लॅपटॉप-शोध मनाचा
(पडदयावरील पात्रे- तात्या,शांताक्का, पोस्टमन,जेनी, हरी, जेन (छोटा मुलगा)) --------------------------------------------------------------------------------------------------------- पहिला अंक (पडदा उघडतो, उजेडामध्ये स्टेजच्या मध्यभागी एक मध्यमवयीन गृहस्थ हातात पेन व डायरी घेऊन बाकडयावर बसलेला आहे. काहीतरी आठवून तो डायरीमध्ये लिहित आहे. दूरवरुन कुठेतरी सू सू असा वारा वाहण्याचा आवाज ऐकू येत आहे.) (स्वगत) मला आठवते, ती संध्याकाळ, जेव्हा तात्या नेहमी आम्हांला देवांच्या, क्रांतीकारकांच्या साहसांच्या, पराक्रमी पुरुषांच्या कथा सांगायचे. तात्या, माझे वडिल. स्वच्छ धोतर, वर बनियन घालुन डोक्यावर सदैव पांढरी टोपी तिरकी घालणारे. मला आजही आठवतोय तो घराचा व्हरांडा, आणि तो झोपाळा. ज्याच्यावर बसून तात्...