पोस्ट्स

टाईम स्टोरी

इमेज
     "अरे अर्णव, चल ना त्या गुहेकडे परत जाऊ!"             "असीम ती गुहा काय भयानक आहे बघितलंय ना?"        "अरे पण एकदाच जाऊया, तिथे काहीतरी नक्कीच सापडेल बघ."         अर्णव व असीम माऊंट आबुच्या एका विशालकाय गुहेत शिरले होते, पण घाबरुन त्यांच्या चड्ड्या ओल्या झाल्या होत्या. अर्णव ला माञ वाटत होतं, की तिथे नक्कीच काहीतरी सापडेल. गुप्त धन, खजाना किंवा आणखी काही!😲               दोघे पुन्हा एकदा मोठ्या कष्टाने त्या गुहे जवळ गेले. "यार असीम चल मागे फिरुया मला जाम भिती वाटते अशा गुहेची." "अरे दिवसाउजेडी कसला भितोस? चल आत." असीम चा उत्साह दांडगा होता. त्याने अक्षरक्षः अर्णव ला आत ढकलले. गुहेतील वटवाघळे त्या दोघांच्या डोक्यावरनं गेली. "मम्मी मम्मी..." अर्णव ने असीमच्या कुशीत उडी घेतली. "अरे वटवाघळे आहेत ती! ड्रॅक्युला नाहीत.😆"             असीम व अर्णव पुढे पुढे जात...

आदिशक्ती

इमेज
                           दुर्गा आणि पार्वती दोन्ही जुळ्या बहिणी. राजापुरमधील आनंद देशमुख यांच्या मुली. आनंद देशमुख एक सरकारी निव्रुत्त अधिकारी.          दुर्गा स्वभावाने खुप कडक तर पार्वती मवाळ, पण दोन्ही एकञ चालु लागल्या की पाहणाऱ्यांना ओळखणं कठीण होई.          दोघीही कॉलेज पुर्ण करुन एकञच एमबीए ची तयारी करत होत्या. वेळ- सकाळी १०.०० - आनंद देशमुख यांचे घर     "दुर्गा, दुर्गा उठ. कॉलेजला जायचं नाहीये का?" पार्वती बेडवरून तिला उठवत होती. "काय गं मला झोपु पण देत नाहीस." डोळे न उघडताच दुर्गा बोलली. "अगं दुर्गे आज तो येणार आहे म्हटलं." पार्वती ने असं म्हणताच दुर्गा दचकत खाडकन बेडवर उठुन बसली. "काय? यु मीन तो?" पार्वती मान डोलवते.         तो. त्याच्या बोलण्यातच एक रुबाब आहे. तो ज्याच्यावर सगळ्या मुली लट्टु व्हायच्या. तो अगदी हैंडसम हंक, डॅशींग पण तेवढाच सगळ्यांना हवाहवासा वाटणारा शिवा....
इमेज
                    मेघमल्हार- एक रांगडी प्रेमकहाणी नमस्कार वाचकहो! मी आज एक नवीन प्रेमकथा सुरु करणार आहे. ही कथा आहे नात्यातल्या ओलाव्याची , बहरणाऱ्या प्रेमाची. मेघना- मल्हारची. एक रांगडेपण , एक स्वच्छंदीपण आणि एक विश्वासघात........! ----------------------------------------------       सातारा जिल्ह्यातील कोरेगाव. सकाळची वेळ. शेठ हिराचंदानींच्या फुड फैक्टरीतील एका गोदामासमोर भरपुर गर्दी होती. एक मोठा ट्रक उभा होता , आणि गडी त्यातुन सामान उतरत गोदामात पोहचवत होते. " ए चला चला आवरा पटकन." गोदामाचा खडुस मैनेजर जळफळत होता. एक म्हातारासा गडी कसाबसा सामान उचलण्याचा प्रयत्न करत असतो , पण त्याला ते जमत नसते. " अरे ए चल लवकर. काही काम करायला नको. आयता पगार पाहिजे." म्हणत तो मैनेजर आगपाखड करत होता. तेवढ्यात एक अंगापिंडाने बळकट , भारदस्त तरुणाने त्या म्हाताऱ्याकडील सामान उचलले आणि मैनेजरच्या देखत गोदामात सामान नेऊन ठेवले. " लयी उपकार झाले बाबा तुझे." म्हातारा गडी हात जोडत बोलु लागला. मैनेजर मात्र रागाने दोघांकडे पाहत...