पोस्ट्स

ये रिश्ता क्या कहलाता है!

इमेज
 (सदर कथेचा उद्देश हा केवळ निखळ मनोरंजनाचा असुन मुळ कलाक्रुतीचा अपमान व्हावा हा नाही. तरी वाचकांनी गंमत म्हणुन या कथेचा आस्वाद घ्यावा.) "अगे बाये, ह्या वटवाघुळ खयसुन इला हा घरात?" खालच्या अवाटातली उषाची आवस करवादली( ओरडली). "अगे इला असताला खयसुन तरी. हाकल तेका." उषा "अगो दोन दिवसापासून येता मगो ता."उषाची आवस चुलीत लाकडा सारत बोलली.       उषा काय बोलाक नाय. भायर पडयेत जावन बसला. तितक्यात बाजूच्या घरातला मेघला इला. "अगो उषे, तिया हय बसलय? चल मगो'ये रिश्ता क्या कहलाता है' बघुक." "अगे बाये. होय गो होय. चल जावया. गे आये येतय हा जावन मिया." म्हणत उषा भायर पडता.      थडे समोरच्या झाडार- "च्या मारी ह्या पोराचो दोन दिवस झाले पिछो करतय, तरी माका ओळख दाखयना नाय." रामु वटवाघुळ उल्टो होवन फ्रेंडाक सांगत असता. "होय रे, तिया जसो काय मोठो हिरोच मरे. अरे ता माणुस, तिया वटवाघुळ. रिश्तो कसो जुळतलो?'" फ्रेंड. "अरे होतला बरोबर. जुळतलो आमचो रिश्तो." रामु तावातावानं बोलाक लागता. "ए राम्या ता बघ उषा जात...

द डायरी ऑफ लोस्ट व्हिलेज

इमेज
                          आज मी लिहायला बसलो आहे, पण काय लिहायचं हा प्रश्न मनात येतो आहे. माझ्या २५ वर्षांच्या सरकारी नोकरीत मला बरेच चांगले वाईट अनुभव आले, ते मांडायचे का? पण मन भुतकाळात शोध घेऊ लागले. तेव्हा मला सापडले असे एक गाव ज्याच्याविषयी लिहावेसे वाटेल.             मी राजाराम म्हात्रे. मुंब ईत महानगरपालिकेत अधिकारी आहे. माझ्या सोबत माझे खास सहकारी दामोदर देशमुखही होते. तसं सरकारी असुनही आम्ही शक्य तेवढ्या जलद कामांचा निपटारा करत असे. एकदा आमच्या विभागात एक नवीन अधिकारी बदलून आला, सोमनाथ कुलकर्णी. अतिशय शिस्तबद्ध आणि रेखीव काम व नवनवीन सुधारणांवर त्याचा भर होता. आमचं हळूहळू त्यांच्याशी जमत होतं. त्यांच्याकडुनच समजलं की ते ज्या गावातून आले तिथे तर काम करण्याची, एवढचं काय बाकीच्या गोष्टीही जगापेक्षा भारी व वेगळ्या आहेत. त्या गावाचं नाव होतं नवेगाव.         ते गाव मुंब ई पासुन १०० एक किलोमीटर वर होतं. साहेबांकडून त्याच्याविषयी ऐकताना तिकडे एखादी सहल काढावी असा विचार मना...