पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बाप-मुलीचे नाते

इमेज
                                  ऊन्हाच्या निथळत्या धारात एक माणुस लोहाराच्या भात्यावर कोयत्याला धार काढत असतो. घणाचे घाव घालताना पटकन त्याचा घाव बोटांवर पडतो, असह्य वेदना तो आओठ आवळत सहन करतो, तेवढ्यात समोरून जाणारा माणूस त्याला 100 ची नोट दाखवतो, आपल्या रक्ताळलेल्या बोटांकडे पाहून तो काम सुरू करतो, कारण पा पा असे म्हणत त्याची तान्हुली पाणी बोटल घेऊन आलेली असते, ती तान्हुली हेच त्याचे जिवन असतं. –--–----–---------–----------------------------–---------------------            मुलींना ओझे समजणाऱ्या लोकांना हेच सांगु इच्छितो, की तुम्ही कामावर जाताना पाण्याची बाटली, डबा, बैग मुलगीच आणुन देऊ शकते. तुम्हांला दुखलं खुपलं तर तीच तुमचे डोळे पुसु शकते. गर्व आहे मला मी एका मुलीचा बाप आहे. प्रथा पध्दतींंमध्ये त्यांना अडकवून ठेवू नका. जी मुलांना सांभाळू शकते ती जगही पुरुषांपेक्षा उत्तम चालवू शकते, तरीही अजून त्यांच्या बद्द्ल दुजाभाव का?...

माझी केरळ भ्रमंती 2016

इमेज
                                     देवाला पडलेले एक सुंदर स्वप्न म्हणजे केरळ. माडांची वने आणि हिरवीगार शेती यांनी सजलेले मळे अशी वेगळी ओळख आहे या राज्याची. अशा या निसर्गरम्य परिसराला या वर्षीच्या जानेवारी महिन्यात भेट दिली. मी माझी पत्नी व मुलगा असे तिघेचजण मंगला एक्सप्रेस ने कणकवलीतून एर्नाकुलम जंक्शनला पोहोचलो.              तब्बल 16 तासांचा प्रवास, एक वेगळी अनुभुती देऊन गेला. थोडासा कंटाळा, थोडासा उत्साह अशातच शेवटी केरळमध्ये पोहोचलो, त्यावेळी सकाळचे जवळजवळ 11.00 वाजले होते. एर्नाकुलम स्टेशन बरेच मोठे आहे, तेथल्या पाय-या उतरताना समजले की एर्नाकुलम टाऊन हे मागचे स्टेशन होते, कारण आम्ही बुक केलेली खोली तिकडेच होती. मग तिथून थोडेसे चालत चालत आम्ही आमच्या ईप्सित स्थळी ए.व्ही रेसिडन्सी मध्ये पोहोचलो.               हॉटेलमधील सोय तर का...