पोस्ट्स

क्रुपासिंधु

इमेज
                         ते दोघे पती-पत्नी आपली तक्रार घेऊन अक्कलकोट मध्ये स्वामींकडे आले होते. वटवृक्षाच्या बुंध्याशी बाळाप्पा स्वामींची सेवा करत होता. उजव्या कुशीवर स्वामी विश्रांती घेत होते. स्वामींचे रुप अतिशय तेजस्वी जणु आकाशी चा सुर्य. त्या दोघा पती पत्नी च्या चेहऱ्यावर एकमेकांबद्दल व्देष दिसत होता. दोघेही हात जोडून स्वामीं समोर उभे होते. स्वामींनी डोळे उघडले आणि ते उठून बसले. "स्वामी, स्वामी" करत दोघेही पुढे आले. "अरे श्रीपती क्यों आये हो इधर?" "स्वामी तुम्हाला तर माहितीच आहे, मी एवढं करतो तरी हिचं कायम माझ्याशी भांडण......" "अहाहा आणि तुम्ही काय धुतल्या तांदळा सारखे आहात काय! " मैना ही उखडली.       स्वामींनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि हसले. "श्रीपती, मैना बाई अरे बहोत टेढी चीज होती है घर गृहस्थी संभालना." स्वामी उभे राहिले. बाळाप्पा आणि ते दोघे घाबरले. स्वामी सरळ चालत झाडाकडे आले. जवळच बाळाप्पा ची कुदळ पडलेली होती, स्वामींनी ती उचलली, आणि कुदळीचा नुसता दांडा हातात घेत त्याने जमीन खणु लागले. "स्वामी हे काय करताय?&q

...............आणि जेव्हा त्याने पाहिले.......!😠😠😡

इमेज
          "  शी! काय ही घाण." आनंदराव रस्त्यावरुन जाताना बडबडत होते. सोबत त्यांची पत्नी आनंदी व मुलगा आदित्य होते. "काय बाई लोकं कशी पचापचा थुंकतायेत."आनंदी वैतागत बोलते. "पण बाबा सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर थुंकण्याला दंड असतो ना?" छोट्या आदित्यने कुतुहुलाने विचारलं. "हो पण तो नियम आपल्या देशात कोणं पाळतो? अरे इथे लोक सगळे नियम धाब्यावर बसवुन स्वतः चीच मनमानी करतात."  "शी! अहो सांभाळून चला. काय थुंकलीयेत ही लोकं. यापेक्षा जनावरे बरी." आनंदी रस्त्यावरुन कसरत करुन चालता चालता बोलते.  "या लोकांना बोलणारं कोण नाही.जनावरे तरी बरी म्हणावं लागेल."  "एकीकडे स्वच्छता स्वच्छता म्हणुन जनजागृती करायची. आणि दुसरीकडे रस्त्यावर ही घाण, सार्वजनिक बाथरुममध्ये गेलो तर कधी पाणी नसतं, तर कधी...." आनंदराव बोलत असतात. "अहो पुरे पुरे. तुम्ही सार्वजनिक बाथरुम, टॉयलेट सांगितलं खरं पण मला उलटी यायला लागलीय आता." तोंडावर हात ठेवत आनंदी बोलते. "पण बाबा हे कोणीतरी बदलायला हवं की नको." आदित्य मध्येच थांबत बोलतो. "अरे तु

अंधश्रद्धा

इमेज
           रितेश चं काव्याशी नुकतंच लग्न झालं होतं. काव्या दिसायला सुंदर, स्वभावाने चांगली होती. रितेश चिडचिडा होता, पण काव्यावर मनापासून प्रेम करणारा होता.        काव्याची सासु देवभोळी होती. बुवाबाजी, तंज्ञमंञ, चमत्कार असल्या भाकड गोष्टींवर तिचा विश्वास होता. लग्नानंतर काही दिवसांनी एकदा काव्याच्या पोटात दुखु लागले, तिला मासिक पाळीचा ञास होत होता. रितेशला काय यातलं माहिती नव्हतं. तो काय करणार? सासु म्हणजे रितेशची आई बडबडायला लागली. "आमच्या घराण्यात असा ञास कोणाला नाही बघ." रितेश डॉक्टर बोलवायला जात होता, तिने थांबवलं. "अरे थांब हिला बाबांकडे घेऊन जाऊया."  "कोण बाबा? कुणाचे?"  "अरे कुणाचे बाबा काय? हे आपले कुडाळ मठात आहेत ते."  "अगं तुझं काय डोकं फिरलयं का? मी डॉक्टरला बोलवतो."      काव्याची सासु रितेशला तशीच उठवते, पोट दुखत असताना आणि रितेशचं काही न ऐकता तिला रिक्षातून घेऊन जाते. रितेश गडबडीने बाहेर पडुन तिच्या मागोमाग जाऊ लागतो दुसऱ्या रिक्षेने.        बाबांचा मठ. बरेच शिष्यगण जमलेत. बऱ्याच लोकांची गर्दी, पाहणाऱ्याला वाटावे बाबा म्हणज

टाईम स्टोरी

इमेज
     "अरे अर्णव, चल ना त्या गुहेकडे परत जाऊ!"             "असीम ती गुहा काय भयानक आहे बघितलंय ना?"        "अरे पण एकदाच जाऊया, तिथे काहीतरी नक्कीच सापडेल बघ."         अर्णव व असीम माऊंट आबुच्या एका विशालकाय गुहेत शिरले होते, पण घाबरुन त्यांच्या चड्ड्या ओल्या झाल्या होत्या. अर्णव ला माञ वाटत होतं, की तिथे नक्कीच काहीतरी सापडेल. गुप्त धन, खजाना किंवा आणखी काही!😲               दोघे पुन्हा एकदा मोठ्या कष्टाने त्या गुहे जवळ गेले. "यार असीम चल मागे फिरुया मला जाम भिती वाटते अशा गुहेची." "अरे दिवसाउजेडी कसला भितोस? चल आत." असीम चा उत्साह दांडगा होता. त्याने अक्षरक्षः अर्णव ला आत ढकलले. गुहेतील वटवाघळे त्या दोघांच्या डोक्यावरनं गेली. "मम्मी मम्मी..." अर्णव ने असीमच्या कुशीत उडी घेतली. "अरे वटवाघळे आहेत ती! ड्रॅक्युला नाहीत.😆"             असीम व अर्णव पुढे पुढे जातात. "अरे येथुन पुढे तर काहीच दिसत नाहीये." चाचपडत असीम बोलतो. अर्णव त्याच्या खिशातून टॉर्च बाहेर काढतो, आणि असीमच्या डोक्यावर टपली मारतो. &quo

आदिशक्ती

इमेज
                           दुर्गा आणि पार्वती दोन्ही जुळ्या बहिणी. राजापुरमधील आनंद देशमुख यांच्या मुली. आनंद देशमुख एक सरकारी निव्रुत्त अधिकारी.          दुर्गा स्वभावाने खुप कडक तर पार्वती मवाळ, पण दोन्ही एकञ चालु लागल्या की पाहणाऱ्यांना ओळखणं कठीण होई.          दोघीही कॉलेज पुर्ण करुन एकञच एमबीए ची तयारी करत होत्या. वेळ- सकाळी १०.०० - आनंद देशमुख यांचे घर     "दुर्गा, दुर्गा उठ. कॉलेजला जायचं नाहीये का?" पार्वती बेडवरून तिला उठवत होती. "काय गं मला झोपु पण देत नाहीस." डोळे न उघडताच दुर्गा बोलली. "अगं दुर्गे आज तो येणार आहे म्हटलं." पार्वती ने असं म्हणताच दुर्गा दचकत खाडकन बेडवर उठुन बसली. "काय? यु मीन तो?" पार्वती मान डोलवते.         तो. त्याच्या बोलण्यातच एक रुबाब आहे. तो ज्याच्यावर सगळ्या मुली लट्टु व्हायच्या. तो अगदी हैंडसम हंक, डॅशींग पण तेवढाच सगळ्यांना हवाहवासा वाटणारा शिवा. शिवा प्रतापराव पवार.                दुर्गा झटपट तयार झाली. पार्वती दुरुनच तिला पाहत होती. खरंतर तिचं मन अनावर शिवाकडे ओढ घेतं होतं, पण दुर्गा वेड्यासारखी शिव