एक अनुभव असाही " बीप बीप " असा कुठूनतरी आवाज ऐकु आला, आणि मन पटकन भुतकाळातील एका कटु अनुभवाकडे वळले. २०२१ मधील सप्टेंबरची ३० तारीख. मला आठवतो तो दिवस, गोपाळकाला होता त्या दिवशी. सुटटी असल्याने मी घरीच होतो. मी पंचायत समिती कुडाळमध्ये कर्मचारी असल्याने कुडाळातच भाडयाने राहत होतो. काहीतरी काम आलं म्हणून मी लगबगीने खाली गेलो, काम आटोपलं आणि वेगाने जिना चढत रुमकडे आलो. अचानक काय झालं काही कळलं नाही. छातीत प्रचंड वेदना जाणवल्या, पाठीत पण खुप दुखु लागले. कसाबसा मी खाली झोपलो , पण कळा थांबत नव्हत्या. माझी दोन्ही लहान मुलं, त्यांना काही कळालं नाही. त्यांनी माझ्या बायकोला बोलावलं, तेव्हा लगेच मला हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. निदान झालं, मला सौम्य ह्रदयविकाराचा झटका आला होता. माझं वय ३२. सगळेच अवाक झाले. एवढया लहान वयात हार्टअटॅक. कोणी काही, कोणी काही बोलत होतं. शेवटी डॉक्टरांच्या सल्ल्याने मला तातडीने कोल्हापूरच्या ॲपल...