यांना युनिफॉर्म मधला तरुण प्रशांत दिसत असतो. डॉक्टर आदिती मागुन येत, त्यांना आत घेऊन जाते.
हौस्पिटलचा सर्व स्टाफ त्यांच्या स्वागतासाठी तयार असतो. स्टाफ चे, लोकांचे आपल्यावरील प्रेम पाहून डॉक्टर प्रशांतचे ह् दय गलबलून येते. तेवढ्यात डॉक्टर शशांक तिथे येतात. डॉक्टर शशांक ना पाहून डॉक्टर प्रशांत पटकन खाली वाकून पाया पडत असतात, पण डॉक्टर शशांक त्यांना वर उठवतात.
"वेलकम टु सिटी हौस्पिटल डॉक्टर प्रशांत, वेलकम बैक."
डॉक्टर शशांकसह तिथे असलेले सर्वजण भावुक होतात, आणि तेवढ्यातच मि. चौहान चा तिथे प्रवेश होतो. अचानक मि.चौहान ना पाहून डॉक्टर शशांक दचकतात. मि.चौहान मोठ्याने बोलतात.
"डॉक्टर प्रशांत. आ गये तुम? अब मेरे सिने मे जो आग है वो जरुर बुझेगी." असे म्हणत काही कळायच्या आत आपल्या बंदुकीतुन डॉक्टर प्रशांतवर नेम धरून गोळी चालवतात. प्रसंगावधान राखून डॉक्टर शशांक डॉक्टर प्रशांतला खाली वाकवतात. गोळी डॉक्टर प्रशांतच्या खांद्याला चाटून जाते. उपस्थित सर्वजण घाबरतात, तेवढ्यात डॉक्टर आदिती ने फोन करून बोलवलेला तिचा पोलिस मित्र रजत तेथे येतो. मि. चौहान च्या हातातील बंदुक काढून घेत, तो त्यांना अरेस्ट करतो. पण जाता जाता मि. चौहान ओरडत असतात.
"बच गया तु डॉक्टर. लेकिन छोडुंगा नही तुमको."
मि.चौहान ना पोलिस घेऊन जातात. डॉक्टर प्रशांतला O.T ward मध्ये नेले जाते. काही दिवसांनी त्यांची तब्येत बरी होते, पण ते पुर्ण बरे झालेले नसतात. डॉक्टर आदिती ला आपण उगाच डॉक्टर प्रशांतचा जीव धोक्यात घातला, असे वाटत असते.
अशीच ती एकदा डॉक्टर प्रशांतना ठेवलेल्या स्पेशल ward मध्ये येते. तिला पाहताच डॉक्टर प्रशांत सरसावून बसतात. बेडच्या बाजूच्या खुर्चीवर डॉक्टर आदिती संकोचून बसते, आणि नजर खाली झुकवत बोलायला सुरवात करते. समोरून खिडकीतून येणाऱ्या वार्यामुळे पडद्यांची हालचाल होत असते.
"आय एम रिअली सौरी प्रशांत, मला तुझा जीव धोक्यात घालायचा नव्हता."
"इटस All राईट आदिती. अगं डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य पार पाडणे, आणि आपल्या कर्मभुमीची आठवण ठेवणे हेच खरं आपल्या डॉक्टर लोकांच आयुष्य आहे. अग पोलीस आणि डॉक्टर असतातच on duty 24 तास."
डॉक्टर आदिती मान वर करून डॉक्टर प्रशांत कडे पाहत असते, तोच बाहेर बराच गलबला ऐकू येतो, तशी डॉक्टर आदिती उठून ward च्या दरवाज्यापाशी येते, आणि तिथून जाणाऱ्या एका मेल नर्सला विचारते.
"डॉक्टर आदिती एका भयानक व्हायरसने काही लोक अस्तव्यस्थ झाले आहेत. डॉक्टर शशांक ही तिथे पोहचले आहेत. "
डॉक्टर प्रशांत आपल्या बेडवरुन उठून उभे राहतात. त्यांना उभे राहिलेले पाहून डॉक्टर आदिती रागावते.
"डॉक्टर प्रशांत, कुठे चाललात? अजून तुम्ही पुर्णपणे बरे झालेला नाहीत. आणि तुम्ही ऐकलं ना तो एक भयानक व्हायरस आहे."
"डॉक्टर आदिती मी आता पुर्णपणे बरा आहे, प्लीज मला पेशंट्सना तपासू दे. it's my duty."
तेवढ्यात एकजण धावतपळत वर येत डॉक्टर आदितीशी बोलतो.
"मैडम, खाली आलेल्या पेशंट्स मध्ये एकाला खुपच इमर्जन्सी आहे. डॉक्टर शशांक नी तुम्हांला खाली बोलावलयं."
डॉक्टर आदिती व तो निरोप घेऊन आलेला त्या रुमबाहेर जाणार असतात, तेवढ्यात डॉक्टर प्रशांत त्याला पेशंटचे नाव विचारतात.
"सर तो मि.चौहानांचा भाऊ आहे, त्याचे नाव राजन चौहान."
मि.चौहान चे नाव ऐकताच का कोण जाणे, डॉक्टर प्रशांतच्या अंगात एकप्रकारे विजेचा संचार होतो. पटकन पुढे होत, तो आदिती ला थांबवतो.
"आदिती प्लीज मला जाऊ दे. आज खरी माझी व डॉक्टरी पेशाची परिक्षा आहे. मला थांबवु नकोस."
"डॉक्टर प्रशांत. हा व्हायरस नवीन आहे, तितकाच डेंजरसुध्दा. तुम्हांला त्याचा संसर्ग होऊ शकतो."
पण हे ऐकायच्या आधीच व्हायरस प्रतिबंधक पोशाख घालून डॉक्टर प्रशांत खाली जातात. जिकडे तिकडे व्हायरस पिडीत पेशंट असतात, त्यांना वेगवेगळ्या ward मध्ये नेले जात असते. डॉक्टर प्रशांत लगबगीने आपला जखमी हात सावरत डॉक्टर शशांक जवळ पोहोचतात. डॉक्टर शशांक मान वर करुन पाहतात, डॉक्टर प्रशांतला तिथे आलेले पाहून त्यांना बाजूला घेऊन समजावतात.
"डॉक्टर प्रशांत तुम्ही अजून पुर्ण बरे झाला नाहीत. मी तुम्हांला माझ्या सोबत join नाही करु शकत."
डॉक्टर प्रशांत कळकळीची विनंती करत बोलतात,"सर प्लीज. डॉक्टर आणि पोलिसांनी on duty 24 तास असायला हवं, हे तुम्हीच शिकवलतं ना सर? तुम्हांला ती केस आठवते सर? एक तरुण मुलगा मरणाच्या दारात असलेल्या आपल्या आईला घेऊन आला होता?"
डॉक्टर शशांक काहीसं आठवल्यासारखे करतात.
"हां हां ती केस तर खुप क्रिटिकल होती, पण तुमच्या प्रयत्नांमुळे त्या तरुणाच्या आईला आपण वाचवू शकलो, तेव्हा त्या तरुणाच्या व तिच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद मी कसा विसरु शकेन?"
डॉक्टर प्रशांत पुढे होत विश्वासाने डॉक्टर शशांक ना पाहतात.
"Exactly Sir. तोच आनंद माझं बक्षिस आहे, आणि तो माझा हक्कही आहे. तुम्ही माझ्यापासुन तो आनंद, तो हक्क हिरावून नाही घेऊ शकत."
डॉक्टर शशांक ना काय बोलावे तेच समजतं नसते. Ambulance च्या सायरनचे, रुग्णांच्या नातेवाईकांचे रडण्याचे, "डॉक्टर पाहा हो, वाचवा हो" चे आवाज वाढतच असतात. काही वेळ विचार करून डॉक्टर शशांक त्यांना आपल्या सोबत join करतात.
४.
डॉक्टर शशांक डॉक्टर प्रशांत सोबत मि.चौहान च्या भावाची केस हैंडल करतात. त्याला oxygen ची गरज असते. डॉक्टर प्रशांत त्याला oxygen provide करतात. तब्बल अर्धा तास तिथे थांबून डॉक्टर प्रशांत व डॉक्टर शशांक त्या व्यक्ती ची कंडिशन स्टेबल करतात.
जेव्हा ते त्या ward मधून बाहेर पडतात, तेव्हा डॉक्टर आदिती त्यांच्यासमोर येते. डॉक्टर शशांक तिथून थोडे पुढे जातात. डॉक्टर आदितीला डॉक्टर प्रशांतचा अभिमान वाटत असतो, ती हसत त्यांच्याशी काही बोलणार, तोच चक्कर येऊन ते खाली कोसळतात. डॉक्टर शशांक मागे वळून तिकडे धाव घेतात. डॉक्टर आदिती प्रशांतला हात लावायला जाणारच असते, तोच तिला रोकत इमर्जन्सी डॉक्टर प्रशांतला एका special ward मध्ये shift करतात. पेशंटचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात डॉक्टर प्रशांतना त्या भयानक व्हायरसचा संसर्ग झालेला असतो.
डॉक्टर प्रशांत वर त्या हौस्पिटल चे Expert डॉक्टर उपचार सुरु करतात. व्हायरस संसर्गामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असतो. हौस्पिटलचा बाकी स्टाफ आणि तिथे Admitt असलेले रुग्णही डॉक्टर प्रशांत ठिक व्हावेत, म्हणून देवाकडे प्रार्थना करत असतात. डॉक्टर प्रशांत वरील एवढे प्रेम पाहून डॉक्टर शशांक व आदिती चे डोळे भरुन येतात.
अमरावती च्या त्यांच्या मेडिकल कैम्प मध्येही ही बातमी कळालेली असते, तेव्हा आपल्या लाडक्या डॉक्टर ला भेटायला अमरावतीहून फक्त डॉक्टर्सच नव्हे, तर डॉक्टर प्रशांत कडून उपचार घेतलेले लोकही आलेले असतात. व्हायरस संक्रमण होऊ नये याची पुरेपूर काळजी घेत, ते डॉक्टर प्रशांतसाठी देवाजवळ प्रार्थना करत बसून राहतात.
कुठूनतरी या गोष्टीची खबर मि.चौहान ना समजलेली असते. आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर प्रशांतने आपल्या भावाचा प्राण वाचवला, याचे त्यांना मनापासून कौतुक वाटत असते, आणि आपल्या अहंकारामुळे एका चांगल्या डॉक्टर वर गोळी चालवली याचा पश्चाताप होत असतो.
पोलिसांकडून सवलत घेऊन मि.चौहान एका पोलिस हवालदारासोबत हौस्पिटलमध्ये येतात. हवालदार बाहेरच थांबतो. मि.चौहान आतमध्ये प्रवेश करतात. आजबाजूला डॉक्टर प्रशांत ठिक व्हावेत म्हणून प्रार्थना करणारी माणसं त्यांना दिसतात. तशातही तिथले इतर डॉक्टर्स आपले कर्तव्य बजावत असतात, हे पाहून मि. चौहान च्या मनाची घालमेल होते. मंद मंद पावले टाकत, ते डॉक्टर प्रशांतच्या ward बाहेर येतात. नकळत देवासमोर डॉक्टर प्रशांत ठिक व्हावेत यासाठी त्यांचे हात जोडले जातात, अश्रुचे थेंब खालच्या फरशीवर पडून विरलेले असतात.
काही दिवसांनी डॉक्टर प्रशांत व्यवस्थित बरे होतात, तेव्हा सर्वप्रथम मि. चौहान त्यांना भेटायला येतात. हात जोडून मि. चौहान त्यांची माफी मागतात. डॉक्टर शशांक व डॉक्टर आदिती ना मि.चौहान मधील हा बदल पाहून हायसे वाटते. डॉक्टर प्रशांत हसत त्यांच्या कडे पाहतात, तेव्हा डॉक्टर शशांक बोलायला सुरवात करतात.
"पाहिलतं मि. चौहान. एक डॉक्टर आपली ड्युटी किती प्रामाणिकपणे करू शकतो. डॉक्टर्स काही देव नाहीत, की जे सगळ्याच पेशंटना वाचवू शकतील, पण आपले २४ तास ते ड्युटीसाठी देत असतात."
मि. चौहान डॉक्टर प्रशांतना मिठी मारतात.
"सही है डॉक्टर शशांक. दुनिया मै दो तरह के लोग होते है. एक जो अपने के लिए जिता है, और दुसरा जो दुसरों के लिए. आप डॉक्टर्स उन दुसरे लोगोंमेसे हो. सच मै डॉक्टर्स होते है,
On duty २४ तास.
...................................................................................

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा